Maharashtra Information in Marathi | महाराष्ट्र सामान्य ज्ञान

Information about Maharashtra State in Marathi | महाराष्ट्र राज्याची माहिती

महाराष्ट्रात एकूण खालीलप्रमाणे सात प्रादेशिक विभाग आहेत.

१. कोंकण

२. देश

३. मावळ

४. विदर्भ

५. घाटमाथा

६. खानदेश

७. मराठवाडा

महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी ८०० किमी आहे तर दक्षिण पूर्ण लांबी ७२० किमी इतकी आहे.

महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा 

१. पश्चिम – अरबी समुद्र

२. वायव्य – सातमाळा डोंगर, गाळणा टेकडया, दरेकसा टेकड्या

३. ईशान्य – दरेकसा टेकड्या

४. पूर्व – भामरागड डोंगर, चिरोली टेकड्या, गायखुरी डोंगर

५. दक्षिण – हिरण्यकेशी नदी , तरेखोल नदी

६. उत्तर – सातपुडा डोंगर, विलगड टेकड्या

महाराष्ट्राचे प्राकृतिक तीन विभाग

१. कोंकण

२. सह्याद्री किंवा पश्चिम घाट

३. पठारी किंवा दक्खनी प्रदेश

कोंकण 

 • कोंकण किनारपट्टीची दक्षिण उत्तर लांबी ७२० किमी आहे. उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत विस्तार आहे.
 • कोकण विभागाची रुंदी सर्वत्र सारखी नाही आहे. सरासरी रुंदी ३० ते ६० किमी इतकी आहे.
 • कोंकण हा सलग मैदान नसून हा डोगरदऱ्यांनी व्यापलेला परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे.
 • कोकणाचे दक्षिण कोकण आणि पश्चिम कोकण असे दोन भाग पडतात
 • दक्षिण कोकणात रत्नागिरी व सिंधूदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. तर उर्वरित जिल्ह्यांचा उत्तर कोकणात समावेश होतो.
 • उत्तर कोकण हे कमी खडकाळ व डोंगराळ नसून त्यात लोकसंख्या, शहरे व नागरीकरण जास्त प्रमाणात आहे.
 • तर दक्षिण कोकण जास्त खडकाळ व डोंगराळ असून त्यात शहरे आणि लोकसंख्या कमी आहे.
 • पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागाला ‘खलाटी’ असे म्हणतात. खालाटीच्या पूर्वेस जो डोंगराळ भाग आहे त्याला ‘वलाटी’ असे म्हणतात.
 • कोकणाची किनारपट्टी रिया प्रकारची आहे. किनाऱ्यावर खडकात मालवण व हरणे दरम्यात गुहा आढळतात.

कोकणातील सागरी किल्ले 

१. सिंधुदुर्ग

२. वसईचा राजा

३. जंजिरा

४. सुवर्णदुर्ग

५. विजयदुर्ग

कोकणातील बेटे

१. मुंबई

२. साष्टी

३. खांदेरी  वास उंदेरी

४. घारापुरी व अंजदीव

कोकण किनारपट्टीवर मुंबई हे महत्वाचे व आंतरराष्ट्रीय बंदर आहे. मुंबई हे नैसर्गिक बंदर आहे.

मुंबई बंदराचा टॅन कमी करण्यासाठी मुंबई जवळच न्हावा शेवा हे बंदर उभारलेले आहे . (JNPT – Jawaharlal Nehru Port Trust)

 • महाराष्ट्रात एकूण ४९ बंदरे आहेत.

सह्याद्री 

 • भारताच्या पश्चिम किनारपट्टीस सह्याद्री पर्वत सामंतर आहे.
 • सह्याद्री दक्खनची पश्चिम सीमा निश्चित करतो
 • सह्याद्री पर्वत उत्तरेस सातमाळा डोगरापासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत पसरलेला आहे.
 • सह्याद्री पर्वताची एकूण लांबी १६०० किमी असून महाराष्ट्रामध्ये त्याची एकूण लांबी ४४० कमी आहे.
 • सरासरी उंची ९१५ ते १२२० किमी आहे.
 • महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची उत्तरेस वाढत जाते तर दक्षिणेस कमी होत जाते.
 • पश्चिमेकडे सह्याद्रीचा उत्तर तीव्र होत जातो.
 • सह्याद्री पर्वत रांगामुळे पश्चिमवाहिनी व पूर्ववाहिनी नद्यांचे जाल्विभाजक वेगळे झाले आहेत. त्यामुळे सह्याद्रीला महाराष्ट्रातील प्रमुख जाल्विभाजक म्हणतात.
 • सह्याद्री पर्वताच्या व त्याच्या शिखरावर उंच व सपाट प्रदेशाला घाटमाथा म्हणतात. उदा. महाबळेश्वर, माथेरान
 • पठाराचा उत्तर सर्वसाधारण आग्नेय वायव्य दिशेला आहे.
 • संभू महादेव डोंगर भागात सासवड पठार आहे.
 • मराठवाड्यात मांजर पठार आहे.
 • सातमाळा अजिंठा डोंगर भागात बुलढाणा व मालेगाव पठार आहे.

सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगा 

१. शंभू महादेव डोंगर रांगा

२. हरिचंद्र बालाघाट डोंगर रांगा

३. सातमाळा अजिंठा डोंगर रांगा

दख्खन भाग 

 • दख्खन भाग हा मुख्यतः नद्यांच्या खोऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
 • दख्खन पठाराची पश्चिम पूर्व लांबी ७५० किमी तर उत्तर दक्षिण लांबी ७०० किमी आहे.

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.