MPSC Pre-exam Preparation Part 12 | MPSC पूर्वपरीक्षा सराव भाग १२
1. थ्री-जी याचा अर्थ काय?
- थर्ड जनरेशन
- थर्ड ग्लोबल
- थर्ड ग्रेड
- थर्ड गुगल
उत्तर : थर्ड जनरेशन
2. डायलेसिस यंत्रणा खालीलपैकी कोणत्या विकाराच्या रुग्णा करिता वापरतात?
- मूत्रपिंड विकार
- यकृतविकार
- हृदयविकार
- फुफ्फुस विकार
उत्तर :मूत्रपिंड विकार
3. शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात?
- यकृत
- अस्थिमज्जा
- हृदय
- अन्ननलिका
उत्तर :अस्थिमज्जा
4. मनोधैर्य कोणाकरिता आहे?
- अत्याचारामध्ये बळी ठरलेल्या महिला व बालकांकरिता
- उद्योग क्षेत्रात सक्रिय असलेल्या महिलांकरिता
- सुशिक्षित बेरोजगार महिलांकरिता
- विधवा व परितक्त्या महिलांकरिता
उत्तर :अत्याचारामध्ये बळी ठरलेल्या महिला व बालकांकरिता
5. भारताची राज्यघटना —– रोजी स्विकारण्यात आली?
- 26/09/1949
- 26/01/1950
- 26/01/1949
- 26/11/1949
उत्तर :26/11/1949
6. शब्दाच्या जाती एकूण —– आहेत?
- 2
- 3
- 5
- 8
उत्तर :8
7. नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणार्या विकारी शब्दाला —– म्हणतात?
- अव्यय
- सर्वनाम
- विशेषण
- क्रियाविशेषण
उत्तर :सर्वनाम
8. ‘शाळेकडे’ या शब्दातील कडे हा शब्द —– आहे?
- शब्दयोगी अव्यय
- केवलप्रयोगी अव्यय
- क्रियाविशेषण अव्यय
- भाववाचक नाम
उत्तर :शब्दयोगी अव्यय
9. ‘शुक्र शुक्र’ हा शब्द —– आहे?
- क्रियाविशेषण
- भाववाचक नाम
- शब्दयोगी अव्यय
- केवलप्रयोगी अव्यय
उत्तर :केवलप्रयोगी अव्यय
10. —– प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते?
- कर्मणी
- भावे
- केवल
- कर्तरी
उत्तर :कर्तरी
11. अरेरे! हा शब्द —– आहे.
- संकेतार्थ
- विकारी
- अविकारी
- संधुयुक्त
उत्तर :अविकारी
12. भाऊ व बहीण हे —– व्दंव्द आहे?
- इतरेतर
- समाहार
- वैकल्पिक
- बहूव्रीही
उत्तर :इतरेतर
13. खालीलपैकी गुणविशेषण असलेल्या पर्याय ओळखा?
- तर्हेवाईक राजा
- पहिला राजा
- तो राजा
- कोणता राजा
उत्तर :तर्हेवाईक राजा
14. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणार्या अविकारी शब्दाला —– अव्यय असे म्हणतात?
- शब्दयोगी
- केवलप्रयोगी
- उभयान्वयी
- क्रियाविशेषण
उत्तर :उभयान्वयी
15. सत+आनंद?
- सदानंद
- सतानंद
- सदआनंद
- सददानंद
उत्तर :सदानंद
16. ‘वासरू’ हा शब्द —– आहे?
- पुल्लिंगी
- उभयालिंगी
- नपुसकलिंगी
- स्त्रिलिंगी
उत्तर :नपुसकलिंगी
17. ‘चा,ची,चे,’ हे प्रत्येय —– चे आहेत?
- सप्तमी
- तृतीया
- चतुर्थी
- षष्ठी
उत्तर :षष्ठी
18. ‘तो चित्रफीत पाहतो’ या वाक्यतील ‘पाहतो’ हे —– क्रियापद आहे?
- अकर्मक
- शक्य
- अविकारी
- सकर्मक
उत्तर :सकर्मक
19. ‘माणूस आशेवर जगत असतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा?
- अकर्मक कर्तरी
- सकर्मक कर्तरी
- भावे
- कर्मणी
उत्तर :अकर्मक कर्तरी
20. ‘आज, उद्या, नेहमी, वारंवार’ ही —– क्रियाविशेषण अव्यय आहेत?
- स्थलवाचक
- कालवाचक
- रीतीवाचक
- परिणामवाचक
उत्तर : कालवाचक