100+ Polity important questions in marathi

Polity important Questions in marathi

पोलीस भरती असो किंव्हा MPSC परीक्षा सर्व भारतात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यशात्र या विषयावर ४-५ प्रश्न विचारले जातातच. म्हणूनच आजच्या या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे राज्यशात्र या विषयावर मागील वर्षी विचारलेले महत्वाचे प्रश्न.

Q. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2) डॉ. राजेंद्र प्रसाद 
3) दुर्गाबाई देशमुख
4) सर बी. एन. राव

स्पष्टीकरण

 • 11 डिसेंबर 1946 रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष तर एच.सी. मुखर्जी हे घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.
 • सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून सर बी. एन. राव यांना नियुक्त करण्यात आले.
 • घटना समिती ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. ज्यावेळी ही समिती घटना समिती म्हणून कार्य करीत असे त्यावेळी डॉ. राजेंद्र प्रसाद अध्यक्षस्थानी असत. तर ज्यावेळी कायदेमंडळ म्हणून काम करत असे त्यावेळी जी. व्ही. मावळणकर अध्यक्षस्थानी असत.

Q. भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले?

1) 26 ऑक्टोंबर 1949
2) 26 नोव्हेंबर 1949 
3) 26 डिसेंबर 1949
4) 26 जानेवारी 1950

स्पष्टीकरण

 • भारतीय घटना समितीची एकूण 11 अधिवेशने झाली यापैकी शेवटच्या अधिवेशनादिवशी 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकारण्यात आली.
 • 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीच्या सदस्यांनी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या.
 • 26 जानेवारी 1950 रोजी संविधान पूर्णपणे लागू झाले.
 • 26 नोव्हेंबर 1949 – संविधान स्वीकारले.
 • 26 जानेवारी 1950 संविधान अंमलात आले.

Q. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2) डॉ. राजेंद्र प्रसाद
3) जवाहरलाल नेहरू
4) सरदार वल्लभभाई पटेल

स्पष्टीकरण

 • घटना समितीची स्थापना कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री) योजनेनुसार झाली.
 • सदस्य – 389
 • पहिली बैठक 9 डिसेंबर 1946
 • अध्यक्ष – राजेंद्र प्रसाद
 • उपाध्यक्ष- एच. सी. मुखर्जी
 • प्रमुख समित्या – 8 (एकूण 22)
 • घटना समिती अध्यक्ष – राजेंद्र प्रसाद
 • मसुदा समिती अध्यक्ष – डॉ. आंबेडकर
 • मसुदा चिकित्सा समिती अध्यक्ष – पं. नेहरू

Q. भारताचे संविधान कथी अंमलात आले ?

1) 26 जानेवारी 1951
2) 26 जानेवारी 1950
3) 26 नोव्हेंबर 1949
4) 26 जानेवारी 1949

स्पष्टीकरण  

 • 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली.
 • 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेत
 • प्रास्ताविका, 22 भाग, 395 कलमे व 8 अनुसूचींचा समावेश होता.
 • पुढे 24 जानेवारी 1950 रोजी उपस्थित असलेल्या 284
 • सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या.

Q. खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते ?

1) महात्मा गांधी
2) मौलाना आझाद
3) राजकुमारी अमृता कौर
4) हंसाबेन मेहता

स्पष्टीकरण

 • 24 जानेवारी 1950 रोजी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेच्या तीन (इंग्रजीतील छापील प्रत, इंग्रजीतील हस्तलिखित प्रत आणि हिंदीतील हस्तलिखित प्रत) प्रतीवर सह्या केल्या.
 • स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधान सभेतील 299 सदस्यांमध्ये एकूण 15 महिलांचा समावेश होता.
 • संविधान सभेची एकूण 11 सत्रे झाली.
 • महात्मा गांधी व मोहम्मद अली जीना हे महत्त्वाचे नेते संविधान सभेचे सदस्य नव्हते.

Q. भारताच्या राज्यघटनेतील प्रास्ताविकेतील खालील शब्दांचा योग्य क्रम लावा.

1) समाजवादी, धर्मनिरपेक्ष, गणराज्य, लोकशाही, सार्वभौम
2) गणराज्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही सार्वभौम.
3) लोकशाही, गणराज्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम
4) सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य

स्पष्टीकरण

 • भारताच्या घटनेची प्रास्ताविका पंडित नेहरू यांनी तयार केलेल्या व संविधान सभेत मांडलेल्या उद्देश पत्रिकेवर आधारित आहे.
 • प्रस्ताविकेतील समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द 42 वी घटना दुरुस्ती कायदा 1976 नुसार टाकण्यात आले.
 • सर्वप्रथम अमेरिकन घटनेमध्ये प्रास्ताविका देण्यात आली होती, त्यानंतर इतर देशांनी या पद्धतीचा स्वीकार केला.

Q. भारतीय घटना …………या तारखे पासून अंमलात आली.

1) 26 नोव्हेंबर 1949
2) 26 जानेवारी 1950
3) 15 ऑगस्ट 1947
4) तिन्ही पैकी एकही नाही

स्पष्टीकरण

 • 9 डिसेंबर 1946 – घटना समितीची पहिली बैठक.
 • 11 डिसेंबर 1946 – राजेंद्रप्रसाद यांची घटना समितीच्याअध्यक्षस्थानी निवड.
 • 13 डिसेंबर 1946 उद्दिष्टांचा ठराव (पं. नेहरू).
 • 22 जानेवारी 1947 उद्दिष्टांचा ठराव स्वीकारला.
 • 26 नोव्हेंबर 1949 – घटनेच्या काही तरतुदी अमलात.
 • 26 जानेवारी 1950 – संपूर्ण घटना अमलात.
 • 26 जानेवारी 1930 हा पूर्ण स्वराज्य दिन म्हणून पाळला होता, तोच दिवस घटना लागू करताना निवडला गेला.
 • दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

Q. खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते ?

1) ए. के. अय्यर
2) के. एम. मुन्शी
3) डॉ. राजेंद्र प्रसाद
4) एन माधवराव

स्पष्टीकरण

 • 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. अआंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीकडे घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली.
 • या समितीमध्ये एकूण सात सदस्य होते
 • मसुदा समितीला प्रारूप समिती असेही म्हणतात.
 • डॉ. आंबेडकर यांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला.
 • मसुदा समितीचे 7 सदस्य डॉ. आंबेडकर, एन. गोपालस्वामी अय्यंगर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सईद मोहम्मद सादूल्ला, मुन्शी, माधवराव, टी. टी. कृष्माम्माचारी.

Q. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?

1) धर्मनिरपेक्ष
2) साम्राज्यवादी
3) लोकशाही
4) प्रजासत्ताक

स्पष्टीकरण  

 • साम्राज्यवाद म्हणजे जेव्हा एखादा देश आर्थिक किंवा राजकीयफायद्यासाठी इतर प्रदेशांमध्ये आपली सक्ती वाढवतो.
 • अल्फोन्सो डी अल्बुकर्क हे भारतातील दुसरे पोर्तुगीज गव्हर्नर होते ज्यांनी ‘साम्राज्यवादाचे धोरण’ मांडले.
 • साम्राज्यवादाच्या वसाहतींवर विपरीत परिणाम झाला, यामुळे परकीय राजवटीत मूळ संस्कृती आणि उद्योग नष्ट झाले.

Q. भारतीय संविधानानुसार…..सार्वभौम आहे.

1) भारतीय जनता
2) न्याय संस्था
3) संसद
4) कार्यकारी मंडळ

स्पष्टीकरण 

 • सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाहा शक्तीचा प्रभाव नसणे.
 • भारत सार्वभौम आहे म्हणजे भारत स्वतंत्र असून त्यावर कोणत्याही परकीय सत्तेचे अधिपत्य नाही.
 • यामुळे भारत आपला अंतर्गत व बाह्य कारभार स्वतः (आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून) करण्यास मुक्त व सक्षम आहे.

Q. राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत (Basic structure doctrine) ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली?

1) मिनर्वा मिल्स खटला
2) केशवानंद भारती खटला
3) मनेका गांधी खटला
4) ए. के गोपालन खटला
(नाशिक ग्रामीण पोलीस 2023)

स्पष्टीकरण

 • घटनेच्या कलम 368 अंतर्गत प्रास्तविकेत सुधारणा करता येऊ शकते का? हा मुद्दा प्रथम केशवानंद भारती केस मध्ये निर्माण झाला. (दि. 24 एप्रिल 1973)
 • सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले की प्रास्ताविका घटनेचा भाग असल्याने तिच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते, मात्र त्याद्वारे घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही
 • प्रास्ताविकेत आतापर्यंत एकदा सुधारणा करण्यात आली आहे. प्रस्ताविकेतील समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द 42 वी घटना दुरुस्ती कायदा 1976 नुसार टाकण्यात आले.

Q. म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय.

1) घटनेचा मसुदा
2) मार्गदर्शक तत्त्वे
3) घटनेचा सरनामा
4) लिखित घटना

स्पष्टीकरण 

 • सरनामा म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.
 • घटनेचे ओळखपत्र – असे नानी पालखीवाला म्हणाले.
 • ‘घटनेची कुंडली,’ असे के. एम. मुन्शी म्हणाले.
 • सरनामा- पंडित नेहरू यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावाने स्वीकारला. (22 जानेवारी 1947)
 • सरनाम्यात आत्तापर्यंत एकदाच 42 व्या घटना दुरुस्तीने बदल झाला, तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.

Q. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

1) डॉ. राजेंद्र प्रसाद
2) पंडित जवाहरलाल नेहरू
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4) महात्मा गांधी

स्पष्टीकरण

 • मसुदा समिती – स्थापना 29 ऑगस्ट 1947
 • अध्यक्ष – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • सदस्य – 7
 • घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते.
 • घटना समितीचे पहिले अध्यक्ष सचिदानंद सिन्हा होते. (फक्त 2 दिवस)

Q. खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हटले जाते ?

1) मूलभूत कर्तव्ये
2) सरनामा
2) व्यक्ती स्वातंत्र्य
4) एकेरी नागरिकत्व

Q. पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये होत नाही?

1) रोजगाराचा अधिकार
2) माहितीचा अधिकार
3) बालकांचे अधिकार
4) समान कामासाठी समान वेतन

स्पष्टीकरण

मूलभूत हक्कांमध्ये एकूण सहा हक्कांचा समावेश होतो.

 1. समतेचा हक्क (कलम 14 ते 18)
 2. स्वातंत्र्याचा हक्क (कलम 19 ते 22)
 3. शोषणाविरोधी हक्क (कलम 23 ते 24)
 4. धर्म स्वातंत्र्याचा हक्क (कलम 25 ते 28)
 5. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क (कलम 29 ते 30)
 6. घटनात्मक संरक्षणाचा हक्क (कलम 32)
 • मूळ राज्यघटनेमध्ये एकूण 7 मूलभूत हक्कांचा समावेश होता परंतु 44 वी घटनादुरुस्ती 1978 नुसार मालमत्तेचा हक्क हा कायदेशीर हक्क करण्यात आला.
 • भाग- 12, कलम 300 (A)

Q. मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेले आहेत?

1) कलम 12 ते 35
2) कलम 5 ते 11
3) कलम 1 ते 4
4) कलम 36 ते 51

स्पष्टीकरण

 • घटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क दिले आहेत.
 • राज्यघटनेत एकूण सहा मूलभूत हक्कांची तरतूद आहे
  1) समतेचा हक्क (कलम 14 ते 18)
  2) स्वातंत्र्याचा हक्क (कलम 19 ते 22)
  3) शोषणाविरोधी हक्क (कलम 23 ते 24)
  4) धर्म स्वातंत्र्याचा हक्क (कलम 25 ते 28)
  5) सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क (कलम 29 ते 30)
  6) घटनात्मक संरक्षणाचा हक्क (कलम 32).

Q. भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे?

1) कलम 15
2) कलम 16
3) कलम 17
4) कलम 18

स्पष्टीकरण

 • कलम 17 अन्वये ‘अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे.
 • या कलमाच्या आधारावर अस्पृश्यता (निर्मूलन) कायदा, 1955 संमत करण्यात आला.
 • घटनेमध्ये तसेच कायद्यांमध्ये अस्पृश्यता या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही.
 • अस्पृश्यतेच्या कृतीमुळे दोषी व्यक्तीला संसद व राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे.

Q. भारतीय राज्यघटनेत नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे?

1) कलम 14 ते 18
2) कलम 25 ते 32
3) कलम 14 ते 32
4) कलम 19 ते 22

स्पष्टीकरण 

 • कलम 14 नुसार, राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यासमोर समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही.
 • कलम 14, 17 व 18 मधील मूलभूत हक्क भारताचे नागरिक तसेच परकीय व्यक्तींनाही प्राप्त आहे.
 • तर कलम 15, 16, 19, 29 व 30 मधील मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिकांना प्राप्त आहेत.

Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा आहे असे म्हटले आहे?

1) अनुच्छेद 31
2) अनुच्छेद 14 ते 18
3) अनुच्छेद 21
4) अनुच्छेद 32

स्पष्टीकरण

 • कलम 32 चे वर्णन डॉ. आंबेडकर यांनी असे केले आहे: ‘असे कलम ज्याविना ही घटना व्यर्थ आहे.’
 • हे कलम घटनेचा खरा आत्मा असून त्याचे खरे हृदयही आहे. > सर्वोच्च न्यायालयाने कलम 32 हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे घोषित केले आहे, त्यामुळे घटनादुरुस्ती अन्वये है कलम काढून घेता येणे शक्य नाही किंवा त्यात घट घडून आणणे ही शक्य नाही.
 • या हक्काला घटनात्मक उपाय योजनेचा हक्क असे म्हणतात.

Q. भारतीय राज्यघटनेत अपराध्यांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण अनुच्छेद …….मध्ये दिले आहे.

1) कलम 22
2) कलम 21
3) कलम 20
4) कलम 19

स्पष्टीकरण

 • कलम 20 अन्वये सर्व व्यक्तींना (नागरिक, परकीय तसेच कंपन्या/महामंडळ यासारख्या कायदेशीर व्यक्ती) असंगत व अत्याधिक शिक्षेपासून संरक्षण प्रदान करण्यात आले आहे.
 • या हक्काशी संबंधित तीन तरतुदी आहेत
  1) एक्स पोस्ट फॅक्टो कायद्याचा अंमल नसणे.
  2) डबल जेपर्डी नसणे.
  3) स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे.
 •  कलम 359 मधील व्याप्तीवरील मयदि नुसार, आणीबाणी दरम्यान राष्ट्रपती, कलम 20 व 21 द्वारे प्राप्त होणाऱ्या मूलभूत हक्कांच्या बजावणीचा हक्क निलंबित करू शकत नाहीत.

Q. भारतीय राज्यघटनेतील कलम 19 स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही?

1) संघटनेचे स्वातंत्र्य
2) मुक्त संचाराचे स्वातंत्र्य
3) शिक्षणाचे स्वातंत्र्य
4) एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य

स्पष्टीकरण 

 • भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क एकूण 6 आहेत.
 • आधी 7 होते, पण संपत्तीचा हक्क 44 वी घटनादुरुस्तीने (1978) मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आला आणि तो भाग 12 मधील प्रकरण 4 मधील कलम 300 A मध्ये टाकून एक कायदेशीर हक्क म्हणून घोषित करण्यात आला.
 • एकूण 6 मूलभूत हक्क-
  1) समानतेचा हक्क
  2) स्वातंत्र्याचा हक्क
  3) शोषणाविरुद्ध हक्क
  4) धर्म स्वातंत्र्याचा हक्क
  5) सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क
  6) घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार

हे देखील वाचा

MPSC Information About Indian Constitution

Spardha Pariksha GK in Marathi

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

Leave a Comment