कांदा कापताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी का येते? | Why do Onions make you Cry in Marathi

Kanda Chirtana Aaplya dolyatun Pani ka yete | कांदा कापताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी का येते?

Kanda Chirtana Aaplya dolyatun Pani ka yete
Kanda Chirtana Aaplya dolyatun Pani ka yete

मित्रांनो किव्हा कोशिंबिरी मध्ये कांडा तर खाल्लाच असेल, पण असे काय होते कि कांदा कापताना आपल्या डोळ्यामध्ये जळजळ होते आणि आपल्या डोळ्यातून पाणी येते?

तर मित्रांनो आजच्या या लेखामध्ये मध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत.

syn-Propanethial-S-oxide
syn-Propanethial-S-oxide

मित्रांनो आपण जेवण बनवता कांदा तर नेहमीच टाकतो. काही जण तर कच्चा कांदा जेवणासोबत नसेल तर त्यांना जेवणच जात नाही.

पण मित्रांनो जेव्हा कधी आपण कांद्याचा वापर करतो तेव्हा तो आपल्याला तो कांदा कापावा लागतो आणि कांदा कापत असताना आपल्या डोळ्यातून लहान मुलांसारखे अश्रू यायला लागतात आणि विशेष म्हणजे हे अश्रू फक्त कांदा कापतानाच येतात. कारण बघा ना भाज्यांमध्ये सर्वात तिखट असते ती मिरची पण मिरची कापताना तुमच्या डोळ्यातून पाणी येत नाही?

तर मग असे काय आहे ज्याने कांदा कापतानाच आपल्या डोळ्यातून पाणी येते?

तर मित्रांनो याचे उत्तर आहे सिन-प्रोपेनेथियल-एस-ऑक्साइड (syn-Propanethial-S-oxide)

syn-Propanethial-S-oxide
syn-Propanethial-S-oxide

मित्रांनो सुरवातीच्या दिवसात वैज्ञानिकांना असे वाटत होते कि कांद्यामध्ये असेलेल्या एलीनेस नावाच्या enzyme मुळे डोळ्यामध्ये अश्रू येतात पण जेव्हा यावर research केले गेले तेव्हा असे आढळले कि कांद्यामध्ये लेक्राइमेट्री-फैक्टर सिंथेस हे enzyme असते. आणि जेव्हा आपण कांदा कापतो तेव्हा कांद्यामधून लेक्राइमेट्री-फैक्टर सिंथेस बाहेर पडतो आणि हा enzyme कांद्याच्या अमिनो ऍसिड ला sulfuric acid मध्ये रूपांतरण करतो. आणि यानंतर हे sulfuric acid, syn-Propanethial-S-oxide मध्ये रूपांतरित होते. आणि जेव्हा हवे द्वारे हा syn-Propanethial-S-oxide आपल्या डोळ्यांच्या संपर्कात येतो तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये लेक्राईमेल ग्लॅन्ड ला त्रास होतो, ज्याने डोळ्यामध्ये जळजळ होते आणि डोळ्यातून पाणी येते.

तर मित्रांनो तुम्हाला आता समजलेच असेल कि कांडा कापताना आपल्या डोळ्यातून पाणी का येतो.

जर Why do Onions make you Cry in Marathi या लेखाबद्दल तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या शंकांचे निराकरण करण्याचा प्रयन्त करू.

Hello Friends My name is Rohit, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website.

Leave a Comment