TIME WORK & SPEED MPSC Marathi Grammar GK | काळ, काम आणि वेग
नमूना पहिला –
उदा.10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसांत पूर्ण करतात, तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील?
- 6
- 8
- 10
- 4
उत्तर : 4
माहिती भाग = प्रश्न10×6×12=20×9×xयानुसार X = 10×6×12/20×9= 4
नमूना दूसरा –
उदा. ‘अ’ एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?
- 8
- 12
- 15
- 10
उत्तर : 12
‘अ’ ला एक काम करण्यास 20 दिवस लागतात आणि ‘ब’ ला तेच काम करण्यास 30 दिवस लागतात. त्यानुसार ‘अ’ एक दिवसात 1/20 x काम करतो आणि ‘ब’ एक दिवसात 1/3 x काम करतो:: दोघे मिळून एक दिवसात 1/20+1/30=3/60+2/60=5/60 भाग काम करतात दोघे मिळून ते कामा X= 60/5=12 दिवसात पूर्ण करतील.
नमूना तिसरा –
उदा. ‘अ’ हा ‘ब’ च्या दुप्पट वेगाने काम करतो. तर ‘क’ हा ‘अ’ आणि ‘ब’ या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. ‘अ’ एकटा 12 दिवसांत एक काम संपवितो तर ‘अ’, ‘ब’, ‘क’ मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?
- 4
- 12
- 8
- 6
उत्तर : 4
‘अ’ ला एक काम संपविण्यास 12 दिवस लागतात,जर ‘अ’, ‘ब’ च्या दुप्पट काम करतो, तर ‘ब’ ला ते काम करण्यास 24 दिवस लागतील.:: ‘अ’ व ‘ब’ हे दोघे एक दिवसात 1/12+1/24=3/24 काम करतील:: ‘क’ हा ‘अ’ आणि ‘ब’ यांच्या एवढे काम करतो, म्हणजेच 3/24 काम करतो‘अ’, ‘ब’, ‘क’ मिळून एक दिवसात 3/24+3/24=6/24 भाग काम करतात.:: तिघे मिळून ते काम 24/6=4 दिवसांत पूर्ण करतील.
नमूना चौथा –
उदा. एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असल्यास, तेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील?
- 15
- 8
- 12
- 10
उत्तर : 10
3 मुले = 2 पुरुष म्हणजेच 15 मुले = 10 पुरुष,यावरून 10 पुरुष ते काम 20 दिवसांत करतात.: 20 पुरुष ते काम 10 दिवसांत करतील.
नमूना पाचवा –
उदा. 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरीत्या किती दिवसांत पूर्ण करतील?
- 12
- 9
- 10
- 16
उत्तर : 9
6 पुरुष किंवा 8 मुले म्हणजे 3:4 प्रमाण म्हणजेच 4 मुलाएवढे 3 पुरुष काम करतात.यानुसार 12 मुलाएवढे 9 पुरुष काम करतील आणि 6 पुरुष 24 दिवसांत काम करतील:: 7+9=16 याप्रमाणे 6×24/16 = 9, म्हणजेच 16 पुरुष 9 दिवसांत काम पूर्ण करतील.