Chalan MPSC Maths General Knowledge | गणित सामान्य ज्ञान भाग १ – चलन

चलन गणित सामान्य ज्ञान | Chalan MPSC Maths General Knowledge

 नमूना पहिला –

उदा. X व Y समचलनात आहेत. जिव्हा समचलनात X=40 तेव्हा Y = 24. जर X =60 असेल. तर Y = किती ?

 • 16
 • 36
 • 48
 • 32

उत्तर : 36

स्पष्टीकरण :- 
X व Y समचलनात असतील, तर X/Y ची किंमत स्थिर असते.∷X/Y=40/24=60/Y  ∶:40/24=5/3=5×12/3×12= 60/36 ∶: जेव्हा X=60 तेव्हा Y=36  येईल.

 नमूना दूसरा –

उदा.खलील सारणीवरून सत्य विधाने कोणते ?

 • X व्यस्त चलनात Y
 • X समचलनात Y व Y व्यस्त चलनात X
 • समचलनात Y
 • X व Y मध्ये कोणत्याच प्रकारचा संबंध नाही

उत्तर :समचलनात  Y

स्पष्टीकरण :-
वरील सारणीत X ÷ Y म्हणजेच X/Y ची किंमत स्थिर आहे.X/Y = 5/2  X ची किंमत वाढली की Y ची किंमत त्याच पटीत वाढते व X ची किंमत कमी झाली की Y ची किंमत त्याच पटीत कमी होते. नुसार x/y च्या किंमती या सममूल्य अपूर्णाक आहेत.: X समचलनात Y .

 नमूना तिसरा –

उदा.X व y व्यस्त चलनात आहेत. जेव्हा x = 24 तेव्हा y = 12. जर x = 6, तेव्हा y = किती?

 • 48
 • 36
 • 3
 • 12

उत्तर : 48

स्पष्टीकरण :-
X व्यस्त चलनात y असेल, तर x × y ची किंमत स्थिर असते.:: 24×12=6×y:: 24×12/6 = 48

 नमूना चौथा –

उदा.सोबतच्या सारणीतील x व y च्या किंमतींवरून त्यांच्यातील चलनाचा प्रकार ओळखा व प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ओळखा ?

 • समचलन,2
 • व्यस्तचलन,8
 • समचलन,24
 • व्यस्तचलन,18

उत्तर : व्यस्तचलन,18

स्पष्टीकरण :-
व्यस्त चलनात x × y ची किंमत स्थिर असते.:: 6×12 = 8×9 = 18×4:: व्यस्त चलन,18

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.