कोणतीही भाषा हि वाक्यप्रचारामुळे टिकून राहते. एका विशिष्ट् शब्दाची जी एक योजना असते ,तिला वाक्यप्रचार म्हणतात .
Marathi Vakyaprachar (काही निवडक वाक्यप्रचार)
१) अंगाचा टिळ पापड होणे – अतिशय राग येणे.
२) आहुती देणे – सर्वस्व अर्पिणे.
३) अंगावर घेणे – जबाबदारी स्वीकारणे.
४) अस्मान ठेंगणे ठरणे – फार गर्व होणे.
५) अस्तनतिला निखारा – जवळची आपलीच माणसे शत्रू होणे.
६) उर फुटणे – अतिशय दुःख होणे.
७) उट्टे काठणे – सूद उगवणे .
८) आनंदावर विरजण पडणे – आनंदात अकस्मात व्यत्यय येणे .
९) दंड थोपटणे – आव्हान देणे .
१०) दुपारची सावली – फार थोडा काळ मिळणारे सुख .
११) दुधात साखर पडणे – चांगल्या गोष्टीत पुनः आणखी चांगली गोष्ट घडून येणे .
१२) थुंकी झेलणे – हा जी, हा जीकरून राहणे ,खुषमस्करी करणे .
१३) जीव टांगणे – अतिशय काळजी वाटणे .
१४) तिखट मीठ लावून सांगणे – कल्पनेने थोडी भर घालून रंजक करून सांगणे .
१५) बळी तो कान पिळी – सामर्थ्यवानापुढे नाइलाजाने नमावे लागणे .
१६) प्राण गहाण ठेवणे – वाटेल ती त्याग करण्यास तयार असणे .
१७) नांगी टाकणे – डिवचून बोलणे .
१८) रक्त सळसळणे – रागावणे .
१९) नाक मुरडणे – नापसंती दर्शविणे .
२०) तोंडास पाणी सुटणे – लोभ वाटणे .
२१) ताकास तूर लाग न देणे – महत्वाची बातमी लपवणे .
२२) दाटी तृण धरणे – शत्रूला जेरीस आणणे .
२३) कानपूर ओस पडणे – माणूस म्हतारा झाला कि , त्याला नीट ऐकू येत नाही . म्हणून ‘कानपूर’ ओस पडणे म्हणतात .
२४) काळीज काढून देणे – प्रिय व्यक्तीसाठी कात वाट्टेल ते करण्यास तयार होणे .
२५) कानावर हात ठेवणे – आपणास काहीही ज्ञान नाही, असे सांगणे .
२६) मुठीत ठेवणे – ताब्यात ठेवणे .
२७) नाकी नऊ येणे – काम करताना खूप त्रास होणे .
२८) डोळे उघडणे – खरी परिस्थिती कळणे .
२९) बांगड्या भरणे – नामर्द बनणे .
३०) हा हा म्हणता – अल्पावधीत .
३१) रसातळास जाणे – संपूर्ण नाश होणे .
३२) देव्हारे माजवणे – स्तोम माजवणे .
३३) पगडा बसणे – छाप उमटणे .
३४) धारातीर्थी पडणे – समरांगणावर मरण येणे .
३५) चकमक झडणे – खटका उडणे .
३६) ताळतंत्र पाहणे – काळ पाहून वागणे .
३७) रंजीस येणे – कंटाळून जाणे .
३८) देव पावणे – मनोरथ पूर्ण होणे .
३९) अळवावरचे पाणी – अस्थिर वस्तू .
४०) ओफस होणे – निष्फळ होणे .
४१) साखर पेरणे – गोडगोड बोलून आपलस करणे .
४२) सळो कि पळो करणे – खूप त्रास देणे .
४३) लष्कराच्या भाकरी भाजणे – आपला संबंध नसलेल्या गोष्टीत अकारण लक्ष घालणे .
४४) तिलांजली देणे – आशा सोडणे .
४५) उदो उदो करणे – एखादयची खूप स्तुती करणे .
४६) मुठीत ठेवणे – ताब्यात ठेवणे .
४७) गगनाला गवसणी घालणे – पूर्णपणे अशक्य वाटणारी गोष्ट शक्यतेत आणू पाहणे .
४८) धाबे दणाणणे – अतिशय भीती वाटणे .
४९) आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणारा ? – मुळात नसेल तर ते बाहेर कसे येणार ?
५०) जेथे भरेल दरा ,तोच गाव बरा – जेथे पोटापाण्याची वारी सोय होईल ,तेच ठिकाण चांगले ,असे मानणे .
५१) हलक्या कानाचा असणे – मनात किल्मिष निर्माण होणे .
५२) खडा टाकून पाहणे – अंदाज घेणे .
५३) उखळ पांढरे होणे – भरपूर फायदा होणे .
५४) छातीचा कोट करणे – परक्रमाची शर्थ करणे .
५५) मी मी म्हणणे – माझे स्वतःचे तेच खरे असा अहंकार दर्शविणे .
५६) विडा उचलणे – एखादी गोष्ट करण्याचा ठाम निश्र्चय करणे .
५७) आग पाखडणे – शिव्यांची लाखोली वाहणे .
५८) सटीसामासी – केव्हातरी .
५९) अअळीमिळी गुपचिळी – गप्प बसणे .
६०) आगापिछा – कुठलेही बंधन नसणे .
६१) चुलततट्टू – कामचुकार .
६२) नंदीबैल – बिनडोक .
६३) घटोत्कचाच बाजार – सौदेबाजी,फावेगिरी .
६४) हरभऱ्याच्या झाडावर चढविणे – खोटी स्तुती करणे .
६५) विकतचे श्रध्दा घेणे – निरर्थक उद्योग करणे .
६६) पांघरूण घालणे – दोष झाकणे .
६७) पोटात घालणे – क्षमा करणे .
६८) हात देणे – मदत करणे .
६९) डोळ्यात गंगा यमुना येणे – अश्रू येणे .
७०) चर्वितचर्वण करणे – तीच ती गोष्ट पुनः पुनः घोळणे .
७१) खडा टाकून पाहणे – अंदाज घेणे .
७२) घोडा मैदान जवळ असणे – परीक्षेचा प्रसंग जवळ असणे .
७३) अवदसा आठवणे – वाईटाची इच्छा होणे .
७४) कणीक तिंबणे – चांगला बदडून काढणे .
७५) आगीत तेल ओतणे – भांडण विकोपाला जाईल असे करणे .
७६) कपाळमोक्ष करणे – डोळ्यास जखम करणे .
७७) ओजळीने पाणी पिणे – दुसऱ्याच्या मताप्रमाणे वागणे .
७८) एका नावेत असणे – एकच परिस्थिती असणे .
७९) डोळ्यात तेल घालून पाहणे – फार काळजीपूर्वक पाहणे .
८०) तळीराम गार करणे – कोणत्याही उपायाने पोट भरणे.
८१) मुळावर येणे – नाशास कारणीभूत होणे .
८२) वडाची साल पिंपळाला चिकटविणे – नसता संबंध जोडणे .
८३) तारंबळ होणे – फार घाई होणे .
८४) उदरी शनी येणे – विशेष फायदा होणे .
८५) दत्त म्हणून उभे राहणे – अकस्मात समोर प्रकट होणे .
८६) तोंडपाटीलकी करणे – खूप कष्ट करणे .
८७) मन्वतर होणे – काळ बदलणे .
८८) फुले वेचली तेथेच गोवऱ्या वेचणे – श्रीमंती जाऊन गरिबी येणे .
८९) हाडाची कडे करणे – खूप कष्ट करणे .
९०) गळ्यात पडणे – एखाद्याला खूप भीड घालणे .
९१) जग जग पछाडणे – कमालीचा प्रयत्न करणे .
९२) कंठस्नान घालणे – ठार मारणे .
९३) गंगेत घोडे न्हाणे – कार्य तडीस गेल्यावर खूप समाधान वाटणे .
९४) खो घालणे – विघ्न निर्माण करणे .
९५) कानावर पडणे – सहजगत्या माहित होणे .
९६) ताळ्यावर आणणे – योग्य समज देणे .
९७) तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे – मिळालेल्या संधीच लाभ उठविणे .
९८) जीव कि प्राण असणे – प्राणाइतके प्रिय असणे .
९९) प्राणावर उदार होणे – जीवाची पर्वा न करणे .
१००) पाठीशी घालणे – संरक्षण देणे .
१०१) पिच्छा पुरवणे – सतत त्रास देणे .
१०२)संधान बांधणे – जवळीक निर्माण करणे .
१०३) समरस होणे – एकरूप होणे .
१०४) विचारांना पंख फुटणे – विचारांना गती येणे .
१०५) वाटाण्याच्या अक्षता लावणे – स्पष्टपणे नाकारणे .
१०६) हूल देणे – चकविणे