Indian Geography GK in Marathi | Bhugol General Knowledge in Marathi
Indian Geography GK in Marathi: नमस्कार मित्रांनो, भारताच्या भूगोलावर प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात, मग ती पोलीस भरती असो कि आरोग्य विभाग भरती. त्यामुळे या विषयासंबंधी तयारी हि केलीच पाहिजे. आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत 300+ अतिशय महत्वाचे Indian Geography GK Questions in Marathi.
Indian Geography GK in Marathi
Q1. झास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगेचे स्थान…………….हिमालयात आहे?
A. पूर्व
B. मध्य
C. कुमाउ
D. काश्मीर
उत्तर: D
Q2. बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे?
A. पंजाब व हरियाणा
B. महाराष्ट्र व गोवा
C. आंध्रप्रदेश व तामिळनाडू
D. केरळ व कर्नाटक
उत्तर: C
Q3. दिलेल्या पर्यायांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेले स्थान कोणते आहे?
A. ठाणे
B. मुंबई उपनगर
C. मुंबई शहर
D. पुणे
उत्तर: C, मुंबई शहराची लोकसंख्या २ कोटी च्या आस पास आहे.
Q4. डोंगराळ प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वस्त्या आढळतात?
A. केंद्रीय
B. विखुरलेल्या
C. त्रिकोणी
D. चौकोनी
उत्तर: B
Q5. चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरूत्वाकर्षणाच्या ______________ पट आहे?
A. 1/4
B. 1/2
C. 1/6
D. 1/12
उत्तर: C
Q6. ______ हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे?
A. शुक्र
B. बुध
C. मंगळ
D. सूर्य
उत्तर: A
Q7. मँगेनीज उत्पादनात भारताचा जगात _______क्रमांक लागतो?
A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. सहावा
उत्तर: D
Exp. 1 दक्षिण आफ्रिका 62,00,000 tons
2 ऑस्ट्रेलिया 30,00,000 tons
3 चीन 29,00,000 tons
4 गॅबॉन 18,00,000 tons
5 ब्राझील 10,00,000 tons
6 भारत 9,50,000 tons
Q8. _____________हे शहर भारतातील ‘मँचेस्टर’ होय?
A. दिल्ली
B. कोलकाता
C. बेंगळुरू
D. अहमदाबाद
उत्तर: D
Q9. भारताच्या मध्यातुन कोणती रेखा जाते?
A. यापैकी नाही
B. विषतवृत रेखा
C. मकर रेखा
D. कर्क रेखा
उत्तर: D
Q10. भारताचा उत्तरेपासून दक्षिणे पर्यन्त किती विस्तार आहे?
A. 3124 किमी
B. 3214 किमी
C. 3412 किमी
D. 3241 किमी
उत्तर: B
Q11. अंडमान-निकोबार द्वीप समूह कुठे स्थित आहे?
A. यापैकी कोणत्याच नाही
B. अरब सारात
C. हिंदी महासागरात
D. बंगाल च्या खाडीमध्ये
उत्तर: D
Q12. लक्षद्वीप कुठे स्थित आहे?
A. हिन्द महासागरात
B. अरब सागरात
C. बंगाल च्या खाडित
D. प्रशांत महासागरात
उत्तर: B
Q13. भारताच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात?
A. इंदिरा प्वाइंट
B. कन्याकुमारी
C. कोरमण्डल
D. यापैकी काहीच नाही
उत्तर: A, कन्याकुमारी हा भारतातील दक्षिणेकडील मुख्य भूभाग आहे. अंदमान आणि निकोबार बेटातील इंदिरा पॉईंट हा भारतीय प्रदेशाचा दक्षिणेकडील टोक आहे
Q14. इंदिरा पॉइंट कोणत्या दुसऱ्या नावाने पण ओलखळा जातो?
A. पिगमिलियन प्वाइंट
B. एलओसी
C. मेकमोहन लाइन
D. यापैकी काहीच नाही
उत्तर: A
Q15. भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफाळाच्या किती % आहे?
A. 2.30%
B. 3.42%
C. 2.42%
D. 3.30%
उत्तर: C
Q16. जगाच्या एकून लोकसंख्येच्या किती % लोक भारतात निवास करतात?
A. 22 %
B. 19 %
C. 17 %
D. 12 %
उत्तर: C, ट्रेडिंग इकॉनॉमिक्स ग्लोबल मॅक्रो मॉडेल यांच्या विश्लेषकांच्या २०२२ अखेरपर्यंत भारताची लोकसंख्या १४१ करोड पर्यंत पोचण्याची शक्यता आहे.
Q17. भारताचे एकून क्षेत्रफळ किती आहे?
A. 62,87,263 sq.km
B. 32,87,263 sq.km
C. 30,57,263 sq.km
D. 42,82,263 sq.km
उत्तर: B- Exp. भारत जगातील सातवा क्रमांकाचा देश आहे, एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर एवढे आहे.
Q18. भारताची जमीन सीमा कोणत्या देशाला लागुन आहे?
A. बांग्लादेश, चीन, पाकिस्तान, नेपाल, म्यान्मार, भूटान
B. बांग्लादेश, चीन, पाकिस्तान,
C. चीन, पाकिस्तान, नेपाल, म्यान्मार, भूटान
D. बांग्लादेश, चीन, श्रीलंका, म्यान्मार, भूटान
उत्तर: A
Q19. भारताची जलसीमा कोणत्या देशाना मिळते?
A. श्रीलंका, बांग्लादेश, म्यांमार, इंडोनेशिया
B. मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश, म्यान्मार व पाकिस्तान
C. मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश
D. मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश, म्यान्मार, चीन व नेपाल
उत्तर: B
Q20. कर्क रेषा कोणत्या राज्यातून जाते?
A. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, झारखंड आणि मिझोरम
B. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम
C. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, झारखंड
D. छत्तीसगढ़, झारखंड, पश्चिमी बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम
उत्तर: B
Bhugol General Knowledge in Marathi
Q21. भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण सीमा किती अक्षांश आहे?
A. 8°2 N
B. 8°6 N
C. 8°088 N
D. 8°83 N
उत्तर: C
Exp.8.0883° N, 77.5385° E
Q22. भारतीय प्रमाण वेळ आणी ग्रीनिच प्रमाणवेळ यांमध्ये किती अंतर आहे?
A. 6 तास
B. 5 तास
C. 6 तास 30 मिनट
D. 5 तास 30 मिनट
उत्तर: D
Q23. भूमध्य रेखेपासुन भारताच्या दक्षिण टोकाचे अंतर किती आहे?
A. 752 कि.मी
B. 867 कि.मी
C. 856 कि.मी
D. 870 कि.मी
उत्तर: A
Q24. भारताच्या जमिन सीमेची लांबी किती कि.मी आहे?
A. 15700 किमी
B. 15000 किमी
C. 15200 किमी
D. 14200 किमी
उत्तर: C
Q25. भारताच्या मुख्य भूभागाच्या तटरेखेची लांबी किती आहे?
A. 6300 किमी
B. 6100 किमी
C. 6000 किमी
D. 6400 किमी
उत्तर: B
Q26. तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो?
A. लक्ष्मी
B. सरस्वती
C. पार्वती
D. दुर्गा
उत्तर: C
Q27. संपूर्ण भारताच्या किती % भागावर पर्वत आणि डोंगराचा विस्तार आहे?
A. 20.8%
B. 24.8%
C. 28.8%
D. 22.8%
उत्तर: C
Q28. संपूर्ण भारताच्या किती % क्षेत्रफाळावर मैदान आहेत?
A. 48%
B. 40%
C. 42%
D. 44%
उत्तर: D
Q29. कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे?
A. गुजरात
B. कर्नाटक
C. महाराष्ट्र
D. केरल
उत्तर: A
Exp: 1214 किमी
Q30. भूमध्ये रेखाच्या जवळ कोणते स्थान आहे?
A. इंदिरा पॉईंट
B. मध्यप्रदेश
C. सियाचिन
D. काश्मीर
उत्तर: A
Q31. इंदिरा प्वाइंट कुठे स्थित आहे?
A. बंगालची खाड़ी
B. दमन व दिव
C. हिंद महासागर
D. अंडमान-निकोबार बेटावर
उत्तर: D
Exp.इंदिरा पॉईंट हे निकोबार जिल्ह्यातील अंदमान आणि निकोबार बेटांचे अँडमान आणि निकोबार बेटांचे मोठे गाव आहे. हे ग्रेट निकोबार तहसीलमध्ये आहे.
Q32. कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात छोटी आहे ?
A.केरळ
B. महाराष्ट्र
C. गुजरात
D. पश्चिम बंगाल
उत्तर: D, Exp. पश्चिम बंगालमध्ये 157.5 किमी लांबीची सर्वात लहान किनारपट्टी आहे.
Q33. भारताची जमीन सीमा कोणत्या देशासोबत सर्वाधित आहे ?
A. बांग्लादेश
B. पाकिस्तान
C. नेपाल
D. म्यांमार
उत्तर: A, Exp. बांगलादेश: 4,096.7.km
Q34. भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे?
A. न्हावा-शेवा
B. कांडला
C. मुंबई
D. रत्नागिरी
उत्तर: C
Q35. भारतातल्या पूर्वी सागरी किनारपट्टीला कोणत्या नावाने ओळखले जाते?
A. गंगा
B. कोरोमंडल
C. भीमुनीपट्नम
D. विशाखापट्नम
उत्तर: B
Q36. प्राचीन भारताचा कोणता भौगोलिक भाग प्राचीन आहे?
A. हिमालय पर्वत श्रृंखला
B. भारत-गंगा मैदान
C. प्रायद्वीपीय पठार
D. दक्कन का पठार
उत्तर: C
Q37. कोंकण किनारा कुठून कुठपर्यंत स्थित आहे?
A. गोवा ते दमन पर्यंत
B. मुंबई ते गोवा पर्यंत
C. गोवा ते गुजरात पर्यंत
D. गुजरात ते केरळ पर्यंत
उत्तर: A
Q38. कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे ………. यांनी निश्चित केली आहे?
A. अचरा ते दमणगंगा नदी
B. दमणगंगा ते तेरेखोल नदी
C. तानसा ते गाड नदी
D. वैतरणा ते तेरेखोल नदी
उत्तर: B
Q39. भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे?
A. 3214 कि.मी.
B. 3014 कि.मी
C. 2933 कि.मी
D. 3312 कि.मी
उत्तर: A
Q40. न्यू मूर द्वीप कुठे स्थित आहे?
A. लक्षद्वीप मधे
B. बंगालच्या खाडित
C. दमन द्वीप मधे
D. अंदमान समुद्रात
उत्तर: D
Marathi Geography Questions
Q41. कोणता द्वीप भारत आणि श्रीलंकाच्या मध्ये स्थित आहे?
A. मालद्वीप
B. लक्षद्वीप
C. रामेश्वरम्
D. दमन एवं दीव
उत्तर: C
Q42. लक्षद्वीप समुहाच्या एकुण द्विपांची संख्या किती आहे?
A. 32
B. 34
C. 30
D. 36
उत्तर: D
Q43. लक्षद्वीप समुहाच्या एकुण किती द्विपांवर लोकवस्ती आहे?
A. 15
B. 10
C. 20
D. 25
उत्तर: B
Q44. भारताच्या कोणत्या ठिकाणाला ‘सफेद पाणी’ या नावाने ओळखतात?
A. हिमालय
B. सियाचिन
C. अरब सागर
D. केरल
उत्तर: B
Q45. चीन च्या ताब्यात असलेल्या जम्मू कश्मीरच्या भागाला काय म्हणतात?
A. अक्साई चीन
B. एलओसी
C. सियाचीन
D. यापैकी काहीच नाही
उत्तर: A
Q46. भारतात शीत मरुस्थल कोणते आहे?
A. लडाख
B. चम्बा
C. पूर्वी कामेंग
D. लाचेन
उत्तर: A
Q47. दक्खन पठाराची उंची………..मीटर च्या दरम्यान आहे?
A. 200-300 मीटर
B. 300-900 मीटर
C. 100-300 मीटर
D. 500-700 मीटर
उत्तर: B
Q48. भारतात किती केन्द्रशासित प्रदेश आहेत?
A. 8
B. 10
C. 6
D. 8
उत्तर: A
Q49. न्यू मूर द्वीपावरून भारताचे कोणत्या देशासोबत विवाद आहेत?
A. चीन
B. बांग्लादेश
C. श्रीलंका
D. पाकिस्तान
उत्तर: B
Q50. भारत कोणत्या गोलार्धात स्थित आहे?
A. दक्षिण
B. उत्तर
C. पूर्व
D. पक्षिम
उत्तर: B
Q51. केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली भारताच्या कोणत्या दोन राज्यांच्या मधे स्थित आहे?
A. महाराष्ट्र व आंध्रप्रदेश
B. महाराष्ट्र व गोवा
C. गुजरात व राजस्थान
D. गुजरात व महाराष्ट्र
उत्तर: D
Q52. कोणत्या राज्याला पाहिले NEFA(North-East Frontier Agency) च्या नावाने ओळखले जायचे?
A. मध्यप्रदेश
B. उत्तरांचल
C. अरुणाचल प्रदेश
D. गुजरात
उत्तर: C
Q53. केंद्रशासित प्रदेश अंदमान – निकोबार द्वीप समूहाची राजधानी पोर्ट ब्लेयर कोणत्या द्वीपावर स्थित आहे?
A. मध्य अंडमान
B. दक्षिण अंदमान
C. उत्तर अंडमान
D. निकोबार
उत्तर: B
Q54. कोणते राज्य उत्तरी पूर्वी राज्याची ‘Seven Sisters’ चा भाग नाही आहे?
A. असम व सिक्किम
B. सिक्किम व असम
C. असम व पश्चिम बंगाल
D. सिक्किम व पश्चिम बंगाल
उत्तर: D
Q55. आंध्रप्रदेश, तामिळनाडू व उत्तरप्रदेश हे राज्य खालीलपैकी कोणत्या लघुउद्योगासाठी प्रसिध्द आहेत?
A. सतरंज्या
B. कापड छापकाम
C. दागिने
D. कौल
उत्तर: A
Q56. उत्तर भारतात उप हिमालय क्षेत्राच्या मदतीने पसरलेल्या समतल मैदानाला काय म्हणतात?
A. खुले मैदान
B. टिले
C. पठार
D. भावर
उत्तर: D
Q57. खालील कोणत्या राज्यातून कर्क वृत्त जात नाही?
A. राजस्थान
B. मणिपूर
C. मिजोरम
D. त्रिपुरा
उत्तर: B
Q58. भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शविणारे झीरो माईल हे स्थान…………शहरात आहे?
A. नागपूर
B. अलाहबाद
C. रायपूर
D. भोपाळ
उत्तर: A
Q59. भारतात वन महोत्सव कधी साजरा करतात?
A. जुलै च्या तिसरया आठवड्यात
B. जुलै च्या पहिल्या आठवड्यात
C. ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात
D. फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात
उत्तर: B
Q60. गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील…………….टक्के भाग समावून घेतले आहे?
A. 13 टक्के
B. 23 टक्के
C. 33 टक्के
D. 43 टक्के
उत्तर: B
Indian Geography GK Questions in Marathi
Q61. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चथुर्तुंश भागात………….मृदाआढळते?
A. गाळाची मृदा
B. रेगुर मृदा
C. वन मृदा
D. जंभी मृदा
उत्तर: B
Q62. टाटा आर्यन व स्टील कंपनी (जमशेदपूर) कोणत्या नदीवर आहे?
A. सुवर्णरेखा
B. गंगा
C. नर्मदा
D. ब्राह्मणी
उत्तर: A
Q63. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे?
A. मुंबई
B. सिकंदराबाद
C. गुवाहाटी
D. गोरखपूर
उत्तर: B
Q64. महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळतात?
A. इशान्य भागात
B. पश्चिम भागात
C. अग्नेय भागात
D. मध्य भागात
उत्तर: B
Q65. महाराष्ट्र पठाराची निर्मीती कशाने झाली?
A. भूप्रक्षोभ
B. संचयन
C. भूकंप
D. भ्रंशमूलक उद्रेक
उत्तर: D
Q66. भारतामध्ये पवन उर्जा क्षेत्रात खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते आहे?
A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. ओरिसा
D. तामिळनाडू
उत्तर: D
Q67. सह्याद्रीच्या पूर्वीकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?
A. अति प्रजन्यचा प्रदेश
B. ओल्या दुष्काळाचा प्रदेश
C. पर्जन्यछायेचा प्रदेश
D. तराई
उत्तर: C
Q68. क्षेत्रफळाच्या दृष्टिने भारत जगातील………..क्रमांकाचा देश आहे?
A. तीन
B. पाच
C. नऊ
D. सात
उत्तर: D
Q69. खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनविणयाच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिध्द आहे?
A. लातूर
B. भंडारा
C. परभणी
D. बीड
उत्तर: B
Q70. लातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला पूर्वी अंबरपूर किंवा आम्रपूर नावाने प्रसिध्द होता, हा किला बांधण्याचे श्रेय कोणाला दिले जाते?
A. दुसरा सोमेश्ववर
B. सहावा विक्रमादित्य
C. मलिक अंबर
D. निजाम उलू मुल्क
उत्तर: C
Q71. समर्थ रामदासांचे निवासस्थान व समर्थानी स्थापन केलेले श्री राम मंदिर यांमुळे प्रसिध्दी पावलेले सातारा जिल्ह्यतील ‘चाफळ‘ हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
A. कृष्णा
B. नीरा
C. मांड
D. कोयना
उत्तर: C
Q72. सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात?
A. ३००० मिमी पेक्षा जास्त पर्जन्याचे प्रदेश
B. १००० मिमी इतक्या पर्जन्याचे प्रदेश
C. ६०० मिमी इतक्या पर्जन्याचे प्रदेश
D. ६०० मिमी पेक्षा कमी पर्जन्याचे प्रदेश
उत्तर: D
Q73. चांगदेव मंदिरामुळे प्रसिध्दीस आलेले गोदावरी काठचे …….. हे क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आहे?
A. राहुरी
B. नेवासे
C. पुणतांबे
D. घारगाव
उत्तर: C
Q74. ‘अंबोली ‘हे सह्याद्री पर्वत रांगेतील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोठे वसले आहे?
A. तालुका चिपळूण, जि .रत्नागिरी
B. तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
C. तालुका शाहूवाडी,जि.कोल्हापुर
D. तालुका संगमेशवर,जि. रत्नागिरी
उत्तर: B
Q75. पुणे जिल्ह्यायाच्या भोर तालुक्यात वेळवंडी या नदीच्या उपनदीवर भाटघर येथे १९२८ मध्ये धरण बांधणयात आले आहे. या धरणास तत्कालीन मुंबई इलाख्याचा गव्हर्नर ……… यांचे नाव देण्यात आले होते?
A. विल्सन
B. आँर्थर
C. एल्फिन्स्टन
D. लॉईड
उत्तर: D
Q76. खाली राज्यातील काही धरणे व धरणांच्या जलाशयांना देण्यात आलेली नावे यांच्या जोड्या दिल्या आहेत; यांपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
A. भाटघर : येसाजी कंक जलाशय
B. पानशेत : तानाजी सागर जलाशय
C. वरसगाव : वीर बाजी पासलकर जलशय
D. खडकवासल : शिवाजीसागर जलाशय
उत्तर: D- कोयना धरणाचा जलाशय हा शिवसागर जलाशय या नावाने ओळखला जातो. हा धरण सातारा जिल्ह्यात आहे.
Q77. महाराष्ट्राच्या किनार्यालगतच्या भागात भरती-ओहटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान तसेच खाड्यांच्या मुखाशी दलदलयुक्त भूमीवर असलेल्या वनांना ………. वने म्हणतात?
A. पानझडीची
B. खारफुटीची
C. सुरूची
D. काटेरी
उत्तर: B
Q78. महाराष्टातील पहिला साखर कारखाना इ. स .१९२० मध्ये अहमदनगर जिल्ह्यात खालीलपैकी कुठे उभा राहिला?
A. कोपरगांव
B. लोणी
C. हरेगांव
D. कोळपेवाडी
उत्तर: C
Q79. राज्यात अहमदनगर जिल्ह्यातील ……..येथे ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत?
A. जोर्व, नेवासे व खामगाव
B. वडगाव दर्या व निघोज
C. संगमनेर
D. शिर्डी व घारगाव
उत्तर: A
Q80. सातारा जिल्ह्यातील ………या क्षेत्री कृष्णा व वेण्णेचा संगम झाला आहे?
A. कऱ्हाड
B. वाई
C. माहुली
D. चाफळ
उत्तर: C
Geography Questions and Answers in Marathi
Q81. खालीलपैकी कोणत्या गटात दिलेल्या सर्व जिल्ह्यांमधून कृष्णा नदी आपला प्रवास करते?
A. कोल्हापूर ,सातारा
B. सातारा,सांगली
C. सांगली ,कोल्हापूर
D. कोल्हापूर, सातारा, सांगली
उत्तर: D
Q82. खाली काही नद्या व त्यांची उगमस्थाने यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे?
A. सीना – आगरगाव डोंगर (अहमदनगर)
B. भीमा – शिंगी डोंगर :-(पुणे )
C. मुळा – मांडवी डोंगर (पौड , पुणे)
D. नीरा – कुरवंडे (पुणे)
उत्तर: D
Q83. महाराष्ट्राच्या किनारपटीचा विस्तार …….नदीपासून….. …नदीपर्यंत आहे?
A. दमणगंगा – तेरेखोल
B. उल्हास – शास्त्री
C. दमणगंगा – वासिष्ठी
D. काली – तेरेखोल
उत्तर: A
Q84. खाली काही नद्या व त्यांच्या मुखाजवळ निर्माण झालेल्या खाड्या यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यांपैकी कोणती जोडी चुकीची आहे .
A. अंबा व पाताळगंगा : धरमतर खाडी (रायगड)
B. वासिष्ठी : लाभोळची खाडी (रत्नागिरी)
C. देवगड नदी : विजयदुर्ग खाडी (रत्नागिरी)
D. काजळी नदी : भाट्याची खाडी (रत्नागिरी)
उत्तर: C
Q85. घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवती कोणते जिल्हे आहेत?
A. नाशिक , जालना ,बीड ,लातुर ,पुणे ,ठाणे ,धुळे
B. औरंगाबाद ,जालना ,बीड , उस्मानाबाद ,सोलापुर ,पुणे ,ठाणे
C. नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापुर, पुणे, ठाणे
D. धुळे ,नाशिक ,जालना ,लातुर , सांगली , सातारा , पुणे
उत्तर: C
Q86. ……. नदीवर बांधणयात आलेल्या धरणाचा जलाशय ‘लक्ष्मीसागर‘ नावाने ओळखला जातो?
A. वेण्णा
B. भोगावती
C. कोयना
D. कृष्णा
उत्तर: B
Q87. ‘तारापूर’हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र खालील पैकी कुठे आहे?
A. कल्याण
B. डहाणू
C. पालघर
D. तलासरी
उत्तर: C
Q88. खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते?
A. बिलिगिरी
B. निलगिरी
C. निमगिरी
D. नाल्लामाला
उत्तर: B
Q89. भारताच्या पश्चिमेला कोणता देश आहे?
A. चीन
B. बांग्लादेश
C. पाकिस्तान
D. नेपाल
उत्तर: C
Q90. मन्नारची खाड़ी आणि पाल्कची सामुद्रधुनी यांनी भारताला कोणत्या देशापासून वेगळे केले आहे?
A. श्रीलंका
B. बांग्लादेश
C. म्यांमार
D. इंडोनेशिया
उत्तर: A
Q91. भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते?
A. सुंदरबन अरण्य
B. मॅन्ग्रोव्ह अरण्ये
C. अल्लापल्ली अरण्ये
D. तैगा अरण्ये
उत्तर: C
Q92. नागरिकरणाच्या प्रक्रियेत मानवी वसाहतींचा विकासानुसार क्रम सांगा?
अ. खेडे
ब. नगर
क. शहर
ड. वाडी
A. अ,ड,क,ब
B. ड,अ,क,ब
C. अ,ड,ब,क
D. ड,क,अ,ब
उत्तर: B
Q93. कर्क रेषा भारताच्या किती राज्यांमधून जाते?
A. 6
B. 10
C. 8
D. 4
उत्तर: C
Q94. गंगा नदीला बांग्लादेशमधे कोणत्या नावाने ओळखतात?
A.पद्मा
B. तीस्ता
C. कामेंग
D. मेघना
उत्तर: A
Q95. गंगा व ब्रह्मपुत्र यांची संयुक्त जलधारा कोणत्या नावाने ओळखली जाते?
A. कामेंग
B. पद्मा
C. तीस्ता
D. मेघना
उत्तर: D
Q96. भारतची कोणती नदी सुंदरवन डेल्टा बनवते?
A. नर्मदा व ताप्ती
B. कृष्णा व कावेरी
C. गंगा व यमूना
D. गंगा व ब्रह्मपुत्र
उत्तर: D
Q97. त्संगपो नदी कोणत्या राज्यातुन होउन भारतात प्रवेश करते?
A. मेघालय
B. अरुणाचल प्रदेश
C. जम्मू-कश्मीर
D. पश्चिम बंगाल
उत्तर: B
Q98. तवा नदी कोणाची सहायक नदी आहे?
A. गंगा
B. नर्मदा
C. ताप्ती
D. ब्रम्हपुत्र
उत्तर: B
Q99. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत?
A. विदर्भ
B. मराठवाडा
C. कोकण
D. वरील सर्व
उत्तर: A
Q100. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे?
A. मुंबई उपनगर
B. मराठवाडा
C. उस्मानाबाद
D. जालना
उत्तर: B
Indian Geography MCQ Questions In Marathi
Q101. कोणती नदी भ्रंश दोणी मार्गे वाहते?
A. कृष्णा
B. गोदावरी
C. ताप्ती
D. नर्मदा
उत्तर: D
Q102. आताच केंद्र सरकारने कोणत्या नदीला राष्ट्रिय दर्जा देण्याची घोषणा केली?
A. ब्रम्हपुत्र
B. गंगा
C. कृष्णा
D. नर्मदा
उत्तर: B
Q103. प्रायद्वीपीय भारताची सर्वात मोठी नदी कोणती आहे?
A. कृष्णा
B. गोदावरी
C. ताप्ती
D. नर्मदा
उत्तर: B
Q104. भारतात वाहन्याच्या अंतरानुसार सर्वात लांब नदी कोणती आहे?
A. कृष्णा
B. ब्रम्हपुत्र
C. नर्मदा
D. गंगा
उत्तर: D
Q105. पंजाबच्या निर्मितिला सर्वात महत्वाची नदी कोणती?
A. सिंधु
B. झेलम
C. ब्यास
D. रावी
उत्तर: A
Q106. कोणती नदी पश्चिमेला वाहते आणि अरबी समुद्राला मिळते?
A. गोदावरी
B. नर्मदा
C. कावेरी
D. कृष्णा
उत्तर: B
Q107. कावेरी जल विवाद कोणत्या राज्यांमधे आहे?
A. कर्नाटक आणि आंध्रप्रदेश
B. महाराष्ट्र आणि कर्नाटक
C. कर्नाटक आणि तमिलनाडु
D. तमिलनाडु आणि केरल
उत्तर: C
Q108. कोणत्या नदीला वृद्ध गंगा या नावाने ओळखतात?
A. गोदावरी
B. ताप्ती
C. कावेरी
D. नर्मदा
उत्तर: A
Q109. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबी असलेली नदी कोणती?
A. गोदावरी
B. कृष्णा
C. तापी
D. नर्मदा
उत्तर: A
Exp.गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आणि गंगा नंतरची भारतातील दुसरी सर्वात लांब नदी आहे. या नदीची एकूण लांबी 1465 km आहे.
Q110. भारतातील कोणत्या दोन राज्यांत ‘भीमा पाणी तंटा ‘ चालू आहे?
A. महाराष्ट्र –गोवा
B. महाराष्ट्र- कर्नाटक
C. महाराष्ट्र- आंध्रप्रदेश
D. कर्नाटक- आंध्रप्रदेश
उत्तर: B
Q111. महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र …… या विभागात आहे?
A. विदर्भ
B. कोकण
C. मराठवाडा
D. नाशिक
उत्तर: C
Q112. सिंध विजय चे श्रेय कोणाला जाते?
A. सर चार्ल्स नेपियर
B. डुप्ले
C. पुलिकेशन
D. यापैकी कोणालाच नाही
उत्तर: A
Q113. मुळा -मुठा नद्यांच्या संयुक्त प्रवाह………..जवळ भीमा नदीला मिळतो?
A. उदगीर
B. रांजणगांव
C. फलटन
D. शिरूर
उत्तर: B
Q114. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे किती टक्के भाग भूभागांनी व्यापलेले आहे?
A. 20%
B. 20.2%
C. 29.2%
D. 29%
उत्तर: C
Q115. कोणती प्रजाती कागदनिर्मितीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते?
A. निलगिरी
B. सागवान
C. देवदार
D. साल
उत्तर: A
Q116. राष्ट्रीय वन नीतिचा शुभारंभ कधी झाला?
A. 1979 ई
B. 1992 ई
C. 1954 ई
D. 1988 ई.
उत्तर: D
Exp. सध्याचे राष्ट्रीय वन धोरण 1988 (एनएफपी-1988) जाहीर केले गेले होते.
Q117. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे विश्वात कितवे स्थान आहे?
A. पाचवे
B. सातवे
C. सहावे
D. दहावे
उत्तर: B
Q118. जनसंखेच्या दृष्टीने भारताचे जगात कितवे स्थान आहे?
A. पहिले
B. तीसरे
C. दुसरे
D. पाचवे
उत्तर: C
Q119. भारताच्या उत्तरेला कोण-कोणते देश आहेत?
A. यापैकी कोणतेच नाही
B. पाकिस्तान, अफगानिस्तान
C. बांग्लादेश, म्यानमार
D. चीन, नेपाल, भूटान
उत्तर: D
Q120. भारताच्या पूर्वेला कोणता देश आहे?
A. बांग्लादेश
B. पाकिस्तान
C. चीन
D. नेपाल
उत्तर: A
Q121. भारतच्या दक्षिण पश्चिममेला कोणता समुद्र आहे?
A. बंगाल की खाड़ी
B. अरबी समुद्र
C. हिंद महासागर
D. यापैकी कोणताच नाही
उत्तर: B
Q122. भारताच्या दक्षिण-पूर्वेला कोणती खाड़ी आहे?
A. यापैकी काहीच नाही
B. अरब सागर
C. मन्नारची खाड़ी
D. बंगालची खाड़ी
उत्तर: D
Q123. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे?
A. यापैकी काहीच नाही
B. प्रशांत महासागर
C. अरब सागर
D. हिन्द महासागर
उत्तर: D
Q124. पूर्वांचल चे पर्वत भारताला कोणत्या देशापासून वेगळे करते?
A. यापैकी कोणताच नाही
B. श्रीलंका
C. नेपाल
D. म्यांमार
उत्तर: D
Q125. अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
A. सिंधुदुर्ग
B. कणकवली
C. राजेवाडी
D. वसई
उत्तर: C
Q126. भारतातील एकूण बॉक्साईट उत्पादनापैकी किती टक्के उत्पादन बिहार राज्यात होते?
A. 20%
B. 32%
C. 36%
D. 27%
उत्तर: C
Q127. कोणती नदी ‘कपिलधारा जलप्रपात’ चे निर्माण करते?
A. नर्मदा
B. गोदावरी
C. कोसी
D. झेलम
उत्तर: A
Q128. खालीलपौकी कोणता राष्ट्रीय मार्ग महाराष्ट्र राज्यात सुरु होऊन महाराष्ट्र राज्यातच संपतो?
A. राष्ट्रीय महामार्ग क्र 16
B. राष्ट्रीय महामार्ग क्र 17
C. राष्ट्रीय महामार्ग क्र 50
D. राष्ट्रीय महामार्ग क्र 43
उत्तर: C
Q129. वैनगंगा आणी पैनगंगा कोणाच्या सहायक नद्या आहेत?
A. नर्मदा
B. गंगा
C. कोसी
D. गोदावरी
उत्तर: D
Q130. इंडो ब्रह्मा हे काय आहे
A. प्राचीन स्थल
B. एक सभ्यता
C. पौराणिक नदी
D. जाती
उत्तर: C
Geography Quiz in Marathi
Q131. कोणत्या नदीवर सर्वात लांब पुल उभारण्यात आला आहे?
A. गंगा
B. ब्रम्हापुत्र
C. हुगली
D. नर्मदा
उत्तर: A
Q132. कोणती नदी विश्वाताला सर्वात मोठा द्वीप ‘माजुली’ बनाविते?
A. सतलुज
B. सिंधू
C. गंगा
D. ब्रह्मपुत्र
उत्तर: D
Q133. नर्मदा नदीचा सर्वाधिक भाग भारताच्या कोणत्या राज्यातुन वाहतो?
A. राजस्थान
B. गुजरात
C. महाराष्ट्र
D. मध्य प्रदेश
उत्तर: D
Q134. कावेरी नदी कुठे जाऊन मिळते?
A. प्रशांत महासागर
B. अरब सागर
C. हिंद महासागर
D. बंगालच्या खाडीला
उत्तर: D
Q135. कोणती नदी आपला मार्ग बदलान्यासाठी प्रसिद्ध आहे?
A. गंगा
B. कोसी
C. सिंधू
D. नर्मदा
उत्तर: B
Q136. भारताची पवित्र नदी कोणती आहे?
A. गोदावरी
B. तापी
C. गंगा
D. सिंधू
उत्तर: C
Q137. खासी आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते.
A. मणिपूर
B. मेघालय
C. अरुणाचल प्रदेश
D. बिहार
उत्तर: B
Q138. पुढील दोन विधानांचा विचार करा
1) उष्ण कटिबंधीय सदाहरित वने : एका विशिष्ट जातीची विखुरलेली झाडे . उदाहरणार्थ – शीशम .
२) उष्ण कटिबंधीय कदापर्णी वने : झाडांच्या प्रजाती कमी परंतु एकमेकांच्या जवळ . उदारणार्थ – साग.
A. केवळ १ बरोबर आहे
B. केवळ २ बरोबर आहे .
C. १ व २ दोन्ही बरोबर आहेत
D. १ व २ दोन्ही बरोबर नाहीत
उत्तर: C
Q139. खालील पैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते?
A. बिलगिरी
B. निलगिरी
C. निमगिरी
D. नलामाल
उत्तर: B
Q140. जोड्या जुळवुन योग्य पर्याय शोधा, स्थालंतर शेती राज्य (य) झुम 1) छत्ती ( र) पोडू 2) केरळ ( ल) पोणम 3) आसाम ?(व) दहिया 4) आंध्र प्रदेश
A. य -४, र -३ ,ल -१, व -२
B. य – २ , र -३, ल -४, व -१
C. य – ३ ,र – ४ , ल – २ , व – १
D. य – ४ , र- २ , ल – १, व – ३
उत्तर: C
Q141. मानवी शरीरामध्ये पाराच्या संचयनामुळे …… हा आजार होतो?
A. ईटाई – ईटाई
B. मिथॉनोगलोबिनिमिया
C. मिनामाटा
D. पोलिओ
उत्तर: C
Q142. अन्नसाखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थांच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस …….. म्हणतात?
A. जैवनिम्नीकरण
B. जैव आवर्धन
C. जैवसंचयन
D. जैव उपचारीकरण
उत्तर: C
Q143. भारतातील सर्वांत पहिले राष्ट्रीय उद्यान ……. हे होय?
A. जिम कॉर्बेट
B. संजय गांधी
C. गीर
D. कान्हा
उत्तर: A
Q144. खालील नमूद केलेली राज्ये निर्माण केल्याचा किंवा पूर्ण राज्याचा दर्जा दिल्याचा योग्य कालानुक्रम काय आहे (1) नागालँड (2) आंध्रा प्रदेश (3) हरियाना (4) महाराष्ट्र
A. १,२,३,आणि ४
B. १,२,४,आणि ३
C. २,१,४,आणि ३
D. २,४,१आणि ३
उत्तर: D
Q145. २०११च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याचा लोकसंख्यावाढीचा दर उणे होतो?
A. गोवा
B. त्रिपुरा
C. नागालँड
D. अरूणाचल प्रदेश
उत्तर: C
Q146. पांडा हा प्राणी खालीलपैकी कोणत्या कुळाशी संबंघीत आहे?
A. अस्वल
B. मांजर
C. माकड
D. ससा
उत्तर: A
Q147. उसापासून साखर करताना उसाच्या एकूण वजनाच्या किती टक्के रूपांतर होऊ शकते?
A. ४० टक्के
B. ३० टक्के
C. २० टक्के
D. १० टक्के
उत्तर: D
Q148. नदी आपल्या संपूर्ण प्रवाहत वेगवेगळे भू – आकार निर्माण करत असते . खालीलपैकी कोणत्या भू – आकर नदी आपल्या वरच्या टप्प्यात निर्माण करत नाही?
A. घळई
B. धावर्या ( Rapids)
C. धबधबा
D. डोंगर बाहू
उत्तर: D
Q149. कोणत्या प्रदेशामध्ये वस्त्यांचे वितरण पूर पातळीव्दारा निश्चित होईल?
A. नर्मदेच्या त्रिभुज नायट्रेट
B. रोहिलखंड
C. माळवा
D. रामनाड
उत्तर: B
Q150. जर जागतिक तापमान २° सेल्सिअस वाढले तर पृथ्वीवर खालीलपैकी कोणते परिणाम होण्याची शक्याता आहे?
(१) वार्षिक पूर
(२) कीटकांमुळे होणारे आजार जसे मलेरिया
(३) शेती विभागात बदल
(४) प्राणी आणि वणस्पतींच्या बर्याच प्रजाती नष्ट होतील
A. १,२,३. व ४
B. १,२, व३
C. २,३, व ४
D. फक्त ४
उत्तर: A
Q151. खालील नद्यांच्या त्यांच्या खोर्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा?
(१) ब्रह्मपुत्र
(२) कृष्णा
(३) तापी
(४) कावेरी
A. २,१,४,३
B. २,४,३,१
C. १,२,४,३
D. १,३,२,४
उत्तर: C
Q152. खालील विधाने पाहवित व त्यातील कोणते योग्य नाही ते सांगवे?
(१) भारतात गाळाची मृदा सर्वात अधिक पसरलेली आहे.
(२) एकूणच गाळाची मृदा अत्यंत सुपीक असते.
(३) तिच्या वयोमानाप्रमाणे गाळाची मृदा २ वर्गवारीत मोडते – जुनी – बांगर आणि नवी – खादार.
(४)खादर मृदा बांगरपेक्षा अधिक सुपीक असते.
(५) गाळाच्या मृदेत पुरेशा प्रमाणात पोटँश , फॉस्फोरिक अँसिड व लाइज असते.
(६) गाळाची मृदा ऊस , भात ,गहू व कडधान्यांकरता उत्कृष्ट असते.
A. ३
B. ४
C. ५
D. एकही नाही .
उत्तर: D
Q153. खालील नकाशात पूर्व हिमालय प्रदेशातील चार पर्वतरांगा १,२,३,४ अंकांनी दाखविलेल्या आहेत य पर्वतरांगांचा पश्चिमेकडून पूर्वकडे कोणता क्रम बरोबर आहे?
A. बराली , जयंतिय ,काशि ,गारो
B. गारो ,खाशि , जयंतिया ,बराली
C. जयंतिया , खाशी , गारो , बरोली
D. काशी , गारो , बराली , जयंतिया
उत्तर: B
Q154. पुढील क्षेत्रांचा नीट विचार करा.
(१) अँडीज पर्वत
(२)न्यूझीलंड
(३)फिलीपाईन्स
(४) तैवान
A. फक्त १
B. १ आणि २
C. २,३,आणि ४
D. १,२,३ आणि ४
उत्तर: D
Q155. खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुववृत्तीय हावामानात आढळात नाही?
A. येथे हिवाळा नसतो .
B. दुपारी पाऊस पडतो .
C. वर्षभर सारखेच (Uniform)तापमान असते .
D. प्रतिरोध पर्जन्य .
उत्तर: D
Q156. भारतात मासेमारी अत्यल्प प्रमाणात केली जाते कारण ……
(१) मोठ्या प्रमाणात अन्नधान्यावर अवलंबून राहणे.
(२)मासे साठवण्याच्या मर्यादित सोई.
(३) सरकार मासेमारीस प्रोत्साहन देत नाही.
(४) जास्त चांगली बाजरपेठ नाही.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
A. १,३,आणि ४
B. २,३,आणि ४
C. १,२,आणि ४
D. फक्त ३
उत्तर: C
Q157. मुंबई हाय मध्ये भारताच्या एकूण उत्पादनाच्या ६३टक्के खनिज तेल तर ८० टक्के नैसर्गिसक वायूचे उत्पादन होते . ओ.एन .जी .सी . ला येथे सर्वप्रथम १९७४ मध्ये तेल सापडले .हे खनिज तेल खालीलपैकी कोणत्या कालवाधीचे आहे?
A. इओसीन
B. मायोसीन
C. प्लायोसीन
D. प्लस्टोसीन
उत्तर: B
Q158. खालील दोन विधाने पाहावीत .
(१) भारतात प्रती माणशी कृषी क्षेत्राची उपलब्धता सन १९५१ च्या ०.४८ हेक्टर पासून १९९१ पर्यंत ०.१६ हेक्टर एवढी कमी झाली व ती २०३५ पर्यंत ०.०८ हेक्टर पर्यंत खाली जाण्याची शक्यात आहे .
(२) कृषी क्षेत्राची उपलब्धता कमी होण्याचे प्रमुख कारण वाढती लोकसंख्या व कृषी क्षेत्राचे अकृषी क्षेत्राकडे वळतीकरण आहे .
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
A. विधान २ योग्य पंरतु विधान १ योग्य नाही .
B. विधान १ योग्य परंतु विधान २ योग्य नाही
C. दोन्ही विधाने बरोबर व विधान २ विधान १ ची कारणमीमांस देते.
D. दोन्ही विधाने बरोबर परंतु विधान २ विधान १ ची कारणमीमांस देते नाही .
उत्तर: C
Q159. आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदा धुपीमुळे प्रभावित आहे .मृदा धुपीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते?
A. राजस्थान
B. मध्य प्रदेश
C. महाराष्ट्
D. उत्तर प्रदेश
उत्तर: A
Q160. खालील दिलेल्या भारताच्या नकाशात काढलेली दाट ( Thick) रेषा पुढीलपैकी काय दाखविते?
A. तां दूळ व गहू उत्पादन करणार्या प्रदेशाचे विभाजन करणारी रेषा
B. जल विभाजक
C. समभूकंप तीव्रता दर्शक रेषा
D. वरीलपैकी एकही नाही .
उत्तर: B
भारताचा भूगोल प्रश्न उत्तरे
Q161. सुपोषण – बाबत विधाने
(१) प्राथमिक रित्या डोंगराळ भागातील वाहत्या पाण्यामध्ये सुपोषण होते .
(२) सुपोषण हे थांबलेल्या पाण्यात होते आणि त्यामध्ये जिवांचा आणि त्यांनी उत्पादित केलेल्या बाबींचा हळूहळु संचय होतो
(३) सूपोषणामुळे तयार झालेल्या शेवाळाचा पुंज हा अन्न म्हणून उपयोग होऊन माशांच्या वाढीसाठी पोषक ठरतो.
(४) सुपोषित पाणी हे आँक्सिजन – संपन्न असते आणि कुठलीही प्रक्रिया न करता मानवी वापरास सुरक्षित असते.
वरीलपैकी कोणते / कोणती विधाने / विधाने बरोबर आहेत
A. फक्त १
B. फक्त ४
C. २ आणि ३
D. १ आणि ४
उत्तर: C
Q162.खालील विधाने भारतातील दारीद्रयाच्या संकल्पनेशी संलगन आहेत –
(१) दारीद्र्यारेषेची संकल्पना कॉलरीजच्या स्वरुपात माडंली आहे.
(२) दारीद्रया आणि भूक या दोन्ही संकल्पना एकच आहेत .
(३) ‘दारीद्रयरेषा टोपली (Basket)’ मधील वस्तू आणि सेवांमध्ये बदल घडवून आणला गेले आहे .
(४) शिक्षण आणि आरोगयावरील खर्च समाविष्ट करण्यासाठी नवीन पध्दतीशास्त्र सुचवले गेले आहे .
वरीलपैकी कोणतीविधाने एस .डी.तेंडूलकर कमिटीच्या दारिद्ययसंकल्पनेनुसार बरोबर आहेत .?
A. १ आणि ४
B. फक्त २
C. २ आणि ३
D. फक्त ४
उत्तर: D
Q163. सन २०४५ पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करण्यास्त आपल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची सामाजिक व लोकसंख्यात्मक उद्दिष्टे काय आहेत ?
(१) मुलांचा मृत्युदर ३० प्रती १००० जन्मांपेक्षा कमी आणणे .
(२)मुलींना विलंबाने लग्न करण्यास प्रवृत्त करणे
(३) एकूण प्रसूतींच्या ८० टक्के बांळांतपणे संस्थात्मक आसावीत .
(४) १०० टक्के बाळंतपणे प्रशिक्षित व्यक्तींकडूनच व्हावीत
(५) जन्मदर कमी करण्यास्तव लग्नाचे वय वाढविणे
A. १,२,३आणि ४
B. २,३,४आणि ५
C. वरील सर्व
D. २,३,आणि ४
उत्तर: A
Q164.कृषी व सहकार विभागाने केशरी मोहीम (सँफ्रन मिशन ) सन २०१० ते २०१४ मध्ये राबविण्यासाठी सुरू केली आहे ज्यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे .
(१) पुनर्लागवड
(२)जमिनीचा पोत सुधारणे
(३) पाणीपुरवठा वाढविणे
(४) हवामान अंदाज यंत्रणा विकास
(५) संशोधन व विस्तारात भर
A. १,२,३,४
B. १,२,३,५
C. १,२,४,५
D. १,३,४,५
उत्तर: A
Q165. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणा , २००० चे तातडीचे उद्दिष्ट म्हणजे –
A. स्वास्थविषयक पायाभूत सुविधांची गरज भागविणे .
B. एकूण जननदर कमी करणे .
C. लोकसंख्या स्थिर करणे .
D. वरील करणे.
उत्तर: A
Q166. रिओ अर्थ समीट, अजेंडा २१ ने खालीलापैकी कोणत्या विभागात कार्य करण्याचे आशवासन दिले ?
(१) सामाजिक व आर्थिक मोजमाप जसे गरिबीचे निर्मूलन व अविनाशी शहर योजना
(२)महिला ,स्थानिक सरकार व बिगरसरकारी संघटना यांसरख्या महत्वाच्या घटकांचे सशक्तीकरण
(३) साधनांचे जतन व व्यवस्थापन जसे निर्वानीकरण थांबवणे.
A. १
B. ३
C. २
D. वरील सर्व
उत्तर: D
Q167. भारतातील काही प्रजाती पुढील प्रमाणे – (१) वाघ (२) भारतीय चित्ता (३) सँलमेंडर (४) गीब्बन (५) माळढोक (६) दोनशिंगी गेंडा वरीलपैकी कोणती / कोणत्या प्रजाती नष्ट झाली / झाल्या आहे /आहते ?
A. फक्त २
B. फक्त ३
C. फक्त ४
D. फक्त २ आणि ६
उत्तर: D
Q168. वनस्पतींपासुन मिळविलेल्या सजीवानमध्ये सक्रिय असणार्या संयुगाची यादी –
१) निकोटीन – तंबाखू वनस्पतीपासून
(२) निबीडाईन – कडुनिंबापासून
(३) रोटीनोन – डेरिस इलिप्टिकापासून
(४) पायरीथ्रम – क्रायसँथमम सिनक्रॉरीफोलीअमपासून
आदिम लोकांनी वनस्पतीं चे सार काढून ,सजीवांमध्ये सक्रिय असणारे संयुग मिळविले व त्याचा वापर मासे स्तंभित क
Q169. ‘लू ‘हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य वाहणारं महिने ………
A. एप्रिल – मे
B. मे – जून
C. जून – जुलै
D. ऑक्टोबर – नोव्हेंबर
उत्तर: B
Q170 . खालीलपैकी कोणते घटक वय रचनेवर परिणाम करतात?
(a)जन्मदर
(b)मृत्यूदर
(c)लोकसंख्येचे आकारमाण
(d)स्थालांतर
A. (b) (c) आणि (d)
B. फक्त (c)
C. फक्त (d)
D. वरीलपैकी कोणतीही नाही
उत्तर: D
Q171. जोड्या लावा :
स्तंभ (A) स्तंभ (B)
(a)पंजाब हिमालया (i)काळी आणि तिस्ता नदीमधील हिमालय
(b)आसम हिमालया (ii)सिंधू आणि सतलज नदीमधील हिमालय
(c)नेपाळ (iii)सतलज आणि काळी नदीमधील हिमालया
(d)कुमाऊन हिमालया (iv) दिहांग व तिस्ता नदीमधील हिमालया
A. (a)(iv),(b)(ii),(c)(iii),(d)(i)
B. (a)(ii),(b)(iv),(c)(i),(d)(iii)
C. (a)(i),(b)(iii)(c)(iv),(d)(ii)
D. (a)(ii),(b)(iv),(c)(iii),(d)(i)
उत्तर: B
Q172. जिल्हे आणि त्यांचे निर्मिती साल याच्यां योग्य जोड्या लावा , जिल्हा निर्मिती साल
(a)गोंदिया (i) 26 ऑगस्ट 1982
(b)वाशिम (ii)16 ऑगस्ट 1982
(c)गडचिरोली (iii)01मे 1999
(d)लातूर (iv)01जुलै 1998
A. (a)(iii),(b)(iv),(c)(ii),(d)(i)
B. (a)(iv),(b)(iii),(c)(i),(d)(ii)
C. (a)(iii),(b)(iv)(c)(i),(d)(ii)
D. (a)(ii),(b)(i),(c)(iii),(d)(iv)
उत्तर: C
Q173. भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त …………. आहे
A. 97° 25E
B. 68° 7’E
C. 82° 50’E
D. 90° 25’E
उत्तर: A
Q174. मानव विकास निर्देशांक मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ………. पेक्षा जास्त आहे .
A. 0 .3
B. 0.5
C. 0.9
D. 0.8
उत्तर: D
Q175. गुरूशिखार खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखार आहे?
A. छोटा नागपूर
B. अरवली
C. विंध्या
D. मालवा
उत्तर: B
Q176. खालीलपैकी कोणत्या राज्याच्यी किनारी प्रदेशात थोरियम हे अनूउर्जेसाठी म्हतवाचे खनिज इंधन आढळते?
A. केरळ
B. गुजरात
C. तामिळनाडू
D. कर्नाटक
उत्तर: A
Q177. मान्सूनच्या परतीच्या काळात ऑक्टोबर-नोहेंबर मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात पाऊस पडतो?
A. आंध्रप्रेदश व तमिळनाडू
B. प.बंगाल व आसाम
C. केरळ व तामिळनाडू
D. महाराष्ट्र व गुजरात
उत्तर: A
Q178. जगातील सर्वात अधिक पाऊस खालीलपैकी कुठे पडतो?
A. चेरापुंजी
B. मनाली
C. मौसिनराम
D. सिक्कम
उत्तर: C
Q179. सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कुठे होतो?
A. गंगोत्री
B. यमुनोत्री
C. मान सरोवर जवळ
D. सांभर सरोवर जवळ
उत्तर: C
Q180. भारतातील घटकराज्य व केंद्रशासित प्रदेश संख्येचा योग्य पर्याय निवडा.
A. 28, 7
B. 29, 7
C. 28, 6
D. 28, 6
उत्तर: B
Q181. क्षेत्रपळाच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे?
A. तिसरा
B. पाचवा
C. सातवा
D. नववा
उत्तर: C
Q182. द्विपकल्प म्हणजे काय ?
A. दोन नद्यांमधील प्रदेश
B. नदीय बेट
C. मुख्य भूमीच्या निमुळत्या बाजूंना पाणी
D. समुद्रातील बेट
उत्तर: C
Q183. भारतातील सर्वात दक्षिणकडील टोक खालीलपैकी कोणते?
A. अंदमान
B. कन्याकुमारी
C. इंदिरा पॉईंट
D. निकोबार
उत्तर: C
Q184. वातावरणाततील सर्वात कमी तापमान खालीलपैकी कोणत्या थरात आढळते?
A. तपांबर
B. मध्यांतर
C. आयनांबर
D. बाह्यांबर
उत्तर: B
Q185. प्रसिध्द फ्रेंडशिप गार्डन खालीलपैकी कोठे आहे?
A. बंगलोर
B. भिलाई
C. चंडीगढ
D. जैसलमेर
उत्तर: B
Q186. कोणते सरोवर हे उल्कापात मुळे तयार झाले आहे?
A. चिल्का
B. सांभर
C. मान
D. लोणार
उत्तर: D
Q187. छोटा नागपूर पठार हे खालीलपैकी कोणत्या पठाराचा एक भाग आहे?
A. मारवाड
B. मेवाड
C. दख्खन
D. बुंदेलखंड
उत्तर: C
Q188. खालीलपैकी कोणते पठार हे अतिप्राचीन पठार म्हणून ओळखले जाते?
A. दख्खन
B. मारवाड
C. मेवाड
D. माळवा
उत्तर: A
Q189. चंबळ, बेटवा, सिंद या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
A. गंगा
B. कोसी
C. यमुना
D. गंडक
उत्तर: C
Q190. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
A. कळसुबाई
B. अनैमुडी
C. महाबळेश्वर
D. दोडाबेट्टा
उत्तर: B
Q191. खालीलपैकी कोणते राज्य पातळीवरील पशुरोग संशोधन केंद्र आहे?
A. अमरावती
B. अहमदनगर
C. कोल्हापुर
D. पुणे
उत्तर: D
Q192. 2011 च्या जनगनने नुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे?
A. 833
B. 922
C. 925
D. 950
उत्तर: C
Q193. एप्रिल व मे महिन्यात महाराष्ट्राच्या काही भागत पाऊस पड़तो याला खालीलपैकी काय म्हणार?
A. वळवाचा पाऊस
B. वादळी पाऊस
C. पहिला पाऊस
D. आंबेसरी
उत्तर: D
Q194. विष्णूपुरी धरण कोणत्या नदी वर आहे?
A. कोयना
B. पैनगंगा
C. भीमा
D. वरीलपैकी एकही नाही
उत्तर: D
Q195. महाराष्ट्रातुन खालीलपैकी कोणते राष्ट्रीय राजमार्ग जातात ?
NH-3
NH-4
NH-7
NH-8
A. 1,2,व 3
B. 2,3 व 4
C. 1,4 व 4
D. वरील सर्व
उत्तर: D
Q196. पुढील कोणते विधान योग्य आहेत ?
1. सहस्त्रकुंड धबधबा वेनगंगा नदीवर आहे.
2. वणी हे गाव निरगुडा नदीवर वसलेले आहे.
A. केवळ 1 योग्य
B. केवळ 2 योग्य
C. 1,2 योग्य
D. 1,2 अयोग्य
उत्तर: B
Q197. उत्तरेकडुन दक्षिणेकडे, रत्नागिरी जिल्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे?
A. सावित्रि, भारजा, जोग, वशिष्ठी
B. वशिष्ठी, जोग, भारजा, सावित्री
C. जोग, भारजा, वशिष्ठी, सावित्री
D. सावित्री, वशिष्ठी
उत्तर: A
Q198. खालील विधाने लक्षात घ्या ?
1. मिखाईल कलाश्र्निको्ह याने सोव्हिएत युनियन करिता एके 47 या शस्त्राची रचना केली.
2. या शस्त्राच्या नावातूनच त्याला अमरत्न प्राप्त झाले.
3. वयाच्या 94 व्या वर्षी तो मरण पावतो.
4. हे शस्त्र वालुकामय तसेच आर्द्र परिस्थितीत वापरता येते.
A. फक्त 1
B. 2 व 3
C. 3 व 4
D. सर्व बरोबर
उत्तर: D
Q199.पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. ?
1. डोलोमाईट हा खडक महाराष्ट्राच्या कडप्पा प्रणाली मध्ये सापडतो.
2. चुनखडी खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणाली मध्ये सापडतो
A. 1 योग्य
B. 2 योग्य
C. 1,2 योग्य
D. 1,2 अयोग्य
उत्तर: D
Q200. गोदावरी नदीला वृध्द गंगा म्हणतात कारण-
A. गोदावरीला नदीच्या विस्तृत आकार व विस्तारामुळे
B. गोदावरी नदी भारतातली जूनी नदी असल्यामुळे
C. गोदावरी नदीची लांबी गंगा नदी एवढी असल्यामुळे
D. गोदावरीला नदी काठावर अनेक तीर्थस्थान असल्यामुळे
उत्तर: B
Q201. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहेत ?
1. मालवण जवळील खांदेरी बेदावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे
2. एलीफंता लेणी उंदेरी बेटावर आढळते.
A. 1 योग्य
B. 2 योग्य
C. 1,2 योग्य
D. 1,2 अयोग्य
उत्तर: B
Q202. महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण-
A. उन्हाळ्यात पाऊस पडत नाही
B. उन्हाळ्यात तापमान जास्ती असते
C. उन्हाळ्यात हवामान विषम असते
D. बाष्पीभवन कमी करन्यास्तव
उत्तर: D
Q203. लोहखनिजात असलेल्या प्रमानावरून लोहखनिजाचे उच्च प्रतीकडून क्रम लावा?
अ.हेमेटाईट
ब. सिडेराईट
क.मॅग्नेटाइट
ड. लीमोणाईट
A. 1,4,3,2
B. 3,1,4,2
C. 3,2,1,4
D. 4,3,2,1
उत्तर: B
Q204. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गळाच्या संचयनाचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे?
A. तराई, खादर, भांगर
B. तराई, भांगर. खादर
C. खादर, भांगर, तराई
D. भांगर, तराई, खादर
उत्तर: A
Q205. खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणेे आणि अहमदनगर जिल्याची नैसर्गिक सीमा आहे?
A. गोदावरी
B. भिमा
C. कृष्णा
D. वरीलएकही नाही
उत्तर: B
Q206. भारताचे सर्वात पर्वेकडील रेखावृत्त कोणते?
A. 97′ 25′ E
B. 67′ 7′ E
C. 82′ 50′ E
D. 90′ 25′ E
उत्तर: A
Q207. लु हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने…………..
A. एप्रिल – मे
B. मे-जून
C. जून-जूलै
D. ऑक्टोबर-नोव्हेंबर
उत्तर: B
Q208. गुरू शिखर कोणत्या पर्वतरांगेतील सर्वोच शिखर आहे?
A. छोटा नागपूर
B. विंध्य
C. अरवली
D. मालवा
उत्तर: C
Q209. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता?
A. लातूर
B. वाशीम
C. जालना
D. सिंधूदुर्ग
उत्तर: D
Q210. कसौली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
A. पंजाब
B. उत्तराखंड
C. हिमाचल प्रदेश
D. पश्चिम बंगाल
उत्तर: C
Q211. खालीलपैकी कोणती जमात सह्याद्री पर्वत क्षेत्रात आढळत नाही?
A. महादेव कोळी
B. ठाकर
C. गोंड
D. वारली
उत्तर: C
Q212. अभोर व अप्तानी या जमाती कोणत्या राज्यात आढळतात?
A. मेघालय
B. सिक्कीम
C. अरूणाचल प्रदेश
D. त्रिपूरा
उत्तर: B
Q213. भारतातील खालीलपैकी कोणते क्षेत्र जैवविविधतेला सुरक्षित ठेवण्यासाठी पहिल्यांदा आरक्षित करण्यात आली?
A. निलगीरी
B. पश्चिम घाट
C. काझीरंगा
D. सुंदरबन
उत्तर: A
Q214. खालीलपैकी कोणत्या भागात चहा व कॉफी हि दोन्ही पिके घेतली जातात?
A. ईशान्य भारत
B. नैऋत्य भारत
C. वायव्य भारत
D. आग्नेय भारत
उत्तर: B
Q215. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?
A. तापी
B. नर्मदा
C. वैनगंगा
D. कृष्णा
उत्तर: C
Q216. राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 व 7 खालीलपैकी कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात?
A. भोपाळ
B. हैदराबाद
C. नागपूर
D. रायपुर
उत्तर: C
Q217. भारतात खालीलपैकी कोठे सोने सापडले आहे?
A. कोलार
B. खेत्री
C. पन्ना
D. कटनी
उत्तर: A
Q218. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खाजगी सर्वाधिक साखर कारखाने आहेत?
A. अहमदनगर
B. सांगली
C. कोल्हापूर
D. सातारा
उत्तर: C
Q219. खालीलपैकी कोणत्या नदीतून मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येत नाही?
A. तानसा
B. मानसा
C. तुलसी
D. मुठा
उत्तर: D
Q220. देशातील एकमेव सागरी सेतू कोणत्या दोन शहरांना जोडतो?
A. मुंबई-पुणे
B. मुंबई-नवी मुंबई
C. नरीमन पॉईंट-बांद्रा
D. बांद्रा-वरळी
उत्तर: D
Q221. २०२२ मध्ये भारताचा जागतिक दुध उत्पादनात कितवा क्रमांक होता?
A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. चौथा
उत्तर: A
Q222. पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यातआहे?
A. राजस्थान
B. महाराष्ट्र
C. मध्यप्रदेश
D. छत्तीसगढ
उत्तर: C
Q223. चौधरी चरण सिंह राष्ट्रीय कृषी विपणन संस्था भारतात कोठे आहे?
A. मुंबई
B. पुणे
C. जयपुर
D. चेन्नई
उत्तर: C
Q224. माती आणि वेतकामासाठी प्रसिध्द असणारे खालीलपैकी राज्य ओळखा?
A. त्रिपूरा
B. आसाम
C. मेघालय
D. मणिपूर
उत्तर: A
Q225. खालीलपैकी कोणता भाग हा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात शुष्क असतो?
A. कोरोमंडल
B. कोकण
C. मलबार
D. उत्तर भारत
उत्तर: A
Q226. पांबम बेट खालीलपैकी कोणत्या भागात आहे?
A. अंदमान
B. निकोबार
C. तामिळनाडू पठारावर
D. लक्षद्वीप
उत्तर: C
Q227. पूर्व किनारपट्टीची उत्तर सीमा म्हणजे …………….होय.
A. महानंद
B. राजमहल डोंगररांग
C. सुवर्णरेखा नदी
D. हुगळी नदी
उत्तर: C
Q228. कागद निर्मिती संशोधन केंद्र कोठे आहे?
A. मुंबई
B. डेहराडून
C. भोपाळ
D. मथुरा
उत्तर: B
Q229. महाराष्ट्राचे जंगलाबाबतचे विद्यालय कोठे आहे?
A. गडचिरोली
B. वर्धा
C. अकोला
D. चंद्रपूर
उत्तर: C
Q230. आयोग्य जोडी ओळखा
A. साबरमती-अमरावती
B. महानदी-कटक
C. क्षिप्रा-इंदौर
D. तावी-काश्मीर
उत्तर: D
Q231. गोबीचे वाळवंट(Gobi Desert) कोणत्या देशात आहे?
A. कझाकिस्तान
B. म्यानमार
C. दक्षिण कोरिया
D. चीन
उत्तर: D
Q232. युरोपातील सर्वात मोठी नदी कोणती?
A. हाइन
B. वोल्गा
C. डॉन
D. सुदा
उत्तर: B
Q233. जगप्रसिध्द यलोस्टोन कोणत्या देशात आहे?
A. बेल्जियम
B. ऑस्ट्रेलिया
C. अमेरिका
D. कॅनडा
उत्तर: C
Q234. कुडनकुलम अणुउर्जा प्रकल्पास कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे?
A. अमेरिका
B. रशिया
C. जर्मनी
D. फ्रांस
उत्तर: B
Q235. खालीलपैकी कोणत्या शहराला सूर्याची लंबरूप किरण मिळू शकत नाही?
A. मुंबई
B. भोपाळ
C. जम्मू
D. चेन्नई
उत्तर: C
Q236. समान तापमान असणार्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषांना काय म्हणतात?
A. समताप रेषा
B. समभार रेषा
C. अक्षवृत्त
D. समशीतोष्ण रेषा
उत्तर: A
Q237. झोजिला खिंड कोणत्या राज्यात आहे?
A. जम्मू काश्मीर
B. सिक्कीम
C. उत्तराखंड
D. हिमाचल प्रदेश
उत्तर: A
Q238. कोणत्या राज्याचा किनारा दक्षिण अमेरिकेतून आणलेल्या विशाल ऑलिव्ह रिडले कासवासाठी अंडी घालण्याच्या जागेसाठी प्रसिध्द आहे?
A. गोवा
B. गुजरात
C. तामिळनाडू
D. ओडिशा
उत्तर: D
Q239. योग्य विधान ओळखा-
अ. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात केरळ हे सर्वआधिक साक्षर राज्य आहे.
ब. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात लक्षद्विप हा सर्वाधिक साक्षर केंद्रशासित प्रदेश आहे.
A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. यापैकी नाही
उत्तर: C
Q240. वसईच्या खाडी कोणत्या नदी मुळे तयार झाल्या आहेत?
A. उल्हास
B. तानसा
C. वैतरणा
D. पाताळगंगा
उत्तर: A
Q241. महाराष्ट्रात एकूण तृणधान्याचे सर्वात उत्पादन कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. यवतमाळ
B. अहमदनगर
C. परभणी
D. अमरावती
उत्तर: B
Q242. देशातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक करणारे बंदर कोणते?
A. मुंबई
B. जेएनपीटी
C. हल्दिया
D. कोची
उत्तर: B
Q243. खालीलपैकी कोणता नॅरोगॅज लोहमार्ग नाही?
A. पाचोरा-जामनेर
B. मुर्तीजापुर-यवतमाळ
C. सोलापुर-गदग
D. मुर्तीजापुर-अचलपूर
उत्तर: C
Q245. निझामसागर जलविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे?
A. कर्नाटक
B. सिमांध्र
C. तेलंगना
D. केरळ
उत्तर: C
Q246. महाराष्ट्रात ……………….मध्ये पुरूषांपेक्षा सित्र्यांचे स्थलांतर जास्त असते.
A. ग्रामीण भागातून नागरी भागा मध्ये
B. नागरी भागातून ग्रामीण भागा मध्ये
C. एकाच जिल्ह्याअंतर्गत व जिल्ह्या-जिल्ह्यामधील स्थलांतर
D. एका नागरी भागातून दूसर्या नागरी भागात स्थलांतर
उत्तर: C
Q247. वॅटिकन सिटी हा देश कोणत्या देशाने सगळया बाजूंनी वेढला गेलेला आहे?
A. रोम
B. फ्रांस
C. इटली
D. ग्रीस
उत्तर: C
Q248. खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी कोपनहेगन आहे?
A. पोर्तुगाल
B. लिस्बन
C. कॅलिफोर्निया
D. डेनमार्क
उत्तर: D
Q249. महाराष्ट्रात खरीफ हंगामात कोणत्या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र असते?
A. तांदूळ
B. ऊस
C. ज्वारी
D. कापूस
उत्तर: A
Q250. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात अभ्यारण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे?
A. नागपूर
B. अमरावती
C. औरंगाबाद
D. कोकण
उत्तर: B
Q251. किलिमंजारो हा पर्वत कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी आहे?
A. केंद्रीय ज्वालामुखी
B. भेगीय ज्वालामुखी
C. अ व ब
D. निद्रिस्त
उत्तर: A
Q252. सर्वात जास्त गव्हाचे क्षेत्र असलेला जिल्हा कोणता?
A. अहमदनगर
B. जळगाव
C. बुलढाणा
D. औरंगाबाद
उत्तर: A
Q253. पूर्वीचा निजाम (हैदराबाद) राज्यात कोणत्या जिल्ह्याचा समावेश नव्हता?
A. औरंगाबाद
B. उस्मानाबाद
C. नांदेड
D. सोलापूर
उत्तर: D
Q254. खालीलपैकी कोणते प्राणी पक्षी अंटार्टीका खंडात आढळतात?
अ. पेंग्विन
ब. देवमासे
क. सील
ड. स्कुआ पक्षी
A. अ आणि ब
B. अ, ब आणि क
C. ब आणि क
D. वरील सर्व
उत्तर: D
Q255. अल्लापल्ली अरण्ये कोणत्या ठिकाणी आढळतात?
A. आंध्रप्रदेश
B. गडचिरोली
C. कोकण
D. विदर्भ
उत्तर: B
Q. खालीलपैकी कोणत्या पाणीवाटप तंट्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहभागी आहे?
अ. कृष्णा नदी पाणी वाटप तंटा
ब. गोदावरी नदी पाणी वाटप तंटा
क. नर्मदा नदी पाणी वाटप तंटा
ड. कावेरी नदी पाणीवाटप तंटा
A. अ व ब
B. अ व ड
C. अ व क
D. वरील सर्व
उत्तर: C
Q256. योग्य विधाने ओळखा-
अ. गाविलगड टेकड्यांचे दक्षिण उतार अतिशय तीव्र स्वरूपाचा आहे.
ब. सह्याद्रीचा उतार पश्चिमेकडे अतिशय मंद स्वरूपाचा आहे.
A. फक्त अ योग्य
B. फक्त ब योग्य
C. वरील दोन्ही
D. दोन्ही पैकी एकही नाही
उत्तर: A
Q257. नुकतेच चर्चेत आलेले जांगूम धरण कोणत्या नदीवर बांधण्यात येते आहे?
A. ब्रम्हपूत्र
B. गंगा
C. सिंधू
D. झेलम
उत्तर: B
Q258. जीवशास्त्रीय समूहांमध्ये अन्य अनेक प्रजातींची त्या समूहात टिकून राहण्याची क्षमता ठरवणाऱ्या काही महत्वाच्या प्रजाती असतात. अशा प्रजातींनार …….. म्हणतात?
A. मध्यशिला प्रजाती
B. क्षेत्रातीरिक्त प्रजाती
C. समक्षेत्रिक प्रजाती
D. जोखमीत प्रजाती
उत्तर: A
Q259. शेतीविषयक खालील गोष्टी लक्षात घ्या.
1. समतल सामोच्च बांध
2. पिकपालट पध्दत
3. शून्य मशागत
जागितक जलवायुमान बदलासंदर्भात वरीलपैकी कोणत्या गोष्टी जमिनीत कार्बन साठून राहण्यास मदत करतात.
A. 1,2
B. 3
C. सर्व
D. एकही नाही
उत्तर: C
Q260. पुढीलबाबी लक्षात घ्या
1. प्रकाश संश्लेषण
2. श्वसन
3. सेंद्रिय द्रव्यांचे विघटन
4. ज्वालामुखी क्रिया
यापैकी कोणत्या बाबी पृथ्वीवरील CO2 मध्ये वाढ करण्यास कारणीभूत आहेत?
A. 1,4
B. 2,3
C. 2,3,4
D. वरीलसर्व
उत्तर: C
Q261. खाजण वनस्पतींचा उपयोग खालीलपैकी कोणत्या कारणांसाठी होतो?
A. सागरी मीठ तयार करणे
B. रोगांवर नैसर्गिक औषध
C. सागर किनार्यांची झीज कमी करणे
D. यापैकी नाही
उत्तर: C
Q262. तळी व विहिरींमधील सोडलेला पुढीलपैकी कोणता प्राणी डासांचे नियंत्रण करतो?
A. खेकडा
B. स्वानमत्स
C. गप्पी मासा
D. गोगलगाय
उत्तर: C
Q263. खालील विधान बघा-
1. मार्शेस हा भाग पाणथळ क्षेत्र व मुख्य जमीन यांना जोडणारा दुवा असतो.
2. पाणथळ क्षेत्र व जमीन यांना जोडणार्या भागाला स्वॅम्पी भूभाग म्हणून ओळखतात.
A. 1 बरोबर
B. 2 बरोबर
C. वरीलपैकी नाही
D. दोन्ही बरोबर
उत्तर: A
Q264. मंगळा संबंधी खालील विधानांचा विचार करा-
अ. विरळ वातावरण
ब. शुष्क नदी पात्र
क. -30° से. ते – 100° से. तापमान
ड. फोबोस हा एकमेव उपग्रह
वरील विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
A. अ आणि ड
B. ब आणि ड
C. क आणि ड
D. अ आणि ब
उत्तर: D
Q265. समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते?
A. मिसिसिपीौ
B. अमेझॉन
C. कॉलोरॅडो
D. बियास
उत्तर: C
Q266. मुगा रेशिमच्या उत्पादनात मक्तेदारी आहे त्याचे उत्पादन ……………..राज्यांत होते?
A. आसाम आणि बिहार
B. कर्नाटक आणि उत्तर प्रदेश
C. कर्नाटक आणि तामिळनाडू
D. काश्मिर आणि हिमाचल प्रदेश
उत्तर: A
Q267. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे?
A. अरूणाचल प्रदेश
B. छत्तीसगढ
C. हिमाचल प्रदेश
D. गुजरात
उत्तर: C
Q268. खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही?
A. दख्खनचे पठार
B. अरेबियाचे पठार
C. ब्राझिलचे पठार
D. तिबेतचे पठार
उत्तर: D
Q269. खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात?
A. दक्षिण अमेरिका
B. आफ्रिका
C. आशिया
D. युरोप
उत्तर: B
Q270. किसान सभेचे पाहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते?
A. मुंबई, 1942
B. ठाणे, 1945
C. टीटवाळा, 1945
D. पुणे, 1942
उत्तर: C
Q271. अभोर व अप्तानी या जमाती भारतातल्या कोणत्या भागात आळतात?
A. नागालँड
B. सिक्कीम
C. अरूणाचल प्रदेश
D. हरियाणा
उत्तर: B
Q272. हिंदी महासागरामधील भारताचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘Peral of Ring’ हि योजना कोणत्या देशाने राबविली?
A. अमेरिका
B. रशिया
C. चीन
D. ऑस्ट्रेलिया
उत्तर: C
Q278. दलहस्ती उर्जा निर्मीती केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे?
A. चिनाब
B. कृष्णा
C. पेन्नार
D. कावेरी
उत्तर: A
Q279. लाटांपासून वीजनिर्मीती करण्याची क्षमता खालीलपैकी कोणत्या भागात सर्वाधिक आहे?
A. खंभातचे आखात
B. मन्नारचे आखात
C. पाल्कची सामुद्रधुनी
D. केरळ किनारपट्टी
उत्तर: A
Q280. ओट्टमथुलाल हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
A. तामिळनाडू
B. ओरिसा
C. केरळ
D. उत्तरप्रदेश
उत्तर: C
Q281. मध्य आशियातील देशातून भारताला कोणत्या वस्तू आयात कराव्या लागतात?
A. कच्चे सुत व सतरंज्या
B. खजूर व ऑलिव्ह
C. रत्ने
D. कॉफी
उत्तर: B
Q282. सेतूसमुद्रम प्रकल्पाबाबत खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
A. हा प्रकल्प भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान आहे.
B. हा प्रकल्प अमेरिकेच्या सहाय्याने राबविले जात आहे.
C. या प्रकल्पामुळे हिंदी महासागरावर भारताचे नियंत्रण वाढवणार आहे.
D. या प्रकल्पामुळे भारताला आर्थिक फायदा होणार आहे.
उत्तर: B
Q283. सागरलाटांचे खननकार्य खालीलपैकी कोणकोणत्या बाबींवर अवलंबून असते?
अ) लाटा
ब) किनार्यावरील
क) लाटाबरोबर वाहून येणारे पदार्थ
A. फक्त अ आणि ब
B. फक्त ब आणि क
C. फक्त अ
D. वरील सर्व
उत्तर: D
Q284. कोणकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा
A. धरमतर खाडी-विजयदूर्ग खाडी-राजापुरी-दाभोळची खाडी
B. धरमतर खाडी-विजयदूर्ग खाडी-राजापूरी खाडी-तेरेखाली खाडी
C. धरमतर खाडी-राजापुरी खाडी-दाभोळची खाडी-विजयदुर्ग खाडी
D. धरमतर खाडी-विजयदुर्ग खाडी-तेरेखोल खाडी-दाभोळची खाडी
उत्तर: C
Q285. योग्य विधान ओळखा
अ) कडधान्य उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे.
ब) भुईमूग उत्पादनात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो.
क) महाराष्ट्रात लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते.
ड) भारतात ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक महाराष्ट्रात आहे.
A. फक्त अ, ब आणि क
B. फक्त ब आणि ड
C. फक्त ड
D. फक्त अ आणि क
उत्तर: C
विद्यार्थीमित्रांनो भूगोलासंबंधी संपूर्ण प्रश्न मी Geography GK in Marathi या लेखात समाविष्ट करण्याचा प्रयन्त केला आहे. माझ्या अनुभवावरून आता पर्यंत महाराष्ट्र भरती परीक्षेमध्ये भूगोलासंबंधी जे जे प्रश्न आतापर्यंत विचारले गेले आहेत ते सर्वच प्रश्न तुम्हाला या एकाच लेखात भेटून जातील. तुम्हाला काही शंका असतील मग त्या या लेखासंबंधी असतो किव्हा एखाद्या परीक्षेसंबंधी तुम्ही तुमच्या मनातल्या सर्व शंका खाली कंमेंट द्वारे विचारू शकता. मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रश्न करेन.
हे देखील वाचा:
MPSC History Of Maharashtra in Marathi