1. पंचशील हा करार भारताने —– बरोबर केला होता.
- इंग्लंड
- चीन
- पाकिस्तान
- फ्रान्स
उत्तर : चीन
2. राज्यसभेची एकूण सभासद संख्या —– इतकी आहे.
- 500
- 238
- 250
- 547
उत्तर : 250
3. भारतीय राज्यघटनेच्या कलम —– अन्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतो.
- 356
- 360
- 352
- 354
उत्तर : 352
4. लोकसभेची सभासद संख्या —– इतकी आहे.
- 587
- 547
- 537
- 500
उत्तर : 547
5. भारताचा राष्ट्रपती —– असतो.
- प्रत्यक्ष निवडलेला
- अप्रत्यक्षपणे निवडलेला
- वारसा तत्वाने निवडलेला
- नेमलेला
उत्तर : अप्रत्यक्षपणे निवडलेला
6. ग्रामपंचायतीचा सभासद कोणत्या पद्धतीने निवडला जातो?
- हात उंचावून
- गुप्त मतदान पद्धतीने
- वरील दोन्ही पद्धतीने
- वरील कोणत्याही पद्धतीने नाही
उत्तर : गुप्त मतदान पद्धतीने
7. प्रशासकीय सुधारणेसाठी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ‘लखीना पॅटर्न’ चा सर्वप्रथम प्रयोग करण्यात आला?
- नाशिक
- पुणे
- औरंगाबाद
- अहमदनगर
उत्तर : अहमदनगर
8. महाराष्ट्रात पंचायत पद्धती —— स्तरीय आहे.
- दोन
- तीन
- चार
- पाच
उत्तर : तीन
9. खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो?
- पोलिस पाटील
- ग्रामसेवक
- तलाठी
- सरपंच
उत्तर : पोलिस पाटील
10. ‘नाबार्ड’ प्रत्यक्षपणे —— ला पतपुरवठा करते.
- राज्य सहकारी बँक
- व्यापारी बँक
- कृषि बँक
- प्राथमिक पतपुरवठा संस्था
उत्तर : राज्य सहकारी बँक
11. राष्ट्रीय विकास मंडळाची स्थापना —— या वर्षी झाली.
- 1951
- 1952
- 1956
- 1950
उत्तर : 1952
12. कोरकू ही अनुसूचीत जमात —– मध्ये रहाते.
- कोकण
- मेळघाट
- ताडोबा
- सहयाद्री
उत्तर : मेळघाट
13. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती सर्वात मोठी नदी आहे?
- गोदावरी
- कृष्णा
- वैनगंगा
- वर्धा
उत्तर : गोदावरी
14. कोणत्या प्रकारची वीज पारस येथे निर्माण केली जाते?
- जल विद्युत
- अणु विद्युत
- औष्णिक विद्युत
- यापैकी कोणतीही नाही
उत्तर : औष्णिक विद्युत
15. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता एक विभाग संत्राविभाग म्हणून ओळखला जातो?
- मराठवाडा
- कोकण
- पुणे
- नागपूर
उत्तर : नागपूर
16. खालीलपैकी कोणता जिल्हा ‘तलावांचा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो?
- गडचिरोली
- भंडारा
- चंद्रपूर
- वर्धा
उत्तर : भंडारा
17. ‘ध्रुव अनुभट्टी’ कोणत्या ठिकाणी आहे?
- नरोरा
- मद्रास
- कोटा
- मुंबई
उत्तर : मुंबई
18. पृथ्वी आपल्या आसाभोवती —– फिरते.
- पूर्वेकडून पश्चिमेकडे
- दक्षिणेकडून उत्तरेकडे
- उत्तरे कडून दक्षिणेकडे
- पश्चिमेकडून पूर्वेकडे
उत्तर : पश्चिमेकडून पूर्वेकडे
19. ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा —– वर्षाचा असतो.
- 2 वर्ष
- 3 वर्ष
- 5 वर्ष
- 6 वर्ष
उत्तर : 5 वर्ष
20. भारताला —– किलोमीटर लांबीची भू सीमा लाभली आहे.
- 10475
- 15200
- 16720
- 21105
उत्तर : 15200