Maharashtra Police Bharti 2024 | Police Bharti Question Paper in Marathi

Maharashtra Police Bharti 2024 | Police Bharti Question Paper in Marathi

Maharashtra police bharti exam paper: तुम्ही सुद्धा महाराष्ट पोलीस भरती परीक्षेची तयारी करताय का? मग तुम्ही योग्य वेबसाईट वर आला आहात. आजच्या या लेखामध्ये आम्ही १०० अशा प्रश्नांचा समावेश केला आहे, जे आता पर्यंत अनेकदा महाराष्ट्र राज्य पोलीस भरती परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेमध्ये Police Bharti General Knowledge Questions नेहमीच विचारले जातात. त्यामुळे तुम्ही जर का तुम्ही पोलीस भरती परीक्षेची तयारी करताय तर ला लेखामध्ये दिलेले सर्व 100 प्रश्न परीक्षेपूर्वी वाचून नक्की जा.

1. जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे?
A. कोलंबो
B. हरारे
C. बर्लिन
D. बीजिंग

2. अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणास म्हणतात?
A. डॉ. नेल्सन मंडेला
B. मार्टिन ल्युथर किंग
C. जॉर्ज वॉशिंग्टन
D. जॉर्ज बुश

3. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे?
A. सुष्मिता सेन
B. नर्सिंग दत्त
C. देविका राणी
D अरुंधती रॉय

4. उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यातील सीमारेषा खालीलपैकी कोणती आहे?
A. 24 अक्षांश रेषा
B. 38 अक्षांश रेषा 
C. 49 समांतर रेषा
D. डिव्हिडंड रेषा

5. सुरती, मुऱ्हा, मेहसाना या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत?
A. गाय
B. म्हैस 
C. मेंढी
D. शेळी

6. जगातील सर्वात खोल मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे?
A. अटलांटिक महासागर
B. पॅसिफिक महासागर
C. हिंदी महासागर
D. अरबी समुद्र

7. फिलिपिन्स या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे?
A. रुबल
B. दिनार
C. पेसो
D. डॉलर

8. ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस’ खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो?
A. 3 जानेवारी
B. 12 फेब्रुवारी
C. 8 सप्टेंबर
D. 20 एप्रिल

9. खट्याळ नदी असे खालीलपैकी कोणत्या नदीचे नाव आहे?
A. ब्रह्मपुत्रा
B. कोसी 
C. दामोदर
D. नर्मदा

10. संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र “वरणगाव” खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. चंद्रपूर
B. नाशिक
C. जळगाव 
D. नागपूर

11. छत्रपती शाहू महाराजांचे समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
A. पुणतांबे(अहमदनगर)
B. माहुली (सातारा)
C. अमळनेर (जळगाव)
D. पैठण (औरंगाबाद)

12. ‘सेंट्रल वॉटर रिसर्च’ ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरांमध्ये आहे?
A. नागपूर
B. औरंगाबाद
C. पुणे
D. मुंबई

13. 51 ते 100 पर्यंतच्या संख्येत 07 हि अंक किती वेळा येतो?
A. 10
B. 15 
C. 25
D. 35

14. लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते?
A. जहाल मतवादी
B. मवाळ मतवादी
C. साम्यवादी
D. माओवादी

15. संसदेची एका वर्षातून किती अधिवेशन होतात?
A. एक
B. दोन
C. तीन
D. चार

16. राजश्री शाहू महाराज यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे?
A. 27 मे 1867
B. 26 जुलै 1875
C. 26 जून 1874 
D. 12 जून 1874

17. कडधान्यांमध्ये कोणत्या अन्नघटकांचे प्रमाण जास्त असते?
A. प्रथिने
B. कर्बोदके
C. कार्बोहायड्रेट्स 
D. यापैकी नाही

18. मानवाच्या पाठीच्या कण्याच्या 33 मणक्यांपैकी किती मणके मानेत असतात?
A. चार
B. पाच
C. सात 
D. सहा

19. सध्या भारताचे केंद्रीय कृषिमंत्री कोण आहेत?
A. राजनाथ सिंग
B. धर्मेंद्र प्रधान
C. नरेंद्र सिंग तोमर
D. प्रल्हाद जोशी

20. “वेलिंग्टन” ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
A. रशिया
B. इंडोनेशिया
C. न्युझीलँड
D. दक्षिण कोरिया

21. “भूमध्य समुद्राची किल्ली” असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते?
A. कोचीन, केरळ
B. जिब्राल्टर खाडी 
C. रोम, इटली
D. यापैकी नाही

22. अज्ञातवासी हे टोपणनाव खालील पैकी कोणत्या कवीचे आहे?
A. आत्माराम रावजी देशपांडे
B. दिनकर गंगाधर केळकर 
C. काशिनाथ हरी मोडक
D. शंकर काशिनाथ गर्गे

23. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
A. जयंत पाटील
B. हर्षवर्धन पाटील
C. दिलीप वळसे-पाटील
D. यापैकी नाही
5 April 2021

24. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत?
A. नवाब मलिक
B. यशोमती ठाकूर
C. आदित्य ठाकरे
D. राजेश टोपे

25. 2019 च्या ऑलम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही?
A. मीराबाई चानू
B. पी व्ही सिंधू
C. नीरज पांडे 
D. रवी कुमार भैया

26. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
A. IX = V + IV
B. IX = X – I
C. IX = XX – X 
D. IX = XV – VI

27. खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही?
A. कामठी
B. बल्लारपूर 
C. रामटेक
D. हींगणे

28. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था, श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली?
A. बाबा आमटे
B. डॉ. सुनील देशमुख
C. डॉ. पंजाबराव देशमुख 
D. डॉ. शिवाजी पटवर्धन

29. खालीलपैकी अंगोरा, कश्मीर, मोहेर हे कशाचे प्रकार आहेत?
A. चामडे
B. लोकर
C. कापूस
D. रेयॉन

30. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतामध्ये पहिली जनगणना कोणत्या वर्षी पार पडली होती?
A. 1860
B. 1881
C. 1872 
D. 1867

31. भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट खालीलपैकी कोणता आहे?
A. हरिश्चंद्राची फॅक्टरी
B. श्यामची आई
C. श्वास 
D. सैराट

32. मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A. सातारा
B. सांगली
C. रायगड 
D. सिंधुदुर्ग

33. पन्हाळा हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A. अहमदनगर
B. अमरावती
C. पुणे
D. कोल्हापूर 

34. तानसा हे महाराष्ट्र मधील अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A. यवतमाळ
B. रायगड
C. ठाणे
D. नांदेड

35. ‘धर्म ही अफूची गोळी’ आहे असे कोणी म्हटले आहे?
A. कार्ल मार्क्स 
B. माओत्सेतुंग
C. नेपोलियन बोनापार्ट
D. द गॉल

36. ‘जनगणमन’ हे गीत काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी गायले गेले होते?
A. 1910
B. 1912
C. 1913
D. 1911 

37. करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला?
A. सुभाष चंद्र बोस
B. भगतसिंग
C. चंद्रशेखर आजाद
D. महात्मा गांधी 

38. 7 X 8 + 4 X 9 + 5 X 6 = ?
A. 112
B. 116
C. 118
D. 122

39. सच्चर समितीने कोणाबद्दल शिफारस केली होती?
A. मुस्लिम 
B. ख्रिस्ती
C. शिख
D. अनुसूचित जमाती

40. ‘सिक्स मशीन’ हे कोणत्या क्रिकेट खेळाडू चे आत्मचरित्र आहे?
A. वीरेंद्र सेवाग
B. रिकी पॉंटिंग
C. क्रिस गेल 
D. एबी डिव्हिलियर्स

41. PIN म्हणजे काय?
A. Postal India Number
B. Postal Index Number 
C. Postal Index Nomenclature
D. Postal Infrastructure Number

42. 1962 मध्ये भारतावर चीन हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते?
A. मोरारजी देसाई
B. यशवंतराव चव्हाण
C. व्ही. के. कृष्णमेनन 
D. लाल बहादूर शास्त्री

43. महाराष्ट्राचा वीरधवल खाडे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. टेनिस
B. धावणे
C. जलतरण 
D. कुस्ती

44. भारताच्या नौदल प्रमुखाला……. असे म्हणतात?
A. ऍडमिरल 
B. एअर मार्शल
C. फील्ड मार्शल
D. वॉटर मार्शल

45. ‘ययाती’ या पुस्तकाचे लेखक कोण?
A. वि. स. खांडेकर 
B. वि. वा. शिरवाडकर
C. प्रल्हाद केशव अत्रे
D. रणजित देसाई

46. बुकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?
A. खेळ
B. सामाजिक सेवा
C. साहित्य 
D. संशोधन

47. क्रीडा प्रशिक्षकांसाठीची कोणता पुरस्कार दिला जातो?
A. अर्जुन पुरस्कार
B. राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार
C. दोणाचार्य पुरस्कार
D. पद्मश्री पुरस्कार

48. विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते?
A. सेवाग्राम
B. धावेपाडा
C. कोराडी
D. रामटेक

49. ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे?
A. पर्यावरण रक्षण
B. आरोग्य सुधारणा
C. नक्षलवाद बिमोड 
D. भ्रूणहत्या

50. ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण?
A. सुरेंद्रनाथ बॅनर्जी 
B. रवींद्रनाथ टागोर
C. रघुनाथ परांजपे
D. सुभाष चंद्र बोस

51. राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण?
A. वैजयंतीमाला 
B. हेमा मालिनी
C. जय ललिता
D. नर्गिस दत्त

52. कोणत्या उद्योगात कच्चामाल म्हणून चुनखडीची राख वापरली जाते?
A. सिमेंट 
B. रंग
C. वीटभट्टी
D. लोखंड

53. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक कोणी लिहिले?
A. संतोष पवार
B. वसंत कानेटकर
C. विजय तेंडुलकर
D. वसंत बापट

54. 12 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा करण्यात येतो?
A. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
B. आंतरराष्ट्रीय युवक दिन
C. राष्ट्रीय युवक दिन
D. आंतरराष्ट्रीय नारळ दिन

55. पुढील म्हणीचा अर्थ ओळखा – कोल्हा काकडीला राजी
A. कोल्ह्याला काकडी आवडते
B. काकडी स्वस्त होणे
C. कोल्हा धूर्त असणे
D. क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तुंना भाळतात 

56. ‘पपई, आंबा’ या फळांमध्ये कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते?
A. ड जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. अ जीवनसत्व 
D. क जीवनसत्व

57. चिपको आंदोलनाशी संबंधित व्यक्ती कोण?
A. सुंदरलाल बहुगुणा
B. मेधा पाटकर
C. नवीन पटनायक
D. अरुंधती राय

58. नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट(NEERI) चे मुख्यालय कुठे आहे?
A. औरंगाबाद
B. नाशिक
C. मुंबई
D. नागपूर

59. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने……. या जिल्ह्यात आहेत?
A. नागपूर
B. ठाणे
C. चंद्रपूर
D. भंडारा

60. ‘औंढा नागनाथ’ हे भारतातील कितवे ज्योतिर्लिंग आहे?
A. 5 वे
B. 8 वे 
C. 6 वे
D. 12 वे

61. ‘हॅरीस शिल्ड ट्रॉफी’ कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे?
A. हॉकी
B. फुटबॉल
C. क्रिकेट
D. बुद्धिबळ

62. पंचायत समितीला आसाममध्ये ‘………’ म्हटले जाते?
A. आंचलिक पंचायत
B. जनपद सभा
C. महकमा परिषद
D. जिल्हा पंचायत

63. महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना कधी झाली?
A. 20 जानेवारी 1976
B. 20 जानेवारी 1975
C. 20 जानेवारी 1974
D. 21 जानेवारी 1976

64. महाराष्ट्रात सध्या किती जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभला आहे?
A. चार
B. पाच 
C. सहा
D. आठ

65. बर्फाचे ज्यावेळी पाण्यात रूपांतर होते त्यावेळी त्याचे आकारमान……..?
A. कायम राहते
B. वाढते
C. कधी वाढते व कधी कमी होते
D. कमी होते 

66. खालीलपैकी कोणत्या दिवशी ‘जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस’ पाळला जातो?
A. 7 जून
B. 12 जून
C. 16 जून
D. 17 जून 

67. हरिश्चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात?
A. ठाणे
B. अहमदनगर 
C. नाशिक
D. पुणे

68. राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे?
A. मुख्यमंत्री
B. राज्यपाल
C. राज्य विधानसभा
D. राष्ट्रपती

69. …….. हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते?
A. श्री. जवाहरलाल नेहरू
B. श्री. राजेंद्र प्रसाद
C. श्री.सी.डी. देशमुख
D. श्री.के.सी. पंत

70. तलाठ्याच्या कार्यालयास…… असे म्हणतात?
A. चावडी
B. पार
C. दप्तर
D. सज्जा 

71. अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य…….. या संघटनेने केले आहे?
A. प्रार्थना समाज 
B. सत्यशोधक समाज
C. आर्य समाज
D. ब्राह्मो समाज

72. ‘शिवाजी आणि स्वराज्य’ या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?
A. बाबासाहेब पुरंदरे
B. पु. ल. देशपांडे
C. सुमित्रा महाजन
D. अनिल माधव दवे 

73. कलकत्ता इंडियन असोसिएशनची स्थापना कधी झाली?
A. 1890
B. 1884
C. 1887
D. 1876 

74. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरू गाव ‘पारपोली’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. रायगड
B. सिंधुदुर्ग 
C. पालघर
D. रत्नागिरी

75. कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणले जाते?
A. कर्नाळा
B. सुलतानपूर
C. भरतपुर 
D. घटप्रभा

76. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते?
A. के -२ 
B. कांचनगंगा
C. मकाऊ
D. धवलगिरी
Jammu and Kashmir

77. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ कशासाठी राबवण्यात आली?
A. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी
B. शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यासाठी
C. उत्पन्न वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी
D. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी

78. भाववाढ झाल्यास सर्वात जास्त फायदा कोणाला होतो?
A. उत्पादक
B. व्यापारी
C. शेतमजूर
D. छोटे शेतकरी

79. नगराध्यक्षाचा कार्यकाल महाराष्ट्र शासनाने सध्या किती वर्ष केला आहे?
A. दोन वर्ष
B. अडीच वर्ष
C. पाच वर्ष
D. दहा वर्ष

80. महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र……… येथे आहे?
A. बारामती
B. महाबळेश्वर
C. कळसुबाई शिखर
D. भीमाशंकर

81. खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे?
A. सह्याद्री माथा
B. कृष्णाकाठ
C. प्रीतीसंगम
D. माझा विरंगुळा

82. ‘बल्लारपूर’ हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?
A. सिमेंट
B. कागद कारखाना
C. साखर
D. अभयारण्य

83. लाल काचेतून पाहिल्यावर झाडाची हिरवी पाने………?
A. काळ्या रंगाची दिसतात 
B. दिसून येत नाहीत
C. नैसर्गिक रंगछटेत दिसतात
D. निळ्या रंगछटेत दिसतात

84. सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे?
A. साबरमती
B. कृष्णा
C. माहि
D. नर्मदा

85. राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतीगृह सुरु केले?
A. मीस मेरी वस्तीगृह
B. मिस रोझी वस्तीगृह
C. मिस क्लार्क वसतिगृह 
D. मिस लूसी वस्तीगृह

86. ‘स्टेट फ्रॉम दि हार्ट’ पुस्तकाचे लेखन कोणी केले?
A. युवराज सिंग
B. झुंपा लाहिरी
C. खुशवंत सिंग
D. कपिल देव

87. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हे अभियान कोणत्या राज्यातून सुरू झाले?
A. हरियाणा
B. गुजरात
C. महाराष्ट्र
D. बिहार

88. शाररिक तापमान कायम राखणारी मानवी शरीरातील ग्रंथी खालीलपैकी कोणती?
A. पियुषिका ग्रंथी
B. अवटू ग्रंथी
C. अधिवृक्क ग्रंथी
D.अधश्चेतक 

89. भारतामध्ये घरगुती वापरासाठी असणारी सर्व विद्युत यंत्रे साधारणपणे…… व्हॉल्ट दाबावर चालतात?
A. 80
B. 120
C. 150
D. 230

90. महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात कोणता विभाग अग्रेसर आहे?
A. पश्चिम महाराष्ट्र
B. विदर्भ व मराठवाडा
C. कोकण
D. उत्तर महाराष्ट्र

91. लोह व अल्युमिनीयम चे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते?
A. काळी मृदा
B. गाळाची मृदा
C. जांभी मृदा
D. पिवळसर मृदा

92. आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते?
A. हमास
B. इंटरपोल
C. आय. एस. आय
D. यापैकी नाही

93. कावेरी पाणीवाटप वाद कोणत्या दोन राज्यादरम्यात आहे?
A. आंध्रप्रदेश कर्नाटक
B. कर्नाटक मध्य प्रदेश
C. कर्नाटक तामिळनाडू
D. पंजाब हरियाणा

94. ‘असतील शिते तर जमतील भूते’ या वाक्याचा प्रकार ओळखा?
A. केवल वाक्य
B. संयुक्त वाक्य
C. मिश्र वाक्य 
D. यापैकी नाही

95.नदी या शब्दाचे लिंग कोणते?
A. पुलिंग
B. स्त्रीलिंगी 
C. नपुसकलिंगी
D. यापैकी नाही

96. ‘सरहद्द गांधी’ म्हणून कोणाला ओळखले जाते?
A. मोहम्मद अली जिन्ना
B. महात्मा गांधी
C. खान अब्दुल गफार खान
D. मौलाना अब्दुल कलाम

97. मृत्युंजय या ग्रंथाचे लेखक…… आहेत?
A. वसंत कानेटकर
B. लक्ष्मण माने
C. शिवाजी सावंत
D. पु. ल. देशपांडे

98. भारताची साखरपेठ म्हणून ओळखला जाणारा तालुका कोणता?
A. बारामती
B. रामेश्वर
C. कोपरगाव
D. इंदापूर

99. खालीलपैकी हात या शब्दाचा समानार्थी शब्द नाही?
A. कर
B. पाणी
C. पद
D. हस्त

100. ‘चिंतामणी’ या अष्टविनायक गणपती चे तीर्थक्षेत्र कोणते?
A. अहमदनगर
B. रायगड
C. नागपूर
D. पुणे
श्री चिंतामणी विनायक मंदिर थेउर

विद्यार्थीमित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra police bharti questions in Marathi वाचून तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल. वरील दिलेल्या Police Bharti GK in Marathi प्रश्नांमध्ये तुम्हाला काहीही शंका असेल तर कंमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुमच्या शंकांच निरसन लवकरात लवकर करण्याचा प्रयन्त करू.

आमच्या या वेबसाईटवर तुम्हाला Police Bharti सह Talathi Bharti, Arogya Seva Bharti, MPSC, Saralseva Bharti, Mhada Exam या सर्व परीक्षांसाठीचे प्रश्न तुम्हाला भेटून जातील.

Police Bharti General Knowledge Questions in Marathi हे प्रश्न तुमच्या मित्रांसोबत Facebook आणि Whatsapp नक्की शेअर करा.

हे देखील वाचा👇👇👇

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

2 thoughts on “Maharashtra Police Bharti 2024 | Police Bharti Question Paper in Marathi”

Leave a Comment