1. पहिल्या पंचवार्षिक योजनेत —— ला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले.
- व्यापार
- शेती
- औद्योगिकरण
- गुंतवणूक
उत्तर : शेती
2. धवलक्रांति —– शी संबंधित आहे.
- शेती व्यवसाय
- मत्स्य व्यवसाय
- दुग्ध व्यवसाय
- कुकुटपालन व्यवसाय
उत्तर : दुग्ध व्यवसाय
3. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो?
- महाबळेश्वर
- पंचगणी
- लोणावळा
- आंबोली
उत्तर : आंबोली
4. ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?
- तहसीलदार
- उपजिल्हाधिकारी
- जिल्हाधिकारी
- महसूल आयुक्त
उत्तर : महसूल आयुक्त
5. सप्टेंबर 2011 मध्ये रशियात झालेल्या बुद्धिबळ वर्ल्डकप स्पर्धेच विजेता कोण?
- पीटर सविड्लर
- अलेक्झांडर ग्रीशुक
- व्हॅसिली इव्हानचूक
- विश्वनाथ आनंद
उत्तर : पीटर सविड्लर
6. मुअम्मर गद्दाफी हा कोणत्या देशाचा हुकूमशहा होता?
- सौदी अरेबिया
- अफगाणिस्तान
- लिबिया
- इराक
उत्तर : लिबिया
7. केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने ठरविल्यानुसार —— वर्गापर्यंतच्या मुलांना ‘मोफत व सक्तीचे शिक्षण’ देण्यात येणार आहे.
- दहावी
- आठवी
- बारावी
- स्नातकीय
उत्तर : दहावी
8. 2011 मधील अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला?
- गगन नारंग
- रामपाल
- राजेंद्र सिंह
- जहीरखान
उत्तर : जहीरखान
9. खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?
- ब्रिटन
- रशिया
- भारत
- दक्षिण आफ्रिका
उत्तर : ब्रिटन
10. मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून —— हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.
- हल्दिया
- न्हावा-शेवा
- कांडला
- मार्मागोवा
उत्तर : न्हावा-शेवा
11. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय —– येथे आहे.
- जिनिव्हा
- पॅरिस
- न्यूयॉर्क
- रोम
उत्तर : जिनिव्हा
12. —— येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.
- महाड
- औरंगाबाद
- नाशिक
- मुंबई
उत्तर : नाशिक
13. भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) —– तासांनी पुढे आहे.
- अडीच
- तीन
- साडे चार
- साडे पाच
उत्तर : साडे पाच
14. —— यांना महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर’ म्हणतात.
- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
- लोकहितवादी
- महात्मा फुले
- न्या. महादेव गोविंद रानडे
उत्तर : महात्मा फुले
15. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?
- द्राक्ष
- मका
- उस
- डिझेल
उत्तर : उस
16. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
- नीळ
- भात फक्त
- गहू फक्त
- भात व गहू
उत्तर : भात व गहू
17. ‘श्रीपती शेषाद्री प्रकरण’ ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.
- जगन्नाथ शंकर सेठ
- बाळशास्त्री जांभेकर
- भाऊ दाजी लाड
- छत्रपती शाहू महाराज
उत्तर : बाळशास्त्री जांभेकर
18. पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?
- अमेरिका आणि मेक्सिको
- अमेरिका आणि कॅनडा
- ब्राझिल आणि अर्जेटीना
- ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
उत्तर : अमेरिका आणि कॅनडा
19. खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?
- ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे
- अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात
- या विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.
- वरील कोणतीही नाही
उत्तर : वरील कोणतीही नाही
20. —–% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.
- 79
- 59
- 49
- 39
उत्तर : 49