[60+] Marathi Kode | नवीन मराठी कोडी । New puzzles in Marathi 2024
Marathi Kodi: मित्र आणि मैत्रिणींनो खेळण्यासोबत मेंदूचा व्यायाम करणे देखील लहान मुलांसाठी खूप महत्वाचे आहे. या मुले लहान पणापासूनच मुलांची विचार करण्याची क्षमता वाढते व त्यांचा मानसिक विकास व्हायला मदत होते. आणि या सगळ्यांसाठी Marathi Kodi तुमच्या मुलांना नक्कीच मदत करतील. हे Marathi puzzles मेंदूच्या विकासासाठी खूप महत्वाचे आहे.
त्यामुळे जर का तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलाला हुशार आणि स्मार्ट बनवायचे असेल तर आजपासून च त्यांना दररोज एक नवीन कोडे घालत जा. सकाळी उठल्यावर तुमच्या मुलाला किंव्हा तुमच्या मुलीला एक कोडे लिहून द्या किंव्हा तोंडी सांगा आणि त्यांना सांगा कि संध्याकाळ पर्यंत या कोड्याचे उत्तर तू शोधून काढ. असे नित्यनियमाने केले तर तुमच्या मुलाच्या brain development खूप फायदा होईल. तर चला मग सुरवात करूया Marathi Kodi च्या या लेखाला.
Marathi kodi 2024
1. माझे शरीर आहे गोल-गोल,
प्रत्येक स्त्रीचे रूप मी अजून निखारते
मी बनले आहे काचेची,
प्रत्येक रंगात मी भेटते.
सांगा पाहू मी कोण?
=> बांगड्या
2. मी कधीच प्रश्न विचारत नाही परंतु नेहमी उत्तर देते. सांगा पाहू मी कोण?
=> दारावरची बेल
3. माझ्या डोक्यावर चाकू चा घाव घालून तुम्ही मला मारता आणि मी मेलेले असताना तुमची बाजूला रडता सांगा पाहू मी कोण?
=> कांदा
4. मी छिद्रांनी भरलेला आहे, परंतु तरीही भरपूर पाणी मी स्वतःमध्ये ठेऊ शकतो. सांगा बघू मी कोण?
=> एक स्पंज
5. मला चार बोटे आणि आहे एक अंगठा, परंतु तरीही मी जिवंत नाही?
=> हातमोजे
6. काय आहे जे पंखांशिवाय सुद्धा उडत जाते?
=> वेळ
7. रिंग आहे, परंतु बोट नाही ओळखा पाहू मी कोण?
=> फोन
8. चार पाय आहेत, परंतु चालू शकत नाही ओळख पाहू मी कोण?
=> एक टेबल
9. मी हवेपेक्षा हलका आहे परंतु दहा लाख माणसे मला वर उचलू शकत नाहीत, ओळखा पाहू मी कोण?
=> बुडबुडा/bubble
10. लोखंडाला सुद्धा मी खेचू शकतो,
पण रबरासमोर मी हरतो,
ओळखा पाहू मी कोण?
=> चुंबक
Also Read: Hindi Riddles with Answers
Best Marathi Riddles
11. जगभर मी फिरतो,
पण जमिनीवर ठेवत नाही पाय,
दिवसभर मी झोपतो आणि रात्री मी जागा राहतो,
रात्र आहे काळोखी माझ्या शिवाय
ओळखा पाहू मी कोण?
=> चन्द्र
12. खरेदी करताना काळा, जाळल्यावर लाल,
फेकल्यावर सफेद
ओळखा पाहू मी कोण?
=> कोळसा
13. रंग आहे माझा काळा,
उजेडात मी दिसते,
अंधारात मी लपते
ओळखा पाहू मी कोण?
=> सावली
14. अशा एका गोष्टीच नाव सांग जी आपल्या आजूबाजूला असते पण दिसत नाही?
=> हवा
15. अशी कोणती गोष्ट आहे जी बोलल्यानंतर तुटून जाते?
=> शांतता
16. तीन हात व पोट आहे गोल,
गर्मीमध्ये होतो माझा उपयोग
ओळखा पाहू मी कोण?
=> पंखा
17. वीस जणांचा शिरच्छेद केला,
न मारला न केला खून
सांगा पाहू या कोड्याचे उत्तर?
=> नेल कटर
18. भांड्यावर भांडी,
मुलगा बापापेक्षा गोरा,
=> नारळ
19. नाक माझा मोठा
नाकाने करतो सगळे काम,
सांगा पाहू माझं नाव?
=> हत्ती
20. कोंबडी देते अंडी, गाय देते दूध,
पण असा कोण आहे जो दूध आणि अंडी दोन्ही देतो?
=> दुकानदार
Marathi Puzzles
21. असे काय आहे जे ज्याचं आहे तोच बघू शकतो?
=> स्वप्न
22. असा कोणता दुकानदार आहे जो माल घेतो पण आणि त्याचे पैसे पण घेतो?
=> न्हावी
23. पाण्यातून होतो माझा जन्म आणि पाण्यातच जातो मी मरून,
जेवणाशी आहे माझं जवळच नातं. ओळखा पाहू मी कोण ?
=> मीठ
24. असा कोणता कोट आहे जो आपण खाऊ शकत नाही?
=> पठाणकोट
25. अशी कोणती गोष्ट आहे जी कितीही चालली, तरी दमत नाही?
=> जीभ
26. अशी कोणती जागा आहे जिथे
१०० लोक जातात आणि येताना १०१ बाहेर येतात?
=> वरात
27. कल्पना करा कि तुम्ही एका गडद खोलीमध्ये आहात,
आणि तुम्हाला त्या गडद खोलीमधून बाहेर पडायचं असेल तर
तुम्ही काय कराल?
=> कल्पना करायचं बंद करा
28. असा कोणता शहर आहे ज्याला, आपण नेहमी खाऊन टाकतो?
=> पुरी
29. फक्त सकाळीच मी येतो,
जगभरातील बातम्या सांगतो,
माझ्याशिवाय प्रत्येकजण होतो दुःखि
सांगा पाहू मी कोण?
=> वर्तमानपत्र
३०. अस काय आहे जे तुमचे बोलून झाल्यावर वेगळे होऊन जातात?
⇒ उत्तर: तुमचे ओठ
31. 6 फूट लांब, 5 फूट रुंद, 4 फूट खोल, रिकाम्या खड्ड्यात किती माती असेल?
=> काहीही नाही, कारण खड्डा रिकामा आहे.
32. असे कुठले दान आहे जे श्रीमंत आणि गरीब दोघे पण करतात?
=> मतदान किव्हा कन्यादान
33. असा कोणता प्राणी आहे जो बिना पाण्याचा खूप दिवस राहू शकतो?
=>उंट (Camel)
34. असा कोणता जीव आहे जो बिना पायांचा देखील जोराने धावू शकतो?
=> साप(Snake)
35. असा कोणता जीव आहे जो ३ वर्षा पर्यंत झोपून राहतो?
=> गोगलगाय(Snails)
मजेदार कोडे व उत्तर
36. असा कोणता जीव आहे जो कोणत्याही गोष्टीची चव हि जिभेने नाही तर पायाने घेतो?
=> फुलपाखरू
37. अशी कोणती गोष्ट आहे जी चालता चालता थकल्यावर त्याची मान कापली जाते आणि मग परत चालायला लागते?
=> पेन्सिल
38. असा कोणता ड्राइवर आहे ज्याला लायसेन्स ची गरज नसते?
=> Screwdriver
39. अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्या कडे पंख नाहीत तरी सुद्धा उडते?
=> पतंग
40. अशी कोणती गोष्ट आहे जी रात्रीत असते पण दिवसा नसते, एखाद्या दिव्याच्या खाली असते पण वर नसते?
=> काळोख
41. असे काय आहे जे मे महिन्यात आहे पण डिसेंबर मध्ये नाही आगी मध्ये आहे पण [पाण्यात नाही?
=> गरमी
42. अशी कोणती गोष्ट आहे जी फाटल्यावर कोणीच शिवू शकत नाही?
=> फुगा
43. अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला आयुष्यात दोन वेळा भेटते पण तिसऱ्या वेळी त्या गोष्टी साठी आपल्याला पैसे द्यावे लागतात?
=> दात
44. असा कोणता ड्रेस आहे जो आपण घालू शकत नाही?
=> ऍड्रेस / Address
45. एक माणूस बाथरूम मध्ये गेला. बाथरूम मध्ये गेल्यावर त्या माणसाने स्वतःच्या डोळ्यांच्या मधोमध गोळी मारली, पण तरी सुद्धा तो माणूस जिवंत राहतो! सांगा बरे कसे?
=> कारण गोळी त्याने आरशावर मारली होती.
46. शिंग आहेत पण बकरी नाही,
ब्रेक आहेत पण कार नाही,
घंटी आहे पण दरवाजा नाही,
सांगा पाहू मी कोण?
=> सायकल
47. काळा रंग माझी शान आहे
सगळ्यांना मी देतो ज्ञान
सांगा पाहू मी कोण?
=> शाळेतील फळा(ब्लॅकबोर्ड)
48. एक हत्ती पाण्यामध्ये पडला तर सांगा पाहू तो बाहेर कसा निघेल?
=> ओला होऊन
49. असा कोणता व्यक्ती आहे जो १०० लोकांना मारून देखील त्याला कोणी काही करत नाही?
=> जल्लाद
50. अशी कोणती गोष्ट आहे जी दिवस रात्र चालत राहते?
=> नदी
Marathi Kode With Answers
51. अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षा मध्ये एकदाच येते तर रविवारात २ वेळा येते?
=> ‘व’ अक्षर
52. अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या हातात तर आहे पण आपल्या नियंत्रणा मध्ये नाही आहे?
=> हातावरच्या रेषा
53. अशी कोणती गोष्ट आहे जी पाण्यापासून बनली आहे पण त्या गोष्टीला सूर्य सुद्धा सुकवू नाही शकत?
=> घाम
54. English मध्ये ‘E’ नंतर कोणते अक्षर येते?
=> N
55. ते कोण आहेत जे कितीही म्हातारे झाले तरी जवान च राहतात?
=> देशाचे सैनिक – जे कितीही म्हातारे झाले तरी आपण त्यांना जवान च बोलतो.
56. एक घर आहे जे पूर्ण लाकडाचे बनलेले आहे, त्या घरातील सगळा सामान लाकडाचे आहे. त्या घरात एका टेबलवर एक कोंबडी बसलेली आहे, तर मला सांगा जर कोंबडीने अंड दिले तर ते टेबलावर पडेल कि जमिनीवर?
=> लाकडाची कोंबडी अंड कसे देणार कारण घरातील सगळंच सामान लाकडाचे आहे
57. एका पिपळाच्या झाडाखाली तीन माणसे बसलेली असतात,
एक माणूस आंधळा आहे,
दुसरा माणूस बहिरा आहे,
आणि तिसरा माणूस मुका आहे,
जर झाडावरून आंबा पडला तर तो या तिघांपैकी कोणाच्या अंगावर पडेल?
=> पिपळाच्या झाडाला कधीपासून आंबे लागायला लागले?
58. लाल, काळे, हिरवे,
आंबट आणि गोड, खायला सगळ्यांच आवडतात
कोणी सांगू शकतो का या फळाचे नाव?
=> द्राक्ष
59. असा कोणता टेबल आहे ज्याला पाय नसतात?
=> टाइम टेबल
60. एका डॉक्टरने तुम्हाला तीन गोळ्या दिल्या आणि सांगितले कि अर्ध्या तासाच्या अंतराने खा तर तीन गोळ्या खायला तुम्हाला किती वेळ लागेल?
=> १ तास, पहिली गोळी लगेच खा, दुसरी अर्ध्या तासाने तर तिसरी १ तासानंतर
61. एक टेबलावर, प्लेट मध्ये २ सफरचंद आहेत, आणि ते तीन जणांमध्ये वाटायचे असेल तर कसे वाटल?
=> प्रत्येकाला १-१ सफरचंद भेटेल, प्रश्न परत वाचा, तिथे तीन सफरचंद नमूद केलेलं आहे, १ टेबलवर आणि २ प्लेट मध्ये.
काही मराठी चित्रपटांची नावे ओळखा पाहू
🔩 🎨 | नटरंग |
7 आत 🏠 | सातच्या आत घरात |
💉 🌅 🍋 te | Dr. प्रकाश आमटे |
⌚ पास | टाइमपास |
🌍 दारी | दुनियादारी |
➖➖➖👦 | बिनकामाचा नवरा |
👆डाव 💀 | एक धाव भूताचा |
♦ 👑 | चौकट राजा |
💣💥 | धूम धडाका |
💘 👦👧 📖 | प्यार वाली लव्ह स्टोरी |
👃💨 | नाकाबंदी |
६२. अशी कोणती गोष्ट आहे जी पहिली लाल असते आणि पाणी पिल्यानंतर काळी होऊन जाते?
=> आग
६३. एक सेल्समन बोलला ₹100 मध्ये पूर्ण तुमची फॅमिली आयुष्यभर बसून खाऊ शकते तर सांगा बघू तो सेल्समॅन काय विकत असेल?
=> चटई
६४. एका आशा धनुष्याचे नाव सांगा जे लढाई करण्यासाठी उपयोगात येत नाही तरीसुद्धा लोक खूप पसंत करतात?
=> इंद्रधनुष्य
६५. 18 चिमण्या 18 घरटे 18 दिवसात बनवते तर सांगा बघू एक चिमणी एक घरटा बनवायला किती वेळ घेईल?
=> 18
६६. एका माणसाला सहा बोटे होती परंतु सर्वजण त्याला अकबर म्हणून मारत होते सांगा बघू असे का?
=> कारण त्या माणसाचे नावच अकबर होते
६७. ए आणि बी मध्ये काय फरक आहे?
=> ए एक स्वर आहे तर बी एक व्यंजन आहे.
६८. २ माणसं २ आंबे जर दोन मिनिटांमध्ये खात असतील सांगा 20 माणसे २० आंबे किती मिनिटांमध्ये खाऊ शकतात?
=> दोन मिनिट
६९. अशी कोणती गोष्ट आहे जी फ्रिजमध्ये ठेवल्यावर सुद्धा गरमच राहते?
=> गरम मसाला
तर मित्र आणि मैत्रणींनो Marathi Kodi या लेखात दिलेली मराठी कोडी तुम्हाला कशी वाटली कंमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला एखादा कोड्यामध्ये काही शंका असेल किंव्हा तुम्हाला एखाद्या कोड्याचे उत्तर माहिती करून घायचे असेल तर खाली कॉमेम्टन मध्ये नक्की नमूद करा.
हे देखील वाचा
Paz
Uattr plz
दोन भाऊ शेजारी भेट नाही संसारी
डोळा
असा कोणता दुकानदार आहे की जो आपल्याकडून मल पण घेतो आणि पैसे पण घेतो ?
न्हावी
Nagesh
Vnm