पोलीस भरती | Maharashtra police Bharti Science Related Questions in Marathi

Maharashtra police bharti Questions and answers in Marathi | विज्ञान

police bharti 2021
police bharti 2021

Police Bharti Maharashtra: अलीकडच्या काळात विज्ञान हा विषय सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमधील एक महत्वाचा घटक आहे. मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकेवरून असा निष्कर्ष काढता येतो कि विज्ञान या विषयावरील प्रश्न पोलीस भरती परीक्षेसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात विचारले गेले आहेत.

1. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे?
A. स्वादुपिंड
B. यकृत
C. जठरग्रंथी
D. आतडे
उत्तर => B. यकृत (Liver)

2. खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होते?
A. साखर
B. जीवनसत्वे
C. इन्सुलिन
D. कॅल्शियम
उत्तर => C. इन्सुलिन

3. मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे कशापासून बनलेले असतात?
A. सोडियम असिटेट
B. मॅग्नेशिअम सल्फेट
C. कॅल्शियम ऑक्सलेट
D. कॅल्शियम सल्फेट
उत्तर => C. कॅल्शियम ऑक्सलेट

4. खालीलपैकी कोणता वायू हा क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरला जातो?
A. प्रोपेन
B. मिथेन
C. ईथर
D.यांपैकी कोणतेही नाही
उत्तर => B. मिथेन

5. आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे?
A. CO2
B. H2S
C. CFCs
D. SO2 आणि NO2 =
उत्तर => D. SO2 आणि NO2 (sulfur dioxide(SO2) आणि Nitrogen Dioxide (NO2))

6. रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते?
A. हिपॅटोमा
B. लायपो ओसारकोमा
C. ल्युकेमिया
D. ऑस्टिओसारकोमा
उत्तर => C. ल्युकेमिया

7. इंसूलिन हे ….. या अवयवांपासून स्त्रवणारे संप्रेरक आहे?
A. यकृत
B. स्वादुपिंड
C. जठर
D. आतडे
उत्तर => B. स्वादुपिंड(Pancreas)

8. खालीलपैकी कोणती पिके अत्यंत आम्लधर्मी मृदेस सहनशील आहेत?
A. मका, भात, टोमॅटो
B. गहू, भात, वांगी
C. एरंड, भात, ओट
D. यांपैकी कोणतेही नाही
उत्तर => C. एरंड, भात, ओट

9. ‘Richter scale’ हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे?
A.समुद्राची पातळी
B. भूकंप
C. ज्वलामुखी
D. भूपट्ट निर्मिती
उत्तर => B. भूकंप

10. राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून ….. या प्राण्यास ओळखले जाते?
A. पाणघोडा
B. डॉल्फिन
C. मगर
D. कासव
उत्तर => B. डॉल्फिन

11. हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीस काय म्हणतात?
A. धामणीका
B. धमनी
C. शिर
D. मज्जातंतू
उत्तर => B. धमनी (Artery)

12. मतदाराच्या बोटावर लावणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर केला जातो?
A. सिल्व्हर नायट्रेट
B. पोटॅशियम नायट्रेट
C. सिल्व्हर क्लोराईड
D. सोडियम नायट्रेट
उत्तर => A. सिल्व्हर नायट्रेट

13. इलेक्ट्रिक बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो?
A. कार्बन डाय ऑक्साइड
B. ऑक्सिजन
C. हायड्रोजन
D. नायट्रोजन
उत्तर => D. नायट्रोजन

14. सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे?
A. ग्राहम बेल
B. आयझॅक न्युटन
C. अल्बर्ट आईन्स्टाईन
D. मारी क्यूरी
उत्तर => C. अल्बर्ट आईन्स्टाईन

15. खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबनाकडे आकर्षित होतात?
A. कोबाल्ट
B. निकेल
C. लोखंड
D. वरील सर्व
उत्तर => D. वरील सर्व

16. ओझोन थराला सर्वाधिक धोका कोणत्या वायूमुळे निर्माण झाला आहे?
A. CH4
B. CO2
C. CFC
D. NO2
उत्तर => C. CFC (Chlorofluorocarbons)

17. ऑक्सिजनयुक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरविले जाते?
A. महाशिरांमार्फत
B. महाधमणीमार्फत
C. फुफ्फुसांमार्फत
D. यापैकी कोणतेही नाही
उत्तर => B. महाधमणीमार्फत(Aorta)

18. यकृतामधून पित्तरस घेऊन तो पित्ताशयात संग्रहित करणाऱ्या अन्ननलिकेचा भाग कोणता असतो?
A. अन्नाशय
B. पित्ताशय
C. लहान आतडे
D.मोठे आतडे
उत्तर => C. लहान आतडे(Small intestine)

19. खालील रक्तगटांपैकी कोणत्या गटाच्या रक्तदात्यास सार्वत्रिक दाता (universal donor) असे म्हणतात?
A. A
B. AB
C. O
D. B
उत्तर => C. O

20. भोपाळ गॅस दुर्घटना हि कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे?
A. नैसर्गिक आपत्ती
B. जैविक आपत्ती
C. आण्विक आपत्ती
D. रासायनिक आपत्ती
उत्तर => D. रासायनिक आपत्ती (भोपाळ गॅस दुर्घटना हि १९८४ मध्ये झाली होती ज्यामध्ये ३७०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. )

21. कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरला जातो?
A. मिथेन
B. ब्युटेन
C. इथिलिन
D. इथेन
उत्तर => C. इथिलिन

22. फुफ्फुसातील ऑक्सिजन युक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते?
A. उजवे निलय
B. डावे निलय
C. डावे अलिंद
D. उजवे अलिंद

उत्तर => C. डावे अलिंद (Left atrium)

23. pH मापनश्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती असते?
A. 1
B. 0
C. 14
D. 7
उत्तर => D. 7

24. टोमॅटो कोणत्या घटकामुळे लाल दिसतो?
A. लायकोपिन
B. केसीन
C. झिंथोफिल
D. वरीलपैकी सर्व
उत्तर => A. लायकोपिन

25. सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या मानवी अवयवात होतो?
A. हृदय
B. आतडे
C. यकृत
D. मूत्रपिंड
उत्तर => C. यकृत

26. प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे?
A. हिमोग्लोबिन
B. क्लोरोफिल
C. मेलॅनिन
D. यांपैकी कोणतेही नाही
उत्तर => B. क्लोरोफिल

27. कोणाचा जन्मदिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो?
A. जगदीशचंद्र बोस
B. सि. व्ही. रमण
C. डॉ. होमी भाभा
D. रामानुजन
उत्तर => B. सि. व्ही. रमण – 28 February

28. आधुनिक मूल्य आवर्तसारणी मध्ये तांब्याचा अनुक्रमांक किती आहे?
A. 26
B. 22
C. 36
D. 29
उत्तर => D. 29 (तांबा – Copper)

29. भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो?
A. जस्त
B. कथिल
C. मॅगनीज
D. चांदी
उत्तर => B. कथिल

30. Toxicology हे कशाशी संबंधित आहे?
A. अनुवंशिकता
B. त्वचा
C. विष
D. वरील सर्व
उत्तर => C. विष

31. शरीरात अ जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास खालीलपैकी कोणता रोग होतो?
A. बेरीबेरी
B. मुडदूस
C. क्षयरोग
D. रातांधळेपणा
उत्तर => D. रातांधळेपणा

32. डॉट्स (Dots) हा उपचार कोणत्या आजारांच्या रुग्णांसाठी केला जातो?
A. एड्स
B. पोलिओ
C. क्षयरोग
D. कर्करोग
उत्तर =>C. क्षयरोग(Tuberculosis)

33. अंड्यातील कोणत्या भागामध्ये मुख्यतः प्रथिने असतात, ज्यामुळे त्याला पूर्णान्न असे म्हणतात?
A. पांढऱ्या व पिवळ्या बलकामध्ये
B. पिवळ्या बलकामध्ये
C. पांढऱ्या भागामध्ये
D.अंड्यामध्ये प्रथिने नसतात
उत्तर => C. पांढऱ्या भागामध्ये

34. खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही?
A. युरिया
B. कंपोस्ट
C. सुपर फॉस्फेट
D. अमोनियम फॉस्फेट
उत्तर => B. कंपोस्ट

35. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सुष्म कणांमुळे तयार होते, त्या कणांना काय म्हणतात?
A. फोटॉन
B. इलेक्ट्रॉन
C. पोझिट्रॉन
D. प्रोटॉन
उत्तर => A. फोटॉन

36. कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?
A. बिटा
B. अल्फा
C. गॅमा
D. यु.व्ही.
उत्तर => C. गॅमा

37. अति श्रमामुळे स्नायू दुखी मध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार आहे?
A. इथेनॉल
B. फॉरमिक आम्ल
C. एस्कॉर्बिक अम्ल
D. लॅक्टिक आम्ल
उत्तर => D. लॅक्टिक आम्ल

38. यकृत हा अवयव कोणत्या संस्थेशी संबंधित आहे?
A. चेतासंस्था
B. पचनसंस्था
C. अस्थीसंस्था
D. उत्सर्ग संस्था
उत्तर => B. पचनसंस्था

39. दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग करून घेतला जातो?
A. यांत्रिक
B. चुंबकीय
C. रासायनिक
D.उष्णताजनक
उत्तर => B. चुंबकीय

40. झाडांच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते?
A. कार्बन
B. सूर्यप्रकाश
C. नायट्रोजन
D.ऑक्सिजन
उत्तर => B. सूर्यप्रकाश

41. ‘ड जीवनसत्वाच्या’ अभावी लहान मुलांना कोणता आजार होतो?
A. मुडदूस
B. गलगंड
C. स्कर्व्ही
D.रातांधळेपणा
उत्तर => A. मुडदूस

42. हवेचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
A. हायड्रोमीटर
B. थर्मामीटर
C. एनीमोमीटर
D. सिस्मो मैनोमीटर
उत्तर => C. एनीमोमीटर

43. कोणत्या लसीमुळे नवीन जन्माला आलेल्या मुलांमध्ये क्षयाचा प्रतिबंध करता येतो?
A. जल संजीवनी
B. बी.सी.जी. लस
C. त्रिगुणी लस
D. यांपैकी कोणतेही नाही
उत्तर => B. बी.सी.जी. लस

44. भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय होते?
A. भास्कर
B. रोहिणी
C. आर्यभट्ट
D. PSLV
उत्तर => C. आर्यभट्ट

1 thought on “पोलीस भरती | Maharashtra police Bharti Science Related Questions in Marathi”

Leave a Comment