Why are there stones on railway tracks in Marathi | रेल्वेच्या रुळावर खूप सारे दगडे का असतात?

Why are there stones on railway tracks in Marathi | रेल्वेच्या रुळावर खूप सारे दगडे का असतात?

मित्रांनो तुम्ही कधी ना कधी ट्रेन ने तर ट्रॅव्हल केलेच असेल पण तुम्ही कधी असा विचार केला आहेत का कि रेल्वेच्या रुळाखाली खूप सारे दगडे का असतात? किव्हा या दगडांच्या ऐवची दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा वापर का केला जात नाही?

तर मित्रांनो याचे दोन कारणे आहेत.

सर्वात आधी मित्रानो तुम्हाला हे समजले पाहिजे कि रेल्वेचे रूळ दिसायला जेवढे सोपे दिसतात तेवढे ते सोपे नसतात. तुम्ही रेल्वे रूळ नीट पहिले असेल तर तुम्हाला दोन रुळांच्या मध्ये सिमेंटचे आयताकृती ब्लॉक्स दिसतील, ज्यांना स्लीपर बोलले जाते. आणि या स्लीपर सोबत जी दगड तुम्हाला दिसतात त्यांना ballast असे म्हटले जाते.

तुम्ही जेव्हा रेल्वे चे track बघता तेव्हा तुम्हाला नेहमी असेच वाटत असेल कि साध्या जमिनीवर रेल्वेचे रूळ आंथरलेले असतात. पण खर सांगायचं झालं तर तर ते एवढे सोपे नाही आहे. आपण जे रेल्वेचे track पाहतो त्याच्या खाली अजून दोन मातीचे थर व त्या खाली जमीन असते, म्हणूनच रेल्वेचे ट्रकस हे नेहमी जमिनीपासून काही उंचीवर असतात. आणि रुळांच्या मध्ये असलेले सिमेंटचे स्लीपर आणि आजूबाजूला असलेले खूप सारी दगडे दोन रुळांना धरून ठेवतात व रुळांमध्ये गॅप पडून देत नाही.

मित्रांनो एका ट्रेनचे वजन हे जवळ जवळ १०-१५ लाख किलो एवढे असते, त्यामुळे तुम्ही विचार करू शकता कि एक लोखंडाचा पातळ ट्रॅक एवढे वजन नाही घेऊ शकणार. त्यामुळे ट्रेनचा एवढा वजन सांभाळण्यासाठी रेल्वेच्या रुळाचा, स्लीपर ब्लॉक्सचा आणि बाजूला असलेल्या दगडांचा मोठा योगदान असतो.

खर जर बघितले गेले तर ट्रेन चे सर्वात जास्त लोड हे ट्रॅक च्या आजूबाजूला असलेल्या दगडांवरच असते. आणि या दगडांमुळे रेल्वेचे ट्रॅक एका जागी धरून राहायला मदत होते.

पण रेल्वे रुळाच्या खाली कोणत्याही दगडांचा वापर केला जात नाही. मुख्यतः येथे टोकदार आणि खरबडीत दगडांचा वापर केला जातो, ज्यामुळे हि दगडे एकमेकांमध्ये अडकून ट्रॅक ला घट्ट धरून ठेवतात. आणि याच मुळे ट्रेन कितीहि वजन किव्हा फास्ट असली तरी आरामात रेल्वे ट्रॅकवरून चालते.

या दगडांचा अजून एक उपयोग आहे, तो म्हणजे जर का रेल्वेच्या रुळाच्या खाली दगडे टाकली नाही तर रेल्वेच्या रुळाच्या आजूबाजूला खूप सारी झाडे उगवण्याची शक्यता असते, त्यामुळे या दगडांमुळेच ट्रॅक वर गवत किंव्हा इतर झाडे उगवत नाहीt. तसेच हि दगडे पावसाचे पाणी ट्रॅक च्या आजू बाजूला जमून देत नाहीत.

Railway Tracks without stones in Marathi
Railway Tracks without stones in Marathi

तर मित्रांनो तुम्ही जेव्हा कधी रेल्वेने प्रवास कराल तेव्हा या दगडांचे निरीक्षण नक्की करा व बघा कसे हि दगडे रेल्वेचे ट्रॅक एक जागी धरून ठेवायला मदत करतात.

मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला आता समजले असेल कि रेल्वे रुळाच्या खाली खूप सारी दगडे का असतात!

Leave a Comment