नवीन मराठी कोडी । New puzzles in Marathi

हिम्मत असेल तर हे Marathi Kodi सोडवून दाखवा. चला बघूया तुम्हची बुद्धिमत्ता.

1. माझे शरीर आहे गोल-गोल,
प्रत्येक स्त्रीचे रूप मी अजून निखारते
मी बनले आहे काचेची,
प्रत्येक रंगात मी भेटते.
सांगा पाहू मी कोण?

=> बांगड्या  


2. मी कधीच प्रश्न विचारत नाही परंतु नेहमी उत्तर देते. सांगा पाहू मी कोण?

=> दारावरची बेल


3. माझ्या डोक्यावर चाकू चा घाव घालून तुम्ही मला मारता आणि मी मेलेले असताना तुमची बाजूला रडता सांगा पाहू मी कोण?

=> कांदा  


4. मी छिद्रांनी भरलेला आहे, परंतु तरीही भरपूर पाणी मी स्वतःमध्ये ठेऊ शकतो. सांगा बघू मी कोण?

=> एक स्पंज  


5. मला चार बोटे आणि आहे एक अंगठा, परंतु तरीही मी जिवंत नाही?

=> हातमोजे  


6. काय आहे जे पंखांशिवाय सुद्धा उडत जाते?

=>  वेळ 


7. रिंग आहे, परंतु बोट नाही ओळखा पाहू मी कोण?

=> फोन


8. चार पाय आहेत, परंतु चालू शकत नाही ओळख पाहू मी कोण?

=> एक टेबल  


9. मी हवेपेक्षा हलका आहे परंतु दहा लाख माणसे मला वर उचलू शकत नाहीत, ओळखा पाहू मी कोण?

=> बुडबुडा/bubble  


10. लोखंडाला सुद्धा मी खेचू शकतो,
पण रबरासमोर मी हरतो,
ओळखा पाहू मी कोण?

=> चुंबक


11. जगभर मी फिरतो,
पण जमिनीवर ठेवत नाही पाय,
दिवसभर मी झोपतो आणि रात्री मी जागा राहतो,
रात्र आहे काळोखी माझ्या शिवाय
ओळखा पाहू मी कोण?

=> चन्द्र


12. खरेदी करताना काळा, जाळल्यावर लाल,
फेकल्यावर सफेद
ओळखा पाहू मी कोण?

=> कोळसा


13. रंग आहे माझा काळा,
उजेडात मी दिसते,
अंधारात मी लपते
ओळखा पाहू मी कोण?

=> सावली


14. अशा एका गोष्टीच नाव सांग जी आपल्या आजूबाजूला असते पण दिसत नाही?

=> हवा


15. अशी कोणती गोष्ट आहे जी बोलल्यानंतर तुटून जाते?

=> शांतता


16. तीन हात व पोट आहे गोल,
गर्मीमध्ये होतो माझा उपयोग
ओळखा पाहू मी कोण?

=> पंखा


17. वीस जणांचा शिरच्छेद केला,
न मारला न केला खून
सांगा पाहू या कोड्याचे उत्तर?

=> नेल कटर


18. भांड्यावर भांडी,
मुलगा बापापेक्षा गोरा,

=> नारळ


19. नाक माझा मोठा
नाकाने करतो सगळे काम,
सांगा पाहू माझं नाव?

=> हत्ती


20. कोंबडी देते अंडी, गाय देते दूध,
पण असा कोण आहे जो दूध आणि अंडी दोन्ही देतो?

=> दुकानदार


21. असे काय आहे जे ज्याचं आहे तोच बघू शकतो?

=> स्वप्न


22. असा कोणता दुकानदार आहे जो माल घेतो पण आणि त्याचे पैसे पण घेतो?

=> न्हावी


23. पाण्यातून होतो माझा जन्म आणि पाण्यातच जातो मी मरून,
जेवणाशी आहे माझं जवळच नातं. ओळखा पाहू मी कोण ?

=> मीठ


24. असा कोणता कोट आहे जो आपण खाऊ शकत नाही?

=> पठाणकोट


25. अशी कोणती गोष्ट आहे जी कितीही चालली, तरी दमत नाही?

=> जीभ


26. अशी कोणती जागा आहे जिथे
१०० लोक जातात आणि येताना १०१ बाहेर येतात?

=> वरात


27. कल्पना करा कि तुम्ही एका गडद खोलीमध्ये आहात,
आणि तुम्हाला त्या गडद खोलीमधून बाहेर पडायचं असेल तर
तुम्ही काय कराल?

=> कल्पना करायचं बंद करा


28. असा कोणता शहर आहे ज्याला, आपण नेहमी खाऊन टाकतो?

=> पुरी


29. फक्त सकाळीच मी येतो,
जगभरातील बातम्या सांगतो,
माझ्याशिवाय प्रत्येकजण होतो दुःखि
सांगा पाहू मी कोण?

=> वर्तमानपत्र


३०. अस काय आहे जे तुमचे बोलून झाल्यावर वेगळे होऊन जातात?

⇒ उत्तर: तुमचे ओठ


 

4 thoughts on “नवीन मराठी कोडी । New puzzles in Marathi”

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.