लहान मुलांसाठी कोडी | Puzzles for kids in Marathi | Marathi Kode 2024
Every Marathi Puzzle in this collection of Riddles in Marathi, is either funny or tests your logical thinking & can be enjoyed by both kids & adults.
1. मी उडू शकतो पण मला पंख नाहीत.
मी रडू शकतो पण मला डोळे नाहीत.
मी जिथे जातो तिथे अंधार माझ्या मागे येतो.
ओळखा पाहू मी कोण आहे?
=> ढग
2. असे काय आहे ज्याचे नाव घेतल्या-घेतल्या ते अदृश्य होते? 🤔
=> शांतता
3. तुम्ही मला पाण्यात पाहू शकता, परंतु मी कधीही ओली होत नाही. 🤔
ओळखा पाहू मी कोण आहे?
=> एक प्रतिबिंब
4. मी तरुण असतो तेव्हा मी उंच असतो, मी जेव्हा म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो.
ओळखा पाहू मी कोण आहे?
=> एक मेणबत्ती / पेन्सिल
5. लोक मला खाण्यासाठी विकत घेतात, परंतु कधीही मला खात नाही. ओळखा पाहू मी कोण आहे?
=> प्लेट्स / कटलरी
6. जेव्हा मी जिवंत असेल तेव्हा सर्व जण गाणं गातात, जेव्हा मी मरते तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात.
ओळखा पाहू मी कोण आहे?
=> वाढदिवसाला वापरलेल्या मेणबत्त्या
7. माझ्याकडे हृदय आहे, परंतु इतर अवयव नाहीत.
ओळख पाहू मी कोण?
=> पत्त्यांचा डेक
8. गोल आहे पण बॉल नाही,
शेपूट आहे पण प्राणी नाही,
सारी मुले माझी शेपूट धरून खेळतात,
पण तरी सुद्धा मी रडत नाही.
ओळख पाहू मी कोण?
=> फुगा
9. चौकीवर बसलेली एक राणी, तिच्या डोक्यावर पाणी? 🤔
=> एक मेणबत्ती
10. आपण जितके पुढे जातो तेवढे मागे सोडत जातो? 🤔
=> पाऊल
11. एक महिला तिच्या हॉटेलच्या खोलीत बसली आहे, तेवढ्यात कोणी तरी तिचा दरवाजा ठोठावला, तिने दरवाजा उघडला. तो म्हणाला “अरे मला माफ करा, मी चूक केली आहे, मला वाटले की ही माझी खोली आहे.” त्यानंतर तो कॉरिडॉर मध्ये असलेल्या लिफ्टचा वापर करून खाली गेला. ती महिला परत तिच्या खोलीत गेली आणि फोनवर पोलिसांना त्या माणसाची माहिती दिली. असे संशयास्पद त्या महिलेला त्या पुरुषाबद्दल काय वाटले असेल?
=> आपण आपल्या स्वत: च्या हॉटेल रूमचा दरवाजा कधीच ठोठावत नाही आणि त्या माणसाने सर्वात प्रथम दरवाजा ठोठावला होता.
12. रविवारी दुपारी श्री पाटील यांचा खून करण्यात आला.
बायको म्हणाली की ती एक पुस्तक वाचत आहे.
बटलर म्हणाला की तो शॉवर घेत होता.
आचारी म्हणाला की तो ब्रेकफास्ट बनवत आहे.
मोलकरीण म्हणाली की ती कपडे धुवत होती,
आणि माळी म्हणाली की मी नारळाची झाडे लावत होतो. तर मग श्री पाटील यांचा खून कोणी केला असेल?
=> आचारी, कारण श्री पाटील यांना दुपारी मारण्यात आले आणि तरीही आचाऱ्याने असा दावा केला की तो नाश्ता बनवित होता!!
13. आपण जितक्या वेगाने धावता तेवढे ते पकडणे कठीण होत जाते?
=> आपला श्वास
14. ब्रेकफास्ट साठी कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या तुम्ही खाऊ शकत नाही?
=> लंच आणि डिनर
15. असे काय आहे ज्याने मी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते,
ज्याने तुमच्या डोळ्यात अश्रू देखील येऊ शकतात पण,
मी पाहिले जाऊ शकत नाही. ओळख पाहू मी काय आहे?
=> आठवणी
16. अशी कोणती गोष्ट आहे ज्याला मान आहे पण डोके नाही?
=> एक बाटली
17. असे काय आहे जे कोपऱ्यात राहून जगभर काय प्रवास करते?
=>पत्रावरील एक शिक्का/Stamp
18. असे काय आहे जे आपल्याकडे असल्यास तुम्ही इतरांना सांगू इच्छिता पण इतरांना सांगितल्यावर ते आपले रहात नाही?
=> गुपित.
19. जो माणूस ते निर्माण करतो तो ते वापरत नाही; जो माणूस ते खरेदी करतो त्याला त्याची गरज नसते; जो माणूस त्याचा वापर करतो त्याला ते माहित नसते. ओळखा पाहू मी कशाबद्दल बोलत आहे?
=> एक ताबूत / A coffin
20. एकदा एका मुलाचे आणि त्याच्या वडिलांचा अपघात होतो, आणि या अपघातात त्या मुलाच्या वडिलांचा मृत्यू होतो. मुलाला त्वरित इस्पितळात दाखल केले जाते. ऑपरेशनसाठी हेड सर्जनला बोलावले जाते, पण मुलगा पाहून डॉक्टर लगेचच सांगतो कि “मी ऑपरेट करू शकत नाही. हा माझा मुलगा आहे.” हे कसे शक्य आहे?
=> हेड सर्जन मुलाची आई आहे.
मित्रांनो या लेखामध्ये दिलेली Marathi Puzzles तुम्हाला कशी वाटली ती कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुमच्या कडे सुद्धा अशीच नवीन Marathi Kodi असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये त्यांची नक्की नोंद करा.
any riddle for rabbit
Very Nice
यातील बरीचशी कोडी ५ वषाऀच्या मुलांचे डोक्यावरून जातात असे दिसते