भारतीय राज्यघटना आणि राज्यव्यवस्था | Indian Constitution Questions in Marathi

भारतीय राज्यघटना आणि राज्यव्यवस्था | Bhartiya Rajyaghatna Questions in Marathi

Indian Constitution Questions in Marathi: भारताचे संविधान हे जगातील कोणत्याही प्रजासत्ताक देशाच्या तुलनेत सर्वात मोठे लिखित संविधान आहे. भारताची राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे आणि सरकार देखील संविधानाच्या अंतर्गत कार्य करते. संविधानाच्या अंतर्गत नागरिकत्व, मूलभूत अधिकार, तत्त्वे, राष्ट्रपती, न्यायव्यवस्था, निवडणूक व्यवस्था इत्यादी विषयांचा विस्तृत समावेश आहे. तसेच भारतीय संविधान जाणून घेणे देखील जवळजवळ सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे, ज्यांचे प्रश्न नेहमीच विचारले जातात.

आजच्या या लेखामध्ये त्या महत्त्वाच्या आणि निवडक GK प्रश्नांचा समावेश केला आहे जी विद्यार्थ्यांना सर्व स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उपयुक्त आहेत. या प्रश्नांच्या मदतीने तुम्ही सहजपणे चांगली रँक मिळवू शकता.

Indian Constitution Questions and Answers in Marathi

1. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
A. डॉ. राजेंद्र प्रसाद
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
C. सच्चिदानंद सिन्हा
D. पंडित जवाहरलाल नेहरू

2. मूलभूत हक्कांची संबंधित राज्यघटनेचे कलम कोणते?
A. 1-13
B. 12-35 
C. 13-35
D. 1-35

3. भारताच्या घटनादुरुस्ती चा अधिकार……. ला आहे?
A. भारतीय जनता
B. कार्यकारी मंडळ
C. कायदेमंडळ
D. सर्वोच्च न्यायालय

4. भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्कांचे पालक असतात?
A. संसद
B. राष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. सर्वोच्च न्यायालय

5. राष्ट्रपतीस पदग्रहण समय कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
A. पंतप्रधान
B. लोकसभेचा सभापती
C. उपराष्ट्रपती
D. सर न्यायाधीश

6. राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात?
A. 250
B. 288
C. 546
D. 238 

7. उपराष्ट्रपती हे……. चे पदसिद्ध अध्यक्ष असतात?
A. लोकसभा
B. विधानसभा
C. राज्यसभा
D. विधान परिषद

8. भारत देशाचे सरसेनापती कोण असतात?
A. पंतप्रधान
B. सरन्यायाधीश
C. भूदल प्रमुख
D. राष्ट्रपती

9. बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण?
A. डॉ. राधाकृष्णन
B. फक्रुद्दीन अली अहमद
C. डॉ. नीलम रेड्डी
D. डॉ. एपीजे अब्दुल कलाम

10. पोलीस खाते हा विषय कोणत्या सूची मध्ये येतो?
A. केंद्र सूची
B. राज्य सूची
C. समवर्ती सूची
D. यापैकी नाही

11. भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती?
A. 545
B. 548
C. 544
D. 540

12. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे?
A. पुणे
B. कोल्हापूर
C. औरंगाबाद
D. अमरावती

Police Bharti GK in Marathi

13. राज्यपाल व मंत्रिमंडळ हे…… ह्या दुव्यामुळे साधले जाते?
A. गृहमंत्री
B. महापौर
C. विधानसभा अध्यक्ष
D. मुख्यमंत्री

14. ……. हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात?
A. मुख्यमंत्री
B. राज्यपाल
C. मुख्य न्यायाधीश
D. मेयर

15. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?
A. राष्ट्रपती
B. उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. गृहमंत्री

16. भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारचे आहे?
A. लोकशाही
B. अध्यक्षीय
C. हुकूमशाही
D. राजेशाही

17. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण?
A. उपराष्ट्रपती
B. सरन्यायाधीश
C. पंतप्रधान
D. राष्ट्रपती

18. लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहे?
A. बिहार
B. उत्तर प्रदेश
C. मध्य प्रदेश
D. राजस्थान

19. लोकसभेचा कार्यकाळ…… वर्ष असतो?
A. पाच वर्ष
B. सहा वर्ष
C. स्थायी
D. वरील सर्व

20. ‘सत्यमेव जयते’ हे बोधवाक्य…… या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतलेले आहे?
A. ऋग्वेद
B. मनुस्मृती
C. भगवद्गीता
D. मंडूकोपनिषद 

21. …….. घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्क मधून वगळण्यात आले?
A. 42
B. 44
C. 45
D. 46

22. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती?
A. 43
B. 42
C. 44
D. 45

23. सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ……. वर्ष असतो?
A. 5 
B. 4
C. 6
D. 3

24. ‘वन’ हा विषय कोणत्या सूचीतील आहे?
A. केंद्र
B. राज्य
C. समवर्ती
D. यापैकी नाही

25. नव्या कायद्याचा प्रस्तावाला…… म्हणतात?
A. ठराव
B. अध्यादेश
C. वटहुकूम
D. विधेयक

26. भारतीय राज्यघटना भारतीय घटना समितीने केव्हा स्वीकृत केली?
A. 15 ऑगस्ट 1947
B. 26 जानेवारी 1948
C. 26 नोव्हेंबर 1949
D. 26 जानेवारी 1950

27. सुरुवातीस भारतीय राज्यघटनेत किती कलमे व परिशिष्टे होती?
A. 461 व 10
B. 395 व 12
C. 395 व 8 
D. 445 व 12

28. भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली?
A. 26 नोव्हेंबर 1949
B. 15 ऑगस्ट 1950
C. 26 जानेवारी 1950
D. 15 ऑगस्ट 1949

29. घटना समितीचे कायदेशीर सल्लागार……. हे होते?
A. बी. एन. राव 
B. बी. सी. दत्त
C. एम. एन. रॉय
D. बी. आर. आंबेडकर

30. एखादी व्यक्ती भारताचे राष्ट्रपती पद किती वेळा घेऊ शकते?
A. फक्त दोन वेळा
B. फक्त तीन वेळा
C. फक्त एक वेळा
D. कितीही वेळा

Constitution Of India MCQ in Marathi

31. भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अमलात आणता येते?
A. एक
B. दोन
C. तीन
D. चार

=> राष्ट्रीय, राज्य आणि आर्थिक आणीबाणी.

32. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत?
A. 12
B. 13
C. 14
D. 16

33. भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे?
A. दोन वेळा
B. तीन वेळा
C. सहा वेळा
D. एकदाही नाही 

34. लोकसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात?
A. उपसभापती लोकसभा
B. कायदेमंडळ
C. कार्यकारी मंडळ
D. सभापती राज्यसभा

35. खालीलपैकी कशामध्ये प्रशासन कायद्याचे मूळ आहे?
A. कायदे
B. राज्यघटना
C. केस कायदा
D. वरील सर्व 

36. अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे?
A. 14
B. 15
C. 16
D. 17 

37. लोकसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो?
A. राष्ट्रपती
B. मंत्रिमंडळ
C. पंतप्रधान
D. राज्यसभा

38. राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे?
A. 72 
B. 52
C. 62
D. 92

39. राज्यसभा……. सभागृह आहे?
A. कनिष्ठ
B. वरिष्ठ
C. प्राचीन
D. अर्वाचीन

40. अर्थ विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते?
A. राज्यसभा
B. विधान परिषद
C. लोकसभा
D. A व B

41. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?
A. विठ्ठलभाई पटेल
B. ग. वा. मावळणकर
C. वा. ना. मावळणकर
D. यापैकी नाही

42. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो?
A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. विधानमंडळ
D. राज्यपाल

43. राज्यपालास कायदेशीर सल्ला कोण देतो??
A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. भारताचा महान्यायवादी
D. महाधिवक्ता

44. निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहे?
A. पंतप्रधान
B. संसद
C. राष्ट्रपती
D. वित्तमंत्री

45. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?
A. 48
B. 46
C. 44
D. 50

46. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते?
A. 58
B. 60
C. 62
D. 65 

47. केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते?
A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. लोकसभा
D. राज्यसभा

48. भारतीय राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टात एकूण किती राष्ट्रीय भाषांचा समावेश केला आहे?
A. 12
B. 16
C. 18
D. 22

49. महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या….. आहे?
A. 288
B. 19
C. 48
D. 67 

50. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात?
A. डॉ. राजेंद्र प्रसाद
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. पंडित जवाहलाल नेहरू
D. महात्मा गांधी

51. विधेयक हे वित्त विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उद्भवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो?
A. राष्ट्रपती
B. उपराष्ट्रपती
C. लोकसभेचे सभापती
D. पंतप्रधान

52. महाराष्ट्र विधानसभेच सभासद संख्या…… आहे?
A. 78
B. 238
C. 288 
D. 545

53. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती?
A. सर्वोच्च न्यायालय
B. संसद
C. कार्यकारी मंडळ
D. यापैकी नाही

54. खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापती पद भूषवले नाही?
A. सरदार हुकुमसिंग
B. रवी रे
C. शिवराज पाटील
D. स. का. पाटील 

55. खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार ‘ भारतरत्न व पद्म सन्मान’ प्रदान केले जातात?
A. कलम 18
B. कलम 11
C. कलम 32
D. कलम 13

56. राज्यपालांची नेमणूक कोण करतात?
A. पंतप्रधान
B. मुख्यमंत्री
C. राष्ट्रपती
D. उपराष्ट्रपती

57. राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे?
A. कलम 21
B. कलम 23
C. कलम 24
D. कलम 28

58. भारतीय संविधानानुसार……. सार्वभौम आहे?
A. भारतीय जनता
B. न्यायसंस्था
C. संसद
D. कार्यकारी मंडळ

59. कोणत्या कलमानुसार संसद घटनादुरुस्ती करू शकते?
A. कलम 350
B. कलम 368
C. कलम 374
D. कलम 360

60. लोकसभेत ‘ शून्य प्रहर’ कधी सुरू होतो?
A. दहा वाजता
B. बारा वाजता 
C. दोन वाजता
D. यापैकी नाही

मित्रांनो मला अशा आहे Indian Constitution Questions in Marathi या लेखातील हे महत्वाचे प्रश्न वाचून तुम्हाला फायदा झाला असेल. तुमच्या काही शंका असतील तर कंमेंट मध्ये त्याची नोंद करा.

हे देखील वाचा

Aadarsh Gaav Marathi Nibandh

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

4 thoughts on “भारतीय राज्यघटना आणि राज्यव्यवस्था | Indian Constitution Questions in Marathi”

Leave a Comment