Latest Marathi Kodi 2023 | नवीन मराठी कोडी | 10 Best Marathi Riddles 2023
नमस्कार मित्रांनो, आजच्या या मराठी कोडी लेखामध्ये मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे नवीन 10 Marathi Kodi. खाली दिलेल्या कोड्यांपैकी तुम्हाला किती कोड्यांचे उत्तर तुम्हाला माहिती होते, ते कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.
1. 30 पुरुष आणि 2 स्रिया, यांच्या कडे एवढी ताकद आहे कि, जोपर्यंत ते एकत्र आहेत, तोपर्यंत कितीही भांडू शकतात. ओळखा पाहू मी कशाबद्दल बोलत आहे?
=> बुद्धीबळ, कारण या खेळामध्ये 2 राणी आणि 2 राजे, 4 हत्ती, 4 उंट, 4 घोडे आणि 16 प्यादे मिळून 32 सैनिक असतात. म्हणून या कोड्याचे उत्तर आहे बुद्धीबळ.
2. तुमच्या कडे 20 संत्री आहेत आणि ती 11 मुलींना वाटायची आहेत, अट फक्त एवढीच आहे कि कोणत्याही मुलीला जास्त किव्हा कमी संत्र भेटले नाही पाहिजे. तर मग तुम्ही सारख्या प्रमाणात संत्री कशी वाटल?
=> तर मित्रांनो त्या 20 संत्र्यांचे रस काढून तुम्ही 11 मुलींना योग्य प्रमाणात ते रस देऊ शकता, जेणे करून 20 संत्री 11 मुलींना योग्य प्रमाणात वाटली जातील.
3. एक ट्रक ड्राइवर वनवे मध्ये उलट्या बाजूने जात होता. तर तिथे एक ट्रॅफिक पोलिसवाला आला, त्याने त्याला बघितले पण तरी सुद्धा काहीच केले नाही तर सांगा पाहू असेल का?
=> कारण तो ट्रक ड्राइवर वनवे मध्ये उलट्या बाजूने फक्त चालत चालला होता.
4. अशी कोणती जागा जिथे माणूस गरीब असो कि श्रीमंत त्यांना हातामध्ये वाडगा घेऊन उभे राहायलाच लागेल?
=> पाणी पुरी च्या गाडीवर गरीब असो कि श्रीमंत हातामध्ये वाडगा घेऊन आपल्या वेळेची वाट पहावीच लागेल.
5. रात्री जागतो, दिवसा झोपतो, नेहमी असतो उलटा लटकलेला, सांगा पाहू मी कोण?
=> वटवागूळ
6. अशी कोणती गोष्ट आहे जी मुलांना आयुष्यामध्ये एकदाच भेटते तर मुलींना दोन वेळा भेटते?
=> आडनाव, कारण तुम्हाला माहितीच असेल मुलींचे माहेरचे आणि सासरचे असेल दोन आडनाव असतात.
7. शरीरावरील अशी कोणती गोष्ट आहे जी पुरुषांमध्ये तर वाढते पण स्त्रियांमध्ये वाढत नाही?
=> मिशी आणि दाढी
8. 2, 3, 5, 9, 17, _ तर या क्रमवारीनुसार पुढील नंबर कोणते असेल?
=> 33, मागील संख्या दुप्पट करा आणि त्यातून 1 वजा करा.
9. माझ्याकडे डोळे, कान, नाक आणि जीभ नाही आहे तरी सुद्धा मी बघू, ऐकू, वास तसेच चव घेऊ शकतो तर सांगा पाहू मी कोण?
=> मेंदू
10. अशी कोणती गोष्ट आहे जी जिवंत असताना जमिनीमध्ये गाडली जाते आणि मेल्यावर जमिनीमधून काढली जाते?
=> झाड
मित्रांनो तुम्हाला हि मराठी कोडी कशी वाटली ती कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तसेच तुमच्या कडे सुद्धा काही अशीच Marathi Riddles असतील तर कंमेंट बॉक्स द्वारे नक्की कळवा. आम्ही तुम्ही दिलेली Navin Marathi Kodi आमच्या Gkinmarathi.com वेबसाइट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू.