How to Find CIBIL Score in Marathi | सिबिल स्कोर जाणून घायचे 4 मार्ग

सिबिल स्कोर जाणून घायचे 4 मार्ग | How to Find CIBIL Score in Marathi

How to Find CIBIL Score in Marathi: मित्रांनो आजकाल प्रेत्येकाला स्वतःचा CIBIL Score जाणून घायचा असतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा घर बसल्या तुमच्या CIBIL Score जाणून घायचा असेल तर आजच्या या लेखात मी घेऊन आलो आहे. CIBIL Score चेक करण्याचे ५ सोपे मार्ग. कारण जेव्हा कधी आपण लोन घायला जातो तेव्हा सर्वात प्रथम तुमचे CIBIL Score चेक केले जाते.

त्यामुळे जर का तुम्ही सुद्धा तुमचा CIBIL Score चांगला आहे कि खराब हे जाणून घ्यायचा असेल तर हा लेख पूर्ण वाचा. आजच्या या लेखात दिलेल्या ५ मार्गांचा वापर करून तुम्ही अगदी सोप्या रित्या तुमचा सिबिल स्कोर जाणून घेऊ शकता आणि मित्रांनो ते सुद्धा अगदी मोफत निशुल्क.

What is CIBIL Score in Marathi 
What is CIBIL Score in Marathi

What is CIBIL Score in Marathi । CIBIL SCORE म्हणजे काय?

Cibil Score हा एक आपल्या केलेल्या Transaction चा स्कोर असतो. म्हणजेच सोप्याभाषेत बोलायचे झाले तर आपल्या Loan Transaction च्या History वर आपले Cibil Score पूर्णपणे अवलंबून असते. जर तुम्ही भूतकाळात एखादा लोन घेतला असाल आणि त्याचे payment म्हणजे EMI वेळेवर देत असाल तर तुमचा Cibil Score हळू हळू वाढत जाईल.

जर तुम्ही एखाद्या महिन्याचा EMI दिलेल्या तारखेला भरला नाहीत तर तुमचा Cibil Score खराब होत जाईल आणि परिस्थितीत तुम्हाला नवीन लोन देखील मिळण्यास अडचण येऊ शकते.

जर सिबिल स्कोअर चांगला असेल तर त्याचे बरेच फायदे होतात. जर खराब सिबिल स्कोअर असेल तर त्याचे भरपूर तोटे आहेत. त्यामुळे सिबिल स्कोर चे फायदे आणि नुकसान देखील आपल्याला माहिती पाहिजेत.

आपली क्रेडिट स्कोअर तपासण्यासाठी आपल्याकडे खालील माहिती असणे आवश्यक आहे.

  • नाव: आपले मूळ नाव जे आपल्या पॅनमध्ये आणि इतर अधिकृत प्रती जसे की मतदार आयडी, पासपोर्ट, जन्म प्रमाणपत्र इ. मध्ये सारखे असावे.
  • जन्म तारीख: आपली विनामूल्य क्रेडिट स्कोअर तपासण्यासाठी जन्मतारीख अनिवार्य आहे. हे आपल्या पॅन आणि इतर अधिकृत नोंदीवरील जन्म तपशीलांशी जुळले पाहिजे.
  • पॅन कार्ड नंबर: ब्युरोमधून आपला क्रेडिट स्कोअर जोडण्यासाठी हा सर्वात महत्वाचा पुरावा आहे. ते मिळविण्यासाठी आपल्याला आपला Permanent Account Number(PAN) प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
  • लिंग: आपले लिंग(पुरुष किव्हा स्त्री) हे देखील नमूद करणे गरजेचे आहे.
  • मोबाइल नंबर: आपले प्रोफाइलची सत्यता पडताळण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाइलची नोंद करणे आवश्यक आहे. 
  • रोजगाराचा तपशीलः आपली कंपनी, मासिक पगार आणि रोजगाराची माहिती हि क्रेडिट स्कोअर मिळविण्यासाठी आवश्यक असू शकते.
  • पिन कोड: आपण कायमस्वरुपी राहता त्या परिसराचा पिन कोड किव्हा तुमच्या शहराचे नाव प्रविष्ट करणे देखील आवश्यक असते.

Spardha Pariksha GK in Marathi

भारतात क्रेडिट स्कोअर निश्चित करणारे घटक कोणते आहेत?

आधी नमूद केल्याप्रमाणे, क्रेडिट ब्यूरो आपल्या क्रेडिट स्कोअर वर गणना करण्यासाठी आपल्या क्रेडिट इतिहासावरील डेटा वापरतो.

  • देय इतिहास – सर्वात महत्वाचा घटक. आपण आपल्या कर्ज किव्हा क्रेडिट कार्डचे पेमेंट किती नियमित करत आहात.
  • थकबाकी/क्रेडिट वापर – खूप जास्त कर्ज असणे किंवा बर्‍याच महिन्यांपासून थकबाकीसह क्रेडिट कार्ड वाढविण्यामुळे आपल्या स्कोअरवर नकारात्मक परिणाम होईल.
  • क्रेडिट इतिहासाची लांबी – क्रेडिट इतिहास जितका जास्त असेल तितका क्रेडिट स्कोअर जास्त.
  • क्रेडिट मिक्स – वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड आणि कार कर्ज यासारख्या एकाधिक प्रकारचे क्रेडिट असणे हे दर्शविते की आपण विविध प्रकारचे क्रेडिट कार्यक्षमतेने आणि जबाबदारीने हाताळू शकता.
  • नवीन क्रेडिट – अल्पावधीतच क्रेडिट्स घेणे आपल्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम करते.

तर चला मग आता सर्वात महत्वाचे cibil score जाणून घ्यायचे ५ मार्ग जाणून घेऊया.

1. Paisabazaar

Cibil score जाणून घायचा 4 मार्गांमधील सर्वात पहिले आहेत Paisabazaar.com. Paisabazaar हे अतिशय लोकप्रिय लोन देणारा आणि CIBIL Score जाणून घ्यायचा एक aaplication आणि वेबसाईट आहे. सोबत या वेबसाइट वर तुम्हाला Financial आणि इतर services बद्दल देखील जाणून घेता येईल. या वेबसाईट द्वारे अगदी मोफत तुम्ही तुमचा Cibil Score जाणून घेऊ शकता.

Paisabazaar कि एक प्रसिद्ध आणि Genuine वेबसाइट आहे, ज्यावर तुम्हाला CIBIL Score चा पूर्ण रिपोर्ट पाहायला मिळतो.

2. CRED

या नंतर पुढे सिबिल स्कोर चेक करण्यासाठी मी तुम्हाला suggest करेन CRED. CRED ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यांचा user interface. जेव्हा तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर या वेबसाईट वर पाहाल तेव्हा तिथे तुम्हाला ५-६ बुलेट पॉईंट दिसतील ज्यामध्ये तुमच्या detail CIBIL रिपोर्ट ला एका summary मध्ये तुम्हाला सांगितले असते. त्यामुळे तुम्ही 2 मिनट मध्ये समजूल जाल कि काय केल्याने तुमचा सिबिल स्कोर वाढू शकतो. तसेच या रिपोर्ट वरून तुम्हाला हे देखील कळेल कि केव्हा आणि कसे तुमचे क्रेडिट स्कोर कमी झाले आहे किव्हा वाढले आहे.

cred cibil score
cred cibil score

3. Paytm

Paytm अँप च्या साहाय्याने जर तुम्हाला तुमचा क्रेडिट किव्हा सिबिल स्कोर चेक करायचा असल्यास. तुमच्या मोबाइल मध्ये Paytm अँप ओपन करा आणि वरील सर्च बार मध्ये CIBIL Score सर्च करा. पुढे तुम्हाला तुमचे नाव, मोबाइल नंबर, जन्मतारीख आणि पॅन कार्ड नंबर टाकावा लागेल. त्यानंतर लगेच च Paytm तुमचे सिबिल स्कोर स्कोर तुमच्या समोर दाखवेल ते सुद्धा अगदी मोफत.

Paytm find Cibil Score
Paytm find Cibil Score

4. wishfin.com

मित्रांनो wishfin.com हि अशी कंपनी आहे जिच्या मदतीने तुम्हाला तुमचा CIBIL Score तुमच्या व्हाट्सअँप नंबर वर भेटून जाईल. सर्वात प्रथम तुम्हाला wishfin च्या वेबसाईट वर जायचं आहे. तिथे तुम्हाला तुमचा पूर्ण नाव, जन्मतारीख, ई-मेल आयडी व मोबाइल नंबर, तुमचा महिन्याचा पगार, तुम्ही जॉब करता कि बिसनेस, तुमचे शहर, लिंग आणि पण कार्ड enter करावा लागेल, त्या नंतर सबमिट वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला लगेचच तुमचे CIBIL Score दिसून येईल. wishfin हि एक विश्वासू वेबसाईट आहे, हि वेबसाईट तुमचा डेटा कोणत्याही कंपनी सोबत शेअर करत नाही.

भारतात टक्केवारीनुसार क्रेडिट स्कोअर:

Credit Score Range % People
< 600 22.87
649 – 600 10.51
699 – 650 9.75
749 – 700 18.89
>= 750 37.98

FAQ

Q. सिबिल स्कोअर तपासणे आवश्यक आहे का?

A. जर भविष्यात तुम्ही कर्ज घेणार असाल तर तुम्हाला सिबिल स्कोअर ची तपासणी करायची गरज आहे. चांगल्या सिबिल स्कोअर शिवाय तुम्हाला कर्ज किव्हा क्रेडिट कार्ड भेटणार नाही.

Q. कर्ज किंवा नवीन क्रेडिट कार्ड घेण्यासाठी सिबिल स्कोअर किती असावे?

A. क्रेडिट कार्ड किंवा कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोअर हा 750 किव्हा त्यापेक्षा जास्त असावा.

Q. सिबिल स्कोअर वाढविण्यासाठी काय करावे?

A. सिबिल स्कोअर वाढविण्यासाठी, जे कोणतेही कर्ज घ्याल त्याचे EMI वेळेवर द्या तसेच क्रेडिट कार्ड चे देखील वेळेवर payment करा.

Conclusion

तर मित्रांनो How to Find CIBIL Score in Marathi या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला निशुल्क सिबिल स्कोर जाणून घायचे 4 मार्ग समजले असतील. जर तुमच्या काही शंका असतील किव्हा तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर जाणून घायला काही अडचण येत असेल तर खाली कंमेंट नक्की करा.

हे देखील वाचा: 

Top Companies and CEO in Marathi

Hello Friends My name is Rohit, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website.

1 thought on “How to Find CIBIL Score in Marathi | सिबिल स्कोर जाणून घायचे 4 मार्ग”

Leave a Comment