Maharashtra GK in Marathi | Maharashtra GK Questions in Marathi 2024

Maharashtra GK in Marathi | Maharashtra GK Questions in Marathi 2024

Maharashtra GK in Marathi: महाराष्ट्र एक असे राष्ट्र जे भारतातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखले जाते. कारण आपल्या देशाच्या जीडीपीमध्ये सर्वात जास्त 15% योगदान हे आपले महाराष्ट्र राज्य देते. आजच्या घडीला महाराष्ट्र मध्ये एकूण 36 जिल्हे आहेत.

2011 च्या जनगणनेनुसार इथली लोकसंख्या ही 12 कोटी आहे. 12 कोटी लोकसंख्या असलेल्या या राज्याचे एकूण क्षेत्रफळ हे 3.07 लाख चौरस किलोमीटर आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा लिटरसी रेट, देखील खूप चांगला म्हणजेच ८५% आहे. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्र राज्याविषयी माहिती तुम्हाला सर्व माहिती आजच्या या Maharashtra GK Questions in Marathi च्या लेखात मी देण्याचा प्रयन्त केला आहे.

 Maharashtra general knowledge Marathi

Q. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
उत्तर: अहमदनगर

Q. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?
उत्तर: शेकरू

Q. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे ?
उत्तर: दुसरा

Q. महाराष्ट्राला किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.
उत्तर: 720

Q. महाराष्ट्रातील सर्वांत मोठी (लांब) नदी कोणती ?
उत्तर: गोदावरी

Q. संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: धाराशिव

Q. कावेरी, गोदावरी, कृष्णा, नर्मदा यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे?
उत्तर: नर्मदा

Q. त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते ?
उत्तर: गोदावरी

Q. सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीसी कारवाई द्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले?
उत्तर: ऑपरेशन पोलो

Q. कृष्णा नदीचे उगमस्थान ?
उत्तर: महाबळेश्वर

Q. संत गाडगे बाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला ?
उत्तर: 23 फेब्रुवारी, 1876

Q. सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्ग जुना नंबर किती आहे?
उत्तर: 211

Q. ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ ……. या नदीच्या काठी वसले आहे.
उत्तर: दहिसर

Q. जालना, छ. संभाजीनगर, बुलढाणा, बीड यापैकी कोणत्या जिल्ह्याचा मराठवाडा विभागामध्ये समावेश नाही.
उत्तर: बुलढाणा

Q. अमरावती विभागात समाविष्ठ नसलेला जिल्हा
उत्तर: वर्धा

Q. राष्ट्रसंत ही पदवी……यांच्याशी संबंधीत आहे.
उत्तर: तुकडोजी महाराज

Q. कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे?
उत्तर: गिरणा

Q. किर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या…… यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो.
उत्तर: तुकडोजी महाराज

Q. कृष्णा, गोदावरी, भीमा, कावेरी यापैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही ?
उत्तर: कावेरी

Q. राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा सापडते ?
उत्तर: जांभी

Q. कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते ?
उत्तर: कोयना

Q. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती ?
उत्तर: रेगूर मृदा

Q. बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली ?
उत्तर: उल्कापातामुळे

Q. चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते ?
उत्तर: डहाणू – घोलवड

Q. यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात?.
उत्तर: अमरावती

Q. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती ?
उत्तर: 36

Q. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो ?
उत्तर: पूर्व विदर्भ

Q. वर्धा नदीमुळे कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे?
उत्तर: वर्धा – अमरावती

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी

Q. ‘समृद्धी महामार्ग’ या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे?
उत्तर: MSRDC

Q. राष्ट्रीय विषाणू संस्थेचे (National Institute of Virology) हे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर: पुणे

Q. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर: वारणा

Q. राज्यात सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास ओळखले जाते.
उत्तर: पर्जन्यछायेचा प्रदेश

Q. पुर्णा, पांजरा, दुधना, गिरणा यापैकी कोणती तापीची उपनदी नाही ?
उत्तर: दुधना

Q. महाराष्ट्रातील कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?
उत्तर: वैनगंगा

Q. महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. कोणत्या राज्याचा या सहा राज्यांमध्ये समावेश होत नाही?
उत्तर: आंध्र प्रदेश

Q. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?
उत्तर: 1981

Q. कोकण किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने लावा?
उत्तर: श्रीवर्धन, जयगड, विजयदुर्ग, मालवण

Q. कोण महाराष्ट्रातील रस्त्यांचे बांधकाम, दुरुस्ती व देखभाल करण्याचे कार्य करीत नाही?
उत्तर: MSSC

Q. राष्ट्रीय विधी विद्यापीठ (NLU) महाराष्ट्रामध्ये कुठे आहे?
उत्तर: मुंबई, औरंगाबाद, नागपूर

Q. भाभा अणु संशोधन केंद्र ……..येथे आहे..
उत्तर: मुंबई

Q. पैणगंगा नदीचा उगम…… डोंगरात आहे.
उत्तर: अजिंठा डोंगर

Q. मुळा, मुठा, घोड, नीरा या …..नदीच्या उपनद्या आहे.
उत्तर: भीमा

Q. राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था ………… येथे आहे.
उत्तर: पुणे

Q. महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?
उत्तर: जायकवाडी

Q. पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो?
उत्तर: नृसिंहवाडी

Q. पेंच, रणथंबोर, मेळघाट, ताडोबा पैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही?
उत्तर: रणथंबोर

Q. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: अहमदनगर

Q. आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
उत्तर: नाशिक

Q. अकोला, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यापैकी कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही?
उत्तर: सिंधुदुर्ग

Q. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?
उत्तर: अहमदनगर

Q. यापैकी कोणते तलाव त्याच्या स्थानाशी योग्यरित्या जुळत नाहीत?
लोणार – बुलढाणा,
लोकटक – रत्नागिरी,
रंकाळा – कोल्हापूर,
अंबाझरी – नागपुर
उत्तर: लोकटक – रत्नागिरी

Q. महाराष्ट्राची किनारपट्टी………म्हणून ओळखली जाते.
उत्तर: कोकण किनारा

Q. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?
उत्तर: सातपुडा

Q. महाबळेश्वर – महाड मार्गावर कोणता घाट आहे ?
उत्तर: आंबेनळी

Q. महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोठे आहे?
उत्तर: नागपूर व धुळे

Q. कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही ?
उत्तर: पारस

Q. पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे ?
उत्तर: इंदिरा प्रियदर्शिनी नॅशनल

Q. महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत?
उत्तर: 9

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Q. कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
उत्तर: कराड- चिपळूण

Q. समृध्दी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो ?
उत्तर: 10

Q. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर: पुणे

Q. शिवडी न्हावाशेवा हा सागरी पुल हा कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
उत्तर: मुंबई व नवी मुंबई

Q. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो ?
उत्तर: नाशिक

Q. भिल्ल ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसुन येते ?
उत्तर: खानदेश

Q. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत?
उत्तर: श्री. वि. स. पागे

Q. “पाणी पंचायत’ या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले ?
उत्तर: विलासराव साळुंके

Q. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार …….ते …… आहे.
उत्तर: 72°6 ते 80°9

Q. महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क है…… ला सातारा येथे स्थापित केले गेले?
उत्तर: मार्च 2018

Q. महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?
उत्तर: 2010

Q. महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली?
उत्तर: कोविड मदत

Q. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर: भोगावती

Q. जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते?
उत्तर: नाथसागर

Q. महाराष्ट्रातील सर्वांत जुनी लेणी कोठे आहे?
उत्तर: पितळखोरा

Q. हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेट्री कोठे आहे ?
उत्तर: गुलमर्ग

Q. गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली ?
उत्तर: 1 मे 1999

Q. नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत ?
उत्तर: 6

Q. भारत इतिहास संशोधक मंडळ….. येथे…. यांनी स्थापन केली.
उत्तर: पुणे, वि. का. राजवाडे

Q. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई चा …. …. साली जागतीक वारसा स्थळामध्ये समावेश झाला आहे.
उत्तर: 2004

Q. जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश ….. साली झाला आहे?
उत्तर: 2012

Q. कराड व चिपळुण या दोन शहरांच्या मध्ये……घाट आहे.
उत्तर: आंबा

Q. यापैकी चुकीची जोडी सांगा.
कुतुब मिनार – मेहरवली,
गोल घुमट – बिजापूर,
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस – दिल्ली,
ताजमहाल – आग्रा
उत्तर: छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, दिल्ली

Q. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना ……रोजी झाली.
उत्तर: १ नोव्हेंबर, 1956

Q.माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम महाराष्ट्र राज्याने…….या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरु केली.
उत्तर: COVID – 19

Q.पीतक्रांती कशाशी संबंधित आहे ?
उत्तर: तेलबीया उत्पादन

Q.SEARCH (Society for Education, Action and Research In Community (Health) ही विदर्भातील संस्था कोणत्या प्रसिद्ध दांपत्यामार्फत चालविली जाते ?
उत्तर: डॉ. अभय व राणी बंग

Maharashtra GK in Marathi

Q.भामरागड येथील नदी संगमात पर्लकोटा, प्राणहिता, पामुलगौतमी, इंद्रावती यापैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही ?
उत्तर: प्राणहिता

Q.राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
उत्तर: महाराष्ट्र

Q.संत तुकडोजी महाराज यांचा ‘गुरुकुंज आश्रम’ कोठे आहे ?
उत्तर: मोझरी

Q.गोदावरी, भीमा, तापी, कृष्णा यापैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नदी आहे ?
उत्तर: तापी

Q.महाराष्ट्रात दर….. वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते.
उत्तर: चार

Q.गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे ?
उत्तर: नाशिक

Q.महाराष्ट्रातील प्रशासकिय/महसुली विभागांची एकूण संख्या किती ?
उत्तर: सहा

Q.वाई महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट आहे?
उत्तर: पसरणी

Q.महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळींबाची जात कोणती ?
उत्तर: गणेश

Q.अहमदनगर – कल्याण मार्गावर कोणता घाट आहे ?
उत्तर: माळशेज

Q.एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण ?
उत्तर: अरुणिमा सिन्हा

Q.महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला ?
उत्तर: पालघर

Q.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर: छत्रपती संभाजीनगर

Q.’नाथ सागर’ हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे?
उत्तर: जायकवाडी

Q.ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे?
उत्तर: माणिक बंडोजी इंगळे

Q.महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?
उत्तर: कोयना (सातारा)

Q.भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली ?
उत्तर: मुंबई

Q……….. या डोंगररांगांमुळे तापी – पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे.
उत्तर: अजिंठा व सातमाळा

Q.कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे ?
उत्तर: तेलंगणा

Q.मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेशणारी……….. ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे.
उत्तर: तापी

Q.1948 साली घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर: न्या. एस. के. दार

Q.महाराष्ट्र राज्याची पूर्व – पश्चिम लांबी……किमी आहे.
उत्तर: 800 किमी

Q.’कळसुबाई शिखराची उंची……..मीटर आहे.
उत्तर: 1646

Q. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना………..रोजी झाली आहे.
उत्तर: 1 ऑगस्ट 1962

Q. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
उत्तर: मुंबई

Q. छत्रपति शिवाजी महाराज यांचा जन्म किल्यावर झाला.
उत्तर: शिवनेरी

Q. कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते ?
उत्तर: आंबोली

Q. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?
उत्तर: हरियाल

Q. पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो ?
उत्तर: पुणे – महाबळेश्वर

Q. वैतरणा, ताणसा, कोयना, शास्त्री यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?
उत्तर: कोयना

Q. सातारा जिल्ह्यातील धरणे कोणती ?
उत्तर: कोयना, धोम, कन्हेर, वीर

Q. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु कोणते आहे ?
उत्तर: ब्ल्यू मॉरमॉन

Q. महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत ?
उत्तर: 6

Q. कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे?
उत्तर: पितळखोरा

Q. महागणपती, मयुरेश्वर, चिंतामणी, बल्लाळेश्वर यापैकी कोणते अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही.
उत्तर: बल्लाळेश्वर

Q. कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात ?
उत्तर: इचलकरंजी

महाराष्ट्र सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर

Q. तुळापूर मध्ये…….नद्यांचा संगम आहे.
उत्तर: भीमा व इंद्रायणी

Q. महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत ?
उत्तर: 36

Q. मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे ?
उत्तर: मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे

Q. तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर: बैतुल जिल्हा (म.प्रदेश )

Q. महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली ?
उत्तर: बॉम्बे हेरॉल्ड

Q. निरा, पवना, कन्हा, दारणा यापैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही ?
उत्तर: दारणा

Q. कान्हेरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: मुंबई उपनगर

Q. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: छ. संभाजीनगर

Q. पाताळेश्वर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: पुणे

Q. मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: अमरावती

Q. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: सांगली

Q. मयुरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: पुणे

Q. घोडाझरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: चंद्रपूर

Q. बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: वर्धा

Q. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: पुणे

Q. लाचलुचतप प्रतिबंधक विभाग कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: मुंबई

Q. दहशतवाद विरोधी पथक कोणत्या जिल्ह्यात कोठे आहे?
उत्तर: मुंबई

Q. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?
उत्तर: तिसरा

Q. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्हयात आहे?
उत्तर: चंद्रपुर

Q. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हयात नुकतेच केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली ?
उत्तर: अमरावती

Q. महाराष्ट्र दिन हा…….. या दिवशी साजरा करण्यात येतो.
उत्तर: 1 मे

Q. शिर्डी कोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर: अहमदनगर

Q. अंजिठा वेरूळ कोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर: छ. संभाजीनगर

Q. चिखलदरा कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: अमरावती

Q. प्रतापगड कोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर: सातारा

Q. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर: नाशिक

Q. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हयात आहे?
उत्तर: गोंदिया

Q. आंबा घाट हा कोणत्या मार्गावर लागतो?
उत्तर: कोल्हापुर – रत्नागिरी

Q. नागपूर जिल्ह्यात कोराडी, खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे ?
उत्तर: औष्णिक विद्युत

Q. मुळा, मुठा, घोड, सीना, कुकडी, कन्हा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
उत्तर: भीमा

Q. गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्राचे मुख्यालय कोठे आहेत ?
उत्तर: पुणे

Q. समृध्दी महामार्ग कोठून कुठपर्यंत आहे?
उत्तर: नागपूर ते मुंबई

Q. मध्यप्रदेश, गुजरात, बिहार, गोवा यापैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र लगत नाही ?
उत्तर: बिहार

Q. कोणत्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय (अनुवाद) हा जाहीर झालेला पुरस्कार नुकताच रद्द करण्यात आला?
उत्तर: फॅक्चर्ड फ्रिडम

Q. भारतातील महाराजा जयसिंग यांनी बांधलेली ‘जंतरमंतर’ ही वास्तु प्रामुख्याने कशाशी निगडीत आहे?
उत्तर: खगोलशास्त्र

Q. नागपूर येथील निरी (NEERI) ही संस्था प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात काम करते?
उत्तर: पर्यावरण

Q. नागपूर जिल्हयातुन वाहणारी कन्हान नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
उत्तर: वैनगंगा नदी

Q. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली?
उत्तर: डॉ. के. बी. हेडगेवार

Q. नुकताच राज्यगीताचा दर्जा मिळालेले ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत कोणी लिहिले आहे?
उत्तर: राजा बढ़े

Q. मुंबई – नागपूरला जोडणाऱ्या समृध्दी महामार्गाला काय नाव दिले आहे?
उत्तर: बाळासाहेब ठाकरे

Q. ‘दक्षिण भारताची गंगा’ म्हणून कोणत्या नदीस संबोधले जाते ?
उत्तर: गोदावरी

Q. Central Institute of Road Transport (CIRT) ही संस्था कोणत्या शहरात आहे?
उत्तर: पुणे

Q. डहाणू तालुका कशासाठी प्रसिध्द आहे?
उत्तर: चिकू

Q. कोणते ठिकाण हे संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थान आहे?
उत्तर: देहू

Q. ‘कळसुबाई’ हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्हयात आहे?
उत्तर: अहमदनगर

Q. वैष्णवी पाटील, प्रतिक्षा बागडी, अमृता पुजारी, प्रतिक्षा राक्षे यापैकी कोण पहिली ‘महिला महाराष्ट्र केसरी’ ठरली ?
उत्तर: प्रतिक्षा बागडी

Q. रायगड जिल्हयात भिरा, भिवपुरी, रसायनी, खोपोली यापैकी कोणत्या ठिकाणी टाटा वीज निर्मिती प्रकल्प नाही ?
उत्तर: रसायनी

Maharashtra General knowledge Questions and Answers in Marathi

Q. कोणत्या साली मुंबई ते मंगलोर अशी कोकण रेल्वे सेवा सुरू झाली ?
उत्तर: 1998

Q. रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता ?
उत्तर: ताम्हीणी

Q. मुंबई – गोवा हायवे हा कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो ?
उत्तर: NH 66

Q. चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयाची सिमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे?
उत्तर: वैनगंगा

Q. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
उत्तर: पांझरा

Q. मेळघाट अभयारण्याची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर: 1973

Q. नुकतेच कोणत्या गीतास ‘महाराष्ट्राचे राज्यगीत’ म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
उत्तर: जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा (राजा बढे)

Q. वर्धा नदीची वर्धा जिल्हयामध्ये वाहण्याची दिशा …..आहे.
उत्तर: वायव्येकडून आग्नेयेकडे

Q. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्हयात आहे?
उत्तर: सातारा

Q. वाशिम जिल्हयातील अडाण धरण कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर: कारंजा

Q. वाशिम जिल्हयाची निर्मीती कधी झाली ?
उत्तर: 01 जुलै 1998

Q. किर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या …….यांना आपण राष्ट्रसंत म्हणुन ओळखतो.
उत्तर: संत तुकडोजी महाराज

Q. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव भारतातील पहिले आगळेवेगळे…..गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
उत्तर: पुस्तकाचे

Q. गडचिरोली जिल्हयाची स्थापना कधी व कोणत्या जिल्हयाचे विभाजन करुन झालेली आहे.
उत्तर: 1982, चंद्रपूर

Q. संत्रा उत्पादनसाठी प्रसिध्द असणारे शहर कोणते आहे ?
उत्तर: नागपूर

Q. गाढवी, वाघ, प्रवरा, अंधारी यापैकी कोणती वैनगंगेची उपनदी नाही?
उत्तर: प्रवरा

Q. फडीमुन्शी हे कोणत्या व्यवसायाशी संबंधीत आहे?
उत्तर: तेंदूपत्ता संकलन

Q. भामरागड, नंदुरमधमेश्वर, बोर, नागझिरा यापैकी कोणते वन्य जीवन अभयारण्य नागपूर विभागात येत नाही?
उत्तर: नंदुरमधमेश्वर

Q. पारस, कोराडी, दुर्गापुर, परळी यापैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र विदर्भातील नाही?
उत्तर: परळी

Q. वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती ?
उत्तर: प्राणहिता

Q. नुकतीच G-20 परिषद महाराष्ट्रात कुठे झाली ?
उत्तर: नागपूर

Q. महाराष्ट्रातील समृध्दी महामार्गाची लांबी किती आहे?
उत्तर: 701 किमी

Q. गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्हयात येते ?
उत्तर: ठाणे

Q. “महाराष्ट्र इंटेलिजेस अॅकॅडमी’ कोणत्या शहरात आहे?
उत्तर: पूणे

Q. कराडजवळ प्रितीसंगम येथे…..या नद्यांचा संगम आहे.
उत्तर: कृष्णा व कोयना

Q. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला कोणता आहे ?
उत्तर: साल्हेर

Q. कृषीक्षेत्रात पीतक्रांती कशाशी संबंधीत आहे?
उत्तर: तेलबिया

Q. प्रसिध्द गोदावरी नदीचा उगम कोठे होतो?
उत्तर: त्र्यंबकेश्वर

Q. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे होते.
उत्तर: नागपुर

Q. महाराष्ट्रात गहु संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर: निफाड

Q. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?
उत्तर: गंगापूर

Maharashtra Static GK in Marathi

Q. देशातील एकुण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात एकुण किती ज्योतिर्लिंगे आहेत?
उत्तर: 5

Q. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो?
उत्तर: त्र्यंबकेश्वर

Q. मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, भोर व्याघ्र प्रकल्प, अमराबाद व्याघ्र प्रकल्प यापैकी महाराष्ट्रात कोणते व्याघ्र प्रकल्प नाही ?
उत्तर: अमराबाद व्याघ्र प्रकल्प तेलंगणा

Q. संत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ कोठे आहे?
उत्तर: अमरावती

Q. महाराष्ट्रातील सर्वात पुर्वेकडील तालुका कोणता आहे ?
उत्तर: भामरागड

Q. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: बुलढाणा

Q. भिमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यातुन होते ?
उत्तर: आंबेगाव

Q. छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे?
उत्तर: वढु बुद्रुक

Q. मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ……आहे.
उत्तर: NH – 8

Q. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
उत्तर: यवतमाळ

Q. तलवाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?
उत्तर: भंडारा

Q. केळीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
उत्तर: जळगाव

Q. दमयंतीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?
उत्तर: अमरावती

Q. कण्हेर धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर: वेण्णा

Q. पैठण तालुका……..या संतांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते.
उत्तर: संत ज्ञानेश्वर

Q. सन 2011 च्या जनगणेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात क्रमांक कितवा ?
उत्तर: दुसरा

Q. सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता?
उत्तर: सिंधुदुर्ग

Q. कृष्णा, गोदावरी, चंबळ, नर्मदा यापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती?
उत्तर: नर्मदा

Q. महाराष्ट्रात अणुविद्युत कोठे आहे?
उत्तर: तारापूर

Q. वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रातील कोणत्या मार्गांवर अलिकडेच सुरु झाली ?
उत्तर: मुंबई – सोलापूर

Q. नॅशनल स्टॉक एक्सचेंज कोठे आहे?
उत्तर: मुंबई

Q. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे?
उत्तर: पाचवा

Q. गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी सबंधित आहे?
उत्तर: झिंगे / कोळंबी उत्पादन

Q. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई ची उंची किती फूटआहे?
उत्तर: 5400 फूट

Q. सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर, अहमदनगर, धाराशीव, बीड, चाळीसगांव, जालना, नांदगांव यापैकी कोणती शहरे आहेत?
उत्तर: तुळजापूर, धाराशीव, बीड, चाळीसगांव

Q. कावेरी, वैतरणा, पेरियार, तेरेखोल यापैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही ?
उत्तर: कावेरी

Q. …..हे गाव पैठण तालुक्यात गोदावरी काठी वसलेले ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ आहे ?
उत्तर: आपेगाव

Q. महाराष्ट्रातील डोंगर रागांचा दक्षिणेकडुन उत्तरेकडे योग्य क्रम……..
उत्तर: शंभु महादेव हरिश्चंद्र बालाघाट-सातमाळा अजिंठा-सातपुडा

Q. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर: भीमा

Q. महाराष्ट्रातील जालना, भिवंडी, नागपुर, भुसावळ यापैकी कोणते शहर सुत गिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर: भिवंडी

Q. समृध्दी महामार्ग नाशिक, बुलढाणा, वाशिम, जळगाव यापैकी कोणत्या जिल्हयातून जात नाही ?
उत्तर: जळगांव

Q. महाराष्ट्र राज्यातील सर्वांत मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?
उत्तर: कोयना

Q. ताडोबा व्याघ्रप्रकल्प
उत्तर: चंद्रपूर

Q. मेळघाट व्याघ्रप्रकल्प
उत्तर: अमरावती

महाराष्ट्र सामान्य ज्ञान प्रश्न मराठी

Q. बोर व्याघ्रप्रकल्प
उत्तर: वर्धा

Q. शिवाजी विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यापैकी सर्वाधिक जुने विद्यापीठ कोणते ?
उत्तर: मुंबई विद्यापीठ

Q. सोलापूर, नाशिक, अमरावती, नांदेड यापैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही?
उत्तर: नांदेड

Q. नर्मदा आणि तापी या नदया……आहेत
उत्तर: पश्चिम वाहिनी

Q. कृष्णा व पंचगंगा नदयाचा संगम कोठे आहे……
उत्तर: नरसोबाची वाडी

Q. फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे?
उत्तर: तेरेखोल खाड़ी

Q. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे?
उत्तर: पुणे

Q. राज्य परिवहन महामंडळ (एसटी) बस प्रवासात महिलांना तिकिट दरात किती % सवलत नुकतीच जाहीर झाली आहे ?
उत्तर: 50%

Q. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता?
उत्तर: मुंबई उपनगर

Q. ‘एकलहरे’ हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: नाशिक

Q. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली ?
उत्तर: 2014

Q. कृषी क्षेत्रातील पीत/ पिवळी (Yellow) क्रांती कशाशी निगडीत आहे?
उत्तर: तेलबीया उत्पादन

Q. संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे ?
उत्तर: पैठण

Q. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता ?
उत्तर: लातूर

Q. कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ?
उत्तर: कृष्णा

Q. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे?
उत्तर: पुणे

Q. संगमनेर व नेवासा ही गावे कोणत्या नदीच्या काठी वसली आहेत?
उत्तर: प्रवरा

Q. प्राणहिता, कुंडलिका, प्रवरा, पवना यापैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही ?
उत्तर: पवना

Q. सह्याद्रीच्या पुर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो ?
उत्तर: पर्जन्य छायेचा प्रदेश

Q. मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे?
उत्तर: मराठवाडा

Q. इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
उत्तर: गोदावरी

Q. आरोग्य सेवा देणारा प्रसिध्द लोकबिरादरी प्रकल्प कोठे आहे?
उत्तर: हेमलकसा

Q. भंडारा, नागपुर, गोंदिया, छ. संभाजीनगर यापैकी कोणता जिल्हा विदर्भात येत नाही ?
उत्तर: छ. संभाजीनगर

Q. भारतात सध्या नवीन चालू केलेल्या रेल्वेचे नाव काय आहे?
उत्तर: वन्दे भारत एक्सप्रेस

Q. कोवीड-19 ची लस निर्माण करणारी सिरम इन्स्टीटयुट ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर: पुणे

Q. “अबुजमाड नावाचे नक्षलग्रस्त क्षेत्र’ कोणत्या ठिकाणी आहे ? –
उत्तर: गडचिरोली – छत्तीसगड सिमा क्षेत्र

Q. पूर्णा, गिरणा, पांझरा, दारणा यापैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही ?
उत्तर: दारणा

Q. चांदोली, अनेरधरण, नांदूर मधमेश्वर, यावल यापैकी कोणते अभयारण्य धुळे जिल्हयात आहे?
उत्तर: अनेर धरण

Q. छत्तीसगढ़, तेलंगाणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश यापैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागून नाही ?
उत्तर: आंध्र प्रदेश

Q. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ……व्यापलेले आहे. चौ.कि.मी. असून भारताच्या…..टक्के क्षेत्र व्यापलेले आहे
उत्तर: 307713 चौ.कि.मी., 9.36

Q. मांजरा, वैनगंगा, पैनगंगा, पंचगंगा यापैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही?
उत्तर: पंचगंगा

Q. महाराष्ट्रातील हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरता प्रसिद्ध आहे.
उत्तर: नागपूर – चंद्रपूर

हे सुद्धा वाचा:

सारांश (Summary)

मित्रांनो आपले हे महाराष्ट्र राज्य हे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोंकण, नागपूर नाशिक आणि पुणे अशा ६ विभागात विभागले गेले आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक रीजनला एक वेगळ्या प्रकारे विकसित करण्यात आलेलं आहे. आजच्या या Maharashtra general knowledge questions in marathi च्या लेखातून मी या सर्व विभागातील माहिती प्रश्नांच्या माध्यमातून तुमच्या सोबत शेअर करण्याचा प्रयन्त केला आहे. तुम्हाला या Maharashtra GK Questions in Marathi च्या लेखात काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

Leave a Comment