National honors and awards in Marathi | राष्ट्रीय सन्मान व पुरस्कार

National honors and awards in Marathi | राष्ट्रीय सन्मान व पुरस्कार

१. भारतरत्न :-

हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असून, हा भारताच्या राष्ट्रपतींकडून प्रतिवर्षी साहित्य ,कला ,विज्ञान ,सामाजिक सेवा आदी क्षेत्रांत असामान्य आणि अव्दितीय कार्य करणाऱ्या महनीयांना प्रदान केला जातो .

हा सामान्य देण्यास देशात १९५४ पासून सुरुवात झाली .

भारतरत्न सन्मानाचे मानकरी

मानकरी वर्ष
१. डॉ. सर्वपल्ली राधाकुष्णन १९५४
२. डॉ. सी. राजगोपालाचारी १९५४
३. डॉ. सी. व्ही. रामन १९५४
४. डॉ. भगवानदास १९५५
५. डॉ. मोक्षगुंडम विश्र्वेश्र्वरय्या १९५५
६. पं. जवाहरलाल नेहरू १९५५
७. गोविंद वल्लभ पंत १९५७
८. डॉ. धोंडो केशव कर्वे १९५८
९. डॉ. बिंधनचंद्र रॉय १९६१
१०. पुरुषोत्तम दास टंडन १९६१
११. डॉ. राजेंद्रपसाद १९६२
१२. डॉ. झाकीर हुसेन १९६३
१३. डॉ. पांडुरंग वामन काणे १९६३
१४. डॉ. लालबहादूर शास्त्री (मरणोत्तर) १९६६
१५. श्रीमती इंदिरा गांधी १९७१
१६. वराहगिरी वेंकटगिरी १९७५
१७. कुमारस्वामी कामराज (मरणोत्तर) १९७६
१८. मदर टेरेसा १९८०
१९. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) १९८३
२०. खान अब्दुल गफार खान-सरहद गांधी १९८७
२१. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) १९८८
२२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर) १९९०
२३. डॉ. नेल्सन मंडेला १९९०
२४. वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) १९९१
२५. राजीव गांधी (मरणोत्तर) १९९१
२६. मोरारजी देसाई १९९१
२७. नेताजी सुभाषचंद्र बोस (मरणोत्तर) १९९२
२८. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) १९९२
२९. जे. आर. डी. टाटा १९९२
३०. सत्यजीत रे १९९२
३१. अरुणा असफअली (मरणोत्तर) १९९७
३२. गुलझारीलाल नंदा १९९७
३३. सी . सुब्रमण्यम १९९८
३४. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम १९९८
३५. एम. एस. सुब्बलक्ष्मी १९९८
३६. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) १९९९
३७. डॉ अमर्त्य सेन १९९९
३८. पंडित रविशंकर १९९९
३९. गोपीनाथ बोर्डोलाई (मरणोत्तर) १९९९
४०. उस्ताद बिस्मिल्लाखॅ २००१
४१.लता मंगेशकर २००१
४२.पंडित भीमसेन जोशी २००८
४२.पंडित भीमसेन जोशी २००८
४३.डॉ . सी .एन .आर . राव २०१३
४४. सचिन तेंडुलकर २०१३
४५. पं . मदनमोहन मालवीय (मरणोत्तर ) २०१४
४६.अटलबिहारी वाजपेयी २०१४

 

२. पद्मविभूषण , पद्मभूषण व पद्मश्री :- या पदव्या व सन्मान कोणत्याही क्षेत्रात असामान्य व महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतात.

३. सैनिक शौर्य पदके :-

परमवीर चक्र :- लष्करी क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान , शत्रूशी झालेल्या लढाईत असामान्य पराक्रम करून आत्मबलिदान केलेल्या व शत्रूचा पराभव करण्यात कारणीभूत झाल्याबद्दल सर्वोच्च पदक दिले जाते.

महावीर चक्र :- हे दुसऱ्या क्रमांकाचे पदक होय. असामान्य धाडस,धैर्य आणि पराक्रमाबद्दल हे पदक दिले जाते.

वीरचक्र :- भूदल, नौदल  किंवा हवाईदलातील कोणाही सैनिकांनी दाखविलेल्या असामान्य शौर्याबद्दल हे पदक देण्यात येते. या शिवाय सरक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कर्तुंत्व दाखविणाऱ्यास अशोक चक्र ,कीर्ती चक्र शौर्य चक्र आदी पदके दिली जातात

Hello Friends My name is Rohit, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website.

2 thoughts on “National honors and awards in Marathi | राष्ट्रीय सन्मान व पुरस्कार”

Leave a Comment