MPSC History Of Maharashtra | महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे
महाराष्ट्रातील नेवासे, चांदोली, सोमगाव, टेकवाडे, सावरदे व दायमाबाद इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.
महाराष्ट्रातील महापाषाण युगाचा काळ इ.स.पूर्व 1000 वर्षापूर्वीचा आहे.
मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रात सातवाहन राजघराण्याचा उदय झाला.
जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे ‘सातवाहन’ हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय.
‘सिमुक’ हा राजा सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो.
सातवाहन ‘राजा सातकर्णी’ प्रथम व त्याची रानी ‘नागणिका’ यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाटात आढळून येते.
चालुक्य हे वैष्णवपंथी होते, तरीही त्यांनी धर्मसंहिष्णुतेचे धोरण राबविले होते.
इ.स. 753 च्या दरम्यान चालुक्य घराण्याच्या र्हासानंतर ‘दंतीदुर्ग’ याने राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली.
राष्ट्रकूट घराण्यातील ‘कृष्ण प्रथम’ याने जगप्रसिद्ध असलेले ‘वेरूळ येथील कैलास मंदिर’ बांधले .
शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण, उत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी सत्ता केंद्रे होती.
शिलाहार घराण्याचा संस्थापक म्हणून ‘विद्याधर जीमुतवाहन’ हा असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर (तेर) हे त्याचे मूल स्थान होय.
चंद्रपुर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता निर्माण केली तसेच या घराण्याचा संस्थापक ‘कोल भिल’ हा होता.
यादवांचा प्रधान हेमाद्री याने ‘चातुरवर्ग चिंतामणी’ हा ग्रंथ लिहिला.
अल्लाउद्दीन खिलजी याने 1296 मध्ये देवगिरीवर स्वारी केली.
महाराष्ट्रात बहामणी राज्याची स्थापना ‘हसन गंगू बहामणी’ याने केली तो या राज्याचा संस्थापक मानला जातो.
बहामणी राज्याचे पुढील पाच तुकडे झाले. वर्हाडी – इमादशाही, अहमदनगर – निजामशाही, बिदर – बरीदशाही, गोवलकोंडा – कुतुबशाही, विजापूर – आदिलशाही.
विजापूरची आदिलशाही राज्याची युसुफ अदिलशाह याने 1489 मध्ये स्थापना केली
‘गुरु नानक’ हे शीख धर्माचे संस्थापक मानले जातात.
गुरु गोविंदसिंग नांदेड मध्ये मुक्कामी असताना इ.स.1708 मध्ये दोन पठाणांकडून त्यांची हत्या झाली.
19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली.
6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले.
1761 मध्ये तिसरे पानीपतचे युद्ध घडून आले.
1802 मध्ये इंग्रज आणि मराठे यांच्यात वसईचा तह होऊन मराठ्यांनी तैनाती फौज स्वीकारली.
शिवाजी महाराजांनी जमीन मोजण्यासाठी एक काठी तयार केली होती तिला ‘शिवशाही काठी’ असे म्हटले जात असे.
शिवाजी महाराजांनी दोन नाणी सुरू केली होती त्यामध्ये ‘होन’ हे सोन्याचे तर ‘शिवराई’ हे तांब्याचे नाणे होते.
दक्षिण भारतामध्ये ‘नायनार आणि अलवार’ या भक्ती चळवळी उदयास आल्या.
महाकवी सूरदास यांनी ‘सुरसागर’ हे काव्य लिहिले.
शिलाहार राजे प्रथम राष्ट्रकूटाचे व नंतर चालुक्य व यादवांचे अंकित झाले. चालुक्य राजा दुसर्या पुलकेशीने आपला मुलगा चंद्रादित्य यास सामंत म्हणून 630 च्या सुमारास नेमले व चांदोर सध्याचे चंद्रपुर ही आपली राजधानी बनवली.
23 जून 1757 च्या प्लासीच्या युद्धात बंगालच्या नवाबचा पराभव करून ब्रिटीशांनी बंगालमध्ये आपली सत्ता निर्माण केली.
1818 मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.
ग्रजांनी उमाजी नाईकांच्या विरोधात पहिला जाहीरनामा 1826 साली काढला.
उमाजी नाईक व त्याचा साथीदार पांडुजी याला पकडण्यासाठी रु.100/- चे बक्षीस जाहीर केले.
उमाजी नाईकांचा जुना शत्रू बापुसिंग परदेशी याने इंग्रजांना सहकार्य करून नाईकांना पकडून देण्यास मदत केली. काळू व नाना यांनी विश्वासघाताने उमाजीला पुण्याच्या मुळशीजवळ अवळसा येथे आणून पकडून देण्यास मदत केली.
नानाने उत्तोळी येथे 15 डिसेंबर 1831 रोजी उमाजीला पकडले आणि इंग्रजांच्या स्वाधीन केले.
3 फेब्रुवारी 1834 रोजी उमाजी नाईकला फाशी देण्यात आली.
कोळी जातीच्या लोकांनी 1828 मध्ये मुंबई विभागात ब्रिटिशांविरोधी रामजी भांगडि याच्या नेतृत्वाखाली उठाव केला.
पुणे जिल्ह्यात 1839 मध्ये कोळी जमातीच्या लोकांनी उठाव केला.
ब्रिटिश राजवटीविरुद्ध सर्वात मोठा उठाव म्हणून 1857 च्या उठावाकडे पाहिले जाते.
स्वातंत्र्य वीर सावरकरांनी 1857 च्या उठावास पहिले स्वातंत्र्य समर असे म्हटले आहे. तर इतिहासकार न.र. फाटक यांनी शिपायांची भाऊगर्दी असे संबोधिले आहे.
सातार्याचे छत्रपती प्रतापसिंग यांचे गेलेले राज्य परत मिळण्यासाठी रांगो बापुजी यांनी 1857 च्या उठावाच्या वेळी खूप प्रयत्न केले.
1857 च्या उठावाच्या वेळी 31 जुलै 1857 रोजी कोल्हापुरात इंग्रजांविरुद्ध उठाव झाला.
नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी कोळ्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला यामध्ये पेठचा राजा भगवंतराव नीलकंठ राव हा प्रमुख होता.
13 जून 1957 रोजी नागपूरमधील लोकांनी 1857 च्या उठावात भाग घेवून इंग्रजांविरुद्ध उठाव केला.
1857 साली महाराष्ट्रात पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये दख्खनचे दंगे घडून आले. हे दंगे म्हणजे शेतकर्यांनी सावकार विरुद्ध केलेले उठाव होत.
वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर,1845 रोजी कुलाबा जिल्ह्यातील ‘सिरधोण’ येथे झाला.
गणेश वासुदेव जोशी यांनी समाजामध्ये ऐक्य ,समन्वय निर्माण व्हावा म्हणून ‘ऐक्यवर्धणी’ ही संस्था स्थापन केली. व त्याच वेळी पुण्यात 1874 ‘पुना नेटीव्ह इन्स्टिट्यूशन’ ही शाळा सुरू केली.
20 फेब्रुवारी, 1889 नंतर वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी, कोळी, महार आणि मुसलमान इत्यादी लोकांच्या मदतीने पुणे जिल्ह्याच्या परिसरात दरोडे घालण्यास सुरुवात केली.