Home Marathi Kodi 30 Rare Riddles in Marathi with Answers | मराठी कोडे

30 Rare Riddles in Marathi with Answers | मराठी कोडे

The 30 Marathi riddles are listed below. The best part of these Latest Marathi Puzzles in Marathi is that they can be enjoyed by both adults & kids. Do let us know which among these were easy or difficult for you, in our comment section.

1. अशी कोणती जागा आहे जिथे दर हप्त्याला काही तरी नवीन बघायला भेटते?

⇒ उत्तर: रंगमंच


2. अशी कोणती गोष्ट आहे ज्याला चोर बघू शकतो पण कधीही चोरू शकत नाही?

⇒ उत्तर:  ज्ञान


3. एक अशा धान्याचे नाव सांगा ज्याचे नाव एक तीर्थक्षेतत्राचे नाव आहे, आणि जिकडे जगभरातील लोक सुद्धा जातात?

⇒ उत्तर: मक्का


4. डोळे आहेत पण बघू शकत नाही, पाय आहेत पण चालू शकत नाही तोंड आहे पण बोलू शकत नाही, सांगा बार मी कोण आहे?

⇒ उत्तर: बाहुली


5. असा कोणता प्रश्न आहे ज्याचे उत्तर सतत बदलतच राहते?

⇒ उत्तर: वेळ काय झाली आहे?


6. असा कोण आहे जो लोकांशी कधीच भांडत नाही तरी सुद्धा लोक त्याला जोर जोरात मारतात?

⇒ उत्तर: ढोल


7. सांगा पाहू बायकोचा कोणता असा रूप आहे जो सगळे लोक बघतात पण तिचा नवरा कधीच बघू शकत नाही?

⇒ उत्तर: विधवा रूप


8. असे काय आहे जे नकळत आपण कुठे ना कुठे सोडून देतो पण ते नेहमी आपल्या सोबतच असते?

⇒ उत्तर: फिंगरप्रिंट


9. मी खात पित नाही आणि पगार पण घेत नाही तरी सुद्धा तुमच्या घराला पहारा देतो, सांगा बर मी कोण?

⇒ उत्तर: कुलूप


10. एका मुलाने त्याच्या वडिलांना आग लावून टाकली पण त्याला कोणीही थांबवले नाही सांगा बार असे का?

⇒ उत्तर: तो मुलगा त्याच्या वडिलांचे अंतिम संस्कार करत होता.


11. असे काय आहे ज्याला आपण कधी उघडत नाही पण नेहमी बंद करतो?

⇒ उत्तर: अलार्म


12. मी मिठाई नाही पण गोड आहे,

शस्त्र नाही पण मी सरळ आहे

मला खाऊ नाही शकत तरी सुद्धा आपण खातो

आणि खाऊन झाले कि थुंकून टाकतो, सांगा बर मी कोण?

⇒ उत्तर: ऊस


13. तुमच्या कडे असे काय आहे जे जेवढे जास्त असणार तेवढेच तुम्हाला कमी दिसणार?

⇒ उत्तर: काळोख


14. अशी कोणती बॅग आहे जी फक्त ओली केल्यावरच उपयोगी येते?

⇒ उत्तर: टी-बॅग


15. एका भाजीचे नाव सांगा ज्याचा अर्थ म्हणजे आपले पालन पोषण करणे आहे?

⇒ उत्तर: पालक


16. असे काय आहे जे आपण खूप वेळा खातो तरी सुद्धा आपले पोट भरत नाही?

⇒ उत्तर: वचन


17. जर तुम्ही तिला पकडला तर तुम्ही तिला मारून टाकता आणि तर नाही पकडलात तर सोबत ठेवता, सांगा पाहू मी कोण?

⇒ उत्तर: ऊवा


18. असा कोणता माणूस आहे जो बिना तिकीट पूर्ण जग फिरू शकतो?

⇒ उत्तर: नवीन जन्मलेला माणूस


19. असे काय आहे जे लोक म्हणतात वाईट आहे पण तरी सुद्धा ते प्यायला सांगतात?

⇒ उत्तर: आपला राग


20. मी सगळं काही उलटे करू शकतो पण मी स्वतःला कधीच हलवू शकत नाही सांगा बर मी कोण?

⇒ उत्तर: आरसा


21. असे काय आहे जे लहान मुलाला तरुण आणि तरुण मुलाला वयस्कर बनवते?

⇒ उत्तर: वय


22. असे कोण आहे ज्याचा पोटात दात असतात?

⇒ उत्तर: डाळिंब


23. लिहतो पण पेन नाही, चालतो पण गाडी नाही, टिक टिक करतो पण घड्याळ नाही, सांगा बार मी कोण आहे?

⇒ उत्तर: टाईपरायटर


24. अशी कोणते गोष्ट आहे जी आपल्याला फ्री मध्ये भेटते तरी सुद्धा हॉस्पिटल ला गेल्यावर विकत घ्यावी लागते?

⇒ उत्तर: ऑक्सिजन


25. मुलगी १८ वर्षाची झाल्यावर काय देण्या करता लायक होते?

⇒ उत्तर: मतदान


26. असे काय आहे जे तोडल्यावर आपण खूप खुश होतो आणि आपल्याला ते सतत तोडावेसे वाटतात?

⇒ उत्तर: रेकॉर्ड


27. असे काय आहे जे कधी गोड तर कधी कडू लागते?

⇒ उत्तर: वाणी किव्हा बोलणे


28. अशा भाजीचे नाव सांगा ज्या भाजी मध्ये एका प्रसिद्ध शहराचे नाव लपलेले आहे?

⇒ उत्तर: शिमला मिरची


29. असे कोणते सामान आहे जे फक्त स्त्रिया वर्षातून एकदाच घेतात?

⇒ उत्तर: राखी


30. माझं एक दुकान आहे, एक कॉलेज आहे आणि मी विध्यार्थी देखील आहे. सांगा पाहू मी कोण?

⇒ उत्तर: मेडिकल


 

रोहित म्हात्रेhttps://gkinmarathi.com/
A Writer, Teacher and GK Expert. I am have completed B.tech & M.tech in Information Technology. I am highly passionate about Technology and Indian History. If you have any questions then share your questions in comment box.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

MPSC 2020 Logical Questions And Answers Tips In Marathi

पाण्याची टाकी व नळ उदाहरणे नमूना पहिला – उदा. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते; तर दुसर्‍या नळाने ती टाकी भरण्यास 12 तास लागतात. जर...

Panchayat raj questions in Marathi – महाराष्ट्रातील पंचायत राज महत्वाचे प्रश्न

आज आम्ही तुम्हाला पंचायती राज वर प्रश्न विचारणार आहोत. हे MCQ अगदी सरळ सोपे आहेत परंतु आपल्या मूलभूत ज्ञानाची चाचणी करण्यासाठी पुरेसे आहेत. 1. कोणत्या...

MPSC Syllabus Marathi Grammar Part 10 – Sandhi | मराठी संधी व त्याचे प्रकार

संधी व त्याचे प्रकार जोडाक्षरे: ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास ‘जोडाक्षर’ म्हणतात. उदा. विद्यालय : धा : द +...

Information About Panchayat Samiti in Marathi | पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती

पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम क्र. 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे. पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून...

Recent Comments