Arogya Vibhag Bharti Question Paper | महाराष्ट्र आरोग्य भरती प्रश्नपत्रिका

महाराष्ट्र आरोग्य भरती प्रश्नपत्रिका | Arogya Vibhag Bharti Question Paper

Arogya Vibhag Bharti Question Paper: विद्यार्थीमित्रांनो तुम्हाला आता आरोग्य भरती परीक्षेची तारीख तर समजलीच असेल. जस कि तुम्हाला माहिती असेल कि ३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर दरम्यात public health department म्हणजे आपल्या राज्यातील महाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा पार पडणार आहेत. जर तुम्हाला अजून पर्यंत या परीक्षांचे वेळापत्रक भेटले नसेल तर या लेखाच्या शेवटी मी Arogya Bharti 2023 timetable ची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो वेळापत्रक डाउनलोड करू शकता.

महाराष्ट्र आरोग्य भरती प्रश्नपत्रिका या लेखात मी आरोग्य भरती २०२१ च्या परीक्षेमध्ये विचारलेले १००+ PYQ म्हणजेच Previous Year Questions समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा हे सर्व प्रश्न वाचून नक्की जा.

Arogya Vibhag Bharti Question Paper

Q1. खालीलपैकी कशामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते?

A. डाळी
B. सफरचंद
C. दूध
D. खाद्यतेल

Q2. HIV विषाणू शरीराच्या कोणत्या पेशींवर हल्ला करतात?

A. श्वेतपेशी
B. रक्तपेशी
C. थ्रोम्बोसाईट
D. चेतापेशी

Q3. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे?

A. कॉलरा – बॅक्टेरिया
B. मलेरिया – फंगी
C. कॉमनकोल्ड – प्रोटोझा
D. रिंग वर्म – वायरस

Q4. औषधाची बाटलीत बरेचदा सिलिका जेल ची एक छोटी पिशवी आढळते कारण की सिलिका जेल?

A. जिवाणू नष्ट करते
B. औषधांचा वास घालवते
C. आद्रता शोषते
D. बाटलीतील वायू शोषते

Q5. सर्वात अस्थायी स्वरूपाचे जीवनसत्व कोणते?

A. इ जीवनसत्व
B. क जीवनसत्व
C. ब जीवनसत्व
D. ड जीवनसत्व

Q6. जागतिक हात धुवा दिन कधी साजरा केला जातो?

A. 15 सप्टेंबर
B. 30 सप्टेंबर
C. 15 ऑक्टोबर
D. 30 ऑक्टोबर

Q7. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्षी किती रकमेचा लाभ घेता येतो?

A. 1 लाख
B. 1.5 लाख
C. 2 लाख
D. 2.5 लाख

Q8. निर्दोष डोळ्यात प्रतिमा कुठे तयार होते?

A. दृष्टीपटलामागे
B. दृष्टिपटलावर
C. पितबिंदूपुढे
D. यापैकी नाही

Q9. डोंगराळ व अतिदुर्गम भागातील उपकेंद्र अंतर्गत असलेली लोकसंख्या किती?

A. 3000
B. 5000
C. 6000
D. 9000

Q10. खालीलपैकी कशासाठी कॅल्शियम हा घटक उपयुक्त आहे?

A. लोह चयापचन
B. जखम बरी होण्यासाठी
C. हाडे व दातांसाठी
D. यापैकी नाही

Q11. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात प्रथम किती राज्यांसाठी लागू केली होती?

A. 10 राज्यांसाठी
B. 18 राज्यांसाठी
C. 22 राज्यांसाठी
D. यापैकी नाही

Q12. गोलकृमी आकाराच्या जिवाणूला काय म्हणतात?

A. बॅसिल
B. कोकी
C. स्पायरल
D. यापैकी नाही

Q13. चुंबकसूची नेहमीच…… दिशा दर्शविते?

A. पूर्व-पश्चिम
B. पूर्व दक्षिण
C. उत्तर-दक्षिण
D. उत्तर-पश्चिम

Q14. कुटुंब नियोजनासाठी बसवण्यात येणारी तांबी साधारणपणे किती वर्षांनंतर बदलावी लागते?

A. पाच वर्ष
B. सहा वर्ष
C. तीन वर्ष
D. दोन वर्ष

Q15. नाडीचा वेग दर मिनिटाला 120 पेक्षा जास्त वाढल्यास त्याला काय म्हणतात?

A. डिस्पनिया
B. टॅकिकार्डिया
C. ब्रॅडीकार्डिया
D. यापैकी नाही

Q16. मुतखड्याचा नाश करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते?

A. केमोथेरपी
B. लिथोट्रिप्सी
C. स्टोनोलॉजी
D. यापैकी नाही

Q17. महिलांना कमी मासिक पाळी मध्ये सर्वसाधारण उपचार म्हणून कोणत्या गोळ्या देण्यात येतात?

A. लोह
B. फॉलीक ऍसिड
C. A व B
D. यापैकी नाही

Q18. लोण्याचे तूपात रूपांतर होताना खालीलपैकी कोणते जीवनसत्व कमी होते?

A. क
B. ड
C. अ
D. यापैकी नाही

Q19. मुळव्याध असलेल्या रुग्णांनी खालीलपैकी कोणता आहार घ्यावा?

A. प्रथीनयुक्त
B. कॅल्शियमयुक्त
C. फायबरयुक्त
D. यापैकी नाही

Q20. जगातील दरवर्षी होणाऱ्या मृत्यू मध्ये किती टक्के मृत्यू कर्करोगामुळे होतात?

A. 10%
B. 20%
C. 9%
D. 5%

Q21. पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीराचा सांगाडा स्त्री आहे की पुरुष हे खालील कोणत्या हाडांवरून लक्षात येत?े

A. किमर
B. पेल्विक गर्डल
C. थोरायसिस केज
D. टीबीया फिस्तुला

Q22. खालीलपैकी कोणता वायू वैदिकशास्त्रात शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्यासाठी वापरला जातो?

A. हेलीका
B. नायट्रस ऑक्साईड
C. कार्बन डाय-ऑक्साइड
D. क्लोरीन

Q23. मानवी शरीरातील श्वेतपेशीचे प्रमुख कार्य कोणते?

A. शरीराची वाढ
B. रक्त गोठणे
C. शरीररक्षण
D. वहन

Q24. विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला?

A. आईन्स्टाईन
B. एडिसन
C. ग्राहम बेल
D. अलेक्झांडर बेल

Q25. मानवास दररोज किती ग्रॅम हिरव्या भाज्यांची आवश्यकता असते?

A. 50 ग्रॅम
B. 60 ग्रॅम
C. 100 ग्रॅम
D. 150 ग्रॅम

Q26. धनुर्वात या जिवाणूजन्य आजारामुळे खालीलपैकी कोणत्या संस्थेवर विपरीत परिणाम होतो?

A. पचन संस्था
B. मज्जासंस्था
C. रक्ताभिसरण संस्था
D. यापैकी नाही

Q27. ‘लेप्टोस्पाइरा सिरा’ हा आजार साधारणपणे महाराष्ट्राच्या णत्या विभागात आढळतो?

A. खानदेश
B. विदर्भ
C. कोकण
D. मराठवाडा

Q28. विहिरीचे निर्जंतुकीकरण कोणत्या वेळी केल्यास फायद्याचे ठरेल?

A. कधीही
B. रात्री
C. दुपारी
D. सकाळी

Q29. किती डेसिबल आवाजाची तीव्रता असताना मनुष्य बहिरा होऊ कतो?

A. 55 डेसिबल
B. 75 डेसिबल
C. 100 डेसिबल
D. यापैकी नाही

Q30. पुढीलपैकी कोणते तृणधान्य आहे?

A. तांदूळ
B. नाचणी
C. मका
D. वरील सर्व

Q31. कुटुंबनियोजनाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम णत्या साली करण्यात आले?

A.1975
B.1978
C.1980
D.1982

Q32. भीतीदायक परिस्थिती निर्माण झाल्याने शरीरात खालीलपैकी शाचे निर्मिती होते?

A. घाम
B. थायरॉईड
C. ईस्टोजीन
D. एड्रेनलिन

Q33. महाराष्ट्रातील टीबी रुग्णाचे NGO कुठे आहे?

A. पुणे
B. गडचिरोली
C. सातारा
D. कोल्हापूर

Q34. खालीलपैकी कोणता आजार लैंगिक संबंधापासून पसरणारा आहे?

A. धनुर्वात
B. कावीळ-अ
C. कावीळ-ब
D. यांपैकी नाही

Q35. सिगारेटचा धुम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो?

A. तोंडाचा
B. फुफ्फुसाचा
C. यकृत
D. आतड्यांचा

Q36. खालीलपैकी कोणते हॉर्मोन्स पुरुषांमध्ये असतात?

A. प्रोजेस्टेरॉन
B. इस्ट्रोजन
C. टेस्टोस्टेरोन
D. यापैकी नाही

Q37. किडनीची कार्यक्षमता मापण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो?

A. BMR
B. BMI
C. GFR
D. BEE

Q38. पुढीलपैकी कोणाच्या दुधामध्ये कॅसिनचे प्रमाण सर्वात जास्त सते?

A. म्हैस
B. गाय
C. शेळी
D. मेंढी

Q39. कोणत्या शिक्षण आयोगाने विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणीवर भर दिला होता?

A. कोठारी आयोग
B. मुदलियार आयोग
C. यशपाल आयोग
D. यापैकी नाही

Q40. उवांमुळे एपिडेमिक व ट्रेंच फिवर सारखे रोग होतात. उवांना रण्यासाठी खालीलपैकी कोणते कीटकनाशक वापरतात?

A. फेनिथॉल
B. लिन्डेन
C. डायझोऑन
D. मलेरीऑन

Q41. जागतिक परिचारिका दिन केव्हा साजरा करतात?

A. 12 मार्च
B. 12 एप्रिल
C. 12 मे
D. 12 जुन

Q42. सजीवांच्या शरीरात खालीलपैकी कोणती संस्था नसते?

A. श्वसन संस्था
B. पचनसंस्था
C. उत्सर्जन संस्था
D. परिसंस्था

Q43. कोंबडीच्या एका अंड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असते?

A. 50 ग्रॅम
B. 6.6 ग्रॅम
C. 100 ग्रॅम
D. यापैकी नाही

Q44. पालेभाज्यात कोणते जीवनसत्व हे कॅरोटीन या द्रव्याच्या रूपात असते?

A. ब
B. अ
C. क
D. ड

Q45. अस्थमा कोणत्या कवकामुळे होतो?

A. टिनिया पेडीस
B. एकेरस स्केबीज
C. टीनिया केविरीस
D. यापैकी नाही

Q46. हिमोग्लोबिन कशाचे वहन करते?

A. लोह
B. ऑक्सिजन
C. प्रोटिन्स
D. हिम्स

Q47. खालीलपैकी कोणते मानवी त्वचेचे कार्य आहे?

A. औष्णिक नियमन
B. उत्सर्जन
C. संवेदी कार्य
D. वरीलपैकी सर्व

Q48. खालीलपैकी ग्लाइसेमिक इंडेक्स (GI) जास्त असणारा पदार्थ णता?

A. साखर
B. मैदा
C. भात
D. वरील सर्व पर्याय 

Q49. कोणत्या माश्याच्या यकृत तेलातून आयोडीन बऱ्याच प्रमाणात मिळते?

A. पापलेट
B. सुरमई
C. कॉड
D. बांगडा

Q50. चालणाऱ्या व्यायामात पावले मोजण्याच्या यंत्राचे नाव काय?

A. बॅरोमीटर
B. पेडोमिटर
C. लॅक्टोमीटर
D. यापैकी नाही

Q51. मुंबईत कोणत्या रोगाच्या संदर्भात ‘अव्हर्ट’ हा नियंत्रण र्यक्रम राबविला जात आहे?

A. क्षयरोग
B. मलेरिया
C. एड्स
D. कुष्ठरोग

Q52. प्रौढ डास साधारणपणे किती आठवडे जगतो?

A. दोन आठवडे
B. एक आठवडा
C. चार आठवडे
D. यापैकी नाही

Q53. पेशीमार्फत तयार झालेल्या अन्नाचे विघटन होणे म्हणजे लीलपैकी काय?

A. पोषण
B. पचनक्रिया
C. अपचयक्रिया
D. चयक्रिया

Q54. कोणती पचकरस लहान आतड्यात पचण्यासाठी मदत करत नाही?

A. जठररस
B. आंगरस
C. पित्तरस
D. स्वादुरस

Q55. खालीलपैकी ऍसिडिटी चे कारण कोणते?

A. अतिरिक्त वजन वाढ
B. अनियमित आहार
C. दारू, चहा, तंबाखू ई.
D. वरील सर्व बरोबर

Q56. मानवी शरीरात खालीलपैकी किती क्षार असतात?

A. 12
B. 24
C. 30
D. 32

Q57. जपानी मेंदूदाहामुळे रुग्णाचा मृत्यू साधारणपणे नऊ दिवसात होतो. या रुग्णाचे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण खालील पैकी किती आहे?

A. 20 ते 40 टक्के
B. 15 ते 20 टक्के
C. 40 ते 60 टक्के
D. पाच ते दहा टक्के

Q58. चिकनगुनिया या आजाराचा उद्रेक भारतात 1953 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला?

A. चेन्नई
B. पांडिचेरी
C. कोलकाता
D. यापैकी नाही

Q59. डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?

A. प्यूपील
B. रेटिना
C. आयरिस
D. कॉर्निया

Q60. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कशाशी झीज होते?

A. डोळ्यांची
B. कानांची
C. दातांची
D. यापैकी नाही

Q61. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कुठले जीवनसत्व महत्त्वाचे ठरतात?

A. विटामिन इ
B. विटामिन क
C. विटामिन अ
D. वरील सर्व 

Q.62 खालीलपैकी कोणता भावनेचा विकार आहे?

A. हिस्टेरिया
B. मेनिया
C. अग्नेशिया
D. यापैकी नाही

Q63. ‘टाल्कम पावडर’ तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो?

A. कॅल्शियम सिलिकेट
B. मॅग्नेशियम सिलिकेट
C. सोडियम सिलिकेट
D. सिलिकॉन

Q64. मेंदूतील सर्वात मोठा भाग…….. हा असतो?

A. अनुमस्तिष्क
B. मध्यमस्तिष्क
C. प्रमस्तिष्क
D. यापैकी नाही

Q65. सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार ईल?

A. नायट्रोजन
B. हायड्रोजन
C. हेलियम
D. यापैकी नाही

Q66. स्त्रियांमध्ये कोणत्या प्रकारचे कर्करोग अधिक ळतात?

A. गर्भाशयाचे
B. स्तनाचे
C. घशाचे
D. A व B

Q67. ‘लस’ ही सज्ञा कोणी शोधली?

A. लुईस पाश्चर
B. रॉबर्ट कोच
C. एडवर्ड जेनर
D. यापैकी नाही

Q68. डांग्या खोकला या आजारात खोकल्याचा आवाज हूप असा होतो हणून त्याला कोणत्या नावाने सुद्धा ओळखले जाते?

A. हूपिंक कफ
B. रनिंग कप
C. हूपिंग मग
D. यापैकी नाही

Q69. खालीलपैकी कोणता आजार सहसा लहान मुलात आढळत नाही?

A. गोवर
B. पोलिओ
C. उच्च रक्तदाब
D. यापैकी नाही

Q70. भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या वाढीचा दर शून्यावर आणण्याचे ठरवले आहे?

A. 2025
B. 2046
C. 2045
D. यापैकी नाही

Q71. टायफाईड हा आजार खालीलपैकी कोणत्या जंतूंमुळे होतो?

A. सालमोनेला टायफी
B. व्हीब्रिओ
C. इचमाईड
D. यापैकी नाही

Q72. एखाद्या भूभागात…….. वर्षे पोलिओचे एकही रुग्ण न मिळाल्यासपोलिओ निर्मूलन झाले असे मानले?

A. एक वर्ष
B. दोन वर्ष
C. तीन वर्ष
D. यापैकी नाही

Q73. जगातील एकूण कुष्ठरुग्णांपैकी किती टक्के रुग्ण रतात आढळतात?

A. 50%
B. 45%
C. 30%
D. 75%

Q74. मानवी शरीराला खालीलपैकी किती अमिनो आम्लाची गरज सते?

A. 24
B. 10
C. 20
D. 15

Q75. मुंबईत कोणत्या रोगाच्या संदर्भात ‘ऍव्हर्ट’ हा नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे?

A. क्षयरोग
B. एड्स
C. मलेरिया
D. कुष्ठरोग

Q76. गर्भनाळेमध्ये …….. इतक्या धमन्या असतात?

A. एक
B. दोन
C. तीन
D. चार

Q77. क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांमध्ये व्यक्तींना…….. पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो?

A. ड्रग सेवनापासून
B. धूम्रपान व तंबाखू पासून
C. लैंगिक भावना न पासून
D. यापैकी काही नाही

Q78. निर्जंतुकीकरणाच्या तंत्राचा परिचय कोणी दिला?

A. जॉन नीधाम
B. लुई पाश्चर
C. रॉबर्ट कोच
D. यापैकी नाही

Q79. खालीलपैकी कोणता जिवाणू pasteurization ची प्रक्रिया कवून ठेवू शकतो?

A. सालमोनेला टायफी
B. मायको ओव्हिस
C. मायको ट्यूबर्क्युलोसिस
D. यापैकी नाही

Q80. गोवर या रोगात साधारणतः मृत्यूचे प्रमाण किती टक्के आहे?

A. 1 ते 2%
B. 1.8% ते 7.6%
C. 10.5% ते 12.5%
D. यापैकी नाही

Q81. ……. याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला?
A. गॅलिलिओ
B. नेपियर
C. न्यूटन
D. विल्यम हार्वे

 

Q82. पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे वजनी प्रमाण….. असते?
A. 1:2
B. 1:8
C. 1:4
D. यांपैकी नाही
Q83. …….. रक्तपेशी शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करतात?
A. पांढऱ्या
B. तांबड्या
C. प्लेटलेट्स
D. हिरव्या
Q84 विष खाल्ल्यानंतर त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या औषधाला काय म्हणतात?
A. प्रतिजन
B. प्रतिविष
C. प्रतिजैविक
D. प्रतिरक्षि
Q85. मानवाचा शरीरामध्ये अपेंडिक्स हा कोणत्या भागामध्ये असतो?
A. अंडाशय
B. जठर
C. मोठे आतडे
D. यकृत
Q86……. या रोगात पेशींची अनियंत्रित आणि असामान्य वाढ होते?
A. एड्स
B. कर्करोग
C. क्षयरोग
D. मधुमेह
Q87. प्रतिरोध संस्थेच्या कार्यात खालीलपैकी कोण मदत करते?
A. आयोडीन
B. कॅल्शियम
C. लोह
D. यापैकी नाही
Q88. ‘हवाना सिंड्रोम’ आजार सर्वप्रथम कोणत्या देशांमध्ये आढळला?
A. जपान
B. भारत
C. अमेरिका
D. ऑस्ट्रेलिया
Q89. खालीलपैकी कोणत्या आजारात लसग्रंथीची वाढ होते?
A. क्षयरोग
B. एड्स
C. कर्करोग
D. वरील सर्व
Q90 मानवी विष्ठेद्वारे पसरणाऱ्या आजाराचा गट ओळखा?
A. पोलिओ, कावीळ
B. अतिसार, हगवण
C. कॉलरा, गोलकृमी
D. वरील सर्व
Q91. ए. एफ. पी. सर्वेक्षण खालीलपैकी कोणत्या आजारासाठी केले जाते?
A. मलेरिया
B. विषमज्वर
C. पोलिओ
D. यापैकी नाही
Q92. मनगटाचे व घोट्याचे सांधे हे खालील पैकी कोणत्या प्रकारच्या सांध्यांची उदाहरणे आहेत?
A. सरकता 
B. बिजागरीचा
C. उखळीचा
D. यापैकी नाही
Q93. खालीलपैकी कोणता आजार जिवाणूजन्य नाही?
A. विषमज्वर
B. हागवण
C. अतिसार
D. पोलिओ
Q94. अपगार स्कोर खालील पैकी किती असल्यास अर्भकाची स्थिती चिंताजनक असते?
A. 8
B. 6
C. 4
D. 10
Q95. करडईच्या तेलातील कोणते मेदाल्म  शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते?
A. ग्लुटेनिन
B. सुक्रोज
C. लिनोलिक 
D. यापैकी नाही
Q96. त्रिगुणी लस खालीलपैकी कुठे दिली जाते?
A. तोंडावाटे
B. स्नायूंमध्ये
C. मजे मध्ये
D. वरील सर्व
Q97. जागतिक हृदय दिन कधी साजरा केला जातो?
(A) २९ सप्टेंबर 
(B) ३० सप्टेंबर
(C) १ ऑक्टोबर
(D) २ ऑक्टोबर
Q98. एम एस स्वामींनाथन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना भारताच्या कोणत्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाते?
(A) निळ क्रांती
(B) हरीत क्रांती 
(C) स्वेत क्रांती
(D) सोनेरी क्रांती

Q99. नुकतेच भारतीय शास्त्रज्ञ M.S.स्वामींनाथन यांचे निधन झाले. त्यांचे भारताच्या कोणत्या क्षेत्रात मोठे योगदान होते?
(A) उद्योग
(B) चित्रपट
(C) कृषी 
(D) साहित्य

 

Q100. भारतीय शास्त्रज्ञ एम एस स्वामींनाथन यांचे निधन झाले. त्यांना भारत सरकारने १९८९ मध्ये कोणता पुरस्कार देऊन सन्मानित केले होते?
(A) पद्मश्री
(B) पद्मभूषण
(C) पद्मविभूषण 
(D) भारतरत्न

 

FINAL WORDS

तर विद्यार्थीमित्रांनो वरील लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो हे सर्व प्रश्न arogya vibhag bharti group c question paper आणि arogya vibhag bharti group D question paper साठी अत्यंत महत्वाचे आहेत त्यामुळे जर तुम्ही आरोग्य भरती चा फॉर्म भरला असेल तर हा लेख नक्की वाचून जा.

तसेच तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून Arogya Bharti 2023 timetable download करू शकता.

Arogya Bharti 2023 timetable download
Arogya Bharti 2023 timetable download

ये देखील वाचा

Arogya Vibhag Tantrik Prashna

Hello Friends My name is Rohit, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website.

Leave a Comment