Information About Maharashtra in Marathi | Maharashtra GK in Marathi
Maharashtra GK in Marathi: विद्याथीमित्रांनो महाराष्ट्रात दर वर्षी होणाऱ्या भरती परीक्षा जसे कि जिल्हा परिषद, वन विभाग, पोलीस भरती, तलाठी भरती यांसाख्या स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रा संबंधी भरपूर प्रश्न विचारले जातात. म्हणूनच आजच्या या लेखात मी Maharashtra Bhugol, Maharashtratil Prashaskiy vibhag, maharashtratil Udyane, abhayaranya संसंबंधी सविस्तर माहिती या लेखात घेऊन आलो आहे.
परीक्षेला जाण्यापूर्वी Maharashtra GK in Marathi चा आमचा हा लेख पूर्ण वाचा कारण या लेखातून तुम्हाला ५-१० प्रश्न परीक्षेमध्ये नक्की बघायला भेटतील.
महाराष्ट्राचा भूगोल | Maharashtra Bhugol Gk in Marathi
- महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ.की.मी. असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो.
- भारताच्या एकूण क्षेत्रफळा पैकी महाराष्ट्राने 9.36 टक्के एवढा प्रदेश व्यापलेला आहे.
- महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृती आहे.
- महाराष्ट्रचा अक्षय वृत्तीय विस्तार 150 उत्तर ते 2201 असा आहे तर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार 7206 पूर्व ते 8009 पूर्व असा रेखावृत्तीय विस्तार आहे.
- 1 मे 1960 ला स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या 26 होती जी नंतर वाढून 36 झाली आहे. म्हणजेच सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत.
- महाराष्ट्रात 33 जिल्हा परिषदा, 27906 ग्रामपंचायती व 355 हून अधिक तालुके आहेत.
- महाराष्ट्रातील पंचायत समित्यांची संख्या 351 एवढी आहे.
- महाराष्ट्रात 26 महानगरपालिका असून त्या पुढील प्रमाणे सांगता येतील. मुंबई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपुर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, सांगली-मिराज-कुपवाड, नांदेड-वाघाळा, आकोला, मालेगाव, भिवंडी-निजामपुर, मीरा-भाईंदर, जळगाव, धुळे, अहमदनगर, वसई-विरार, लातूर, चंद्रपुर, परभणी
- महाराष्ट्रास 720 की.मी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे.
- महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार 720 की.मी. असून पूर्व-पश्चिम विस्तार 800 की.मी. आहे.
- राज्याची राजधानी मुंबई असून उपराजधानी नागपूर आहे.
महाराष्ट्र राज्य सीमा
- पश्चिमेस अरबी समुद्र
- वायव्येस गुजरात आणि दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेस
- उत्तरेस मध्येप्रदेश
- पूर्व व ईशान्येस छत्तीसगढ
- दक्षिणेस गोवा व कर्नाटक
- आग्नेयेस तेलंगणा
महाराष्ट्राचे इतर राज्यांना भिडणारे जिल्हे
- कर्नाटक —- नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सुंधुदुर्ग
- गोवा ——– सिंधुदुर्ग
- मध्येप्रदेश — गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, जळगाव, बुलढाणा, धुळे, नंदुरबार
- छत्तीसगढ —- गडचिरोली, गोंदिया
- तेलंगणा —– गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
- गुजरात —— धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर
महाराष्ट्रातील नवीन जिल्हयांची निर्मिती
- सिंधुदुर्ग————–1 मे 1981 ला रत्नागिरी जिल्ह्यातून विभाजन
- जालना—————1 मे 1981 ला औरंगाबाद जिल्ह्यातून विभाजन
- लातूर—————-16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद जिल्ह्यातून विभाजन
- गडचिरोली————26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपुर जिल्ह्यातून विभाजन
- मुंबई उपनगर———1990 ला बृहन्मुबई मधून विभाजन
- वाशिम————–1 जुलै 1998 ला अकोला जिल्ह्यातून विभाजन
- नंदुरबार————-1 जुलै 1998 ला धुळे जिल्ह्यातून विभाजन
- हिंगोली————-1 मे 1999 ला परभणी जिल्ह्यातून विभाजन
- गोंदिया————–1 मे 1999 ला भंडारा जिल्ह्यातून विभाजन
- पालघर————–2 जून 2014 ला ठाणे जिल्ह्यातून विभाजन
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग (vibhaag)
महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभागांचा समावेश होतो. ते खालीलप्रमाने सांगाता येतील
कोकण – मुख्यालय मुंबई
या प्रशासकीय विभागात एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो. ते जिल्हे पुढीलप्रमाणे सांगता येतील. पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग
पुणे – मुख्यालय पुणे
या विभागात एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर.
नाशिक – मुख्यालय नाशिक
या विभागात एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश होतो ते पुढील प्रमाणे नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव.
औरंगाबाद – मुख्यालय औरंगाबाद
औरंगाबाद विभागात एकूण आठ जिल्ह्याचा समावेश होतो. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद
अमरावती – मुख्यालय अमरावती
या विभागात एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. ते पुढील प्रमाणे सांगता येतील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम.
नागपुर – मुख्यालय नागपूर
या विभागात एकूण सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. ते पुढील प्रमाणे सांगता येतील. नागपुर, वर्धा, चंद्रपुर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली
महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग
कोकण: सहयद्री पर्वत व अरबी समुद्राच्या दरम्यान पसरलेल्या अरुंद किनारपट्टीस कोकण असे म्हणतात. यात एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो.
देश: सहयद्रीच्या पूर्वेस असणार्या प्रदेशास देश असे म्हणतात. यामध्ये एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो.
घाटमाथा: सह्याद्रीच्या पर्वताच्या उंचवट्याचा भाग घाटमाथा म्हणून ओळखला जातो.
मावळ: सह्याद्रीचा पूर्वेकडील उतरणीचा भाग मावळ म्हणून ओळखला जातो.
खांदेश: उत्तर महाराष्ट्रातील खोर्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांच्या समुहास खांदेश असे म्हणतात. येथील कापूस व केळी ही पिके प्रसिद्ध आहेत.
मराठवाडा: मराष्ट्रातील गोदावरीच्या खोर्यास मराठवाडा असे म्हणतात. यात औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांचा समावेश होतो ते पुढील प्रमाणे सांगाता येईल जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी, लातूर, हिंगोली.
विदर्भ: या भागात एकूण आकरा जिल्ह्यांचा समावेश होतो. ते जिल्हे पुढील प्रमाणे सांगता येतील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपुर, वर्धा, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, वाशिम गोंदिया. पूर्णा, वर्धा, पेनगंगा, वेनगंगा. या नद्यांच्या खोर्याचा समावेश विदर्भात होतो. या प्रदेशास वर्हाड नावानेही ओळखतात.
महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग
देशातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंगाचा समावेश महाराष्ट्रात होतो. पुढील पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात स्थित आहेत.
- भीमाशंकर——————————पुणे
- परळी वैज्यनाथ————————बीड
- औंढा नागनाथ————————हिंगोली
- त्र्यंबकेश्वर—————————–नाशिक
- घृष्णेश्वर——————————औरंगाबाद
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
महाराष्ट्रात पाच राष्ट्रीय उद्यानाचा समावेश होतो.
- तडोबा राष्ट्रीय उद्यान————————चंद्रपुर
- नवेगाव राष्ट्रीय उद्यान———————-गोंदिया
- पेंच राष्ट्रीय उद्यान—————————नागपुर
- गुगामल राष्ट्रीय उद्यान———————अमरावती
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान—————–बोरीवली (मुंबई)
महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.
महाराष्ट्रात असलेले अभयारण्य
- अंधारी———————–चंद्रपुर
- बोर—————————वर्धा
- टिपेश्वर———————यवतमाळ
- नागझिरा———————-भंडारा
- भामरागड——————–गडचिरोली
- चपराळ———————–गडचिरोली
- मेळघाट———————–अमरावती
- नर्नाळा————————–अकोला
- वान—————————अमरावती
- अंबाबरवा———————-बुलढाणा
- नांदूर मध्यमेश्वर—————नाशिक
- यावल—————————-जळगाव
- कळशुबाई हरिश्चंद्र गड——–अहमदनगर
- गौताळा औटरमघाट————औरंगाबाद, जळगाव
- जायकवादी पक्षी अभयारण्य—————औरंगाबाद, अहमदनगर
- नायगव मयूर अभयारण्य——————बीड
- येडसी रामलिंगघाट———————उस्मानाबाद
- अनेर डॅम———————————–धुळे
- काटेपूर्णा———————————अकोला, वाशिम
- पैनगंगा————————————–यवतमाळ
- ज्ञानगंगा————————————–बुलढाणा
- कारंजा-सोहळ———————————-अकोला
- लोणार अभयारण्य—————————-बुलढाणा
- कर्नाळा पक्षी अभयारण्य———————ठाणे
- तानसा—————————————ठाणे
- फनसाड————————————–रायगड
- भीमाशंकर———————————–पुणे
- माळढोक अभयारण्य—————-पुणे, सोलापूर, अहमदनगर
- रेहकुरी अभयारण्य————————-अहमदनगर
- मयूरेश्वर-सुपे———————————–पुणे
- राधानगरी अभयारण्य———————–कोल्हापूर
- सागरेश्वर अभयारण्य————————-सांगली
- कोयना अभयारण्य—————————-सातारा
- चांदोली अभयारण्य——————सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी
- मालवण सागरी अभयारण्य——————-सिंधुदुर्ग
- तुंगरेश्वर अभयारण्य—————————ठाणे
महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रे
- खोपोली ———————रायगड
- कोयना————————सातार
- भंडारदरा———————–अहमदनगर
- जायकवाडी——————–पैठण
- पेंच—————————–नागपुर
- भिरा—————————–रायगड
- पवना—————————-पुणे
- वैतरणा————————–नाशिक
- भाटघर————————–पुणे
- तिल्लारी———————–सिंधुदुर्ग
- भिवपुरी————————रायगड
- येल्दरी—————————परभणी
महाराष्ट्रातील महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग
खाली महामार्गाची लांबी केवळ महाराष्ट्रातील लांबी आहे.
- महामार्ग क्रमांक 3————-मुंबई-आग्रा————-391 की.मी.
- महामार्ग क्रमांक 4———मुंबई-बंगलोर-आग्रा———371 की.मी.
- महामार्ग क्रमांक-4ब——–नाव्हा-शेवा-पळस्पे———-27 की.मी.
- महामार्ग क्रमांक 6————धुळे-कोलकत्ता ———-813 की.मी.
- महामार्ग क्रमांक 9———-पुणे-विजयवाडा———–336 किमी
- महामार्ग क्रमांक 13——–सोलापूर-चित्रदुर्ग———-43 किमी
- महामार्ग क्रमांक 16——-निजामाबाद-जगदलपुर—-50किमी
- महामार्ग क्रमांक 17———पनवेल-मंगलोर———-482 किमी
- महामार्ग क्रमांक 50———पुणे नाशिक————–192 किमी
- महामार्ग क्रमांक 69———-नागपुर-अब्दुल्ला गंज—55 किमी
- महामार्ग क्रमांक 204———रत्नागिरी-कोल्हापूर—-126 किमी
- महामार्ग क्रमांक 211———-सोलापूर-धुळे———-400 किमी.
महाराष्ट्रातील महत्वाची शिखरे
- कळशुबाई —————————1646 मी
- साल्हेर———————————1567 मी
- महाबळेश्वर—————————1438 मी
- हरिश्चंद्र——————————-1424 मी
- सप्तश्रुंगी——————————1416 मी
- तोरणा———————————-1404 मी
- अस्तंभा——————————–1325 मी
- त्र्यंबकेश्वर—————————–1304 मी
- तौला———————————–1231 मी
- वैराट———————————–1177 मी
- चिखलदरा——————————1115 मी
- हनुमान———————————1063 मी
महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था
- मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र——————–पाडेगाव(सातारा)
- गवत संशोधन केंद्र—————————पालघर
- नारळ संशोधन केंद्र————————–भाट्य (रत्नागिरी)
- सुपारी संशोधन केंद्र————————–श्रीवर्धन (रायगड)
- काजू संशोधन केंद्र—————————-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
- केळी संशोधन केंद्र—————————-यावल (जळगाव)
- हळद संशोधन केंद्र—————————दिग्रज (सांगली)
महाराष्ट्रातील नद्या
महाराष्ट्रा मध्ये पुढील नद्यांचा समावेश होतो.
गोदावरी, भीमा, तापी, कृष्णा, वैनगंगा, पैनगंगा, पूर्णा, कोयना, गिरणा, उल्हास, मुळमुठा, पंचगंगा, पेंच, मुळा, कण्हण, पवना, नीरा, इंद्रायणी, वशिष्ठी, कुंडलिका, तानसा, प्रवरा, बिंदुसरा, कुंडली, पांझरा, नाग इत्यादि.
राज्यातून जाणारे लोहमार्ग
- मुंबई—दिल्ली (मध्ये रेल्वे)
- मुंबई-दिल्ली (पश्चिम रेल्वे)
- मुंबई-कोलकत्ता (मध्ये रेल्वे)
- मुंबई-चेन्नई (मध्ये रेल्वे)
- चेन्नई-दिल्ली
- भुसावळ-सूरत
महाराष्ट्राची लोकसंख्या
- सन 2011 नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी 23 लाख 74 हजार 333 आहे.
- लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश पाठोपाठ दूसरा क्रमांक लागतो.
- देशातील एकूण लोकसंख्ये पैकी महाराष्ट्राची 9.28 टक्के एवढी लोकसंख्या आहे.
महाराष्ट्रातील विद्यापीठ आणि त्यांची स्थापना
- मुंबई विद्यापीठ (मुंबई)— 1857.
- पुणे विद्यापीठ (पुणे)—-1949.
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (नागपुर)—1925.
- कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ (अमरावती)—1983
- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ (औरंगाबाद)—
- शिवाजी विद्यापीठ (1963)—कोल्हापूर.
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (नाशिक)—1988
- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव)—1989.
- स्वामी रमानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड)—1994
महाराष्ट्राशी सबंधित इतर माहीत
- भारताची आर्थिक राजधानी—मुंबई.
- महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार —रायगड.
- महाराष्ट्रातील मिठगरांचा जिल्हा—रायगड.
- मुंबईची परसबाग—नाशिक.
- महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेविकांचा जिल्हा— रत्नागिरी.
- द्रक्षांचा जिल्हा –नाशिक
- संत्र्यांचा जिल्ह—नागपुर
- महाराष्ट्रातील केळीचा जिल्हा- जळगाव.
- लेण्यांचा जिल्हा–औरंगाबाद.
- आदिवासींचा जिल्हा —नंदुरबार.
- साखर कारखान्यांचा जिल्हा—अहमदनगर.
- महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार—सोलापूर.
- महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा—यवतमाळ
तर मित्रांनो Maharashtra GK in Marathi वर आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला कंमेंट करून नक्की सांगा.
हे देखील वाचा