विभक्ती व त्याचे प्रकार
- नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.
- नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात.
- नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.
- प्रथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत – कर्ता
- व्दितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते – कर्म
- तृतीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण
- चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते – संप्रदान
- पंचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान
- षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध
- सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ – अधिकरण
- संबोधन – नो – संबोधन
विभक्तीचे अर्थ :
1) कारकार्थ/ कारकसंबंध
वाक्यातील नाम/सर्वनाम यांचे क्रियापदांशी जे संबंध असतात, त्यांना ‘कारकार्थ’ असे म्हणतात. तसेच क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध असतात त्यांना ‘उपपदार्थ’ असे म्हणतात.
विभक्तीचे मुख्य 6 कारकार्थ आहेत
- कर्ता
- कर्म
- करण
- संप्रदान
- अपादान (वियोग)
- अधिकरण
1) कर्ता –
- क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा कोणीतरी असतो, त्यास ‘कर्ता’ असे म्हणतात. कर्त्यांची विभक्ती केव्हा-केव्हा प्रथमा असते.
- प्रथमेचा प्रमुख असते. प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता असतो.
- उदा. राम आंबा खातो.
2) कर्म –
- कर्त्यांने केलेली क्रिया कोणावर तरी घडलेली किंवा घडते हे सांगणारा शब्द म्हणजे ‘कर्म’ होय.
- हे प्रत्यक्ष कर्म असते याची विभक्ती व्दितीया असते.
- व्दीतीयेचा प्रमुख कारकार्थ कर्म असतो.
- उदा. राम रावणास मारतो.
3) करण –
- वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते त्याला ‘करण’ असे म्हणतात.
- करण म्हणजे क्रियेच साधन.
- उदा. आई चाकूने भाजी कापते.
- या वाक्यात कापण्याची क्रिया चाकू या साधनाने होत आहे. म्हणून चाकूने या शब्दांची विभक्ती तृतीया असून तृतीयेचा मुख्य कारकार्थ करण होय.
4) संप्रदान –
- जेव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान (कोणतीही वस्तू) ज्याला करण्यात येते त्या शब्दाला किंवा क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला व स्थानाला ‘संप्रदान’ असे म्हणतात.
- दान देण्याची क्रिया ज्याच्यावर होते त्याला ‘संप्रदान’ असे म्हणतात.
- उदा. मी गुरुजींना दक्षिणा दिली.
- या वाक्यात दान देण्याची क्रिया गुरुजी या शब्दावर होत असून त्याची विभक्ती चतुर्थी व चतुर्थीचा मुख्य कारकार्थ संप्रदान होय.
- आजीने नातीला गोष्ट सांगितली.
- गुरुजी मुलांना व्याकरण शिकवतात.
5) आपदान (वियोग) –
- क्रिया जेथून सुरू होते तेथून ती व्यक्ती व वस्तू दूर जाते म्हणजे क्रियेच्या संबंधाने त्याच्यापासून एखाधा वस्तूचा वियोग दाखविण्याचा असतो त्यास ‘अपादान’ म्हणतात.
- उदा. मी शाळेतून आताच घरी आलो.
- या वाक्यातील शाळेतून या शब्दातून अपादानाचा अर्थ व्यक्त होत असून त्याची विभक्ती पंचमी ही असून पंचमीचा मुख्य कारकार्थ अपादान हा होय.
6) अधिकरण (आश्रय/ स्थान) –
- वाक्यातील क्रिया कोठे किंवा केव्हा घडली हे क्रियचे स्थान किंवा काळ दर्शविणार्या शब्दांच्या संबंधास ‘अधिकरण’असे म्हणतात.
- उदा. दररोज सकाळी मी शाळेत जातो.
- या वाक्यातील सकाळी व शाळेत हे शब्द अनुक्रमे क्रियेचा काळ व शाळेत हे शब्द क्रियेचे स्थळ दर्शवित असून त्यांची विभक्ती सप्तमी ही आहे व त्या सप्तमीचा मुख्य कारकार्थ अधिकारण हे आहे
2) उपपदार्थ :
- नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध असतात त्यांना ‘उपपदार्थ’ असे म्हणतात.
- उदा. आमच्या वर्गातील मधुने शाळेचे सुवर्णपदक जिंकले.
- वाक्यातील उद्देश: आमच्या वर्गातील मधुने.
- वाक्यातील विधेय: शाळेचे सुवर्णपदक जिकले.
सामान्य रूप :
विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी तसेच शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी नाम किंवा सर्वनामाच्या मूळ स्वरुपात जो बद्दल होतो त्याला ‘सामान्य रूप’ असे म्हणतात.
उदा.
- घोडा: घोड्यास, घोड्याला, घोड्याने, घोड्याचा.- या सर्व शब्दांमध्ये ‘घोड्या’ हे सामान्यरूप.
- पाणी: पाण्यास, पाण्याला, पाण्याने, पाण्याचा – या सर्व शब्दांमध्ये ‘पाण्या’ हे सामान्यरूप.
पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप :
1. ‘अ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे रूप ‘आ’ कारान्त होते.
उदा.
- खांब-खांबास,
- काळ-काळास
- निर्णय-निर्णयास/निर्णयाने
- दोर-दोरास/दोराने
- बाक-बाकास/बाकाला.
2. ‘आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ‘या’ कारान्त होते.
उदा.
- घोडा-घोड्यास, घोड्याला
- दोरा– दोर्यास, दोर्याने
- पंखा-पंख्याला, पंख्यास
अपवाद: आजोबा, दादा, काका, मामा, राजा, यांचे सामान्यरूप होत नाही.
3. ‘ई’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ‘या’ कारान्त होते.
उदा.
- धोबी-धोब्याला, धोब्यास
- तेली-तेलीला, तेल्यास
- माळी-माळीला, माळ्यास
अपवाद : हत्ती, नंदी, पंतोती, मुनी, ऋषी, भटजी.
4. ‘ऊ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ‘वा’ कारान्त होते.
उदा.
- भाऊ-भावास, भावाचा
- विंचू-विंचवास, विंचवाला
- नातू-नातवाला, नातवास.
5. ‘ए’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ‘या’ कारान्त होते.
उदा.
- फडके-फडक्यांचा
- गोखले-गोखल्यांचा
- फुले-फुल्यांचा
6. ‘ओ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ‘ओ’ कारान्त राहते.
उदा.
- किलो-किलोस, किलोला
- धनको-धनकोस, धनकोला
- हीरो-हीरोला, हिरोस.
स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप :
1.‘अ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात ‘ए’ कारान्त होते व अनेकवचनात ‘आ’ कारान्त होते.
उदा.
- वीट-विटेस, विटेला, विटांना, विटांचा.
- जीभ-जीभेस, जिभेला, जिभांचा, जिभांना
- सून-सुनेस, सुनेला, सुनांना, सुनेचा.
2. काही वेळा ‘अ’ कारान्त स्त्रीलिंग नामाचे सामान्यरूप ‘ई’ कारान्त होते.
उदा.
- भिंत-भिंतीस, भिंतीला, भिंतीचा
- विहीर-विहिरीस, विहिरीला
- पाल-पालीस, पालीला
3. ‘आ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप ‘ए’ कारान्त होते.
उदा.
- शाळा-शाळेत, शाळेस, शाळेला.
- भाषा-भाषेत, भाषेस, भाषेचा.
- विधा-विधेस, विधेला, विधेचे
4. ‘ई’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनात ‘ई’ कारान्त व अनेकवचनात ‘ई’ कारान्त किंवा ‘य’ कारान्त होते.
उदा.
- भक्ती-भक्तीने
- नदी-नदीस
- स्त्रि-स्त्रिस, स्त्रिया, स्त्रियांचा
- बी-बीस, बियांचा
- दासी-दसींचा, दासीला
- पेटी-पेटीस, पेटीला.
5. ‘ऊ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप होत नाही. क्वचित ते ‘वा’ कारान्त होते.
उदा.
- ऊ-ऊवास, उवाला
- काकू-काकूस, काकूला.
- सासू, सासुला, सासवांना.
6. ‘ओ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात होत नाही व अनेकवचनात ‘आ’ कारान्त होते.
उदा.
- बायको-बायकांना, बायकांचा.
नपुंसकलिंगी नामांचे सामान्यरूप:
1. ‘अ’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘आ’ कारान्त होते.
उदा.
- मूल-मुलास, मुलाला, मुलांना
- पान-पानास, पानाला, पानांना
2. ‘ई’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘या’ कारान्त होते.
उदा.
- पाणी-पाण्यात, पाण्याचा
- मोती– मोत्यात, मोत्याचा
- लोणी-लोण्यात, मोण्याचा
3. ‘ऊ’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘आ’ कारान्त होते.
उदा.
- लिंबू-लिंबास, लिंबाचे
- कोकरू-कोकारास, कोकराचे
4. काही वेळा ‘ऊ’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘वा’ कारान्त होते.
उदा.
- कुंकू-कुंकवास, कुंकवाचा
- गडू-गडवास, गडवाचा
5. ‘ए’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘या’ कारान्त होते.
उदा.
- तळे-तळ्यात, तळ्याला
- केळे-केळ्याची, केळ्याचे
- खोके-खोक्यात, खोक्याला
- डोके-डोक्यात, डोक्याला
विशेषणाचे सामान्यरूप :
1. ‘अ’ कारान्त ‘ई’ कारान्त व ‘ऊ’ कारान्त विशेषणाचे सामान्यरूप होत नाही.
उदा.
- जगात गरीब माणसांना कोणी विचारात नाही.
- त्याचे लोकरी कपड्यांचे दुकान आहे.
- मला कडू कारल्याची भाजी आवडते.
2. ‘आ’ कारान्त विशेषणांचे सामान्यरूप ‘या’ कारान्त होते.
उदा.
- भला माणूस-भल्या माणसास
- हा मुलगा-ह्या मुलास
- खरा माणूस– खर्य्या माणसाला.