Information about Amravati district in Marathi | अमरावती जिल्ह्याची माहिती

Information about Amravati district in Marathi | अमरावती जिल्ह्याची माहिती

 • अमरावती जिल्ह्याचे मुख्य ठिकाण: अमरावती
 • अमरावतीचे क्षेत्रफळ : 12,210 चौ.कि.मी.
 • अमरावतीचे लोकसंख्या : 28,87,826 (सन 20११ च्या जनगणनेनुसार)
 • अमरावती जिल्ह्यातील तालुके : एकूण तालुके 14 – वरुड, तिवसा, चांदूर रेल्वे, अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, अमरावती, चांदुरबाजार, भातकुली, अंजनगांव (सुर्जी), नांदगांव (खं.), चिखलदरा, धारणी,  धामनगांव रेल्वे.
 • अमरावती सीमेलगतची राज्ये व जिल्हे – अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, दक्षिणेस यवतमाळ जिल्हा असून पूर्वेस नागपूर व वर्धा हे दोन जिल्हे आहेत. पश्चिम व नैऋत्येस अकोला जिल्हा आहे.
अमरावती जिल्हा विशेष –
 • अमरावती येथे पूर्वी उंबराची झाडे मोठ्या प्रमाणात होती. उंबराच्या या झाडांवरून उंदुबरावती असे झाले व कालांतराने उमरावतीचे अमरावती असा अपभ्रंश होत जावून आजचे अमरावती हे नाव उदयास आले.
 • अमरावती जिल्हयातल कौंडन्यपूर हे गाव रुख्मिणीचे माहेर म्हणून प्रसिद्ध. डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांची कर्मभूमी. डॉ. पंजाबराव देशमुख, विर वामनराव जोशी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे बाबा अशा थोर पुरुषांची जन्मभूमी.
 • अमरावती विधापिठाचे नामकरण ‘संत गाडगे बाबा अमरावती विधापीठ’ असे करण्यात आले.

अमरावती जिल्हयातील प्रमुख स्थळे | Places to visit in Amravati in Marathi

 • अमरावती – येथील संत गाडगे महाराजांनी समाधी व अंबादेवी मंदीर प्रसिद्ध आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मुख्यालय येथे आहे.
 • चिखलदरा – थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले हे स्थळ विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.
 • परतवाडा  – इमारती लाकडाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.
 • रिद्धपूर – येथे गोविंद्प्रभुंची समाधी आहे. महानुभावांची काशी म्हणून प्रसिद्ध.
 • शेडगाव – संत गाडगे महाराजांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे.
 • मोझरी – संत तुकडोजी महाराजांनी स्थापना केलेला गुरुकुंज आश्रम येथे आहे. महाराजांची समाधी येथेच आहे.
 • ऋणमोचन – येथील मुदगलेश्वराचे मंदीर प्रसिद्ध आहे.
 • बडनेरा – विड्याच्या पानासाठी बडनेरा परिसर प्रसिद्ध आहे.
 • कौंडिण्यपुर – विदर्भाची पौराणिक राजधानी कुंडीनपूर या नावाने महाभारतात प्रसिद्ध असलेले आता कौंडिण्यपुर म्हणून ओळखले जाते. प्राचीन अवशेषांकरिता विशेष प्रसिद्ध आहे.
 • सालबर्डी – हे गाव मोर्शी तालुक्यात असून मारू नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाजवळच 2 बौद्ध व 5 हिंदू लेणी आहेत. शिवाय नुकत्याच काळात पाशुपत पंथाच्या 2 लेण्यांचा शोध लागलाय. तसेच लंकेश्वर व पंचवतार मंदिरे, डोंगरावरील शिव मंदीर प्रसिद्ध आहे.

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.