New Marathi Kodi | मराठी शब्दकोडे | Latest Marathi Puzzles with Answers

New Marathi Kode | मराठी शब्दकोडे | Latest Marathi Puzzles with Answers

1. रमेश कडून १०० रुपयांचे सुट्टे पैसे मागितले गेले आणि अट ठेवली गेली कि त्यात १० रुपये नसले पहिले, तर सांगा पाहू रमेश ने ते सुट्टे पैसे कसे दिले असतील?
उत्तर: => 50+20+5+5+5+5+5+2+2+1=100


2. एका टोपलीमध्ये 10 सफरचंद होते. आपण आपल्या दहा मित्रांना बोलावून प्रत्येकाला एक सफरचंद दिला, तरीही एक सफरचंद टोपलीमध्ये राहिला. कसे ते सांगा?
उत्तर: => तुम्ही पहिल्या नऊ मित्रांना एक एक सफरचंद दिला, पण शेवटच्या मित्राला सफरचंदासह टोपली पण दिलीत. यामुळे टोपलीमध्ये एक सफरचंद राहिला


3. अस काय आहे जो ज्याच आहे तोच बघू शकतो आणि फक्त एकदाच बघू शकतो?
उत्तर: => स्वप्न (dream)


4. हत्ती जानेवारी आणि मार्च महिन्यांच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात का कमी पाणी पितो?
उत्तर: => कारण फेब्रुवारी महिन्यात 28 किव्हा 29 दिवसच असतात.


5. जपान मध्ये असे काय जन्माला येते जे पूर्ण जगात कुठेच येत नाही?
उत्तर: => जपानी


6. ओळखा पाहू असा कोणता दुकानदार आहे जो तुमचा माल पण घेतो आणि त्या मालाचे पैसे पण घेतो? 🤔
उत्तर: => न्हावी


7. माझ्या जवळ गळा आहे पण डोक नाही, बाजु आहेत पण हाथ नाही, ओळखा पाहू मी कोण? 🤔
उत्तर: => शर्ट


8. असा कोणता शहर आहे जो आपण खाऊ शकतो?
उत्तर: => पुरी


9. पाण्यापासून जन्माला येते आणि पाण्यातच मरून जाते, सांगा पाहू मी कोण?
उत्तर: => मीठ


10. जेव्हा माझी त्वचा सोलून काढली जाते तेव्हा मी रडत नाही पण तुम्हाला नक्की रडू येते सांगा पाहू मी कोण?उत्तर: =>कांदा


11. असा विचार करा कि तुम्ही एका गडद खोलीमध्ये आहात, मग सांगा पाहू तुम्ही तिथून बाहेर कसे पडाल?
उत्तर: => विचार करणे बंद करा.


12. असे काय आहे जे नेहमी येते परंतु कधीच येत नाही?
उत्तर: => येणारी वेळ


13. पैसे दुप्पट करण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता आहे? 🤔
उत्तर: => ते पैसे आरशासमोर ठेवा


14. असे काय आहे जे वर जाते पण कधीही खाली येत नाही? 🤔
उत्तर: => तुमचे वय


15. असे काय आहे जे प्रकाशात तुम्हाला कधीच एकटे सोडत नाही? 🤔
उत्तर: => सावली

Marathi Kode with Answer

16. आम्ही वीस लोक आहोत, प्रत्येक वेळी तुम्ही आमची डोके कापता पण आम्ही पुन्हा वाढतो, सांगा पाहू आम्ही कोण आहोत?
उत्तर: => पायाची आणि हाताची नखे


17. मोजण्यासाठी मला वापरले जाते, एका मिटतात करतो मी सगळे हिशोब सांगा पाहू मी कोण?
उत्तर: => Calculator


18. माझ्या नसा नसांमध्ये आहे गोड रस, जो कोणी माझं नाव सांगेल त्याला भेटतील दहा रुपये?
उत्तर: => जलेबी


19. अशी कोणती गोष्ट आहे जी पाण्यामध्ये पडल्यावर सुद्धा ओली होत नाही?
उत्तर: => सावली (Shadow)


20. A, H, I, R, D, A, M, U, L, A, T, H, I या इंग्लिश अक्षरांना अशा रीतीने सेट करा कि यातुन तीन शब्दांचा हिंदी रोमांटिक नाव बनेल?
उत्तर: => Dil Hai Tumhara


21. 1 रुपयाची 40 पक्षी
3 रुपयांचा 1 कबूतर
5 रुपयांचा 1 कोंबडा
तर सांगा पाहू 100 रुपयांना 100 पक्षी कसे येणार?
उत्तर: => 80 पक्षी = 2 रुपये
1 कबूतर = 3 रुपये
19 कोंबड्या = 95 रुपये
80 + 1 + 19 = 100
2 + 3 + 95 = 100


22. बुद्धिबळ किती चौकोन असतात?

उत्तर: => 204 चौकोन = 64 (1 X 1), 49 (2 X 2), 36 (3 X 3), 25 (4 X 4), 16 (5 X 5), 9 (6 X 6), 4 (7 X 7) आणि 1 (8 X 8)


23. जर एखादी ट्रेन दिल्लीहून जयपूरकडे 60 किमी प्रतितास वेगाने जाते आणि 30 किमी प्रतितास वेगाने परत येते तर तिची सरासरी वेग किती असेल?
उत्तर: => ताशी 40 किलोमीटर


 

Hello Friends My name is Rohit, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website.

Leave a Comment