Marathi Mhani Puzzle on Whatsapp with Answers | चला म्हणी पुर्ण करूया

म्हणीच्या शब्दाचे पहिले अक्षर आपणांस दिले आहे. त्यावरून अर्थपुर्ण म्हण तयार करावयाची आहे.

उदाहरण,
अ ते मा
=> अती तेथे माती

१. ज्या गा बो त्या गा बा

उत्तर: => ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी (एकच स्वभाव असलेल्या माणसाने एकमेकांची वर्मी काढण्यात अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणची असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात.)


२. ना सो हा क वा

उत्तर: => नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा (नाव मोठे लक्षण खोटे.)


३. आ पो म वि

उत्तर: => आधी पोटोबा मग विठोबा (प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर देव – धर्म करणे)


४. ना मो ज

उत्तर: => नाकापेक्षा मोती जड(मालकापेक्षा नोकर शिरजोर असणे)


५. मू लो भां व घ बां

उत्तर: => मूर्ख लोक भांडते वकील घर बांधते (मूर्खांचे भांड अन् तिसऱ्याचा लाभ)


६. उ जी ला टा

उत्तर: => उचलली जीभ लावली टाळ्याला (दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे)


७. सा गां मा ए ना का

उत्तर: => सारा गांव मामाचा एक नाही कामाचा(जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे पण त्यापैकी कोणाचाच उपयोग न होणे)


८. ए गा मा म्ह दु वा मा न

उत्तर: => एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये(दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये.)


९. दु डों सा

उत्तर: => दुरून डोंगर साजरे – (कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते; परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते.)


१०. आ तो बा दु ते का

उत्तर: => आपला तो बाब्या दुसर्याचे ते कारटे – (स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे.)


११. गा वा गी रा गों ब हो

उत्तर: => गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. – (मुर्खाला कितीही उद्देश केला तरी त्याचा उपयोग नसतो.)


१२. गा पा गो

उत्तर: => गाढवाच्या पाठीवर गोणी. – (एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा.)


१३. खा का भु भा

उत्तर: => खायला काळ भुईला भार. – (निरूपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो.)


१४. अ सं आ प्रा गा

उत्तर: => असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. – (दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो.)


१५. अ ह गा पा ध

उत्तर: => अडला हरी गाढवाचे पाय धरी. (एखाद्या बुद्धीमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते)


१६. अं का म क

उत्तर: => अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण. – (मरण्याच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात.)


१७. अ झा गा अ पो फु दे

उत्तर: => अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे. (कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच)


१८. आं मा ए डो दे दे दो डो

उत्तर: => आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे (अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे)


१९. आ उ त्या फा मा

उत्तर: => आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास (मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक, अवस्था निर्माण होणे.)


२०. अ न खे रा वी न घ रा

उत्तर: => अठरा नखी खेटरे राखी, वीस नखी घर राखी (मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते.)


Hello Friends My name is Rohit, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website.

16 thoughts on “Marathi Mhani Puzzle on Whatsapp with Answers | चला म्हणी पुर्ण करूया”

  1. अ नि स्व डी र का सा शं री ची भ चं चा ना पा या पसुन मराठी म्हण संगा

    Reply
  2. एक म्हण ओळखा
    स व र ना प ड्या र्य कुं ची त धा प

    Reply
  3. खालील म्हण ओळखा.
    ढी ना भु ही ही ना व ना व ए त्रि ग्वा म त

    Reply
  4. ‘मा त ले गा त वा ‘ही आद्याक्षरे वापर करून म्हण सांगा.

    Reply
  5. ळ त ळ ज णा शी व धु णा व शी दे एक म्हण शोधा

    Reply

Leave a Comment