Information about Amravati district in Marathi | अमरावती जिल्ह्याची माहिती
- अमरावती जिल्ह्याचे मुख्य ठिकाण: अमरावती
- अमरावतीचे क्षेत्रफळ : 12,210 चौ.कि.मी.
- अमरावतीचे लोकसंख्या : 28,87,826 (सन 20११ च्या जनगणनेनुसार)
- अमरावती जिल्ह्यातील तालुके : एकूण तालुके 14 – वरुड, तिवसा, चांदूर रेल्वे, अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, अमरावती, चांदुरबाजार, भातकुली, अंजनगांव (सुर्जी), नांदगांव (खं.), चिखलदरा, धारणी, धामनगांव रेल्वे.
- अमरावती सीमेलगतची राज्ये व जिल्हे – अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, दक्षिणेस यवतमाळ जिल्हा असून पूर्वेस नागपूर व वर्धा हे दोन जिल्हे आहेत. पश्चिम व नैऋत्येस अकोला जिल्हा आहे.
अमरावती जिल्हा विशेष –
- अमरावती येथे पूर्वी उंबराची झाडे मोठ्या प्रमाणात होती. उंबराच्या या झाडांवरून उंदुबरावती असे झाले व कालांतराने उमरावतीचे अमरावती असा अपभ्रंश होत जावून आजचे अमरावती हे नाव उदयास आले.
- अमरावती जिल्हयातल कौंडन्यपूर हे गाव रुख्मिणीचे माहेर म्हणून प्रसिद्ध. डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांची कर्मभूमी. डॉ. पंजाबराव देशमुख, विर वामनराव जोशी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे बाबा अशा थोर पुरुषांची जन्मभूमी.
- अमरावती विधापिठाचे नामकरण ‘संत गाडगे बाबा अमरावती विधापीठ’ असे करण्यात आले.
अमरावती जिल्हयातील प्रमुख स्थळे | Places to visit in Amravati in Marathi
- अमरावती – येथील संत गाडगे महाराजांनी समाधी व अंबादेवी मंदीर प्रसिद्ध आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मुख्यालय येथे आहे.
- चिखलदरा – थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले हे स्थळ विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.
- परतवाडा – इमारती लाकडाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.
- रिद्धपूर – येथे गोविंद्प्रभुंची समाधी आहे. महानुभावांची काशी म्हणून प्रसिद्ध.
- शेडगाव – संत गाडगे महाराजांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे.
- मोझरी – संत तुकडोजी महाराजांनी स्थापना केलेला गुरुकुंज आश्रम येथे आहे. महाराजांची समाधी येथेच आहे.
- ऋणमोचन – येथील मुदगलेश्वराचे मंदीर प्रसिद्ध आहे.
- बडनेरा – विड्याच्या पानासाठी बडनेरा परिसर प्रसिद्ध आहे.
- कौंडिण्यपुर – विदर्भाची पौराणिक राजधानी कुंडीनपूर या नावाने महाभारतात प्रसिद्ध असलेले आता कौंडिण्यपुर म्हणून ओळखले जाते. प्राचीन अवशेषांकरिता विशेष प्रसिद्ध आहे.
- सालबर्डी – हे गाव मोर्शी तालुक्यात असून मारू नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाजवळच 2 बौद्ध व 5 हिंदू लेणी आहेत. शिवाय नुकत्याच काळात पाशुपत पंथाच्या 2 लेण्यांचा शोध लागलाय. तसेच लंकेश्वर व पंचवतार मंदिरे, डोंगरावरील शिव मंदीर प्रसिद्ध आहे.