Marathi Riddles With Answers 2021 | मजेदार कोडी आणि उत्तरे

1. असा कोण आहे जो कधीच प्रश्न करत नाही तरी सुद्धा तुम्ही त्याला उत्तर देता?

⇒ उत्तर: फोन कॉल


2. असा कोण आहे ज्याला चार पाय आहेत तरी सुद्धा तो चालू शकत नाही?

⇒ उत्तर: टेबल


3. काळा आहे पण कावळा नाही
लांब आहे पण साप नाही
फुले वाहतात पण देव नाही
तर सांगा पाहू मी कोण?

⇒ उत्तर: केस


4. वीज गेली आठवण झाली,
मोठी असो किंवा लहान,
डोळ्यातून हिच्या गळते पाणी.

⇒ उत्तर: मेणबत्ती


5. दात आहेत पण चावत नाही,
गुंता होतो काळ्या शेतात,
सगळे माझ्यावर सोपवतात.
सांगा पाहू मी कोण?

⇒ उत्तर: कंगवा


6. थांबून वाजते पण घड्याळ नाही,
बारीक लांब पण काठी नाही,
दोन तोंडची पण साप नाही,
श्वास घेते पण तुम्ही नाही?

⇒ उत्तर:  बासरी


7. पाटील बुवा राम राम,
दाढी मिशी लांब लांब,

⇒ उत्तर:  कणीस


8. मुकुट याच्या डोक्यावर
जांभळा झगा अंगावर
काटे आहेत जरा सांभाळून
चवीने खातात मला भाजून
ओळखा पाहू मी कोण?

⇒ उत्तर:  वांगे


9. नका जोडू मला इंजीन लागत नाही मला इंधन पाय मारा भराभर धावते मी सरसर

⇒ उत्तर: सायकल


10. असे कोणते फळ आहे जे बाजारात विकले जात नाही?

⇒ उत्तर: मेहनतीचे फळ


11. असे काय आहे ज्यामध्ये सगळं काही लिहलेले असते पण कोणीही ते वाचू शकत नाही?

⇒ उत्तर: आपले भाग्य


12. असे काय आहे जे तुम्ही झोपता तेव्हा ती सुद्धा पडते आणि जेव्हा तुम्ही उठता तेव्हा ती सुद्धा उठते?

⇒ उत्तर: डोळ्याची पापणी


13. असा कोण आहे ज्याच्याकडे झोपण्यासाठी पलंग नाही, राहण्यासाठी महल नाही, आणि विशेष म्हणजे त्याच्या कडे एक रुपया देखील नाही तरी तो राजा आहे?

⇒ उत्तर:  सिंह


14. अशी कोणती गोष्ट आहे जी सगळी मुले खातात, पण मुलांना ते आवडत नाही?

⇒ उत्तर:  पालकांचा ओरडा किव्हा मार


15. सांगा बर असे कोण आहे जे फाटते पण त्यातून आवाज येत नाही?

⇒ उत्तर: दूध


16. हा बागेत भेटत नाही, पण हा अर्धा फुल आणि अर्धा फळ आहे, दिसायला आहे काळा पण खूप गोड आहे, सांगा बर मी कोण?

⇒ उत्तर: गुलाबजामून


17. अशी कोणती गोष्ट आहे जी वाचन आणि लिहण्यासाठी उपयोगी येते पण ती वस्तू पेन किव्हा कागद नाही आहे?

⇒ उत्तर: चष्मा


18. अशी कोणती जागा आहे जिथे माणूस गरीब असो वा श्रीमंत, दोघांना सुद्धा वाडगा घेऊन उभा राहायला लागते?

⇒ उत्तर: पाणी-पुरी च्या ठेल्यावर, पाणी पुरी खाताना आपल्याला नेहमीच वाडगा घेऊन उभा राहायला लागते!


19. अशी कोणती गोष्ट आहे ज्यामध्ये खूप सारे छिद्र आहे तरी सुद्धा तो पाण्याला धरून ठेवतो?

⇒ उत्तर:  स्पॉंज


20. अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही, जंगल आहे पण झाड नाही, आणि शहर आहे पण पाणी नाही?

⇒ उत्तर: नकाशा


21. असा कोण आहे जो सगळी आपली कामे हाताऐवजी नाकाने करतो?

⇒ उत्तर: हत्ती


22. अशी कोणती गोष्ट आहे जिला वापरण्या आधी तोडावी लागते?

⇒ उत्तर: अंड


23. एक अशा वस्तूचे नाव सांगा जी तुम्हाला देण्या अगोदर तुमच्या कडून काढून घेतली जाते?

⇒ उत्तर: फोटोग्राफर द्वारा तुमचा काढलेला फोटो


24. असे काय आहे ज्याचे येणं पण खराब आणि जाण पण खराब आहे?

⇒ उत्तर: डोळे येण पण खराब आणि जाण पण खराब आहे.


25. अशी कोणती गोष्ट आहे जिला आपण काटतो, पिसतो आणि वाटतो सुद्धा पण आपण खात नाही?

⇒ उत्तर: खळायचे पत्ते


26. अशी कोणती गोष्ट आहे जिला माणूस लपवून चालतो पण स्त्रिया दाखवून चालतात?

⇒ उत्तर: पर्स


27. लाल गाय लाकुड खाय,
पाणी प्याय मरुन जाई.

⇒ उत्तर: आग


28. मातीशिवाय उगवली कपाशि लाख मन,
मुसळधार पाण्यात भिजला नाही एक कन.

⇒ उत्तर: ढग


29. वळनावळणाची वाट मध्ये भोगदा आहे मी

एक शरीराचा अवयव, ओळखा पाहू मी कोण?

⇒ उत्तर: कान


30. Mpsc प्रश्न – एका माणसाकडे 25 गाई असतात. त्याना 1 ते 25 क्र.दिलेले असतात. विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते. म्हणजे 5 नंबरची गाय 5 लीटर दूध …….
18 नंबरची गाय 18 लीटर दूध ……
त्या माणसाला पाच मुले असतात.प्रत्येकाला गाई वाटायच्या आहेत पण अट मात्र एकच सर्व पाचही मुलांना सारखेच दूध मिळाले पाहिजे. योग्य असे पाच गट करा. आपल्यातील गणिततज्ञ नक्की याचे उत्तर देऊ शकतील.

⇒ उत्तर: पहिल्या मुलाला 1, 15, 24, 25 या क्रमांकाच्या गाई भेटतील
दुसऱ्या मुलाला 2, 3, 5, 10, 22, 23 या क्रमांकाच्या गाई भेटतील
तिसऱ्या मुलाला 4, 6, 14, 20, 21 या क्रमांकाच्या गाई भेटतील
चौथ्या मुलाला 7, 8, 9, 12, 13, 16,  या क्रमांकाच्या गाई भेटतील
पाचव्या मुलाला 11, 17, 18, 19 या क्रमांकाच्या गाई भेटतील


1 thought on “Marathi Riddles With Answers 2021 | मजेदार कोडी आणि उत्तरे”

  1. प्रश्न 30. एमपीएससी प्रश्न चे उत्तर काढण्याची trick काय आहे?

    Reply

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.