महाराष्ट्र भौगोलिक व संकीर्ण | Maharashtra Police Bharati Question Paper in Marathi
महाराष्ट्र भौगोलिक व संकीर्ण घटकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या इतर विषयांच्या तुलनेत जास्त असते. यामध्ये प्रामुख्याने प्राकृतिक रचना, नदी प्रणाली, पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्र, लोकसंख्या, साक्षरता या घटकांवर जास्त प्रश्न विचारले जातात.
त्यामुळे जे कोणी पोलीस भरती परीक्षेची तयारी करत असतील त्यांनी ज्या जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी इच्छुक आहेत त्या जिल्ह्यातील प्राकृतिक रचना, नदीप्रणाली, जलसिंचन प्रकल्प पर्यटन व तीर्थक्षेत्रे यावर जास्त भर द्यावी.
1. लोणावळा, खंडाळा हि थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
A. सातारा
B. पुणे
C. नाशिक
D. अहमदनगर
उत्तर => B. पुणे
2. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य कोणते आहे?
A. प्रवासी आमचे दैवत
B. बहुजन हिताय बहुजन सुखाय
C. प्रवाशांच्या सेवेसाठी
D. वाटेल तेथे प्रवास करा
उत्तर => C. प्रवाशांच्या सेवेसाठी
3. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील …. या ठिकाणी झाला आहे?
A. कोयना
B. प्रतापगड
C. महाबळेश्वर
D. अजिंक्यतारा
उत्तर => C. महाबळेश्वर
4. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?
A. पुणे
B. औरंगाबाद
C. कोल्हापूर
D. अमरावती
उत्तर => B. औरंगाबाद
5. भारतातील पहिली रेल्वे १८५३ मध्ये कोणत्या मार्गावर धावली होती?
A. ठाणे-कल्याण
B. मुंबई-कल्याण
C. मुंबई – ठाणे
D. यांपैकी कोणतेही नाही
उत्तर => C. मुंबई – ठाणे
6. महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खकडापासून बनलेला आहे?
A. ग्रॅनाईट
B. सिलिकॉन
C. बेसाल्ट
D. यांपैकी कोणतेही नाही
उत्तर => C. बेसाल्ट
7. राजमाता आहिल्याबाई होळकर यांचे मूळ गाव कोणते आहे?
A. जवळा
B. चोंडी
C. जामखेडा
D. खर्डा
उत्तर => B. चोंडी (अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी, जामखेड)
8. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?
A. नाशिक
B. पंढरपूर
C. आळंदी
D. नागपूर
उत्तर => A. नाशिक
9. चालुक्यकाळी बीड शहराचे नाव काय होते?
A. भिर
B. अंबानगर
C. प्रतिष्ठान
D. चंपावतीनगर
उत्तर => D. चंपावतीनगर
10. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
A. 13 सप्टेंबर
B. 15 सप्टेंबर
C. 17 सप्टेंबर =
D. 19 सप्टेंबर
उत्तर => C. 17 सप्टेंबर (17 September 1948 मध्ये indian military ने हैदराबाद च्या निजामाला हरवून हैदराबाद मधील मराठवाड्याचा भाग महाराष्ट्र राज्यामध्ये समाविष्ट केले होते. म्हणून दर वर्षी १७ सप्टेंबर ला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जातो. )
11. देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो
A. चौथा
B. तिसरा
C. पाचवा
D. पहिला
उत्तर => B. तिसरा
12. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगलक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते?
A. नागपूर
B. चंद्रपूर
C. गडचिरोली
D. कोल्हापूर
उत्तर => C. गडचिरोली
13. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. नाशिक
B. अहमदनगर
C. पुणे
D. सातारा
उत्तर => B. अहमदनगर
14. चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे?
A. मराठवाडा
B. खानदेश
C. कोकण
D. विदर्भ
उत्तर => D. विदर्भ (चिखलदरा हे विदर्भातील अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. )
15. कोणत्या नदीच्या खोऱ्याला संतांची भूमी म्हणून संबोधले जाते?
A. कृष्णा
B. गोदावरी
C. कोयना
D. गिरणा
उत्तर => B. गोदावरी
16. पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?
A. पालघर
B. डहाणू
C. तलासरी
D. विक्रमगड
उत्तर => B. डहाणू
17. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) कोणत्या शहरात आहे?
A. नागपूर
B. मुंबई
C. औरंगाबाद
D. पुणे
उत्तर => D. पुणे
18. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते?
A. कोलकाता
B. मुंबई
C. सुरत
D. लखनौ
उत्तर => B. मुंबई
19. ‘मुंबई हाय फील्ड’ हे कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे?
A. मीठ
B. कोळसा
C. मॅगनीज
D. पेट्रोलियम
उत्तर => D. पेट्रोलियम
20. खालीलपैकी कोणते विभाग हे गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही?
A. परिवहन
B. कामगार सुरक्षा
C. गृहरक्षक दल
D. तुरुंग
उत्तर => A. परिवहन
21. खालीलपैकी कोणत्या धरणाच्या पाण्याचा पुरवठा पुणे शहर व इतर परिसरात होत नाही?
A. खडकवासला
B. गंगापूर
C. पानशेत
D. मुळशी
उत्तर => B. गंगापूर (गंगापूर धरण हे नाशिक शहराला पाणी पुरवठा करतो. )
22. मच्छिमारांचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा मुंबईसोबत महाराष्ट्रामध्ये अजून कोठे आहेत?
A. कुडाळ व रत्नागिरी
B. अलिबाग व उरण
C. सातपाटी व रत्नागिरी
D. कुडाळ व अलिबाग
उत्तर => C. सातपाटी व रत्नागिरी
23. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ कोणते आहे?
A. तुळजापूर
B. माहूर
C. कोल्हापूर
D. वणी(नाशिक) =
उत्तर => D. वणी(नाशिक)
कोल्हापूर चे महालक्ष्मी मंदिर
तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिर
माहूर येथील रेणुका मंदिर
व वणीचे सप्तश्रृंगी मंदिर यांचा समावेश होतो.
24. भारताला जेव्हा स्वातंत्र्य भेटले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते?
A. चर्चिल
B. विल्सन
C. लॉर्ड माऊंटबॅटन
D. लॉर्ड क्लीमेंट अॅटली
उत्तर => D. लॉर्ड क्लीमेंट अॅटली
25. कोरडवाहू क्षेत्रात खालीलपैकी कोणते पीक घेतले जात नाही?
A. ऊस
B. ज्वारी
C. बाजरी
D. रागी
उत्तर => D. रागी
26. भारताने कोणत्या ठिकाणी पहिली भूमिगत अणुचाचणी केली होती?
A. चांदीपूर
B. पोखरण
C. श्रीहरीकोटा
D. महेंद्रगिरी
उत्तर => B. पोखरण (राजस्थान राज्यातील जैसलमेर मधील पोखरण येथे अणुचाचणी केली होती. )
27. भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात?
A. बाळशास्त्री जांभेकर
B. राजा राममोहन रॉय
C. जेम्स हिकी
D. मार्शमेन
उत्तर => C. जेम्स हिकी
28. ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ कोणी लिहला होता?
A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B. पंडित जवाहरलाल नेहरू
C. लोकमान्य टिळक
D. महात्मा गांधी
उत्तर => A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९२३)
29. डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली?
A. 1954 साली
B. 1955 साली
C. 1956 साली
D. 1957 साली
उत्तर => C. 1956 साली (4 ऑक्टोबर 1956)
30. वास्को द गामा यांचे भारतात सर्व प्रथम इ.स. १४९८ मध्ये कोठे आगमन झाले?
A. कोची
B. कन्नान्नोर
C. कोझिकोड
D. गोवा
उत्तर => C. कोझिकोड (केरळ राज्यातील, कोझिकोड)
31. सूर्यमालेत सूर्यापासून चौथ्या क्रमांकावर असलेल्या ग्रहाचे नाव काय आहे?
A. शुक्र
B. शनी
C. मंगळ
D. गुरु
उत्तर => C. मंगळ (बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, बृहस्पति, शनि, यूरेनस, नेप्च्यून)
32. ‘दादरा व नगर हवेली’ या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे?
A. पोर्ट ब्लेअर
B. दमण
C. सिल्व्हासा
D. कवरत्ती
उत्तर => C. सिल्व्हासा
33. आशियातील नोबेल म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो?
A. मॅन बुकर
B. रॅमन मॅग्सेसे
C. महात्मा गांधी शांतात पुरस्कार
D. टेलर पुरस्कार
उत्तर => B. रॅमन मॅग्सेसे (रॅमन मॅग्सेसे हे 1957 च्या विमान अपघातात मरण पावलेले फिलिपिन्सचा या देशाचे राष्ट्रपती होते. )
34. प्राणहिता म्हणून ….. व ….. यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते?
A. वर्धा व गोदावरी
B. वैनगंगा व गोदावरी
C. वर्धा व वैनगंगा
D. कृष्णा व गोदावरी
उत्तर => C. वर्धा व वैनगंगा
35. महाराष्ट्रातील कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?
A. तापी नदी
B. नर्मदा नदी
C. वैनगंगा नदी
D. कृष्णा नदी
उत्तर => C. वैनगंगा नदी (लांबी: 569 km, आणि या नदीचे उगमस्थान सिवनी मध्य प्रदेश येथे आहे. )
36. अहिराणी हि भाषा महाराष्ट्रातील कोणत्या भागात बोलली जाते?
A. पूर्व महाराष्ट्र
B. कोंकण
C. उत्तर महाराष्ट्र
D. मराठवाडा
उत्तर => C. उत्तर महाराष्ट्र (धुळे, नंदुरबार आणि जळगाव)
37. ग्रँड ट्रंक मार्ग कोणत्या शहरांना जोडतो?
A. दिल्ली-मुंबई
B. दिल्ली-जयपूर
C. दिल्ली-कोलकाता
D. दिल्ली-पुणे
उत्तर => C. दिल्ली-कोलकाता
38. महाराष्ट्रात मावळ प्रांतात खालीलपैकी कोणता भाग आहे?
A. कोंकण किनारपट्टीचा भाग
B. सह्याद्रीचा पश्चिम भाग
C. सह्याद्रीचा पूर्वेकडील उतरणीचा भाग
D. सह्याद्रीचा उत्तर भाग
उत्तर => C. सह्याद्रीचा पूर्वेकडील उतरणीचा भाग
39. महाराष्ट्रात दगडी-कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
A. नंदुरबार
B. वाशीम
C. चंद्रपूर
D. जळगाव
उत्तर => C. चंद्रपूर
40. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे?
A. रायगड
B. पालघर
C. रत्नागिरी
D. सिंधुदुर्ग
उत्तर => C. रत्नागिरी
मित्रांनो हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत तुम्ही या प्रश्नाची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये केली नसेल तर लगेच करून घ्या. हेच प्रश्न तुम्हला पोलीस भरती परीक्षा crack’करून द्यायला मदत करतील.
Question of you
Q4u: महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रथमच ‘स्मार्ट पोलीस जिल्हा’ म्हणून जाहीर झाला आहे?
A. सातारा
B. पुणे
C. सांगली
D. कोल्हापूर
हे देखील वाचा
पोलीस भरती विज्ञान प्रश्न आणि उत्तरे
1 thought on “Maharashtra Police Bharti Question Paper in Marathi | महाराष्ट्र भौगोलिक व संकीर्ण”