Marathi Kodi | Marathi Puzzle with Answer
मित्रांनो आजच्या या लेखामध्ये मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे 20 Marathi Kodi. तर बघूया तुम्हाला किती कोडी सोडवता येतात ती.
1. बाईक वर बसुन एक पुरुष आणि एक स्त्री रस्त्यावरुन जात असतात.
चौकात त्यांना पोलीस अडवतो आणि विचारतो हि तुझी कोण?
पुरुष सांगतो: हिचा सासरा माझ्या सासऱ्याचा बाप आहे.
तर या दोघांत नातं काय?
उत्तर: => जावई आणि सासू.
2. अशी कोणती जागा आहे,
जेथे जर 100 लोक गेले,
तर 99 लोकच परत येतात?
लावा आता डोकं…
उत्तर: => स्मशानभूमी मध्ये १०० लोक गेले की प्रेताला ठेऊन ९९ च परत येतात.
3. असे काय आहे जे पंखापेक्षा अधिक हलका आहे,
परंतु जगातील सर्वात बलवान माणूस देखील त्याला जास्त काळ टिकवू शकत नाही?
उत्तर:=>श्वास
4. एका माणसाचे चार अक्षरी नाव काय?
ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव.
दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव.
तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव.
व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव.
सांगा पाहु ते नाव?
उत्तर: => सीताराम.
5. एका टेबलावर तीन सफरचंद आहेत आणि तुम्ही त्यापैकी दोन काढून घेतले.
तुमच्याकडे आता किती सफरचंद शिल्लक आहेत?
उत्तर: => अर्थातच दोन.
6. एक-मजली घर आहे जेथे सर्वकाही गुलाबी रंगाचे आहे:
गुलाबी भिंती, गुलाबी दरवाजे, गुलाबी छत, गुलाबी खिडक्या, गुलाबी पडदे, गुलाबी खुर्च्या आणि गुलाबी टेबल.
मग सांगा, त्या घरातील पायऱ्या कोणत्या रंगाचे असतील?
उत्तर: => कोणत्याही रंगाचे नाही कारण हे एक-मजली घर आहे!
7. एका रिकाम्या बॉक्स मध्ये आपण किती मांजरी ठेऊ शकतो?
उत्तर: => एक, त्यानंतर, बॉक्स रिकामा राहणार नाही.
8. माझे वजन काहीही नाही, तरीही आपण मला पाहू शकता.
जर आपण मला बादलीमध्ये ठेवले तर मी बादलीला अधिक हलके करू शकतो.
ओळखा पाहू मी काय आहे?
उत्तर:=> एक छिद्र
9. एक मुलगा आणि एक अभियंता बाजार करण्यासाठी जातात.
तो मुलगा अभियंताचा मुलगा आहे, पण अभियंता त्या मुलाचे बाबा नाहीयेत.
हे कसे शक्य आहे?
उत्तर:=> अभियंता त्या मुलाची आई आहे.
10. एक माणूस आपल्या बायकोला मारतो आणि तिच्या शरीराला झाडा-झुडुपात लपवतो.
दुसऱ्या दिवशी पोलिस त्या व्यक्तीला फोन करून सांगतात की त्याच्या बायकोची हत्या झाली आहे आणि त्या व्यक्तीला लगेचच गुन्हा घडलेल्या घटनास्थळी येण्यास सांगतात.
तो माणूस घटनास्थळी पोहचताच पोलीस त्याला अटक करतात. का?
उत्तर: => गुन्हा घडलेले घटनास्थळ कोठे आहे हे पोलिसांनी कधीही त्याला सांगितले नाही.
11. एका कोंबड्याने घराच्या छतावर एक अंडा घातला,
तो कोणत्या बाजूने पडेल?
उत्तर: => कोंबडा अंडा घालत नाहीत, कोंबडी अंडा घालते.
12. एक राजकुमारी तिच्या काही मैत्रिणीं सोबत बागेत फिरायला गेली असताना समोरून एक राजकुमार येतो आणि राजकुमारीवर मोहीत होऊन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो,
कसा दिसतोय मी?
तेव्हा राजकुमारी उत्तर देते,
मेघनाद रिपुतात वधी ज्या नराला।।
ते नाव आहे द्वादशात पाचव्याला।।
सरता तयासी दिन अस्तमानी।।
ज्या नर पूजिती (तैसा) दिसतोसी नयनी।।
आपला प्रश्न असा आहे की वरील राजकुमार कसा दिसतोय हे राजकुमारीने नेमके काय सांगितले?
उत्तर: =>सूर्यासारखा तेजस्वी
13. लाल आहे पण रंग नाही,
कृष्ण आहे पण देव नाही,
आड आहे पण पाणी नाही,
वाणी आहे पण दुकान नाही.
मी कोण आहे सांगा पाहू…
उत्तर: =>लालकृष्ण अडवाणी
14. आपल्या डाव्या हातामध्ये आपण जे ठेवू शकता
ते आपल्या उजव्या हातावर कधीही ठेवू शकत नाही.
ओळखा काय ते?
उत्तर: =>आपला उजवा हात
15. आपण ज्या इमारतीमध्ये पूर्वी कधीही प्रवेश न करता त्यातून बाहेर येता,
ती इमारत कोणती?
उत्तर: => ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जन्माला आलात ती इमारत.
16. मी एका टेकडीच्या शिखरावर उभा राहिलो आणि दोन घरांच्या दरम्यान मोठ्याने घंटा वाजविले.
कोणते घर प्रथम घंटा ऐकेल?
उत्तर: => दोनीही घरे ऐकू शकत नाहीत, कारण घरांना कान नसतात.
17. ऑस्ट्रेलियाचा शोध लागण्यापूर्वी जगातले सर्वात मोठे बेट कोणते होते?
उत्तर:=> अर्थातच ऑस्ट्रेलिया, फक्त त्याचा शोध लागायचा होता.
18. एका कैदीला तीन खोल्यांपैकी एका खोलीमध्ये जाण्यास भाग पाडले जाते,
परंतु तो कोणत्या खोलीत येऊ शकतो?
पहिल्या खोलीत आग लागलेले आहे.
दुसरी खोली स्फोटक द्रव्याने भरलेले आहे जेणेकरून तो आत जाताक्षणी विस्फोट होण्याची दाट शक्यता आहे.
तिसऱ्या मध्ये एक सिंहाची जोडी आहे जे ३ वर्षांमध्ये काहीही खाल्ले नाही.
त्या कैदीने कोणत्या खोलीत जगण्याचे निवडले पाहिजे?
उत्तर: => तिसरी खोली – वर्षानुवर्षे काहीही न-खाल्लेले कोणतेही सिंह, नक्कीच मृत असेल!
19. एका अपार्टमेंट इमारतीच्या २५ व्या मजल्यावरील एक माणूस खिडकी स्वच्छ करीत आहे.
अचानक त्याचा तोल जातो आणि तो पडतो.
त्याला दुखापती पासून वाचविण्यासाठी सुरक्षिततेची कोणतीही साधने त्याच्याकडे नसते – पण त्याला दुखापत होत नाही.
हे कसे शक्य आहे?
उत्तर: => कारण तो इमारतीच्या आतून खिडक्या स्वच्छ करीत आहे.
20. एक माणूस चालत होता आणि पाऊस पडला.
त्याने छत्री आणली नाही किंवा टोपी घातली नाही.
त्याचे सर्व कपडे ओले झाले परंतु त्याच्या डोक्यावरचा एक केसही ओला झाला नाही.
हे कसे शक्य आहे?
उत्तर: => तो माणूस टकला आहे.
मित्रांनो तुमच्या कडे सुद्धा काही अशीच Marathi Kodi असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये त्यांच्या नोंद करा आम्ही तुम्ही दिलेली मराठी कोडी आमच्या या वेबसाईट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.
हे देखील वाचा
Nice
Nice
Blablablabla everyone are mad hahahaha
आधी होती साळी भोळी मग लेली हिरवी चोळी आली रंगला न हात लावू देईना अंगाला
मिरची
MIrchi
Sang majhya manat ky chalay sangu shakta
जंगलमा रमणेवाली रातला पाणी पिणारी बुड इंडा मेकणे – वाली ची कुण? Please reply answer of this puzzel.