प्रशासकीय सेवेत येण्याची संधी | MPSC 2021 Posts and Eligibility Criteria In Marathi
राज्यसेवेतील पदे
उपजिल्हाधिकारी गट-अ, पोलिस उपअधीक्षक/सहायक पोलिस आयुक्त गट-अ, सहायक विक्रीकर आयुक्त गट-अ, उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी गट-अ, सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ, मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपरिषद गट-अ, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट-अ, तहसीलदार गट-अ, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब, लेखा अधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब, कक्षाधिकारी (मंत्रालय) गट-ब, गट विकास अधिकारी गट-ब, मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद गट-ब, सहायक निबंधक सहकारी संस्था ग-ब, उप अधीक्षक भूमी अभिलेखा गट-ब, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट-ब, सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट-ब, नायब तहसीलदार गट-ब इत्यादी
राज्यसेवा परीक्षेची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे
या परीक्षेचे तीन टप्पे आहेत. 1) पूर्व परीक्षा (400 गुण) 2) मुख्य परीक्षा (800 गुण) आणि 3) मुलाखत (100 गुण) शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विद्याशाखेतील पदवी.
राज्यसेवा पूर्व परीक्षा – अभ्यासक्रम
या परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाने निश्चित केला आहे. हा पॅटर्न बऱ्याच अंशी यूपीएससीसारखा आहे. अभ्यासक्रम आणि त्याचे स्वरूप- पूर्व परीक्षेसाठी प्रत्येकी २०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतील. दोन तास वेळ असेल. या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (मराठी व इंग्रजीत) असतील.
पेपर- एक (गुण २००-दोन तास)
राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ.
महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल- भौतिक, सामाजिक आणि आर्थिक.
महाराष्ट्र व भारत- राज्यव्यवस्था आणि शासन- राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, शहरी प्रशासन, शासकीय धोरणं, हक्कविषयक घडामोडी आदी
आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास, गरिबी, समावेशन, लोकसंख्याविषयक मुद्दे, सामाजिक धोरणे इत्यादी पर्यावरणीय परिस्थिती, जैव विविधता, हवामान बदल यामधील सर्वसामान्य मुद्दे, सामान्य विज्ञान (रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र)
पेपर- दोन (गुण २००- दोन तास)
इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह) :
तर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा/पृथ:करण क्षमता (लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी), निर्णय क्षमता व प्रश्नांची उकल (डिसिजन मेकींग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग), सामान्य बुद्धिमापन क्षमता (जनरल मेंटल एबिलिटी), बेसिक न्यूमरसी, डेटा इंटरप्रिटेशन (चार्ट, ग्राफ, टेबल्स) (दहावीचा स्तर असेल), इंग्रजी व मराठी भाषा आकलन क्षमता- कॉम्प्रिहेन्शन स्किल (दहावीस्तर)
कॉम्प्रिहेन्शन
यात आकलन क्षमतेची परीक्षा घेतली जाते. उताऱ्यावरील प्रश्न, पॅराग्राफ उलटेसुलटे करुन त्याची संगती लावणे, वाक्यरचना ओळखणे, योग्य शब्दाची निवड करणे, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द लिहीणे अशा अनेक गोष्टी त्यात येतात.
लॉजिकल रिझनिंग आणि अॅनॅलॅटिकल अॅबिलिटी
यामध्ये एखाद्या गोष्टीचा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता जोखली जाते. दोन विधानांचा परस्परसंबंध, त्यावरचे अनुमान काढावे लागतात.
डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग
प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना सतत विविध प्रश्नांना-समस्यांना सामोरे जावे लागते. त्यावेळी समस्येचा सर्वांगीण विचार करून योग्य, अधिकाधिक जनतेला उपयोगी ठरेल, असा निर्णय घ्यावा लागतो. यातील काही प्रश्न हे क्षमतेची चाचपणी करणारे असतील.
जनरल मेंटल एबिलिटी
आत्तापर्यंत सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये या घटकाचा समावेश असे. आता नवीन पेपर (पेपर दोन) मध्ये याचा समावेश आहे. यामध्ये काळ, काम, वेग, गुणोत्तर, कोडिंग, डिकोडिंग, प्रोबॅबिलिटी, घड्याळ, कॅलेंडर, दिशा आदींवर आधारित प्रश्न असतात.
बेसिक न्यूमरसी आणि डेटा इंटरप्रिटेशन
यात आकड्यांमधील संबंध ओळखून क्रम किंवा रिक्त स्थानं भरणे, लसावि/मसाविवर आधारित प्रश्न, सरासरी, वयांचे गुणोत्तर नफा-तोटा, क्षेत्रफळ, आकारमान, प्रोबॅबिलिटी आदींवर आधारित प्रश्नांचा समावेश होतो. तर डेटा इंटरप्रिटेशनमध्ये आकृती, ग्राफ, टेबल्स याचे आकलन करणे अपेक्षित असते. कॉम्प्रिहेन्शन तसेच न्यूमरसीचे प्रश्न हे दहावीस्तराचे असणार आहेत. त्यामुळे त्याचा नियमित सराव हमखास यश देऊ शकेल.