Guess the food name puzzles in Marathi | खवय्येगिरी, चला कोडे सोडवा

Guess the food name puzzles in Marathi | खवय्येगिरी, चला कोडे सोडवा

1. पौष्टीकतेत मी आहे सर्व पदार्थांचा राजा
ताई माई पाहुण्या आल्या की,
भाव वाढतो माझा

उत्तर: => आमरस


2. तांदळाची असली तरी
पोट माझे फुगते
हलकी फुलकी असल्याने
सर्वांशी जमते

उत्तर: => इडली / तांदळाची भाकरी


3. पानाचे ठेवले पदरावर पदर
बेसनाच्या सारणाची त्यामधे भर
चवीला हवा , चिंचेचा गर
वाफवुन तळा भरभर

उत्तर: =>अळूवडी


4. बेसन पीठ भिजवुन
तळा कळ्या खमंग
रुचिपालट करीता
दह्याशी जोडावा संग.

उत्तर: => बुंदी / दही बुंदी


5. रवा मैद्याची पोटली
तुपात तळली साखरेत घोळली
घडी सुटु नये म्हणुन
काळी चांदणी टोचली

उत्तर: => लवंगलतिका


6. आकार माझा गोल, चेहरा खडबडीत
अहो पदार्थ बिघडेल करु नका
गडाबडीत

उत्तर: => अनारसा


7. आजीने मला किसलं, साखरेत घोळलं
आंबट गोड चव चाखुन पावणं खुष झालं

उत्तर: => मुरांबा


8. बेसन,साखर ,तुप सार्यांचे मिश्रण यात
एका शहराच्या नावाने
होते सुरुवात

उत्तर: => म्हैसूर पाक


9. गुळ खोबरे नैवेद्याला
पांघरुन पांढरा शेला
सखी सुगरणी ऐन
पावसात घडवी याला

उत्तर: => उकडीचे मोदक


10. साखर खवा सुगंधासाठी
विलायची टाका जपुन
फळाफुलांच्या नावानेच
उर येतो भरुन

उत्तर: => गुलाबजाम


11. छिद्राचे गोल वडे तुपात तळले
पाकात घोळवले..

उत्तर: घेवर / बालूशाही


12. बेसन कांदा ,मिरची भारी
गरम खाण्याची मजाच न्यारी

उत्तर: => भजी


13. रवा मैदा साटे,तुपात तळले
साखरेत घोळले,
सुगरणीचा हात लागता
तोंडात विरघळले.

उत्तर: => चिरोटे


14. रवा मैद्याची पारी ,कापुन टाकली पाकात,
पदर पदर सुटुन दिसला नवीन रुपात..

उत्तर: => चंपाकली


15. भाजल्या तांदुळ डाळी
त्यात तीळ ओवा
गोडानंतर सगळे म्हणती
हाच पदार्थ हवा

उत्तर: => चकली


16. लाडवात लाडु वर मधुर
रवाळ खवा
फ्युजन पदार्थात,लपलाय
बंगाली मेवा…

उत्तर: => संदेश


17. खारे किंवा गोड,
रंग माझा वेगळा
वरुन कठीण कुरकुरीत
आत भाव भोळा.

उत्तर: => शंकरपाळी


18. आधी बांधुन बूंधुन
टांगुन ठेवतात खुंटीला
मग मात्र गोडीगुलाबीने
जवळ केले मला

उत्तर: => श्रीखंड


19. तावुन सुलाखुन मी सुदृढ झाले
नंतर नशिबी रुपेरी कोंदण
आले.
उत्तर: => बर्फी


20. बालपणी माखले तुपात
तारुण्य फुलले दुधात
गोड मऊ म्हातारपण
सांगा पाहु मी कोण

⇒ उत्तर: सुतारफेणी


Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.