Who I am Puzzle in Marathi | ओळखा पाहू मी कोण आहे
Who I am Puzzle in Marathi: या लेखाच्या माध्यमातून आम्ही खूप सारी नवीन मराठी कोडी घेऊन आलो आहोत.
1. तीनजण वाढायला,
बाराजण जेवायला.
उत्तर: => घड्याळ
2. हजार येती हजार जाती,
हजार बसती पारावर,
अशी नार ती जोराची हजार घेती ऊरावर.
उत्तर: => बस/ट्रेन
3. तू माझा भाऊ आहेस,
पण मी तुझा भाऊ नाही.
सांगा पाहू मी कोण आहे?
उत्तर: => तुझी बहीण
4. मी एका हत्तीच्या आकाराचा आहे,
परंतु माझे वजन काहीही नाही.
सांगा पाहू मी काय आहे?
उत्तर: => एका हत्तीची सावली
5. आपण मला न पाहता किंवा स्पर्श न करता तोडू शकता.
सांगा पाहू मी काय आहे?
उत्तर: => एक वचन
6. मी फिरतो पण मला पाय नाहीत.
मी रडतो पण मला डोळे नाहीत.
सांगा पाहू मी कोण आहे?
उत्तर: => एक ढग
7. सगळे गेले रानात,
अन् झिपरी पोरगी घरात.
सांगा पाहू मी कोण आहे?
उत्तर: => केरसुणी
8. थई थकड धा…
तीन डोकी पाय दहा…
उत्तर: => दोन बैल, नांगर आणि एक माणूस (शेत नांगरणारा)
9. मी तुम्हाला नेहमी खाली खेचतो,
पण स्वतः कधी वर जात नाही.
सांगा पाहू मी कोण आहे?
उत्तर: => गुरुत्वाकर्षण
10. पुरूष असून पर्स वापरतो,
वेडा नसून कागद फाडतो.
सांगा पाहू मी कोण आहे?
उत्तर: => बस कंडक्टर
11. चार खंडांचे एक शहर,
चार विहीरी बीना पाणी.
चोर १८ त्या शहरात, १ राणी.
आला १ शिपाई,
सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी…
सांगा पाहू मी काय आहे?
उत्तर: => कॅरम!
12. आहे मला मुख,
परंतु मी खात नाही,
दिसते मी झोपलेली,
पण असते पळतही,
माझ्या शिवाय तुमचे जगणेच शक्य नाही,
सांगा पाहू मी काय आहे?
उत्तर: => नदी
13. अशी कोणती गोष्ट आहे जी कितीही चालली तरी कधीही थकत नाही?
उत्तर: => जीभ
14. अशी कोणती गोष्ट आहे जी दारातून जाते पण कधीच प्रवेश करत नाही आणि कधीही बाहेर येत नाही?
उत्तर: => की होल
15. पांढरं पातेल, पिवळा भात
उत्तर: => अंडी
16. तिखट, मीठ, मसाला, शिंग कशाला?
उत्तर: =>लवंग
17. सूपभर लाह्या त्यात एक रुपया
उत्तर: => चंद्र आणि चांदण्या
18. हिरवी पेटी काट्यात पडली, उघडून पहिली तर मोत्याने भरली.
उत्तर: => भेंडी
19. लांब आहे पण साप नाही, बांधतात पण दोरी नाही, ओळखा पाहू मी कोण?
उत्तर: => वेणी
20. असे काय आहे जे आले तरी त्रास होतो व गेले तरी त्रास होतो?
उत्तर: => डोळे
ओळखा पाहू कोडी मराठी व उत्तरे | RIDDLES IN MARATHI WITH ANSWERS
21. लाल घोडा थांबलेला आहे, काळा घोडा हवेत उडत आहे सांगा पाहू मी कोण?
उत्तर: => आग आणि धूर
22. अशी कोणती गोष्ट आहे, जी जितकी जास्त ओढली जाईल ती तितकी छोटी होत जाईल?
उत्तर: => बिडी / सिगारेट
23. मोजू शकत नाही कोणीही, आम्ही राहतो लाखो एकत्रित, डोक्याला झाकून ठेवतो आम्ही, थंडीत उन्हात आणि पावसात, ओळखा पाहू मी कोण?
उत्तर: => डोक्यावरचे केस
24. एका राजाची एक अद्भुत राणी, जी दमा-दमाने पिते पाणी, सांगा पाहू मी कोण?
उत्तर: => दिवा
25. ऊन बघता मी येतो,
सावली पाहता मी लाजतो,
वाऱ्याचे स्पर्श होताच मी नाहीसा होतो.
सांगा मी कोण?
उत्तर: => घाम
26. हिरवी हिरवाई, हिरवागार रंग
इटूकले, पिटुकले, नक्षीदार अंग
औषधाचा गडू, पण चवीला कडू
ओळखा कोण?
उत्तर: => कडुलिंब
27. आभाळात उडतो पण पक्षी नाही.
लांबलचक शेपूट पण वाघ नाही.
वेगवेगळे आकार, निरनिराळे रंग
मला उडवताना लहान थोर दंग
चढाओढीच्या वेळी नीट ठेवा भान
मकरसंक्रांतीच्या दिवशी मला खरा मान
ओळखा कोण ?
उत्तर: => पतंग
28. हिरव्या रानी पानोपानी
मध्ये कोण बसलंय, राजा का राणी ?
काटेदार अंग, डोक्यावर तुरा
हळूच जरा सांभाळून धरा
हिरवं पिवळ ठिपक्यांचे रूप
याचा रस तुम्हाला आवडतो खूप
ओळखा कोण ?
उत्तर: => अननस
29. कोकणातून येतो
देश विदेशात जातो
मोठेही याला बघून होतात लहान
असा याचा महिमा महान
पिवळा,केशरी रंगाचा
हा तर आहे फळांचा राजा
ओळखा कोण ?
उत्तर: => आंबा
30. भारतीय संस्कॢतीचे प्रतीक
चिखलात राहून अलिप्त
सुर्योदयाला उमलते
सुर्यास्ताला मिटून जाते
सहस्ञदलांची ही आरस छान
“राष्टीय फूल”असा मान
ओळखा कोण ?
उत्तर:=> कमळ
31. कंबर बारीक, आयाळ छान
एक पंजा पडला तर, तुमचा जाईल प्राण
याची गर्जना ऐकताच सारेजण घाबरतात
‘जंगलचा राजा’ असे याला म्हणतात
ओळखा कोण ?
उत्तर: => सिंह
32. तीक्ष्ण डोळे, बाकदार चोच
उंच भरारी घेतो आकाशात
विष्णूचं वाहन, सापाचा शत्रू
पक्ष्यांचा राजा शक्तिमान
ओळखा कोण ?
उत्तर: => गरुड
33. कधी पाण्यात पोहतो
कधी जमिनीवर चालतो
ढालीसारख्या पाठीला याच्या
खडक समजतात दुरुन
मात्र जवळ येताच कुणी
हातपाय घेतो हा गोळा करुन
मंदिरापुढे असतं याचं स्थान
सशाबरोबर शर्यतीत मिळवला पहिला मान !
ओळखा कोण?
उत्तर: => कासव
34. एका महालात बत्तीस खॊल्या
त्यात राहते एकच राणी
सारखं सारखं मागे पाणी
ओळखा कोण ?
उत्तर: => जीभ
35. कधी ढोबळी, कधी काकडी
कधी जाडी, कधी बारीक
कोल्हापूरची प्रसिध्द लवंगी
खाताच येते डोळ्यात पाणी
ओळखा कोण ?
उत्तर: => मिर्ची
36. काळा काळा रंग, वस्तू कुरतडण्यत दंग
मनीमाऊ येताच पळून जातॊ
बिळात जाऊन दडून बसतो
ओळखा कोण ?
उत्तर: => उंदीर
37. आगमनाने याच्या सृष्टी फुलते
पानोपानी चैतन्याची खूण उमलते
कोकीळाही कुहूकुहू करते
आमराई मोहरुन जाते
माघ शुध्द पंचमीला,सोळा कलांनी फुलणारा ऋतू
ओळखा कोण ?
उत्तर: => पावसाळा
38. हिरवा पिवळा रंग, आंबट-गोड चव
’क’ जीवनसत्वाने भरपूर
गावं माझं नागपूर !
ओळखा कोण?
उत्तर: => संत्री
39. गोल, चौकोनी, त्रिकोणी, असा याचा आकार
काच, धातू, प्लॅस्टिकमध्ये, करतात साकार
रंग, रुप, नक्षीने याच्या मोहून जातं मन
हातामध्ये घालतात, हे तर स्त्रीचं एक आभूषण
ओळखा कोण ?
उत्तर: => बांगडी
40. देवबाप्पा जेव्हा छोटा होता
तेव्हा तॊही शाळेत जात होता
एकदा काय गंमत झाली
त्याची रंगपेटी पडली खाली
रंग सारे सांडून गेले
ढगांनी ते पटकन गॊळा केले
ओळखा बरं ते रंग कोणाला दिले ?
कोण मग आकाशात ’सप्तरंगी’ झाले?
उत्तर: => इंद्रधनुष्य
41. घरातल्या एका कोपर्यात बसतो
वेळी-अवेळी वाजत असतो
मला घ्या,मला घ्या म्हणून ओरडत असतो
कधी बरोबर तर कधी चूकीचा असतो
पण खरचं जर हा झाला गप्प
कितीतरी कामं होतात ठप्प
एवढ्या महत्वाचा हा आहॆ तरी कोण?
उत्तर: => घरचा फोन
42. मोट ओढतो, शेतात राबतो
घाणा चालवितो, गोठ्यात राहतो
वर्षभर काम करतॊ
पॊळ्याला हक्काचा आराम करतॊ
ओळखा कोण ?
उत्तर: => बैल
43. हिरवी, काळी फळं कशी
एकावर एक ठेवली रचून
आंबट आहे असं म्हणून
कोल्हा गेला लांबून निघून
वेलीवरील नक्षीदार पान
नासिकची ’प्रसिध्द’ असा मान !
ओळखा कोण ?
उत्तर: => द्राक्ष
44. मधुर रसाचं,उष्ण प्रकृतीचं
’अ’ जीवनसत्वानं भरपूर
रोज खाल्लं तर नेत्ररोग ठेवतो दूर
ससोबाला भारी याचं खूळ
जमिनीच्या खाली येतं हे कंदमुळं
ओळखा कोण ?
उत्तर: => गाजर
45. बकरीसारखे केस,गायीसारखं डोकं
घोड्यासारखं शेपूट,अस्वलासारखा आवाज
हजार किलो वजनाचा,शाकाहारी प्राणी
थंड प्रदेशातील गाय,असं म्हणतात कुणी
ओळखा कोण ?
उत्तर: => याक
46. झाडाझाडांवरुन फिरतो
सरसर नाहिसा होतो
नानाविध रंग बदलतो
किडे खाऊन पोट भरतो
जीभ याची लांब असते
कुंपणापर्यंतच धाव असते
ओळखा कोण ?
उत्तर: => सरडा
47. डोळे असून आंधळा
उत्तर: => बटाटा
48. कधी गोलमगोल
तर कधी लंबगोल
कधी कच्चा, कधी भाजी
कधी सॉस, तर कधी कोशिंबिरीत
रंग माझा लाल, आवडीने सगळे खाल
प्यायलेत माझे सूप तर होईल सुंदर रूप !
उत्तर: => टोमॅटो
49. पिवळसर चॉकलेटी रंग
मी आहे एक अद्भुत कडधान्य
अन्नधान्यात पूरक मी
तेलही माझे उपयोगी
रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतो
आरोग्य चांगले राखायला मदत करतो
उत्तर: => सोयाबिन
50. चक्र माझे भरभर चालते
मी एक यंत्र साधे सोप्पे
कुटिर उद्योगास उपयोगी
कापसातून धागे बनवितो
गांधीजींनी केला माझा प्रसार
देशाभिमानी खादी मीच विणतो.
उत्तर: => चरखा
51. मी एक पाहुणा काही दिवसांचा
कधी आशेचा, कधी निराशेचा
नेमाने माझे रूप बदलतो
जाताना नवीन आशा देऊन जातो
तुम्ही मला आनंदाने निरोप देता
दुसऱ्या पाहुण्याचे स्वागतही
तेवढय़ाच जोशात करतात!
उत्तर: => नवीन वर्ष
52. वाराणसीच्या जोडीने ज्या तीर्थक्षेत्राचे नाव घेतले जाते असे हे गंगा व यमुनेच्या संगमाचे स्थान उत्तर प्रदेशात आहे. येथे गंगेला मिळणारा यमुनेचा प्रवाह गंगेच्या प्रवाहापेक्षा खूपच मोठा आहे. या तीर्थक्षेत्राचे नाव सांगा.
उत्तर: => अलाहाबाद
53. इटुकली, पिटुकली आहे ही धीटुकली
हिरवी असो वा लाल, सगळय़ांना प्रिय फार
बघताच येते तोंडाला पाणी, आंबट-गोड हिची कहाणी
ओळखा कोण?
उत्तर: => ‘चिंच!
54. कितीही फिरवलं तरी थकत नाही,
खिळ्याच्या आरीवर पिंगा घालत राही
दोरीचा विळखा, सुंदर आकार
तळहातावर घेताच, गुदगुल्या होतात फार
ओळखा कोण?
उत्तर: => भोवरा
55. नका जोडू मला इंजीन
लागत नाही मला इंधन पाय मारा भराभर
धावते मी सरसर…. ओळखा पाहू मी कोण?
उत्तर: => सायकल
56. खडक फोडला चांदी चमकली चांदीच्या विहिरीत मिळते पाणी आम्ही म्हणतो हीच देवाजीची करणी
उत्तर: => नारळ
57. हवेत सोडीत काळ्या रेघा
गावोगावी जाते राणी
लोखंडाचा रस्ता हिचा
सांगा हिला ओळखेल कोण ?
उत्तर: => आगगाडी
58. झाडावर राहतो पण पक्षी नव्हे,
तीन डोळे पण शंकर नव्हे,
वल्कलेधारी पण ऋषिमुनी नव्हे,
पोटात पाणी पण घट नव्हे.
उत्तर: => नारळ
59. पाण्यामध्ये पोहू शकतो,
जमिनीवर उड्या मारतो,
कीटक,गांडूळ याचे भक्ष्य,
चिकट जीभेने करतो फस्त
असा कोण सांगा सांगा !
उत्तर: => बेडूक
मित्रांनो मला आशा आहे ओळखा पाहू कोडी मराठी (Marathi Kodi) हा आमचा लेख वाचून तुमच्या ज्ञानात भर पडली असेल. तुमच्या कडे सुद्धा याचप्रकरच्या Who I am Puzzles in Marathi असतील तर कंमेंट मध्ये शेअर करा. आम्ही तुम्ही दिलेली Marathi Kodi आमच्या वेबसाइट द्वारे सर्व मराठी लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू. सोबत तुम्ही दिलेली मराठी कोड्यासोबत तुमचे नाव देखील नमूद केले जाईल.
या लेखात दिलेल्या 50+ मराठी कोडी तुम्हाला आवडले असतील तर Facebook व Whstsapp द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तुम्हाला सुद्धा कोणी असाच कोड दिले असेल आणि त्याच उत्तर तुम्हाला सापडत नसेल तर कंमेंट मध्ये सांगा, आम्ही तुम्हाला तुमचे कोडे सोडवायला मदत करू.
Nice puzzle
Nice
उंच बाप झिपरी आई तीन टकली पोर कोड्याचे उत्तर
Coconut
अशी कोणती गोष्ट आहे जी जन्म होताच बिना पाय उडु शकते
Snoflake – बर्फाचा पातळ तुकडा
ऊन बघता मी येतो सावली पाहता मी लाजतो वाऱ्याचे स्पर्श होताच मी नाहीसा होतो. सांगा मी कोण
उत्तर: => घाम
बघु कोन मराठी मधी हुशार
आहे गळ्यातील टायला मराठी मधी काय म्हनतात?