शब्दसमूहाबद्दल एक शब्द | One word substitution In Marathi

१) ज्याचा थांग लागत नाही असे – अथांग

२) देव आहे असे मानणारा – आस्तिक 

३) ‘भले होवो’ अशी मंगल कामना – आशीर्वाद 

४) दक्षिण सामुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यत – आसेतुहिमाचल 

५) अग्नीची पूजा करणारा – अग्नीपूजक 

६) मोजता येणार नाही इतके – असंख्य ,अमाप 

७) जयचा कधीच विसर पडत नाही असा – अविस्मरणीय 

८) अन्नदान करणारा – अन्नदाता 

९) खूप दानधर्म करणारा – दानशूर 

१०) जिवाला जीव देणारा- जिवलग 

११) जाणून घेण्याची इच्छा असणारा – जिज्ञासू 

१२) दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा – कनवाळू 

१३) कामाची टाळाटाळ करणारा – कामचुकार 

१४) धर्मस्थान करणारा – धर्मसंस्थापक 

१५) देशासाठी झटणारा – देशभक्त ,देशभक्ती 

१६) कोणत्याच पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा – निष्पक्षपाती 

१७) हट्टीपणा करणारा – दुराग्रही 

१८) ईश्वराचे अस्तित्व न मानणारा – नास्तिक 

१९) दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी 

२०) जुन्या मातांना चिकटून राहणारा – पुराणमतवादी ,सनातनी 

२१) नवीन मते स्वीकारणारा – पुरोगामी 

२२) दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी

२३) थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुस्ट 

२४) अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा – अष्टावधानी 

२५) एखाद्या संस्थेची स्थापना करणारा – संस्थापक 

२६) सेवा करणारा – सेवक 

२७) सत्यासाठी झगडणारा – सत्याग्रही 

२८) एकाच काळातील – समकालीन 

२९) शभंर वर्षे आयुष्य जगणारा – शतायुषी 

३०) स्वतःचे काम स्वतःच करणारा – स्वावलंबी

३१) स्वतःच्या इच्छेप्रमाणे खैरपणे वागणारा – स्वच्छदी 

३२) श्रम करून जीवन जगणारा – श्रमिक 

३३) दुसऱ्याचे भाषण ऐकणारा – श्रोता 

३४) श्रद्धा देऊन वागणारा – श्रद्धाळू 

३५) वाट दाखविणारा – वाटाड्या 

३६) देशासाठी प्राण अर्पण करणारा – हुतात्मा 

३७) स्वतःच्या हिताचा त्याग करणारा – स्वार्थत्यागी 

३८) क्षमा करणारी वृत्ती असणारा – क्षमाशील 

३९) सभेत धीटपणे भाषण करणारा- सभाधीट 

४०) शत्रूकडील बातमी काढून आणणारा – हेर 

४१) हातात चक्र असलेला – चक्रपाणी 

४२) विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा – ध्येयनिष्ठ 

४३) दैवावर हवाला ठेवून वागणारा – दैववादी 

४४) जगाचा स्वामी – जगन्नाथ 

४५) श्रम न करता खाणारा – ऐतखाऊ 

४६) केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा – कृतज्ञ 

४७) केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा- कृतघ्न 

४८) कलेची आवड असणारा – कलाप्रेमी 

४९) दुसऱ्याच्या मनातले जाणणारा – मनकवडा 

५०) दगडावर कोरीव काम करून मूर्ती बनविणारा – मूर्तिकार 

५१) उदयाला येत असणारा – उद्योमुख 

५२) अस्वलाचा खेळ खेळणारा – दरवेशी 

५३) चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चौक ,चव्हाटा 

५४) तीन रस्ते एकत्र येतात ती जागा – तिठा 

५५) गावच्या न्यायनिवड्याची जागा – चावडी 

५६) आकाशात गमन करणारा – खग 

५७) पाण्यात राहणारे प्राणी – जलचर 

५८) न टाळता येणारे – अटळ 

५९) कधीही मरण नसणारे – अमर 

६०) ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही आसे – अतुलनीय 

६१) आवरता येणार  नाही असे – अनावर 

६२) वर्णन करता येणार नाही असे – अवर्णनीय 

६३) कधीही ज्याचं नाश नाही होत ते – अविनाशी 

६४) किल्याच्या भोवती बांधलेली भिंत – तट 

६५) मनात इच्छिलेले देणारा मणी – चिंतामणी 

६६) इच्छिलेली वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष – कल्पवृक्ष 

६७) कोणत्याही क्षेत्रात एकाएकी घडून येणार मोठा बदल – क्रांती 

६८) हळूहळू घडून येणारा बदल – उत्क्राती 

६९) धान्य साठविण्याची जागा – कोठार 

७०) दोनदा जन्मलेला – व्दिज

७१) कार्य करणारी जागा – कर्मभूमी 

७२) कसलाही लोभ नसलेला – निर्लोभी 

७३) वाटसरूंना राहुटीसाठी धर्मार्थ बांधलेली इमारत – धर्मशाळा 

७४) तीन महिन्यांनी प्रसिध्द होणारे – त्रैमासिक 

७५) पंधरा दिवसांनी प्रसिध्द होणारे – पाक्षिक 

७६) राजाची स्तुती करणारा – भाट 

७७)  जणांचा कारभार – बारभाई 

७८) मृत्यूवर विजय मिळवणारा – मृत्युजंय 

७९) मोजकेच बोलणारा – मितभाषी 

८०) मोजकेच आहार घेणारा – मिताहारी 

८१) ज्याला खूप माहित आहे आसा – बहुश्रुत 

८२) आईवडील  नसलेला – पोरका 

८३) न्यायाच्या बाबतीत कठोर असणारा – न्यायनिष्ठुर 

८४) पुरामुळे नुकसान झालेले लोक – पूरग्रस्त 

८५) पाणी मिळवण्याची केलेली फुकट सोय – पाणपोई 

८६) मुद्याला धरून असलेले – मुद्देसूद 

८७) शेजाऱ्यांशी वागण्याचर कर्तव्य – शेजारधर्म 

८८) बोधपर वचन – सुभाषित 

८९) लोकांना आवडणारा – लोकप्रिय 

९०) संकटाचे निवारण करणारा – विघ्न्ह्रर्ता 

९१) वर्षाने प्रसिध्द होणारे – वार्षिक 

९२) स्वतःशी केलेले भाषण – स्वागत 

९३) राजाचे बसवायचे आसन – सिहासन 

९४) आपल्याच देशात तयार  झालेली – स्वदेशी 

९५) मोजक्या शब्दात सांगितलेले तत्त्व – सूत्र 

९६) हृदयाला जाऊन भिडणारे – हृदयंगम 

९७) क्षणात नष्ट होणारे – क्षणभंगुर 

९८) दोन नद्या एकत्र मिळवण्याचे ठिकाण – संगम 

९९) दगडावर कोरलेले लेख – शिलालेख

१००) जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण – क्षितिज  

7 thoughts on “शब्दसमूहाबद्दल एक शब्द | One word substitution In Marathi”

  1. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा
    देवाचे अस्तित्व मानणारा

    Reply

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.