[25+] Funny Puzzles in Marathi with Answers | गंमतकोडी कोडी

[25+] Funny Puzzles in Marathi with Answers | गंमतकोडी कोडी

1. छगन आणि मगन हे दोघे मित्र आहेत
छगनच्या कोंबडीने मगनच्या घरी जाऊन अंडी दिली,
तर मग अंडी कोणाची छगनची कि मगनची?

⇒ उत्तर: अंडी तर कोंबडीचीच राहणार ना.


2. एक बाई आपल्या पतीची नाव सांगते “Beautiful Red Underwear”
तर मग त्या बाईच्या पतीचे नाव काय असेल?

⇒ उत्तर: सुंदर लाल चड्डा


3. कोकणातून आला भट, धर कि आपट

⇒ उत्तर:  नारळ


4. भारत सोडून जाणाऱ्या माणसाला काय म्हणतात?

⇒ उत्तर: हिंदुस्तान लिव्हर


5. असा कोणता “तारा” आहे जो जमिनीवर रहातो
आणि काही दिवसात. आकाशात जातो?

⇒ उत्तर: म्हातारा.


6. एका तलावात २० मासे असतात.
त्यातला एक मासा मरतो.
त्यामुळे पाण्याची पातळी वाढते.
सांगा बरं का?

⇒ उत्तर: कारण बाकीचे मासे रडतात म्हणून


7. एकदा एका शाळेवरून विमान चाललेले असते.
पण ते अचानक आहे त्या जागीच थांबते.
ना पुढे जात. ना इकडे तिकडे. का बरे ?

⇒ उत्तर: शाळेमध्ये जन-गण-मन चालू झालेले असते.


8. बायको आणि गाडी यांच्यामध्ये काय फरक आहे?

⇒ उत्तर: गाडी बिघडली की बंद पडते आणि बायको बिघडली की सुरू होते.


9. आभाळात दाटी, रंगबेरंगी पतंगाची
प्रत्येकाला घाई तिळगुळ वाटण्याची
आज होते सूर्याचे, मकर राशीत संक्रमण
‘गोड बोला’ असा मंत्र देणारा हा एक सण
ओळखा कोण ?

⇒ उत्तर: मकरसंक्राती


10. हिच्यासह मला फिरण्याचा छंद…पण लोकांमधे गेलो की बोल्ती बंद…!

⇒ उत्तर: बायको!

Also Read: Marathi Kode With Answers


11. डोळे असून आंधळा

⇒ उत्तर: नारळ


12. कान असून बहिरा

⇒ उत्तर: चहाचा कप


13. ठाकूरला राखी बांधली असती तर
जर बसंतीच्या मावशीने
ठाकूरला राखी बांधली
असती तर,
बसंती आणि ठाकूरचे नाते काय?????

=> जास्त विचार करु नका, ठाकूरला हात नव्हते…


14. “माऊ माऊ”!! एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात.
रिक्षेवाला म्हणतो,”इतके लोक रिक्षेत नाही मावणार..”
तर त्या मांजरी काय म्हणतील???

⇒ उत्तर: माऊ माऊ”!!


15. काट्या कुट्या च्या बांधला भारा, कुठं जातोस ढबूण्या पोरा

⇒ उत्तर: फणस


16. काळ्या रानात हत्ती मेला, त्याच्या पृष्ठभाग उपसून नेला?

⇒ उत्तर: कापूस


17. पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान कसं हिरवं, कात नाही चुना नाही तर तोंड कस रंगल?

⇒ उत्तर: पोपट


18. कूट कूट काडी पोटात नाडी, राम जन्माला हात जोडी कृष्ण जन्माला हात जोडी.

⇒ उत्तर: देव्हाऱ्यातील घंटी


19. कोंकणातन आली नार, तिचा पदर हिरवागार, तिच्या काखेला प्वार

⇒ उत्तर: काजू


20. कोंकणातन आली सखी, तिच्या मनावर दिली बुक्की, तिच्या घरभर लेकरी

⇒ उत्तर: लसूण


21. कोकणातून आला भट, धर कि आपट

⇒ उत्तर: नारळ


22. कड्यांवर काडी सात कांडी, वर समुद्राची अंडी

⇒ उत्तर: ज्वारीचे कणीस


23. मुकुट याच्या डोक्यावर, जांभळा झगा अंगावर

⇒ उत्तर: वांग


24. कोकणातून आला रंगूकोळी, त्यानं आणली भिंगू चोळी, शिंपीण म्हणते शिवू कशी, परटिण म्हणते धुवू कशी, अन राणी म्हणते घालू कशी?

⇒ उत्तर: कागद


25. असा कोणता फुल आहे ज्यामध्ये ना रंग आहे ना सुगंध आहे?

⇒ उत्तर: एप्रिल फुल


26. अशी कोणती गोष्ट आहे जी लावायच्या वेळी हिरवी असते आणि लावल्यानंतर लाल होऊन जाते?

⇒ उत्तर: मेहेंदी


27. किस करताना कुठल्या अवयवाला सर्वात
जास्त
त्रास होतो ???

⇒ उत्तर: हाताला, खोटं वाटत असेल तर १ किलो गाजर/बटाटे/ सुके खोबरे घेऊन त्याचा किस काढून बघा….


28. पेटा-यास इंग्रजीत ‘सुटकेस’ का म्हणतात?

⇒ उत्तर: कारण, पेटारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुटकेस कामी आला….


29. बंड्या -: पप्पा आपल आडनाव वाघ असुनही तुम्ही मम्मीला एवढ का घाबरता?

⇒ उत्तर: पप्पा-: तुझ्या मम्मीच्या माहेरच आडनाव वाघमारे आहे.


30. प्रश्न :- “नारी” म्हणजे काय?
उत्तर :- “शक्ती”.

प्रश्न :- मग पुरूष म्हणजे?

⇒ उत्तर: सहनशक्ती”..!!


 

Hello Friends My name is Rohit, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website.

Leave a Comment