1. खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता?
- शाळांवरील बहिष्कार
- न्यायालयांवरील बहिष्कार
- परदेशी कापडांवरील बहिष्कार
- कर न भरणे
उत्तर : कर न भरणे
2. ‘खोती पद्धत’ कोठे होती?
- मराठवाडा
- खानदेश
- विदर्भ
- कोकण
उत्तर :कोकण
3. गांधार कलाशैली —– कलाशैलीने प्रभावित झालेली होती.
- ग्रीक व चीनी
- युनानी व रोमन
- पर्शियन व ग्रीक
- चीनी व पर्शियन
उत्तर :युनानी व रोमन
4. गांधी-आयर्विन कारारामुळे काय साध्य झाले?
- पूर्ण स्वराज्याच्या मागणीला मान्यता मिळाली.
- मीठावरील कर रद्द झाला.
- गांधीजीनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
- वरीलपैकी काहीही नाही.
उत्तर :वरीलपैकी काहीही नाही.
5. सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे उद्दिष्ट कोणते?
- कायदे मोडून प्रशासनाला जेरीस आणणे.
- सरकारकडून अधिक मागण्या मान्य करून घेणे.
- गोलमेज परिषदेत काँगेससाठी स्थान मिळवणे.
- वैयक्तिक सत्याग्रह लोकप्रिय करणे.
उत्तर :कायदे मोडून प्रशासनाला जेरीस आणणे.
6. खालीलपैकी एक ब्रिटिश नेता आणि संसद सदस्याने स्वीकारले की, 1857 चा उठाव सैनिकी विद्रोह नसून ‘राष्ट्रीय उठाव’ होता :
- लॉर्ड डलहौसी
- लॉर्ड कॅनिंग
- विल्यम ग्लॅडस्टोन
- बेंजामिन डिझरायली
उत्तर :बेंजामिन डिझरायली
7. कोणत्या प्रदेशामध्ये वस्त्यांचे वितरण पुर पातळीव्दारा निश्चित होईल?
- नर्मदेचा त्रिभुज प्रदेश
- रोहिलखंड
- माळवा
- रामनाड
उत्तर :रोहिलखंड
8. आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदा धुपीमुळे प्रभावित आहे.
मृदा धुपीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते?
- राजस्थान
- मध्य प्रदेश
- महाराष्ट्र
- उत्तर प्रदेश
उत्तर :राजस्थान
9. नदी आपल्या संपूर्ण प्रवाहात वेगवेगळे भू-आकार निर्माण करत असते. खालीलपैकी कोणता भू-आकार नदी आपल्या वरच्या टप्प्यात निर्माण करत नाही?
- घळई
- धावर्या
- धबधबा
- डोंगरबाहू
उत्तर :डोंगरबाहू
10. उसापासून साखर करताना ऊसाच्या एकूण वजनाच्या किती टक्के रूपांतर होऊ शकते?
- 40%
- 30%
- 20%
- 10%
उत्तर :10%
11. खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुवृत्तीय हवामानात आढळत नाही?
- येथे हिवाळा नसतो
- दुपारी पाऊस पडतो
- वर्षभर सारखेच (Uniform) तापमान असते.
- प्रतिरोध पर्जन्य
उत्तर :प्रतिरोध पर्जन्य
12. मुंबई हाय मध्ये भारताच्या एकूण उत्पादनाच्या 63% खनिज ते तर 80% नैसर्गिक वायूचे उत्पादन होते. ओ.एन.जी.सी.ला येथे सर्वप्रथम 1974 मध्ये तेल लागले. हे खनिज तेल कोणत्या कालावधीचे आहे?
- इओसीन
- मायोसीन
- प्लायोसीन
- प्लीस्टोसीन
उत्तर :मायोसीन
13. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तातडीचे उद्दीष्ट म्हणजे :
- स्वास्थविषयक पायाभूत सुविधांची गरज भागविणे
- एकूण जननदर कमी करणे
- लोकसंख्या स्थिर करणे
- वरील सर्व
उत्तर :स्वास्थविषयक पायाभूत सुविधांची गरज भागविणे
14. 11 व्या पंचवार्षिक योजनेतील राष्ट्रीय कृषि विकास योजनेचे प्रमुख उद्दीष्ट कोणते?
- राज्य सरकारला कृषी व इतर क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे.
- भारतीय कृषी निर्यातदारांना सवलती देणे.
- सरकरसाठी महसूल निर्माण करणे.
- वरीलपैकी कोणतेही नाही.
उत्तर :राज्य सरकारला कृषी व इतर क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे.
15. अनेकअंगी दारिद्र्य निर्देशांकाने 1997 मध्ये कोणत्या निर्देशांकाची जागा घेतली?
- ग्राहक निर्देशांक
- भारतीय दारिद्र्य निर्देशांक
- दारिद्र्यखालील निर्देशांक
- मानवी दारिद्र्य निर्देशांक
उत्तर :मानवी दारिद्र्य निर्देशांक
16. दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शिर गणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे जास्त चांगले मापक आहे कारण :
- कौटुंबिक उत्पान्नाचा तपशील उपलब्ध नसतो.
- किमान स्वास्थ्याच्या प्रमाणाची व्याख्या करणे कठीण आहे.
- ते निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तुट भरून काढावी लागेल हे दाखविते.
- वरीलपैकी कुठलेही नाही.
उत्तर :ते निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तुट भरून काढावी लागेल हे दाखविते.
17. आर्थिक प्रगतीसाठी वित्त उभे करण्याच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीमुळे भाववाढ निर्माण होऊ शकते?
- अंतर्गत आणि बहिर्गत कर्ज
- क्रमवर्धी करपद्धती
- तुटीची वित्तव्यवस्था
- सरकारी कर्जरोखे
उत्तर :तुटीची वित्तव्यवस्था
18. राष्ट्रीय महिला साक्षमीकरण धोरण 2000 चा प्रयत्न :
- बालिकांसंबंधी असलेले सर्व भेदभाव व महिलांवर होणारे सर्व प्रकारचे अत्याचार दूर करणे
- महिलांना मानवी हक्क आणि सत्तेत समान संधी प्रदान करणे.
- वरील दोन्ही.
- वरीलपैकी कुठलेही नाही
उत्तर :वरील दोन्ही.
19. भारतातील भूअधिकार सुधरणा धोरणाचे खालीलपैकी कोणते ध्येय नव्हते?
- कुळवहिवाट सुधरणा
- मध्यस्थांचे निर्मूलन
- शेतीविषयक वित्त
- सहकारी शेती
उत्तर :शेतीविषयक वित्त
20. सामान्यत: किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही?
- अमोनिया
- युरिक अॅसीड
- पाणी
- साखर
उत्तर :साखर