Indian culture Information in Marathi | भारतीय संस्कृती
आर्याचे ग्रंथ
चार वेद :- १.ऋग्वेद २.यजुर्वेद ३.सामदेव ४.आथर्वदेव
१.ऋग्वेद :- ऋग्वेदात निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती गाणारी कवने आहेत त्यांमध्ये केलेले निसर्गाचे वर्णन अतिशय काव्यमय आहे. ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास ‘ऋचा’ आहे म्हणतात. ऋग्वेद हा आर्याचा आद्य ग्रंथ होय.
२. यजुर्वेद :- यजुर्वेद हा वेद याज्ञाविषयी माहिती सांगणारा ग्रंथ आहे. यज्ञात वापरायचे मंत्र आणि त्या मंत्राची गद्यात केलेली स्पष्टीकरणे त्यात आढळतात.
३. सामदेव :- ऋग्वेदातील काव्याचे तालासुरात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेदात केलेले आहे. सामदेव हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो. हा वेड सर्वात लहान आहे .
४. अथर्ववेद :- अथर्ववेदाचे स्वरूप वर उल्लेखलेल्या वेदांपेक्षा निराळे आहे. यात तत्त्वज्ञानाबरोबर दैनंदिन जीबनातील अडचणी,संकटे, पीडा व दुःख यावर उपाय सांगितले आहेत. औषधी वनस्पतींची माहितीही अथर्ववेदात दिलेली आहे.
महाकाव्य :- १. रामायण २. महाभारत
चार वर्ण :- १.ब्राह्मण २. क्षत्रिय ३. वैशय ४. शूद्र
चार आश्रम :- १. ब्रह्मचर्यश्रम २. गृहस्थाश्रम ३.वानप्रस्थाश्रम ४. सन्यासाश्रम