Sam Sambandh MPSC Question | Maths GK Part 14 | MPSC Syllabus

सम संबंध | Sam Sambandh MPSC Question

समसंबंध या शब्दाचा अर्थ असा की दिलेल्या उदाहरणामध्ये पहिल्या दोन पदाचा आपआपसात जो संबंध आहे तोच संबंध दुसर्‍या दोन पदामध्ये असतो. आपल्याला पहिल्या दोन पदामधील संबंधाचा आधार घेऊन दिलेल्या पर्यायामधून गाळलेले पद शोधावयाचे असते.

उदा.  4 : 64 : : 3 : ?

  • 9
  • 27
  • 81
  • 89
स्पष्टीकरण : 
वरील संख्यामालिकेतील दुसरे पद हे पहिल्या पदाचा घन आहे. हा संबंध तिसर्‍या व चवथ्या पदाशी लावल्यास चवथे पद हे तिसर्‍या पदाचा घन यायला हवे. यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी 81 हे उत्तर येईल. यामुळे उत्तर 81 हे आहे.

उदा. 36 : 216 : : 81 : ?

  • 512
  • 542
  • 632
  • 729
स्पष्टीकरण : 
वरील संख्यामालिकेतील पहिले पद हे 6 चा वर्ग आहे. व दुसरे पद 6 चा घन आहे. हा संबंध तिसर्‍या व चवथ्या पदाशी लावल्यास तिसरे पद हे 9 चा वर्ग आहे. यानुसार चवथे पद हे 9 चा घन यायला हवे. यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी 729 हे उत्तर येईल. यामुळे उत्तर 729 हे आहे.

उदा. 12 : 35 : : ? : 63

  • 14
  • 15
  • 16
  • 18
स्पष्टीकरण : 
वरील संख्यामालिकेतील पहिले पद हे 6 ची दुप्पट आहे व दुसरे पद 6²-1 येते. हा संबंध तिसर्‍या व चवथ्या पदाशी लावल्यास चवथे पद 8²-1 = 63 याप्रमाणे येते. यानुसार तिसरे पद हे 8 ची दुप्पट असणार यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी 16 हे उत्तर येईल. यामुळे उत्तर 16 हे आहे.

उदा.  25 : 49 : : 121 : ?

  • 81
  • 100
  • 144
  • 169
स्पष्टीकरण : 
वरील संख्यामालिकेतील पहिले पद हे 5 चा वर्ग आहे आणि दुसरे पद 7 चा वर्ग आहे. या दोन पदाच्या मूळ संख्येतील फरक 2 आहे. हा संबंध तिसर्‍या व चवथ्या पदाशी लावल्यास तिसरे पद हे 11 चा वर्ग असून चवथे पद 11+2 = 13 चा वर्ग येईल. यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी 169 हे उत्तर येईल. यामुळे उत्तर 169 हे आहे.

उदा. 9 : 729 : : 18 : ?

  • 3285
  • 4096
  • 5916
  • 6561
स्पष्टीकरण : 
वरील संख्यामालिकेतील दुसरे पद हे पहिल्या पदाचा घन आहे. हाच संबंध तिसर्‍या व चवथ्या पदाशी लावल्यास चवथे पद हे तिसर्‍या पदाचा घन असेल म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी 5916 हे उत्तर येईल. यामुळे उत्तर 5916 हे आहे.

Leave a Comment