[550+] Marathi Kodi | Riddles in Marathi 2024
Marathi kodi with answer: मित्रांनो या लेखामध्ये मी 550+ मजेदार Marathi Kodi तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तुम्हाला या पूर्ण 550 मराठी कोड्यांपैकी किती कोड्यांची उत्तरे माहिती होती ते खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला तुमचा मेंदू मजबूत करायचे असेल तर मराठी कोडी तुम्हाला मदत करू शकतात. एका संशोधनात असे आढळून आले आहे की आपण कोडी सोडवण्यासाठी जितका जास्त मेंदूचा वापर करतो तितका आपल्या मेंदूची क्षमता वाढते. त्यामुळे खाली दिलेल्या कोड्यांची उत्तरे न बघता तुम्हाला किती कोड्यांची उत्तरे सापडतात ती मला कंमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला यातील Marathi Puzzles आवडले तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा किव्हा तुम्ही जेव्हा तुमच्या कुटूंबासोबत गप्पा मारत असाल तेव्हा सुद्धा तुम्ही हि Marathi Kode त्यांना विचारू शकता.
Marathi Kode with Answer | मराठी कोडी व उत्तरे 2024
1. तुम्ही एका सश्यासोबत एका घरात गेलात तुमच्या सोबत एक ससा जो गाजर खात होता, एक डुक्कर जो उंदीर खात होता, आणि एक माकड जो केळ खात होता मग सांगा पाहू त्या घरातील सगळ्यात हुशार कोण? 🤔
उत्तर: स्वतः तुम्ही 😊
2. माझ्याकडे पंख नाही पण मी उडतो, मला दात नाहीत पण चावतो. ओळखा पाहू मी कोण? 🤔
उत्तर: बंदुकीची एक गोळी
3. एक मुलगा 100 फूट शिडीवरून पडला. पण त्याला काहीच दुखापत का नसेल झाली? 🤔
उत्तर: तो पहिल्याच पायरीवर होता.
4. हा बागेत भेटत नाही,
पण हा अर्धा फुल आणि अर्धा फळ आहे.
दिसायला आहे काळा,
पण खूप गोड आहे.
सांगा बर मी कोण? 🤔
उत्तर – गुलाबजामून
5. एका हिरव्या घराच्या आत एक पांढरे घर आहे.
पांढऱ्या घराच्या आत लाल घर आहे.
लाल घराच्या आत बरीच लहान मुले आहेत.
ओळख पाहू मी कोण? 🤔
उत्तर: कलिंगड, हिरवा घर = वरील बाजू, पांढरा घर = त्यापुढील बाजू, लाल घर आणि त्यात खूप साऱ्या कलिंगडाच्या बिया
6. अशी कोणते गोष्ट आहे जी आपल्याला फ्री मध्ये भेटते
तरीसुद्धा हॉस्पिटलला गेल्यावर विकत घ्यावी लागते? 🤔
उत्तर: ऑक्सिजन
7. से काय आहे जे पंखापेक्षा अधिक हलका आहे,
परंतु जगातील सर्वात बलवान माणूस देखील
त्याला जास्त काळ धरून शकत नाही?🤔
उत्तर – श्वास
Marathi Kodi With Answer
8. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार किंवा रविवार हे शब्द न वापरता आपण सलग तीन दिवसांची नावे सांगू शकता का?
उत्तर: काल, आज आणि उद्या
9. आपण कोणत्या प्रकारचे टेबल खाऊ शकता?
उत्तर: वेजिटेबल / vegetable
10. एक माकड, गिलहरी आणि एक पक्षी नारळाच्या झाडावर जोराने धावत होते मग सांगा पाहू सगळ्यात प्रथम केळी कोणाला भेटतील?
उत्तर: कोणालाच नाही कारण नारळाच्या झाडावर केळी येत नसतात!
11. डोळा आहे पण पाहू शकत नाही?
उत्तर: सुई
12. असे काय आहे ज्याला चार चाक आणि खूप साऱ्या माश्या असतात?
उत्तर: कचऱ्यांचा ट्रक
13. माझ्याकडे डोळे नाहीत, परंतु कोणी ऐके काळी मी पाहू शकत होतो तसेच कोणी एके काळी मी विचार सुद्धा करू शकत होतो. पण आता मी पाहू नाही शकत आणि मी आता पूर्ण रिकामा झालेलो आहे सांगा पाहू मी कोण?
उत्तर: कवटी
14. मी दहा जणांप्रमाणे सामर्थ्यवान आहे तरीही दहा पुरुष मला उभे करू शकत नाहीत. मी काय आहे?
उत्तर: पाणी
15. हे काय आहे जे कोणाला नको आहे, परंतु कोणीही गमावू पण इच्छित नाही?
उत्तर: न्यायालयातील खटला
16. मी स्वतःहून तुमच्याकडे येतो, मी कधी लहान असतो तर कधी मोठा असतो. मला रंगविले जाऊ शकते, पण मला विकत घेतले जाऊ शकत नाही. मी गोल किंवा चौरस असू शकतो. ओळखा पाहू मी कोण?
उत्तर: बोटाची नखे
17. असे काय आहे जे आपल्या बुटांसोबत नेहमी झोपायला जाते?🤔
उत्तर: घोडा
18. त्याशिवाय प्रवास करा आणि आपण कधीही विजयी होणार नाही, परंतु जर का ते आपल्याकडे जास्त असेल तर आपण नक्कीच अपयशी देखील व्हाल.
उत्तर: आत्मविश्वास
19. एका टेबलावर काय ठेवले जाते जे कट केले जाते, परंतु कधीच खाल्ले जात नाही?
उत्तर: खेळायचे पत्ते
20. माझ्याकडे डॊळे आहेत परंतु मी पाहू शकत नाही. मी जिवंत असलेल्या कोणत्याही मनुष्यापेक्षा वेगवान आहे पण मला काही अवयव नाहीत. ओळखा पाहू मी कोण?
उत्तर: चक्रीवादळ
21. प्रत्येकाकडे मी आहे आणि माझ्याशिवाय तुम्ही लांब जाऊ शकत नाही. ओळखा पाहू मी कोण?🤔
उत्तर: एक सावली
22. आपण मला आपल्या हातात धरू शकता आणि तरीही मी संपूर्ण खोली भरू शकतो. ओळखा पाहू मी कोण?🤔
उत्तर: एक प्रकाशित ब्लब
Kode Marathi
23. एका संगणकाच्या वर बॉम्ब आहे; संगणकाभोवती हेअर ब्रश, चावी, फोन आणि एक चहाचा कप आहे. जर स्पोट झाला तर सर्वप्रथम कोणत्या वस्तूचा नाश होईल?
उत्तर: बॉम्बचा
24. माझ्याकडे बऱ्याच कीज/keys आहेत परंतु लॉक उघडू शकत नाही?
उत्तर: कीबोर्ड⌨️
25. जर तुम्ही मला खाल्ले तर मला ज्याने मला पाठविले आहे तो तुम्हाला खाऊन टाकेल. ओळखा पाहू मी कोण?
उत्तर: एक फिश हुक/ गळ
26. मी एकमेव अवयव आहे ज्याने माझे स्वतःच स्वतःचे नाव ठेवले आहे. ओळखा पाहू मी कोण?
उत्तर: मेंदू🧠
27. अशी कोणती गोष्ट आहे ज्याला पाणी प्यायला दिल्याने ते मरून जाते?
उत्तर: आग
28. अशी कोणती भाजी आहे जिच्या नावामध्ये लॉक आणि की या दोन्ही गोष्टी येतात?🤔
उत्तर: लौकी
29. वडिलांनी मुलीला 1 भेट वस्तू दिली आणि सांगितले कि तुम्हाला भूक लागली असेल तर खा.
तहान लागल्यास प्या आणि सर्दी झाल्यास जाळून टाका. मग ती भेट वस्तू काय असेल?
उत्तर: नारळ🥥
30. कोणत्या प्राण्याच्या शेपटीवर पैसे असतात?
उत्तर: मोर. कारण मोरपिसे विकून लोक पैसे कमवतात.
31. असा कुठला खजाना आहे जो जेवढा लुटू तेवढा वाढत जातो?
उत्तर: ज्ञानाचा कोषागार.
32. कोणत्या फळाच्या पोटात दात असतात?
उत्तर: डाळिंब
33. दोन अक्षरांचे माझे नाव, डोकं झाकणे माझं काम?
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर: टोपी
34. अशो कोणती गोष्ट आहे जी पावसामध्ये कितीही भिजली तरी ओली नाही होऊ शकत?
उत्तर: पाणी
35. असे काय आहे जे एखाद्याला दिल्यानंतरही आपण ठेवून घेऊ शकतो?
उत्तर: आपला वचन
36. काय आहे जिच्या डोळ्यात बोटे टाकली तर ती तोंड उघडते?
उत्तर: कात्री
37. असा कोणता महिना आहे ज्या महिन्यात लोक कमी झोपतात?
उत्तर: फेब्रुवारी महिना.
Also Read: Hindi Riddles with Answers
अवघड कोडे
38. असा कोण आहे ज्याला चार बोटे आणि एक अंगठा आहेत, परंतु जर त्यांची काही बोटे किंवा अंगठे कापले तर त्याला काही फरक पडत नाही?
उत्तर: ग्लोव्ह
39. अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमीच वाढते पण कधीही कमी होत नाही?
उत्तर: वय
40. जर सुरेश रीनाचे वडील आहे तर मग सुरेश रिनाच्या वडिलांचा काय आहे?
उत्तर: नाव
41. एक गुहेचे दोन रक्षक, दोन्ही उंच व दोन्ही काळे?
उत्तर: मिशा
42. पंख नाही, तरीही ते हवेत उडते, हात नाही तरीही भांडते. सांगा पाहू मी कोण?
उत्तर: पतंग
43. तीन अक्षरांचे ज्याचे नाव, उलट असो किव्हा सरळ, प्रवासाचे आहे मुख्य साधन,असेल हिम्मत आर सांगा त्याचे नाव?
उत्तर: जहाज
44. अशी कोणती गोष्ट आहे जी थंडी मध्ये सुद्धा वितळते?
उत्तर: मेणबत्ती
45. कोणते फळ आहे जे कच्चे असताना गोड लागते आणि पिकल्यावर ते आंबट होते?
उत्तर: अननस
46. मी हिरवा आहे पण मी पान नाही. मी अनुकरण करणारा आहे परंतु मी वानर नाही.
सांगा पाहू मी कोण?
उत्तर: पोपट
47. अशी कोणती गोष्ट आहे जी सोन्याची पण आहे सोन्यापेक्षा खूप स्वस्त?
उत्तर: बेड/Bed
48. मी आयुष्यात एकदाच येतो, मी परत परत येत नाही.
जो मला ओळखत नाही त्याला आयुष्यभर पश्चात्ताप होतो?
उत्तर: संधी / Opportunity
49. दोन देखणी मुले, रंग ज्यांचा एकच, वेगळे झाले तर त्यांचा नाही काहीच उपयोग?
उत्तर: शूज
50. अशी कोणती गोष्ट आहे जी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते परंतु एका ठिकाण वरून हालत नाही?
उत्तर: रस्ता
Marathi kodi Question And Answer 2024
51. सात अक्षरी जिल्हा महाराष्ट्रात
ना असे काना नावात
ना असे मात्रा नावात
ना असे नी वेलांटी नावात
नांव सांगा पाहू त्या जिल्ह्याचे?🤔
उत्तर: उत्तर -अहमदनगर
52. रस्ता आहे परंतु गाड्या नाहीत
घरे आहेत परंतु माणसे नाहीत
जंगल आहे पण तू प्राणी नाहीत
ओळखा पाहू मी कोण?🤔
उत्तर- नकाशा
53. आम्ही दोघे जुळे भाऊ
एकाच रंगाचे आणि एकच उंचीचे
सोबत असता खुप कामाचे
एक हरविता नाही काम दुसऱ्याचे
उत्तर- चप्पल
54. पाय नाहीत मला
चाके नाहीत मला
तरी मी खूप चालतो
काही खात नाही मी
फक्त रंगीत पाणी पितो
ओळखा पाहू मी कोण?🤔
उत्तर- पेन
55. एक लाल गाई
नुसती लाकूड खाई
जर पाणी पिले
तर मरून ति जाई
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर- आग
Marathi puzzles with Answers
56. संपूर्ण गावभर मी फिरते
तरीही मंदिरात जायला मी घाबरते
सांगा पाहू मी आहे तरी कोण?
उत्तर- चप्पल
57. बारीक असते लांब पण असते तरीही मी काठी नाही
तोंड आहेत मला तरीही मी गांडूळ नाही
श्वास घेते मी पण सजीव नाही
ओळखा पाहू मी आहे तरी कोण
उत्तर- बासरी
58. मातीविना उगवला कापूस लाख मन
पडला मुसळधार पाऊस तरीही भिजला नाही एकही कण
ओळखा पाहू मी कोण? 🤔
उत्तर- ढग
59. एक कपिला गाय
आहेत तिला लोंखडी पाय
राजा बोंबलत जातो
पण ती थांबत नाही. 🤔
उत्तर -रेल्वे
60. वाचण्यात आणि लिहिण्यात
दोन्ही ठिकाणी असते माझे काम
मी नाही कागद मी नाही पेन
सांगा काय आहे माझं नाव? 🤔
उत्तर- चश्मा
61. उंचावरून पडली एक घार
तिला केले मारून ठार
आतील मास खाऊ पटापट
गोड रक्त पिऊ गटागट
ओळखा पाहू मी कोण 🤔
उत्तर- नारळ
62. मी गोष्ट कशी आहे जी
फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा गरमच राहणार
सांगा पाहू मी कोण? 🤔
उत्तर- गरम मसाला
63. ना खातो मी अन्न
ना घेतो मी तुमच्याकडून पगार
तरीही देतो पहारा दिवस रात्र
सांगा पाहू मी आहे तरी कोण? 🤔
उत्तर- कुलूप
64. एक काळा घोडा त्यावर बसली पांढरी स्वारी
एक उतरवली आता दुसर्याची पाळी
सांगा पाहू मी कोण 🤔
उत्तर- तवा आणि पोळी
65. एक गोष्ट जी
खायला कुणाला आवडत नाही
पण सर्वांना मिळते? 🤔
उत्तर- धोका
66. गावचे पाटील तुम्हाला राम राम
दाढीमिशी तुमची तांबूस खूप लांब लांब 🤔
उत्तर- मक्याचे कणीस
67. तीन पायांची एक तीपाले
बसला त्यावर एक शिपाई
सांगा पाहू मी कोण 🤔
उत्तर- चूल आणि तवा
68. एक सूप भरून लाह्या
त्यात फक्त एक रुपया
उत्तर- चंद्र आणि चांदण्या
69. गळा आहे मला पण डोकं नाही मला
खांदा आहे मला पण हात नाहीत मला
सांगा भाऊ मी आहे कोण? 🤔
उत्तर- शर्ट
70. मी तिखट मीठ मसाला
मला चार शिंगे कशाला
सांगा पाहू मी आहे तरी कोण?🤔
उत्तर- लवंग
71. अवतीभोवती आहे लाल रान
32 पिंपळाना फक्त एकच पान
सांग भाऊ मी कोण?🤔
उत्तर- दात आणि जीभ
72. पांढरे माझे पातेले
त्यात ठेवला पिवळा भात
ओळखा पाहू मी कोण?🤔
उत्तर- उकडलेले अंडे
मराठी कोडी सोडवा – Marathi Kodi With Explanations
73.एक वानर एक खारुताई आणि एक पक्षी
नारळाच्या झाडावर जोराने धावत होते
तर सांगा सर्वप्रथम केळी कुणाला मिळतील
उत्तर- नारळाच्या झाडावर केळी नसतात
74. अशी कोणती गोष्ट आहे जिचा रंग काळा आहे? ती प्रकाशात दिसते…
पण अंधारात दिसू शकत नाही… सांगा ते काय आहे?🤔
उत्तर – सावली
75. दोन बोटांचा रस्ता.. त्यावर चाले रेल्वे..
लोकांसाठी आहे उपयोगाची..
काही सेकंदात आग लावते..🤔
उत्तर – माचीस काडी
76. अशी कोणती गोष्ट आहे जी आपण जागी असल्यावर वर जाते आणि झोपी गेल्यावर खाली येते.
उत्तर – पापण्या
77. अशी कोणती गोष्ट आहे पती आपल्या पत्नीला देऊ शकतो? परंतु पत्नी आपल्या पतीला देऊ शकत नाही.
उत्तर – आडनाव / surname
78. असे फळ कोणते
त्याच्या पोटात दात असतात
उत्तर- डाळिंब
79. दोन अक्षरात सामावले माझे नाव
मस्तक झाकणे आपले माझे काम
ओळखा पाहू मी आहे कोण
उत्तर- टोपी
80. तीन अक्षरांचे ज्याचे नाव, उलट असो किव्हा सरळ,
प्रवासाचे आहे मुख्य साधन, असेल हिम्मत तर सांगा त्याचे नाव?
उत्तर – जहाज
उत्तरांसह मुलांसाठी मराठी कोडी | Marathi kodi for kids with answer
81. असे काय आहे जे गिळले जाऊ शकते परंतु कधी कधी ते सुद्धा तुम्हाला गिळून टाकू शकतात?🤔
उत्तर: अहंकार/गर्व
82. इथेच आहे पण दिसत नाही
उत्तर – वारा
83. एका बाटलीत दोन रंग,
मध्येच फुटले तर होतो बेरंग.
उत्तर – अंडे
84. मी नेहमी पुढे असतो आणि मागे कधीच नसतो. ओळखा पाहू मि कोण आहे?
उत्तर: भविष्य/future🔮
85. आपण जितके दूर करत जात, ते तितकेच मोठे होत जाते?
उत्तर: खड्डा
86. काळा आहे पण कावळा नाही
लांब आहे पण साप नाही
फुले वाहतात पण देव नाही
तर सांगा पाहू मी कोण?
उत्तर – केस
87. लिहतो पण पेन नाही,
चालतो पण गाडी नाही,
टिक टिक करतो पण घड्याळ नाही,
सांगा बार मी कोण आहे?
उत्तर – टाईपरायटर
88. असे कोणते ठिकाण आहे जिथे न झालेली मुलगी जाऊ शकत नाही?
उत्तर – सासरच्या घरी
89. पाणी नसलेले महासागर कुठे भेटतो?
उत्तर – नकाशावर
90. अशी कोणती गोष्ट आहे जी गरमी असो कि थंडी नेहेमीच थंड राहते?
उत्तर – बर्फ🧊
91. अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षातून तुम्ही एकदाच विकत घेता आणि वर्ष संपला कि फेकून देता?
उत्तर – कॅलेंडर
92. अशा एका सजीव जीवाचे नाव सांगा ज्याला डोळे नसतात?
उत्तर – गांडूळ
93. असा कोण आहे जो बिना पायांचा धावतो आणि कधी परत येत नाही?
उत्तर – वेळ
94. अशी कोणती गोष्ट आहे जी एक मुलगी लग्नाआधी घालू शकत नाही?
उत्तर – मंगळसूत्र
95. अशी कोणती गोष्ट आहे जी जेवढी सुखवू तेवढी ओली होत जाते?
उत्तर – टॉवेल
96. अशी कोणती गोष्ट आहे कि खाली तर येते पण वर कधीच जात नाही?
उत्तर – पाऊस
97. अशी कोणी गोष्ट आहे ज्याला Head आणि Tail आहे पण Body नाही आहे?
उत्तर – कॉइन
98. असे काय आहे जे तुम्ही परत बघू शकत नाही?
उत्तर – कालचा दिवस
99. एका बाउल मध्ये १२ मासे होते त्यातले ६ मासे पाण्यात बुडले तर आता त्या बाउल मध्ये किती मासे राहिले असतील?
उत्तर – १२ कारण, मासे पाण्यात बुडू शकत नाही.
100. सांगा बर असे कोण आहे जे फाटते पण त्यातून आवाज येत नाही?
उत्तर – दूध
101. कंबर बांधून घरात राहतो
काय आहे ते? मला सांगा?
उत्तर- झाडू
Final Words | सारांश
मित्रांनो तुमचे खूप खुप आभार कि तुम्ही आमच्या वेबसाइट वर आलात आणि Marathi kodi with answer वर आमचा लेख वाचलात. तुम्हाला या लेखामध्ये दिलेल्या किती कोड्यांची उत्तरे माहिती होती ती आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा. आशा आहे की तुम्हाला ही सर्व Marathi Kodi आवडली असतील आणि तुमच्या मनोरंजनासोबत तुमच्या मेंदूचा देखील व्यायाम झाला असेल. खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचवू शकता आणि या पोस्टमध्ये काय तुम्हाला आवडले नाही किंवा काय आवडले आहे ते आम्हाला कळवू शकता. तुम्हाला Marathi shabd kodi with answers या लेखातील कोडी आवडली असतील तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.
मित्रांनो तुमच्या कडे सुद्धा काही अशीच Marathi Kodi असतील तर कंमेंट बॉक्स द्वारे नक्की शेअर करा आम्ही तुम्ही शेअर केलेले मराठी कोडी (Marathi kodi) आमच्या या वेबसाईट द्वारे इतरां पर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.
FAQ’s – Marathi Kodi
Q. मराठी कोडी कोणी तयार केली होती?
A. असे मानले जाते कि लंडन मधील एकी cartographer होते त्यांनी सर्वात प्रश्न 1760 मध्ये “Jigsaw Puzzle” चे निर्माण केले होते. हे एक प्रकारचा मॅप होता ज्याला लाकडाच्या सपाट तुकड्यावर चिटकवले गेले होते.
Q. दररोज मराठी कोडी सोडवल्याने काय फायदा होईल?
A. तुम्ही जर का नित्यनियमाने रोज कोडी solved करायचा प्रयन्त केलात तर तुमचे लॉजिकल थिंकिंग चांगले होईल, ज्यामुळे तुम्ही दररोज घडणाऱ्या गोष्टी मध्ये देखील विचारपूर्ण आणि पटकन निर्णय घेऊ शकाल.
Q. मराठी कोडी लहान मुलांच्या ब्रेन साठी चांगली असतात का?
A. होय, Marathi Kodi लहान मुलांच्या मेंदूसाठी खुप चांगली असतात, आणि तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणापासूनच मराठी कोडी सोडायचा छंद लावा जयने त्यांच्या मांडूळ चालना भेटेल.
Very Nice Puzzle Overall website is great
दोन भिन्न अर्थाचे शब्द एकत्र करून नवीन वेगळा शब्द तयार करा.उदा.रवि ग्रह + पुष्प = सूर्यफूल
१ वाईट+ एक मैदानी खेळ
२ वास+ बातमी
३ फळातील द्राव+ फुटणे
४ क्रीडा+ एक दैवत
५ लक्ष+ किल्ला
६ एक वाहन( इं.)+ ठिकाण
७ ढीग+ खेळ
८एक फळ( हिंदी)+ लढाई
९ तुकडे+ घास
१० माज+ बाई
११ वेळ+ पूड
१२ वेदना+ हात
१३ सभ्य गृहस्थ+ श्यामवर्णी
१४ एक शस्त्र+ मुलामा
मदत हवे आहे
कृपा करा
संजीव यांनी पाठविलेल्या मराठी दोन शब्द एकत्र करून जोडाक्षर शोधण्याच्या मराठी कोड्याची उत्तरे पाठवावी
Hii
Khupchan ahe he.
Kode
Sir Ek question hota.asi konti vastu ahe ji gharat takli ki ghar bhar pasrel ani khisyat pn mavel
Pl answar mi
Light Bulb!
Very nice puzzles
Great sir, Thanks you so much.
बाहेर गावाच पाहुना, जाता जाता जाइना, कितीही हकालून लावल, पलवून लावल त्याला लाज कशी काय येइना.
Plzz answer dya kay aahe he
एक खोली मध्ये २ आई २ मुली आणि १ आजी आहे तर त्या खोली मध्ये एकूण किती जण आहेत
3 (आई,मुलगी आणि आज्जी)
Me pan tech uttar dilay
Spashtikaran den garjech nahi samzun ja
Tya kholi madhe 3 jan aahet
Ek mulgi
Ek aai
Aani ek
Aaji
Spashtikaran garjech aahe ka
एक घर हजार बल्ब या कोड्याच उत्तर काय आहे
काडीची पेटी
Maz nav ram padar
I’m from Maharashtra nevasa
डाळिंब
डाळिंब?
Sky
Eka shetakaryav
Prashna asa tyache uttar ky?