200+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

General Knowledge in Marathi: अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. पण ते प्रश्न वाचायला थोडे कठीण वाटतात. भारताचा इतिहास असो वा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण कमी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत असतील तर तुमच्या समस्या दूर होतील.

जर का तुम्ही MPSC, Police Bharti, Talathi Bharti यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 100+ GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

GK Questions Marathi
GK Questions Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | GK questions in marathi

1. लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात?
A. 366 
B. 365
C. 360
D. यांपैकी नाही
पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस लागतात, त्याला आपण एक वर्ष असे म्हणतो. पण खरंतर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस आणि सहा तासांचा काळ लागतो. हा अधिकचा पाव दिवसाचा फरक भरुन काढण्यासाठी प्रत्येक चार वर्षांनी कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29वा दिवस मिळवला जातो. त्यामुळे या वर्षाला ‘लीप इयर’ असे म्हटले जाते.

group

2. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
A. आशिया 
B. युरोप
C. आफ्रिका
D. ऑस्ट्रलिया

आशिया खंडाचे पूर्ण क्षेत्रफळ ४ कोटी ४५ लाख ७८ हजार चौरस किलोमीटर असून या खंडात एकूण 47 देश आहेत.

3. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो?
A. बेडूक
B. सरडा 
C. साप
D. पाल

4. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात?

A. तामिळ नाडू
B. उत्तर प्रदेश
C. केरळ
D. कर्नाटक 
पूर्ण भारतातील जवळ जवळ 22% हत्ती हे कर्नाटक राज्यात आढळतात.

5. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?
A. 32°C
B. 37°C 
C. 34°C
D. 39°C

6. कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो?
A. एनाफिलीज
B. प्लाझमोडियम 
C. हायझोबिअम
D. यांपैकी काहीही नाही
प्लाझमोडियम’ जातीचे डास चावल्यामुळे आपल्याला हिवताप येतो.

7. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?
A. हाड
B. डोळा
C. मज्जासंस्था 
D. मान
पोलिओ विषाणू आपल्या मज्जातंतूच्या पेशींचे नुकसान करतो, ज्यामुळे या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचे स्नायू कमकुवत होतात.

8. कोणते तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?
A. बदाम
B. शेंगदाणे
C. करडई 
D. तीळ
करडई ज्याला इंग्लिश मध्ये Safflower म्हंटले जाते, या वनस्पतीचे तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त असते.

9. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो?
A. शिसे
B. लोह
C. प्लॅटिनम
D. पोलाद 

10. वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ?
A. 3 टक्के
B. 0.04 टक्के 
C. 4 टक्के
D. 0.30 टक्के

11. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या …………………. अवलंबून असते?
A. वस्तुमानावर 
B. आकारमानावर
C. रुंदीवर
D. लांबीवर

12. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?
A. अ जीवनसत्व
B. क जीवनसत्व 
C. इ जीवनसत्व
D. ब जीवनसत्व

13. खालीलपैकी कोणता एक धातू आहे?
A. पारा 
B. ग्रॅफाईड
C. हेलियम
D. क्लोरीन

14. निद्रानाश हा रोग ————- या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व 
C. क जीवनसत्व
D. ड जीवनसत्व
निद्रानाश ज्याला इंग्लिश मध्ये insomnia म्हटले जाते हा रोग ब जीवनसत्व कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो, ज्यामध्ये माणसाला वेळेवर झोपे न येणे, झोप आल्यानंतर ती बराच वेळ टिकवून ठेवता न येणे, अर्धवट जाग येऊन पुन्हा झोप न येणे याला ‘निद्रानाश’ असे म्हटले जाते.

15. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो?

A. दूध 
B. पाणी
C. तूप
D. सोयाबीन

दुधाला पूर्णान्न आहार म्हटले जाते कारण त्यात सर्व प्रकारचे पोषक तत्वे जसे कि प्रथिने, फायबर आणि आवश्यक जीवनसत्वांसारख्या सर्व आवश्यक पोषक गोष्टी असतात. म्हणूनच दुधाला पूर्णान्न म्हणून संबोधले जाते.

16. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
D. ड जीवनसत्व 

17. सुर्याकडून पृथ्वीवर येणारी ———– टक्के अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात?
A. ५०
B. ९९ 
C. ९०
D. ७०
मित्रांनो ओझोनचे थर हे वरील वातावरणामध्ये अगदी पातळ व पारदर्शक असते आणि या ओझोनच्या थरामुळेच मनुष्यांसाठी, प्राण्यांसाठी तसेच वनस्पतींसाठी हानिकारक असलेली अतिनिल किरणे अडविली जातात.

18. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो?
A. 90° C
B. 0° C
C. 4° C
D. 10° C
म्हणजेच एखाद्या भागाचे वातावरण 0° C किव्हा त्याहून खाली गेले तर त्या ठिकाणी पाणी गोठायला सुरवात होते.

19. ‘पेनिसिलीन’ या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
A. एडवर्ड
B. स्पाक
C. फ्लेमिंग 
D. पाश्चर

मित्रांनो पेनिसिलिन हे जीवाणू संसर्गाच्या म्हणजेच Bacterial Infections च्या उपचारात वापरली जाते याचा शोध स्कॉटिश शास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये लावला होता.

20.  काकडी किव्हा टरबूज यांसारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते?
A. 90 टक्के
B. 50 टक्के
C. 92 टक्के 
D. 80 टक्के

Heart Touching Birthday Shayari

21. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो?
A. अतिसार
B. कावीळ
C. विषमज्वर
D. वरिल सर्व 
कारण अतिसार, कावीळ आणि विषमज्वर हे तिन्ही आजारांचे मुख्य कारण हे दूषित पाणी असते.

22. सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत येत नाहीत?
A. सूर्याचे तापमान फार आहे.
B. सूर्य पृथ्वीपासून फार दूर आहे.
C. सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही =
D. यांपैकी काहीही नाही.
सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही, त्यामुळे सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत येत नाहीत.

23. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?
A. कार्बन डायऑक्साईड 
B. ऑक्सिजन
C. हैड्रोजन
D. नायट्रोजन

24. ——– च्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय(Anemia) हा रोग होतो ?
A. आयोडीन
B. कॅल्शियम
C. लोह 
D. अ जीवनसत्व

25. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते ?
A. सोडा
B. तुरटी
C. क्लोरीन 
D. यांपैकी काहीही नाही

26. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो ?
A. बॅक्टेरिऑलॉजी
B. व्हायरॉलॉजी 
C. मेटॅलर्जी
D. यांपैकी काहीही नाही

27. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली?
A. कोलकाता 
B. दिल्ली
C. मुंबई
D. चेन्नई
कोलकाता या शहरात 1984 मध्ये सर्वप्रथम मेट्रो धावली होती आणि भारतातील सर्वात मोठे मेट्रो ट्रेन नेटवर्क हे दिल्ली शहरात आहे.

28. बीसीजी लस ———— या रोगापासून बचाव करते?
A. पोलिओ
B. रातांधळेपणा
C. क्षयरोग 
D. कुष्ठरोग

29. कॉलरा रोगाच्या जिवाणूंचा आकार कसा असतो ?
A. स्वल्पविराम सारखा 
B. पूर्णविरामासारखा
C. उद्गारवाचक चिन्हा सारखा
D. यांपैकी काहीही नाही

30. कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रातअंढाळेपणा हा रोग होतो ?
A. अ जीवनसत्व 
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
D. ड जीवनसत्व

31. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात?
A. सोनार तंत्रज्ञान 
B. सोलार तंत्रज्ञान
C. सुपरसॉनीक तंत्रज्ञान
D. अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञान
सोनार तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याची खोली तसेच पाण्यात दडलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी केला जातो. आणि Sonar या शब्दाचे फुल फॉर्म आहे Sound Navigation and Ranging.

sonar technology marathi
Sonar technology marathi

32. त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो?
A. मेलानिन 
B. जीवनसत्व
C. लोह
D. यांपैकी काहीही नाही

33. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ कोणी लिहले आहे?
A. बंकिमचंद्र चटर्जी 
B. रवींद्रनाथ टागोर
C. अरबिंदो घोष
D. शरतचंद्र चट्टोपाध्याय
वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहले होते तर भारताचे राष्ट्रगीत ‘जन गन मन’ हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहले होते.

34. धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते?
A. चांदी
B. लोह
C. सोने 
D. अल्युमिनियम

35. भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही आहे?
A. 1 
B. 10
C. 20
D. 50

36. मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो?
A. त्वचा 
B. हृदय
C. यकृत
D. मेंदू

37. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
A. अशोक
B. चंद्रगुप्त 
C. बिंदुसागर
D. यांपैकी कोणीही नाही

38. हिराकुड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे?
A. यमुना
B. गंगा
C. महानदी 
D. गोदावरी
मित्रांनो ओडिशा राज्यातील हिराकुंड धरणाची पूर्ण लांबी जवळ जवळ ३० किमी एवढी असून हे धरण 1957 मध्ये बांधून पूर्ण झाले होते.

39. पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?
A. 9
B. 6
C. 5 
D. 4
अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर, इंडियन महासागर, आर्कटिक महासागर आणि दक्षिण महासागर मिळून एकूण ५ महासागर आहेत .

40. पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?
A. ६
B. ७ 
C. ८
D. १०
आफ्रिका, अंटार्क्टिका, आशिया, ऑस्ट्रेलिया(ओशिनिया), युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका मिळून एकूण ७ महाद्वीप आहेत.

41. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात ?
A. न्यूरोलॉजी / neurology
B. मानवशास्त्र / Phlebology
C. नेफ्रोलॉजी / Nephrology 
D. यांपैकी काहीही नाही

42. आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ?
A. गलगंड 
B. मधुमेह
C. कुष्ठरोग
D. पोलिओ

43. मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगडयांची संख्या किती असते?
A. २४ 
B. ३६
C. २१
D. ३०

44. मानवी ह्दयाचे दर मिनिटास ———- स्पंदने होतात ?
A. ७२ 
B. ८२
C. ९२
D. ७८

45. युनिव्हर्सल डोनर म्हणजे ——–रक्तदाता होय?
A. एबी
B. बी
C. ओ 
D. ए

46. बटाटा हे ———— आहे ?
A. मूळ
B. खोड 
C. बीज
D. फळ

47. भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात?
A. 20
B. 13
C. 15
D. 17 

48. कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास ———– जीवनसत्व मिळते ?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
D. ड जीवनसत्व 

49. हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते?
A. आंबा
B. लिंबू 
C. पेरू
D. केळी
हायड्रोक्लोरिक आम्ल हे लिंबामध्ये आढळते.

50.———– हा उडता येणारा सस्तन प्राणी(Mammal) होय?
A. देवमासा
B. कीटक
C. पेंग्विन
D. वटवाघूळ 

51. कोणत्या प्राण्यापासून ह्त्तीरोगाचा प्रसार होतो?
A. कावीळ
B. विषमज्वर
C. डास 
D. सर्व
हत्तीरोग हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे. या मध्ये रुग्णांचे पाय आकाराने जाड होतात व रुग्णास हालाचाल करणेही अवघड होते.

52. जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते आहे?
A. तांदूळ
B. गहू 
C. ऊस
D. कॉफी

53. खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय जनता पार्टी राज्य करत नाही?
A. उत्तर प्रदेश
B. राजस्थान 
C. मध्य प्रदेश
D. गुजरात
राजस्थान या राज्यामध्ये काँग्रेस पार्टीची सरकार आहे.

54. ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. क्रिकेट
B. फ़ुटबाँल
C. हॉकी 
D. बँडमिंटन

55. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?
A. ७८ टक्के
B. २१ टक्के 
C. ४० टक्के
D. ६० टक्के
वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण २१ टक्के आहे तर बाकीचे ७८% नायट्रोजन आणि १% आर्‌गॉन, कार्बन डाय ऑक्साइड आणि इतर वायू वातावरणात आहेत.

56. रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात ?
A. नायट्रोजन ऑक्सीईड
B. सल्फ्युरिक असिड 
C. हैड्रोक्लोरिक असिड
D. कअमितो आम्ल

कारण सल्फ्युरिक असिडचा वापर हैड्रोक्लोरिक असिड, नायट्रिक असिड, रंग तसेच अनेक औषधें तयार करण्यासाठी केला जातो. म्हणूनच सल्फ्युरिक असिडला King of chemicals म्हणजेच रसायनाचा राजा असे म्हटले जाते.

57. रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व 
D. ड जीवनसत्व

58. साधारणत: जेट विमानाचा आवाज किती डेसिबल्स असतो?
A. १५० ते १६० डेसिबल्स
B. १४० ते १५० डेसिबल्स 
C. १६० ते १७० डेसिबल्स
D. १०० ते ११० डेसिबल्स

59. मनुष्यास ——- डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येवू शकते?
A. १०० डेसिबल्स 
B. १२० डेसिबल्स
C. १३० डेसिबल्स
D. ९० डेसिबल्स

60. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?
A. पाय
B. हृदय
C. लहान मेंदू 
D. यकृत
शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदू म्हणजे cerebellum करते.

61.खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे?
A. क्षयरोग
B. मधुमेह 
C. घटसर्प
D. गोवर

62. कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो
A. पाणी
B. धातू
C. स्फोटके
D. लाकूड 

63. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?
A. अमोनिया 
B. ऑक्सिजन
C. हेलियम
D. हैड्रोजन

64. युनियन कार्बाईट वायू दुर्घटनेशी संबंधित असलेले शहर कोणते आहे?
A. भोपाळ 
B. पुणे
C. अलाहाबाद
D. इंदोर

65. National Mathematics Day कधी साजरा केला जातो?
A. 14 मार्च
B. 10 जुलै
C. 22 डिसेंबर 
D. 20 ऑक्टोबर
आणि World Mathematics Day 14 मार्च ला साजरा केला जातो.

66. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते ?
A. टंगस्टन 
B. प्लॅटेनियम
C. अल्युमिनियम
D. नायक्रॉन

67. चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता?
A. भारत
B. चीन 
C. इटली
D. जर्मनी

68. रिश्टर(Richter) हे —– मोजण्याचे एकक आहे?
A. पाण्याची खोली
B. भूकंप 
C. ज्वालामुखी
D. भूपट्ट निर्मिती

या तंत्रज्ञानाचा शोध Charles F. Richter यांनी 1935 मध्ये लावला होता. ज्याद्वारे आज आपल्याला पृथ्वीवर आलेल्या भूकंपाची तीव्रता समजायला मदत होते.

69. भारताचे संविधान कधी लागू झाला होता?
A. २६ जानेवारी १९४७
B. २६ जानेवारी १९५० 
C. १५ ऑगस्ट १९५०
D. १५ ऑगस्ट १९४७
२६ जानेवारी १९५० या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारताचे संविधान लागू झाले होते.

70. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
A. सरोजिनी नायडू
B. सुचेता कृपलानी 
C. किरण बेदी
D. इंदिरा गांधी
सुचेता कृपलानी या 1963 ते 1967 या कालावधीसाठी झालेल्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. तेव्हा त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या.

71. भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे?
A. आहुजा टॉवर्स
B. वर्ल्ड वन 
C. इम्पीरियल
D. अँटिलिया
मुंबई मध्ये स्तिथ असलेले आणि २०२० मध्ये सुरु वर्ल्ड वन भारतातील सर्वात उंच इमारत आहे, या इमारतीची उंची 285 m म्हणजे 935 ft एवढी आहे.

72. सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात?
A. चीन
B. नॉर्थ कोरिया
C. इराण
D. जपान 
जपान या देशामध्ये एका वर्षात सुमारे ५००० भूकंप येतात. पण जपान कडे असलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आजकाल जास्त जीवितहानी होत नाही.

73. एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात?
A. श्वसनसंस्था
B. चेतापेशी
C. श्वेतपेशी 
D. अस्थिमज्जा

74. चांदी(Silver) या धातूचा अनुक्रमांक ४७ असून त्याचे रेणुसूत्र काय हे आहे?
A. Ag 
B. AgNO3
C. AgCI
D. PbO

75. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे?
A. मुंबई
B. वर्धा 
C. नाशिक
D. नागपूर

76. प्रौढ मानसाच्या शरीरात किती रक्त असते?
A. २ ते ३ लिटर
B. ३ ते ४ लिटर
C. ५ ते ६ लिटर 
D. ६ ते ७ लिटर
तर नवजात मुलाच्या अंगामध्ये फक्त १ वाटीभर म्हणजे २०० ग्राम भरेल एवढेच रक्त असते.

77. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?
A. मलेरिया 
B. क्षयरोग
C. मोतीबिंदू
D. नारू

78. अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस —– म्हणतात.
A. भागाची भरती
B. ध्रुवीय भरती
C. उधाणाची भरती 
D. विषुववृत्तीय भरती
चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ म्हणजे भरती व उतार म्हणजे ओहोटी. पौर्णिमेच्या आणि अमावास्येच्या रात्री समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते. भरतीची वेळ व प्रमाण हे ऋतूनुसार कमी जास्त होत असते

79. कोणत्या देशामध्ये मध्ये फक्त ८२५ लोकच राहतात?
A. मकाऊ
B. मोनाको
C. वेटिकन सिटी 
D. सैन मैरीनो
वेटिकन सिटी हे जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले देश आहे. ज्यामध्ये केवळ ८२५ लोकच राहतात.

80. तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?
A. निकोटस
B. निकोट
C. निकोलस
D. निकोटीन 

81. ५ हेक्टोलीटर = किती लीटर?
A. ५००० लीटर
B. ५०० लीटर 
C. ५० लीटर
D. १००० लीटर

82. अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला —– म्हणतात.
A. दीर्घिका
B. तेजोमेघ
C. आकाशगंगा 
D. तारकामंडल

83. ……. पासून अल्युमिनियम मिळवले जाते.
A. तांबे
B. लोह
C. बॉक्साइट 
D. मँगनीज

84. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते ?
A. टंगस्टन 
B. प्लॅटेनियम
C. अल्युमिनियम
D. नायक्रॉन

85. एक अश्वशक्ती म्हणजेच ——–
A. १००० वॅट
B. ७४६ वॅट 
C. ४१५ वॅट
D. ६०० वॅट

Covid 19 GK Questions and Answers in Marathi | Coronavirus GK in Marathi

86. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे कोणत्या बँकेने ‘आपत्कालीन कर्ज सुविधा’ सुरू केली आहे?
उत्तर: स्टेट बँक ऑफ इंडिया

87. कोरोना विषाणू 2019 चे पहिले प्रकरण कोठे समोर आले?
उत्तरः चीनमधील वुहानच्या हुआनमध्ये

88. कोरोना विषाणूच्या नवीन विषाणूला तात्पुरते नाव काय आहे?
उत्तर: 2019-nCov

89. कोरोना विषाणूला ‘आंतरराष्ट्रीय आणीबाणी’ कोणी घोषित केले आहे?
उत्तर: जागतिक आरोग्य संघटना (WHO)

90. WHO ने कोरोना विषाणूला काय नाव दिले आहे?
उत्तर: कोविड-19

91. मानवामध्ये कोरोना विषाणू कोणत्या संसर्गामुळे होतो?
उत्तरः श्वसनमार्गाचे संक्रमण

92. कोरोना विषाणू कोणत्या प्रकारचा आहे?
उत्तर: हा आरएनए विषाणू आहे

93. भारतातील कोणत्या राज्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला?
उत्तर : केरळ

94. कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी कोणत्या देशाने ‘महामारी रोग कायदा 1897’ लागू केला आहे?
उत्तर: भारत

95. कोरोना विषाणूचे गंभीर प्रकरण लक्षात घेऊन केंद्र सरकारने कोणत्या दलाची स्थापना केली आहे?
उत्तरः टास्क फोर्स

96. कोरोना विषाणूचा मानवी शरीरावर थेट परिणाम कुठे होतो?
उत्तरः श्वसन प्रणालीवर

97. कोरोना विषाणू लसीची पहिली मानवी चाचणी कोणत्या देशात सुरू झाली?
उत्तर: अमेरिका

98. ‘COVID Action Platform’ कोणी सुरू केला आहे?
उत्तर: WHO (World Health Organization)

99. कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने ‘कोरोनाव्हायरस माहिती हब’ सुरू केले आहे?
उत्तर: WhatsApp

100. कोणत्या यूएस कंपनीने ‘एज्युकेशनल कोरोना व्हायरस’ वेबसाइट सुरू केली आहे?
उत्तरः गुगल

101. तिरुपती बालाजी (देवता- श्री व्यंकटेश्वर) हे मंदिर कोणत्या राज्यात आहे?
उत्तरः आंध्रप्रदेश

102. सोमनाथ मंदिर (भगवान शिव) कुठे स्थित आहे?
उत्तरः गुजरात

103. काशी विश्वनाथ मंदिर (शिव) कुठे आहे?
उत्तरः वाराणसी

104. कामाख्या मंदिर (कामाख्या देवी) भारतातील कोणत्या आधुनिक राज्यामध्ये आहे?
उत्तरः आसाम


 

GK Quick Question in Marathi

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? वाघ
भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? वडाचे झाड
भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? कमळ
भारताचा राष्ट्रीय जलचर कोणता आहे? डॉल्फिन
भारताचे राष्ट्रीय फळ कोणते? आंबा
भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती आहे? ३:२
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? हॉकी
मासे कोणाच्या मदतीने श्वास घेतात? गिल्स
भारतात सूर्य सर्वप्रथम कोणत्या राज्यात उगवतो? – अरुणाचल प्रदेश
भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर
आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? व्हिटॅमिन सी
कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? चीन
भारतातील सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत? राष्ट्रपती
शीखांचा मुख्य सण कोणता? बैसाखी
कोणत्या महापुरुषाला ‘लोहपुरुष’ म्हणतात? सरदार पटेल
टेलिफोनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर ग्रॅहम बेल
आरबीसी कुठे बनतात – अस्थिमज्जामध्ये


GK लक्षात ठेवण्यासाठी सर्वोत्तम टिप्स

नियमित newspaper वाचा
GK in Marathi या आमच्या चॅनेल ला subscribe करा.
GK Apps तुमच्या मोबाइल मध्ये इंस्टाल करा.

General Knowledge Questions in Marathi : FAQs

भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
उत्तर: मोर

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?
उत्तर: सिंह

सार्कची स्थापना कधी झाली?
उत्तर: १९८५

भारतात किती सण आहेत?
उत्तरः 36 प्रमुख सण आहेत.

भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
उत्तर : राजेंद्र प्रसाद

मोदीजींनी नोटाबंदीची घोषणा कधी केली?
उत्तर: 8 नोव्हेंबर 2016

भारताचा लोहपुरुष कोणाला म्हणतात?
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल

ISRO चे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization)

दुसरे महायुद्ध किती काळ चालले?
उत्तर: 1939-1945

पहिल्या महायुद्धात किती देशांनी भाग घेतला?
उत्तर: 30

रिलायन्स कंपनीचे मालक कोण आहेत?
उत्तर : मुकेश अंबानी

जगातील सर्वात श्रीमंत माणूस कोण आहे?
उत्तरः जेफ बेझोस

आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो?
उत्तरः ८ मार्च

बौद्ध इतिहासकार तारानाथ यांचा संबंध कोणाशी होता?
उत्तर: तिबेट

अनी बेझंट यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली?
उत्तर : न्यू इंडिया

भारतात स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर: १५ ऑगस्ट

HP चे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर: हेवलेट पॅकार्ड

भारतात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण कधी आढळला?
उत्तरः जानेवारी २०२०


आम्हाला आशा आहे की General Knowledge Questions in Marathi हा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला मराठी मधून महत्वाचे सामान्य ज्ञान संबंधी प्रशांची माहिती झाली असेल. जर तुम्हाला GK in Marathi या आमच्या वेबसाईट वर काही चुकीचे वाटत असेल किव्हा तुम्हाला Suggestion द्यायचे असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.

19 thoughts on “200+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023”

 1. भारतात स्वातंत्र दिन 15 आँगस्ट ला साजरा केला जातो.

  Reply
 2. भारतात स्वातंत्र दिन 15, ऑगस्ट ला साजरा केला जातो. 26 जानेवारीला नाही. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा होतो. दुरुस्ती करून घ्यावी ही विनंती

  Reply
 3. भारतात स्वातंत्र दिन कधी साजरा केला जातो?

  15 ऑगस्ट

  Reply

Leave a Comment